चाळी-फ्लॅटातील घरात
नवराबायकोंमधे मारझोड होउन
पूर्ण होतेय
घरेलू हिंसा
मार बसला पण हिंसेचे काय?
काही म्हणतात, मारझोड ही तर एक व्यथा
कोणी म्हणतं , ते तर प्रतीक,
अतिव्यक्त गाढवी प्रेमाचे
म्हणून सांभाळा रे
कधीमधी बेल वाजवून नाही थांबणार मारझोड
कारण बेल वाजवणारे येतील आणि जातील
पण ठणकत राहील , आठवत राहील
मनामनात ... तीच मारझोड
============================
आंबोळी ---------- १४-०३-२००९
प्रतिक्रिया
14 Mar 2009 - 12:25 pm | अवलिया
लईच फार्मात हाय रे आंबोळी....
--अवलिया
14 Mar 2009 - 4:03 pm | मनीषा
छान आहे .
पण ठणकत राहील , आठवत राहील
मनामनात ... ......................... सुंदर !
15 Mar 2009 - 11:51 am | भडकमकर मास्तर
" स्त्रीने पुरुषांना मारहाण केली तर त्यांनी काय काय करावे " याविषयीची जालावर नुकतीच चर्चा वाचली होती ती आठवली...
मारझोड कोणीही केली तरी वाईटच...
प्रोफेसर आंबोळे यांचे घरेलू हिंसेबद्दलचे मौलिक विचार फार आवडले...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
15 Mar 2009 - 12:59 pm | अनंता
प्रोफेसर आंबोळे यांचे घरेलू हिंसेबद्दलचे मौलिक विचारानुभव फार आवडले...
16 Mar 2009 - 7:45 am | सहज
आंबोळीशेठ उर्फ कंदीलकुमार बरेच दिवसांनी लिव्हलेत.
अजुन येउ दे!!
16 Mar 2009 - 9:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता मस्त रे ! पण त्या कंदिलाच्या मरणाचे किस्से येऊ दे यार !
-दिलीप बिरुटे