(सांगावा)

आंबोळी's picture
आंबोळी in जे न देखे रवी...
14 Mar 2009 - 10:07 am

प्रेरणा : क्रांति यांची जोगवा

बरेच दिवसाच्या गॅप नंतर अचानक आलेला हा सांगावा गुरुवर्य केशवसुमार याना अर्पण !

नातेवाईकांच्या गावातून कुणी सांगावा धाडला?
जीव पाखरू होऊन कुणाचा अभाळा भिडला
वैशाखातल्या दुपारी असा घाला हा घातला ?
काम धाम सोडा, चला टापशी गुंडाळा
आला मैफलीला रंग , रडू हुंदक्याला भेटला
अंतरात दु:खाचा असा उमाळा दाटला
बुक्कागुलाल लाऊन दारी मुडदा डोलला
देऊया खांदा त्याला आता लोकाना बोलवा
झाकला लाकडानी बघा काडीही लावली
जरा थांबा कवटी आता फुटेल आतली

=======================
कंदीलसुमार.............. १४-०३-२००९

विडंबन

प्रतिक्रिया

अवलिया's picture

14 Mar 2009 - 10:11 am | अवलिया

मार लेका लोकांना दिवसा कंदिल पेटवुन पेटवुन...

--अवलिया

क्रान्ति's picture

14 Mar 2009 - 2:36 pm | क्रान्ति

खरच जोरदार विडम्बन आहे. अगदी सीन उभा केला समोर!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

प्रमोद देव's picture

14 Mar 2009 - 2:47 pm | प्रमोद देव

आंबोळीशेठ,अगदी झोकात पुनरागमन केलंत!

अवांतरः मध्यंतरीच्या काळात कंदिलाच्या मदतीने किती मुडदे पाडलेत?

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

भडकमकर मास्तर's picture

14 Mar 2009 - 3:06 pm | भडकमकर मास्तर

एकदा मी सहज कोल्हापुरातून फिरत असताना ताराबाई पार्कात मला प्रोफेसर आंबोळे भेटले. ते फार गप्पिष्ट. एकदा भेटले की कथा सांगतातच. तर ते म्हणाले,"मुडदा कितीही झाकला तरी कवटी फुटायची थांबत नाही." मला आश्चर्य वाटले. मी म्हणालो, " असे का?" तर त्यांनी स्वतः अनुभवलेली एक कथा सांगायला सुरुवात केली.

क्रमशः

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Mar 2009 - 3:26 pm | बिपिन कार्यकर्ते

हे भगवाऽऽऽऽन!!!!!!!!!!!!!!!!

आधी या आंबोळ्याचं विडंबन आणी वर मास्तराचा प्रतिसाद..... =)) =)) =)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Mar 2009 - 4:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मग काय? =))

कविता एक भारी आणि मास्तरांचा प्रतिसाद दहा भारी ... मास्तर, पुढील प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

आंबोळी's picture

16 Mar 2009 - 12:23 pm | आंबोळी

अहो मास्तर,
अशा कवट्या अनेक गावात फुटतात.झुम्रितलयात -ज्या गांवाचं नांव हिंदी "फिलमच्या ष्टोरीत" नेहमी वापरतात- त्यात सुद्धा.
बाकी तुम्ही दिलेली पदवी आम्ही आजपासून कायम वापरणार.
एक विनंती,
"दिल-पे -मत- ले -यार"

प्रो. आंबोळी

मदनबाण's picture

16 Mar 2009 - 12:57 pm | मदनबाण

बुक्कागुलाल लाऊन दारी मुडदा डोलला
देऊया खांदा त्याला आता लोकाना बोलवा

हा..आत्ता कसं... तरीच म्हंटल अंबोळीरावांनी अजुन तिरडी सजवली कशी न्हांय ते !!! ;)
लगे रहो....

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.