भाजप सरकार - दिल्ली ते गल्ली. प्रतिमा आणि वस्तुस्थिती .

अभिजित - १'s picture
अभिजित - १ in राजकारण
17 Sep 2018 - 1:15 pm

2019
मोदी भाजप सरकारचा कारभार अतिशय उत्तम चालू आहे असे इथल्या बहुसंख्य जनतेचे मत आहे. आनंद आहे. मी आता एक नवीन धागा काढत आहे. जिथे फक्त सरकारची उलट सुलट नीती / बनवा बनवी / जनतेची पिळवणूक कशी चालते याच्या "फक्त बातम्या" टाकणार आहे. अर्थात लिंक्स. सर्व तटस्थ जनतेला आमंत्रण आहे इथे !! इथे कोणतीही चर्चा अपेक्षित नाही. मोदी प्रेमी जनतेने याला उलट उत्तर म्हणुन कारभार कसा उत्तम चालू आहे यावर नवीन धागा काढावाच. तिकडे जरूर लिंक्स द्या. आता ४/५ महिन्यात परीक्षा आलेली आहे. त्या मुळे हे होणे जरुरीचे आहे.
अजून एक - पूर्वानुलोकन म्हणून हि हा धागा उपयोगी पडेल.
भक्तांनी सुरुवात करावी GST / रेरा / UPI पेमेंट इ इ पासून . आगे बढो !!

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

23 Sep 2018 - 10:50 am | मार्मिक गोडसे

मी विचारलेत त्याला उत्तर न देता प्रतिप्रश्न करण्यात काय विशेष आहे?
माझ्या प्रतिसादात तुम्ही नक्की काय विचारायला हवे ते मी सांगितले आहे.
घोटाळा झाला असेल तर त्याची चौकशी करून करणाऱ्यास शिक्षा करता येते , अपहार केलेली रक्कम जमल्यास वसुलही करता येते. इथे तर मोदींनी नोटबंदीचे उद्दिष्टे स्पष्ट न सांगता निरपराध जनतेलाच वेठीस धरले .त्यांच्या नोटा बदलून मिळालेल्या रकमेचे मूल्य घटले हे तरी मान्य आहे का तुम्हाला? मान्य असेल तर ते कोणाकडून आणि कसे वसूल करणार? ह्या मुर्खपणाची त्याला काय शिक्षा करणार?

हे मात्र खरं आहे नोटबंदी चा निर्णय चुकीचा होता , उद्देश चांगला होता पण नीट राबविण्यात अपयश आले त्यामुळे नोटबंदी घोटाळा कधीच नव्हता .
नोटबंदी च्या वेळी काळा पैसे सर्व पक्षीय नेते एकमेकांच्या गळ्यात गळे घालून पांढरा करत होते . त्यावेळेस भाजप ,काँग्रेस ,सेना , घड्याळ वाले यासगळ्या च्या एक से एक सुरस कथा बाहेर आल्या होत्या . व तुमच्या आमच्या सारखे पाच पन्नास हजार उत्पन्न असलेले इथं मिपावर शब्दांवर बोट ठेवून ' अगोदर मी प्रश्न विचारला होता , त्याचे उत्तर द्या ' असे बालिश प्रश्न करत बसले आहेत .

विशुमित's picture

23 Sep 2018 - 5:04 pm | विशुमित

Trump बाळा
व्यक्तिगत टिपण्णी टाळली तर बरं होईल.

ट्रम्प's picture

23 Sep 2018 - 8:39 pm | ट्रम्प

विशुमित पोरा !!
मी दिलेल्या पुढील प्रतिसादा मध्ये कुठे व्यक्तिगत टिप्पणी दिसली सांग बरं !

( हे मात्र खरं आहे नोटबंदी चा निर्णय चुकीचा होता , उद्देश चांगला होता पण नीट राबविण्यात अपयश आले त्यामुळे नोटबंदी घोटाळा कधीच नव्हता .
नोटबंदी च्या वेळी काळा पैसे सर्व पक्षीय नेते एकमेकांच्या गळ्यात गळे घालून पांढरा करत होते . त्यावेळेस भाजप ,काँग्रेस ,सेना , घड्याळ वाले यासगळ्या च्या एक से एक सुरस कथा बाहेर आल्या होत्या . व तुमच्या आमच्या सारखे पाच पन्नास हजार उत्पन्न असलेले इथं मिपावर शब्दांवर बोट ठेवून ' अगोदर मी प्रश्न विचारला होता , त्याचे उत्तर द्या ' असे बालिश प्रश्न करत बसले आहेत . )

राहिला प्रश्न नाक खूपसण्याचा , कट्ट्यावर चर्चा करण्यापेक्षा गा पै ला व्य नीं पाठवायचा म्हणजे इतर लोक चर्चेत उतरले नसते .
माझ्या प्रतिसदा मध्ये जर काही मानहानीकारक वाटलं तर मिपावर कायदा सुव्यवस्था राखण्यास संपादक मंडळ भक्कम आहे .

विशुमित's picture

23 Sep 2018 - 10:58 pm | विशुमित

उगी उगी...

विशुमित's picture

23 Sep 2018 - 1:42 pm | विशुमित

आधी प्रश्न मी विचारला होता. तो पण गापैंना. त्यात तुम्ही मधेच नाक खुपसलत. तुमचे मनोरंजन करायला म्हणून मुद्दाम प्रतिप्रश्न विचारला.
बाकी नोटबंदी चघळून चघळून पार चोथा झालेला विषय आहे.

विशुमित's picture

23 Sep 2018 - 1:46 pm | विशुमित

ओके.
तुमचे बरोबर आहे .घोटाळे करायला अक्कल लागते.
बालिशपणा म्हणू शकतो का?

तेजस आठवले's picture

23 Sep 2018 - 4:06 pm | तेजस आठवले

बरोबर.
नोटबंदीपूर्वी ५०० ची नोट बँकेत भरताना खोटी सिद्ध झाली की त्याचे मूल्य एकदम शून्य होत असे.

खेपा आणि खटाटोप लक्षात घेतला तर मग सरकारी कार्यालयात घालावे लागणारे खेटे, आधार कार्ड काढण्यासाठी केलेला प्रवास, सरकारी प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी लावलेल्या रांगा ह्या सर्वच गोष्टी पैश्यात रूपांतरित करून मग मूळ किमतीतून वजा कराव्या लागतील.

मार्मिक गोडसे's picture

23 Sep 2018 - 6:43 pm | मार्मिक गोडसे

आधार कार्ड काढण्यासाठी केलेला प्रवास, सरकारी प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी लावलेल्या रांगा ह्या सर्वच गोष्टी पैश्यात रूपांतरित करून मग मूळ किमतीतून वजा कराव्या लागतील.
तुम्हाला मुद्दा समजाला का? उदा: एखादी १० रु. ची वस्तू तुम्हाला फुकट जरी मिळत असेल, परंतू ती घेण्याकरता जर तुम्हाला प्रवास खर्च २० रु. इतका आला तर ती वस्तू तुम्ही फुकट मिळाली असं म्हणाल का?
इकडे तर सरकारने पर्यायच ठेवला नाही, त्यामुळे नागरिकांना नोटा बदलायला विनाकारण भुर्दंड पडला.

https://www.business-standard.com/article/companies/the-il-fs-fiasco-rep...
So it’s remarkable that India – itself a vocal critic of belt-and-road ( OBOR चायना !! ) allowed a local financier to do something similar on home turf, with little accountability or supervision.
A perennial paucity of budgetary resources has forced taxpayers to outsource infrastructure — not to the Chinese, but to local public-private partnerships led by IL&FS. However, in many instances, only the returns became private. Risks remained with the public.
five-year-old IL&FS was barely getting started with what would become its unique model: a financier that also conceived, executed and owned large projects. It offered to do all those things in 1992,
IL&FS-controlled Noida Toll Bridge Co. हे महत्वाचे आहे ..
When the Delhi and Noida governments gave the land, they had expected the expressway to be returned to them in 30 years. In 2008, though, it looked like the asset was going to be in private hands for at least 70 years. In 2016, a court called out the daylight robbery and ordered the toll plazas to be dismantled.

प्रचेतस's picture

21 Sep 2018 - 7:16 pm | प्रचेतस

ह्या धाग्यावरील भक्तांचे प्रतिसाद वाचून करमणूक झाली.

ट्रम्प's picture

21 Sep 2018 - 9:00 pm | ट्रम्प

आता सरकारच्या कामगिरी चा उहापोह करण्या इतकी अक्कल आली , हे बघून डोळे भरून आले .
एकदाच्या त्या गुलामगिरी च्या बेड्या तोडण्याची ताकत आली !!! .

गणामास्तर's picture

25 Sep 2018 - 3:22 pm | गणामास्तर

खरं खरं सांगा, वरच्या एकोळी प्रतिसादात तुम्हाला सरकारच्या कामगिरीचा उहापोह दिसला?

ट्रम्प's picture

25 Sep 2018 - 7:24 pm | ट्रम्प

अस काय करताय मास्तर !!!
60 /65 वर्ष गप्प होते आणि आता
5 वर्षात भाजप च्या कामगिरीचा हिशोब मागणारे , सर्व क्षेत्रात भाजप अपयशी ठरली अस मानणाऱ्या बद्दल वाक्य आहे ते .

ट्रेड मार्क's picture

22 Sep 2018 - 12:37 am | ट्रेड मार्क

मोदीत्रस्तांचे प्रतिसाद तुम्हाला लॉजिकल वाटत आहेत याची मला गंमत वाटली. त्यातूनही माझ्या एकही प्रतिसादाचा मुद्देसूद कोणीही प्रतिवाद केला नाही हे तुमच्या लक्षात आले नाही का? बिनडोक वाटणारे का असेना पण काही साधे प्रश्न मी विचारले आहेत, त्यातील एकाचेही उत्तर कोणीच देत नाहीये.

प्रचेतस's picture

22 Sep 2018 - 8:56 am | प्रचेतस

मोदीत्रस्तांचे प्रतिसाद तुम्हाला लॉजिकल वाटत आहेत याची मला गंमत वाटली

त्या विषयी मी काहीही भाष्य केलेलं नाही. माझा प्रतिसाद फक्त भक्तांविषयी आहे आणि जे भक्त नाहीत त्यांना तो गैरलागू आहे. :)

विशुमित's picture

22 Sep 2018 - 11:27 am | विशुमित

भक्तांना देव चांगलाच पावला आहे. त्यामुळे भक्त, भक्त राहिले नाहीत. आता फक्त गुलाम (पगारी) शिल्लक राहिले आहेत.

डँबिस००७'s picture

22 Sep 2018 - 6:43 pm | डँबिस००७

आता फक्त गुलाम (पगारी) शिल्लक राहिले आहेत. ... बाकीचे गेल्या ७० वर्षांत तयार झालेले वेठ-बिगार आहेत !!

विशुमित's picture

22 Sep 2018 - 9:56 pm | विशुमित

तुम्ही कशाला लोड घेताय..

नाखु's picture

25 Sep 2018 - 9:49 pm | नाखु

आणि भक्तांची व्याख्या तुम्ही फारच सुटसुटीत व सोयीस्कर केली आहे विद्यमान सरकारच्या कुठल्याही चांगल्या कामाचे कौतुक केले की तो तहहयात भक्त.
तुम्ही शिवसेनेचे सुप्त हितचिंतक वजा धोरण अवलंबिले आहे असं वाटतं.
मोदी उठले करा टिका,मोदी बसले करा टीका, फडणवीस आले घ्या आक्षेप,नाही आले तरी घ्या आक्षेप.

एकाच लेखाने भक्त हीच गोंदणजखम कपाळावर कोरली गेलेला आणि चांगल्या कामाला चांगलं म्हणण्याची वाईट्ट खोड असलेला (जी मिपावर सद्य परिस्थितीत अक्षम्य अपराध आहे) क्षुल्लक मिपाकर नाखु

भक्तांची मी न केलेली व्याख्या तुम्हाला नेमकी कुठे आढळली?
मी शिवसेनेचे सुप्त सुप्त हितचिंतक वजा धोरण अवलंबिले आहे हे तुम्हास कुठे दिसले?
मी मोदींवर/फडवणीसांवर टीका केलेली तुम्हास कुठे दिसली?

गामा पैलवान's picture

22 Sep 2018 - 1:24 pm | गामा पैलवान

विशुमित,

मग नोटबंदी काय होती?

नोटाबंदी हा घोटाळा असूच शकंत नाही. कारण की ९९ % हून अधिक पैसा परत रिझर्व्ह बँकेत जमा झाला आहे.

आ.न.,
-गा.पै.

नितिन थत्ते's picture

22 Sep 2018 - 2:31 pm | नितिन थत्ते

हे बाकी बरोबर असेल हां

हॅन्लनच्या तत्त्वानुसार

Never attribute to malice that which is adequately explained by stupidity.

नगरीनिरंजन's picture

19 Oct 2018 - 5:50 am | नगरीनिरंजन

=)) अगदी बरोबर. पण स्टुपिडिटी काय झाली ते गामा पैलवानांच्या प्राचीन मेंदूला कळण्याची शक्यता नाही. =))
दुर्दैवाने स्टुपिडिटी एवढीच समस्या नाहीय.
रिझर्व बॅंकेसकट इतर सर्व सरकारी संस्थांनी एका फुशारलेल्या नार्सिसिस्ट मूर्ख माणसापुढे लोटांगण घालणे हा सगळ्यात मोठा नैतिक व प्रशासकीय घोटाळा झाला आहे.
आर्थिक बाबतीत जर २जी “घोटाळ्याचे” लॉजिक लावले तर हा ३ लाख कोटींचा घोटाळा आहे.
केवळ २जी स्पेक्ट्रमचा लिलाव केला असता तर १ लाख ७६ हजार कोटी मिळाले असते असे कॅगने म्हटल्यावर लगेच १ लाख ७६ हजार कोटींचा घोटाळा म्हणून थयथयाट केला ह्या लोकांनी.
नोटबदलीमुळे २% जीडीपी कमी वाढला हे सांगणारा सांसदीय समितीचा अहवाल भाजपच्या लोकांनी अडवून धरलाय. जीडीपीचे २% नुकसान म्हणजे कमीतकमी ३ लाख कोटीचे नुकसान झाले देशाचे. तरी हेतू चांगला होता म्हणजे घोटाळा नाही म्हणत हे लोक फिरतात. ज्यांना त्रास झालाय ते बघताहेत ह्यांची गंमत.

अभिजित - १'s picture

22 Sep 2018 - 5:08 pm | अभिजित - १

मुळात मी हा धागा वादविवाद करायला उघडला नाहीए. २०१९ मध्ये मत टाकण्या पूर्वी, लोकांना नक्की खरं काय चालले आहे ते समजावे म्हणुन मी उघडला. तरीही आपण बोलतो. चर्चा करतो. ठीक आहे. पण काही लोक चर्चेत पोरकट पणाची परिसीमा गाठतात. मला तर अगदी बालवाडी आठवली. बाई मी नाही असं केले , त्यानेच तसं केलं type !! त्या मुळे आता तशा पोरकट प्रतिसादांना मी तरी उत्तर देणार नाही. जनता सुज्ञ आहे. कोण बरोबर कोण चूक , त्यांनाच ठरवू दे.

इष्टुर फाकडा's picture

25 Sep 2018 - 1:34 am | इष्टुर फाकडा

हे बघा, तुम्ही तुमच्या मताच्या पिंका टाकताय आणि लोकांनी तुम्हाला आरसा दाखवायचा प्रयत्न केला कि तुम्ही पुन्हा, 'लोकांना काय ठरवायचं ते ठरवुदे' या मुद्द्यावर येताय. एक पे रेहना, घोडा या चतुर!

टवाळ कार्टा's picture

22 Sep 2018 - 5:45 pm | टवाळ कार्टा

काँग्रेस आणि भाजपच्या समर्थनार्थ प्रतिसाद लिहिण्यासाठी किती पैसे मिळतात कोणी सांगेल का? मी पण थोडे कमवीन म्हणतो ;)
आणि पैसे न मिळता इतके आंधळे समर्थक असतील तर इतके रिकामटेकडे माठ लोक जगात असतात हे पाहून करमणूक होतेय =))

पोरकटपणा ची सुरवात बघा बरं कोणी केली होती ?
" इंटरनेट हे माहितीचा महासागर आहे. पण प्रत्येकाने आपली अक्कल चालवुन ( असली तर !! ) त्यातून ज्ञानकण वेचायचे असतात. डॉ खरे .. परत एकदा माहिती घ्या. आणि म्हणुन मी आधीच लिहिले होते. माहिती घ्या मग बोला. पण ..."

ट्रम्प's picture

22 Sep 2018 - 5:56 pm | ट्रम्प

' मुळात मी हा धागा वादविवाद करायला उघडला नाहीए. २०१९ मध्ये मत टाकण्या पूर्वी, लोकांना नक्की खरं काय चालले आहे ते समजावे म्हणुन मी उघडला. तरीही आपण बोलतो. चर्चा करतो. ठीक आहे. पण काही लोक चर्चेत पोरकट पणाची परिसीमा गाठतात. मला तर अगदी बालवाडी आठवली. बाई मी नाही असं केले , त्यानेच तसं केलं type !! त्या मुळे आता तशा पोरकट प्रतिसादांना मी तरी उत्तर देणार नाही. जनता सुज्ञ आहे. कोण बरोबर कोण चूक , त्यांनाच ठरवू दे. '

2019 ला कोणाला मत द्यायचे ? मिपावरील सगळे मतदार निराश होते , गोंधळलेले होते .
बर झालं तुम्ही धागा काढून त्या गोंधळलेल्या मतदारांना आशेचा किरण दाखवला .
आता 2019 ला काँग्रेस सत्तेवर येणार !! आपले पप्पूदा उर्फ गालावर गोड खळी उर्फ लहरी महंमद पंतप्रधान होणार !!! याबद्दल तमाम मिपाकरांना खात्री झाली आहे .
तुम्ही मिपावरील द्रोणाचार्य आहात याबद्दल खात्री पटली =) = )

नाखु's picture

23 Sep 2018 - 2:20 pm | नाखु

मुळात मी हा धागा वादविवाद करायला उघडला नाहीए. २०१९ मध्ये मत टाकण्या पूर्वी,

लोकांना नक्की खरं

काय चालले आहे ते समजावे म्हणुन मी उघडला. तरीही आपण बोलतो. चर्चा करतो. ठीक आहे
*******
तरीच म्हटलं "खर्यांच"का वावडे आहे इथे!!!
वरती अनुप ढेरे यांच्या प्रतिसादाचा मला खूप निषेध करण्यासाठी शब्द अपुरे पडतात.
डाळ,धान्ये, खाद्य तेल हे कशे काय जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल अगदी गरीबातल्या गरीब ते श्रीमंत यांना रोजच्या रोज लागते,डाळी ई कधीतरी महिन्यात असली नसली तरी चालते.

मोदी पायउतार होऊन युवराज ममो यांच्यामार्फत लालू,ममता,मायावती व शरद, मुलायम यांच्या सारख्या अत्यंत स्वच्छ पारदर्शक व्यवहारी आणि अजिबातच जातीयवादी नसलेल्या भारत भाग्य विधाता मंडळी कडे कारभार आगामी पंचवीस वर्षे द्यायला पाहिजे इतकीच माफक अभिलाषा असलेला य:किष्चिंत नाखु पांढरपेशा मिपाकर

https://www.loksatta.com/desh-videsh-news/5-thousand-crore-scam-accused-...

पाच हजार कोटींचा घोटाळा करुन फरार झालेला स्टर्लिंग बायोटेकचा मालक नितीन संदेसरा याला दुबईतून ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं समोर आलं आहे.
नितीन संदेसरा आपला भाऊ चेतन, वहिनी दिप्तीबेन आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत नायजेरियाला पळून गेल्याचं सीबीआय आणि ईडीच्या सुत्रांकडून समोर आलं आहे. भारताचा नायजेरियासोबत कोणताही प्रत्यार्पण करार नसल्याने सध्या तरी नितीन संदेसरा याला भारतात आणणं शक्य होणार नाही.

ट्रेड मार्क's picture

25 Sep 2018 - 7:50 pm | ट्रेड मार्क

काय योगायोग आहे. पाच हजार कोटींच्याच घोटाळ्याबाबत राजमाता आणि युवराज बेलवर बाहेर आहेत. युवराज तर सतत परदेश दौऱ्यावर असतात आणि राजमाता पण सध्या रशियाला गेल्या आहेत. यांना भारताबाहेर जायला प्रतिबंध करावा अशी मागणी एकही पुरोगाम्याने किंवा काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्याने किंवा निरव/ मल्ल्या/ संदेसरा यांना बाहेर कसे जाऊ दिले असं विचारणाऱ्याने केली नाही? आहे की नाही गंमत?

ट्रम्प's picture

25 Sep 2018 - 9:42 pm | ट्रम्प

पुरोगामी का म्हणून मागणी करतील ? काँग्रेसच्याच वरदहस्ताखाली परदेशी देणग्या ओरपुन पुरोगामी पोट भरत होते मग ते आश्रयदात्यानां परदेशी जाण्यापासून का रोखतील . दहशतवाद्याला फाशी पासून वाचवण्यासाठी ज्या पुरोगाम्यांनी रात्री बारा वाजता कोर्ट उघडायला लावले होते त्या पुरोगाम्यांना ISI ने फंडिंग केले नसेल कशावरून ?

ट्रेड मार्क's picture

26 Sep 2018 - 1:58 am | ट्रेड मार्क

मुद्दा बरोबर आहे, पुरोगामी कशाला अशी मागणी करतील?

पण स्वतःला तटस्थ समजणाऱ्या, कुठल्याही पक्षाचे किंवा विचारसरणीचे बांधील नाही असं म्हणणाऱ्या मिपाकरांनी हे म्हणलं नाही याचं मात्र आश्चर्य वाटतंय.

बर्याच दिवसानी मिपा वर आलो, पहिल्याला रिप्लाय लिहायला घेतो ..
(मुद्दे आधी चर्चिले गेले असेल तर क्षमस्व, आणि मी मोदी समर्थक हि नाही आणि कॉन्ग्रेस समर्थक ही... राजकारणात जे चुक ते चुक आणि जे बरोबर ते बरोबर असे आपले मत )

१. पेट्रोल महागाई, आणि सो कॉल्ड कर्ज :

पहिले लक्शात घ्या, आधी अमुक तमुक करोड कर्ज होते , ते आम्ही फेडले, सो आम्ही आता पेट्रोल स्वस्त करु शकत नाही, फलाना सगळे खोटे आहे.

पहिले लक्षात घ्या, मनमोहन सिंग सरकारच्या काळात , अमेरिका ने इरान चे पेमेंट चॅनेल रोखले होते, त्यामुळे भारताला जी रक्कम त्यांना द्याय्ची होती , ती सगळी डायरेक्ट देता आली नाही. पैसे रेडी होते, इंडियन रिफाईनरी कंपणी ने ते $४०० मिलियन रुपये credit to the central bank of the United Arab Emirates मध्ये केले होते, which will make payments in dirhams to Iran.
जेंव्हा मोदी सरकार आले , ते>न्व्हा तो बॅन उठला, आणि आधीच क्रेडिट असलेली रक्कम इरान ला दिली गेली.

त्या वेळॅस सरकारी साईट वर ही माहीती होती आता नाही.
तरी ही २०१४ ची economictimes ची लिण्क देत आहे..

कोणाते ही सरकार असते तरी ही रक्कम पे झालीच असते..

2014 news

बाकी पेट्रोल किंमती वर सरकारचा वचक नाही मान्य, पण हेच २०१४ ला जाहिराती करताना कळले पाहिजे होते. आणि किंमत कमी होताना वाढवलेला कर कोणी लादला ?

२. नंतर नोटबंदी वर बोलु ...

गामा पैलवान's picture

19 Oct 2018 - 12:24 pm | गामा पैलवान

नगरीनिरंजन,

पण स्टुपिडिटी काय झाली ते गामा पैलवानांच्या प्राचीन मेंदूला कळण्याची शक्यता नाही.

माझ्या प्राचीन मेंदूस तर मॅलाईस पण नाय हो समजंत. तुम्हीच धडपणे ठरवा स्टुपिडिटी की मॅलाईस ते!

आणि हो, रिचर्ड थेलर यांच्या मते विमुद्राकरण योग्य आहे. रिचर्ड थेलर यांनाही स्टुपिडिटी कुठे दिसली नाही. त्यांचा नोबेल पारितोषिक विजेता मेंदूदेखील प्राचीन म्हणायचा का? की दुसरं काही कारण आहे?

आ.न.,
-गा.पै.

नगरीनिरंजन's picture

20 Oct 2018 - 12:50 am | नगरीनिरंजन

थेलर यांचा संकल्पनेस पाठिंबा होता विमुद्रीकरणाच्या; परंतु प्रधानसेवकांच्या मुद्राबदल योजनेत २००० रुपयांची नोट बाहेर आल्यावर थेलर साहेबांनी डोक्यावर हात मारून घेतला.

गामा पैलवान's picture

20 Oct 2018 - 12:46 pm | गामा पैलवान

न.नि.,

जर दोन हजाराची नोट छापली नसती तर कोट्यावधी लोकांची काय हालत झाली असती याची कल्पना आहे का?

आ.न.,
-गा.पै.

नगरीनिरंजन's picture

20 Oct 2018 - 10:43 pm | नगरीनिरंजन

नोटबदलीच नसती केली तर चांगलं झालं असतं. २००० ची नोट काढून मूळ उद्देशालाच हरताळ फासला ना. म्हणजे फुकाचाच लोकांना त्रास. ह्यालाच स्टुपिडिटी म्हणतात.

मार्मिक गोडसे's picture

21 Oct 2018 - 7:49 am | मार्मिक गोडसे

जर दोन हजाराची नोट छापली नसती तर कोट्यावधी लोकांची काय हालत झाली असती याची कल्पना आहे का?
दोन हजाराची नोट छापूनही कोट्यवधी लोकांचे हाल झालेच होते की, बाजारात सुट्टे करणेही शक्य नव्हते त्यावेळेला.

प्रसाद_१९८२'s picture

21 Oct 2018 - 10:44 am | प्रसाद_१९८२

बाजारात सुट्टे करणेही शक्य नव्हते त्यावेळेला.
--

हे अगदी खरे आहे.
त्या काळी दोन हजार रु.ची नोट सुट्टी करुन फक्त दोनच ठीकाणी सहजासहजी मिळत होती, त्यातले एक ठिकाण म्हणजे वॉईन शॉप व दूसरे बियर बार.
----
खिशात दोन हजार रु. असूनही त्या काळात डोंबिवली रेल्वे स्टेशन ते शनी मंदीर, मला चालत जावे लागले होते. म्हणजे दोन हजाराची नोट छापल्याने ज्या कोट्यवधी लोकांचे त्यावेळी हाल झाले होते त्या मधे मी देखील आलो. :))

गामा पैलवान's picture

21 Oct 2018 - 1:36 pm | गामा पैलवान

मागो,

नुकताच भारतात येऊन गेलो होतो. एके ठकाणी दीड लाख रुपये रोख मागितले. धनादेश, पेढीदेयक वगैरे काही नाही चालणार म्हणून सांगितलं. न टाळण्याजोगी निकड होती. म्हणून २००० च्या च्या ७५ नोटा घेऊन गेलो. जर १०० च्या नोटा घेऊन गेलो असतो तर किती वेळ लागला असता १५०० नोटा मोजायला? शिवाय चूक होण्याची शक्यता पण वाढणार ना?

मुंबईत दररोज पाच दहा लाखाची रोकड जमा होणं अत्यंत किरकोळ प्रकार आहे. दर वेळेस नोटा मोजत बसायचं झालं तर ती एक कटकट होणार ना? ती सामान्य माणसाच्या डोक्यालाच होणार ना?

अमेरिकेत सगळ्या नोटानाणी काढून एकूणेक व्यवहार २ डॉलर (म्हणजे साधारण १५० भारतीय रुपये) मध्ये करायला लावले तर अमेरिकी लोकांची काय हालत होईल?

आ.न.,
-गा.पै.

नगरीनिरंजन's picture

22 Oct 2018 - 9:25 am | नगरीनिरंजन

अमेरिकेत ९९.९९% व्यवहार क्रेडिट/डेबिट कार्डावर होतात हा स्वानुभव आहे. तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे व लक्ष्मीरोडवर असतात तसे कार्ड वापरल्यास २-३% जास्त किंमत लावणारे भुरटे व्यापारी नाहीत. अगदी फूडट्रकवरसुद्धा कार्ड घेतात व १-२ डॉलरच्या खरेदीवरही घेतात.

गामा पैलवान's picture

22 Oct 2018 - 4:58 pm | गामा पैलवान

अहो न.नि.,

तेच तर मी म्हणतोय. अमेरिकेतले ९९.९९% व्यवहार कार्डाद्वारे होत असले तरीही तिथे १०० डॉलर्सच्या नोटा आहेत. भारतात तर १०% ही व्यवहार कार्डाद्वारे होत नाहीत. शिवाय रुपया डॉलरच्या तुलनेने १:६५ ते १:७५ इतका हलका आहे. मग २००० ची नोट चलनात ठेवायला पाहिजेच ना?

आ.न.,
-गा.पै.

मार्मिक गोडसे's picture

22 Oct 2018 - 11:07 am | मार्मिक गोडसे

म्हणून २००० च्या च्या ७५ नोटा घेऊन गेलो. जर १०० च्या नोटा घेऊन गेलो असतो तर किती वेळ लागला असता १५०० नोटा मोजायला? शिवाय चूक होण्याची शक्यता पण वाढणार ना?
दोन हजाराची नोट काढण्यामागे हा उद्देश होता हे माहीत नव्हते.

https://www.loksatta.com/pune-news/mns-protest-against-police-inspector-...
फायबर ऑप्टीकलचे काम करणाऱ्यास ५० लाखांची खंडणी
भाजपचे हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणाऱ्या पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्यासह काही पोलीस कर्मचाऱ्यांची दोन दिवसांपूर्वी अचानक बदली करण्यात आली. ही बदली राजकीय दबावामुळे झाली असावी अशी चर्चा पोलीस दलात आणि पुणे शहरात सुरू झाली आहे.
ना खाऊंगा ना खाणे दूंगा !! जुमला होता तर !!

ट्रम्प's picture

20 Oct 2018 - 8:33 pm | ट्रम्प

गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून या केस मध्ये पोलिसांची गळचेपी करण अपेक्षित नव्हत हे नक्की , तरी पण पुन्हा मतिमंद मोगलांचे राज्य बोकांडी घेण्यापेक्षा काँग्रेस सारखं वर्तणूक करणारी भाजप परवडली .

पुन्हा एकदा श्री मा मोदीजींना हटवण्यासाठी कॉंग्रेसने पाकिस्तानकडे हात पसरले ! "मोदी हटाव देश बचाव " ही मोहिम भारतासकट पाकिस्तानमध्ये फेस बुकवर चालवण्यासाठी कॉंग्रेसने पैसे दिल्याच समोर आलेल आहे !! कॉंग्रेस अजुन किती रसातळाला जाणार आहे ? अश्या पक्षाला निवडणुकित भाग घेण्याचा नैतिक अधिकार राहीलेला नाही !! कॉंग्रेसच्या सपोर्टसनी ह्या कॉंग्रेसच्या देशद्रोही कामाबद्यल नक्की विचार करावा !!

डँबिस००७'s picture

20 Oct 2018 - 10:22 pm | डँबिस००७
दिपस्तंभ's picture

21 Oct 2018 - 2:25 am | दिपस्तंभ

वाढणारच , बरेच कर दुप्पट केल्यावर