स्ट्रॉबेरी सालसा

जुइ's picture
जुइ in पाककृती
30 Sep 2018 - 5:08 am

साहित्य:
१. १/२ किलो ताज्या लाल चुटुक पिकलेल्या स्ट्रॉबेरीज
२. अर्धे मोठे लिंबू
३. एका लिंबाची किसलेली साल
४. गोड छोटी ढब्बू मिरची केशरी रंगाची
५. अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
६. कांद्याची पात आणि त्याचा कांदा -१ काडी
७. चवीपुरते मीठ आणि ताजी मिरपूड

कृती:

प्रथम स्ट्रॉबेरीज स्वच्छ धुऊन चिरून घ्याव्यात. कांद्याची पात आणि कांदा बारीक चिरावा. तसेच ढब्बू मिरची बारीक चिरून घ्यावी. एका मोठ्या पातेल्यात चिरलेल्या स्ट्रॉबेरीज घ्याव्यात. त्यात लिंबाचा रस आणि लिंबाची साल घालावी. त्यावर कांद्याची पात आणि कांदा घालावा. मिरची आणि कोथिंबीर घालावी. चवीपुरते मीठ आणि मिरपूड घालावी.

यानंतर सगळे जिन्नस मग नीट एकत्र करावेत. स्ट्रॉबेरीजच्या चवीनुसार लिंबाचा रस कमी- अधिक घालावा. मिरचीचा ठसका अधिक हवा असल्यास मिरचीचे प्रमाण वाढवावे. शेवटी सालसा गार करायला थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवावा. चिप्स अथवा नुसता खायलाही हा सालसा झकासलागतो. हा सालसा लहान मुलांबरोबर मोठेही आवडीने खातात.

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

30 Sep 2018 - 7:03 am | राघवेंद्र

अरे वा मस्तच, लवकरच करून बघण्यात येईल.

इंट्रेस्टिंग ! करुन बघणार .. बर्‍याच दिवसांनी दिसलीस.

जुइ's picture

8 Oct 2018 - 8:51 pm | जुइ

मध्यंतरी जरा व्यस्त होते. कन्या काय म्हणते आहे?

कन्या भरपूर दंगा मस्ती बडबड करत असते ! तिच्या मागे पळण्याशिवाय दुसरं काम नाही सध्या .. उमा काय म्हणते? उमा ३ ची होईल ना आता?

वरुण मोहिते's picture

30 Sep 2018 - 7:29 am | वरुण मोहिते

नक्की.

पद्मावति's picture

30 Sep 2018 - 1:45 pm | पद्मावति

मस्तच दिसतोय हा सालसा. खुप टेम्पटिंग.

यशोधरा's picture

30 Sep 2018 - 2:03 pm | यशोधरा

मस्तच!

श्वेता२४'s picture

30 Sep 2018 - 4:27 pm | श्वेता२४

नक्की करून बघणार. फोटो मस्तच

मदनबाण's picture

30 Sep 2018 - 5:36 pm | मदनबाण

भूक लागली ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ओठों पे बस तेरा नाम है, तुझे चाहना मेरा काम है... :- Yeh Dillagi

निशांत_खाडे's picture

30 Sep 2018 - 8:28 pm | निशांत_खाडे

व्वा!
लवकरच करुन पाहतो!

रच्याकने,
जराशी अमचूर पावडर घातली तर ?

जुइ's picture

8 Oct 2018 - 8:48 pm | जुइ

आमचूर पावडर या पाककृती मध्ये कशी लागले माहीत नाही. प्रयोग करून बघण्यास काही हरकत नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Oct 2018 - 7:09 pm | अत्रुप्त आत्मा

लै झ्याक!

सविता००१'s picture

2 Oct 2018 - 6:04 pm | सविता००१

लगेच करुन पाहणार

रुपी's picture

3 Oct 2018 - 5:04 am | रुपी

मस्तच!
स्ट्रॉबेरीज शक्यतो शिल्लक राहत नाहीत, पण कधी राहिल्या तर नक्की करुन बघेन :)

जुइ's picture

8 Oct 2018 - 8:46 pm | जुइ

वाचकांचे आणि प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार!

जव्हेरगंज's picture

9 Oct 2018 - 6:51 pm | जव्हेरगंज

मस्त!
फोटु भारी आलेत!!