मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्ट्रॉबेरी सालसा

जुइ · · पाककृती
साहित्य: १. १/२ किलो ताज्या लाल चुटुक पिकलेल्या स्ट्रॉबेरीज २. अर्धे मोठे लिंबू ३. एका लिंबाची किसलेली साल ४. गोड छोटी ढब्बू मिरची केशरी रंगाची ५. अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर ६. कांद्याची पात आणि त्याचा कांदा -१ काडी ७. चवीपुरते मीठ आणि ताजी मिरपूड कृती: प्रथम स्ट्रॉबेरीज स्वच्छ धुऊन चिरून घ्याव्यात. कांद्याची पात आणि कांदा बारीक चिरावा. तसेच ढब्बू मिरची बारीक चिरून घ्यावी. एका मोठ्या पातेल्यात चिरलेल्या स्ट्रॉबेरीज घ्याव्यात. त्यात लिंबाचा रस आणि लिंबाची साल घालावी. त्यावर कांद्याची पात आणि कांदा घालावा. मिरची आणि कोथिंबीर घालावी. चवीपुरते मीठ आणि मिरपूड घालावी. यानंतर सगळे जिन्नस मग नीट एकत्र करावेत. स्ट्रॉबेरीजच्या चवीनुसार लिंबाचा रस कमी- अधिक घालावा. मिरचीचा ठसका अधिक हवा असल्यास मिरचीचे प्रमाण वाढवावे. शेवटी सालसा गार करायला थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवावा. चिप्स अथवा नुसता खायलाही हा सालसा झकासलागतो. हा सालसा लहान मुलांबरोबर मोठेही आवडीने खातात.

वाचन 11976 प्रतिक्रिया 0