श्रीगणेश लेखमाला - ३८ तास ३५ मिनिटं

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in लेखमाला
23 Sep 2018 - 9:00 am

.

३८ तास ३५ मिनिटं

२००पैकी १७८ कि.मी. झाले आहेत आणि दोन्ही मांड्याना क्रॅम्प्स आलेत; थोडं थांबून पुढे निघायचं आहे...

34    35

३०० च्या BRMमध्ये १९० कि.मी.ला इतका थकवा आलेला आहे की उरलेले होतील का नाही हा विचार करण्यासाठीचा वेळ सायकलिंग करत घालवणं चालू...
18

पुणे-कोल्हापूर-पुणे ४०० कि.मी.चं अंतर फेब्रुवारीत रात्री ७-७.५ डिग्री ते ३१ डिग्री दिवसा असं करताना समजेनासं झालेलं...
36
६०० मात्र सगळ्यात सोप्पं गेलं, कारण नुकतंच आठवडाभरापूर्वी १०० कि.मी. x ७ दिवस असा उपद्व्याप करून झाला होता....

मार्च २०१८ : खरं तर रविवार असल्यामुळे १०० कि.मी. सायकलिंगचा प्लॅन होता. ५० कि.मी.नंतर परतायचं की दोघं मित्र २०० करणार आहेत त्यांच्यासोबत जायचं, हा प्रश्न २०० कि.मी. झाल्यावर सुटला.....
8

जुलै २०१८ : हेडविंडमुळे (विरुद्ध दिशेने वाहणारा वारा - सायकलिस्ट्सचा मोठा शत्रू) ३०० कि.मी. सायकलिंग ६०० कि.मी.च्या ताकदीनं करावं लागत आहे..

आॅगस्ट २०१८ : ४०० कि.मी.साठी २७ तास दिलेले असतात, त्यापैकी २० तास पावसातच आहे. अंगावरचे कपडे भिजून दोनदा पूर्ण वाळलेत, पायावर उडालेला चिखल वाळून गेलाय, झटकल्यावर माती पडते आहे.....

10
9
सेनाकर्ते, देशपांडे मामा, मी

11
मी, आबा पाटील, मिलिंद थत्ते, अनुप कोहळे

हे लिहायला बसलोय, त्यामुळे काही आठवणी डोळ्यासमोर तरळत आहेत.

शाळा १९९८ साली संपल्यावर सायकलिंग परत सुरू करायला २०१२ उजाडलं आणि ५-१० कि.मी. - तेसुद्धा अतिशय अनियमित असं सायकल चालवणं होतं. पुढची ३ वर्षं तर सायकलिंग बासनात गुंडाळून ठेवलं गेलं होतं.
14

सप्टेंबर २०१५पासून जरा बऱ्यापैकी, म्हणजे आठवड्यातून ४-५ वेळा किमान २० कि.मी. सायकलिंग सुरू झालं. हळूहळू वाढवत नेऊन एका वीकान्ताला (शुक्र-शनि-रवि.) असं ३०, ४० आणि ५० कि.मी.चं अंतर पाठोपाठ केलं आणि स्वत:ची क्षमता जोखली.

28
(डावीकडून) श्रेयस अभ्यंकर, सुमित कुलकर्णी आणि मी. तिघही SR आहोत

आठवड्यात ३०-३५ कि.मी.च्या राइड्स नियमित नाही, पण बऱ्याच होत होत्या. अशाच एका रविवारी ६५ कि.मी.ची मोठी राइड, तीदेखील मराठवाड्याच्या स्पेशल उन्हाळ्यात करून झाली आणि मोठ्या म्हणजे १००+ कि.मी.च्या राइडचे वेध लागले. ती पहिलीवहिली शंभरी करायला २०१६चा जून उजाडला आणि गंमत म्हणजे एकट्याने जाऊन सव्वाचार तासात हा milestone गाठला. तो रविवार फारच भारावलेला गेला होता.

त्याच डिसेंबरमध्ये औरंगाबाद-पुणे असं २३० कि.मी. असा एकट्याने मोठा पल्ला मारला (ह्यावर माझा पहिलावहिला लेखदेखील लिहून झालेला आहे बरं!) https://www.misalpav.com/node/38852

शीर्षकात दिलेली वेळ आजतागायतची सगळ्यात मोठी सायकलिंग राईड ६१४ कि.मी.साठी लागलेली आहे. BRM किंवा Brevet सिरीजमधला मानाचा टप्पा ६०० कि.मी.ची ब्रेव्हे.... स्वत:ची मर्यादा ओळखण्यासाठीचा पाडलेला यशस्वी प्रयत्न!!
17
ह्या सिरीजला Super Randonneur किंवा SR सिरीज म्हटलं जातं. २००, ३००, ४०० आणि ६०० कि.मी. असे चार टप्पे एका वर्षात (one calendar yearमध्ये - नोव्हेंबर ते आॅक्टोबरमध्ये) पार पाडल्यावर SR किताब मिळतो आणि तो मी मिळवला आहे... ह्याच वर्षात :))

६ जानेवारी २०१८ला मी ६०० कि.मी.ची ब्रेव्हे पूर्ण केली, त्याआधी १२ नोव्हेंबर २०१७ला २०० कि.मी.ची केली होती. ३०० कि.मी. २० जानेवारीला आणि ४०० कि.मी.ची ३ फेब्रुवारीला, अशी ही सिरीज संपवली आणि आज १४ आॅगस्टला जेव्हा ह्याबद्दल लिहायला घेतलं आहे, तोपर्यंत दुसऱ्यांदा २००, ३०० आणि परवाच - म्हणजे ११ आॅगस्टला ४०० कि.मी.च्या ब्रेव्हे परत एकदा पूर्ण करून झाल्या आहेत ;))

BRM वगैरे करणाऱ्यातले आपण नाही, हे मनात पक्कं ठरलेलं होतं. अनेक जण विचारून, चुचकारून, प्रेमाने किंवा अगदी रागावूनही BRM न करण्याच्या माझ्या निर्णयाला बदलू शकले नव्हते.

जुलै २०१७ : एक दिवस अचानक साक्षात्कार झाला (मी BRM करायचं ठरवलं) आणि अनेक लोक आश्चर्यचकित झाले. मी ३०० कि.मी.च्या BRMचं registration करून टाकलं. नवे प्लेयर्स सहसा २०० कि.मी.ने सुरुवात करतात. (आपण मुळातच प्रवाहाच्या विरोधात पोहोणारे ना!)...
मागच्या आख्ख्या महिन्यात मिळून २०० कि.मी.सुद्धा नव्हते झाले आणि मी २० तासांत ३०० करणार होतो. मनाची तयारी सुरू केली (शरीर त्याचंच ऐकतं...) शेवटचे २-३ दिवस performance anxiety नावाचा पाळीव प्राणी सोबत होताच, पण आपण उसनं अवसान घेऊन cool dude असल्याचं स्वत:ला जाणवून देत होतो... आणि ३०० कि.मी. ब्रेव्हेला फक्त ७ मिनिटं उशीर झाला, म्हणून Late Finishचा शिक्का लागला होता. त्यामुळे मेडल मिळणार नव्हतं. मग दुसरा प्रयत्न (परत शहाणपणा केलाच) ६०० कि.मी.चा करताना २०० कि.मी. झाले आणि mental blockमुळे तिथेच सोडून देऊन घरी आलो.

कितीही नाही म्हटलं, तरी ह्या दोन्ही राइड्सचं शल्यं कुठेतरी बोचत होतं आणि त्यावर उत्तर सापडतच नव्हतं. दरम्यान डेक्कन क्लिफहँगर पुणे-गोवा रेस (चार जणांची रिले टीम) यशस्वीरित्या पूर्ण केली आणि मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल झाला. तेव्हापासून कोणतंही अंतर अशक्य वाटेनासं झालं!!

29   18

19  19

20
डावीकडून देशपांडे मामा, सागर पाध्ये, आनंदराव नाईक, अभिजित बुचके, शैलेंद्र कवाडे, सुमित कुलकर्णी, मनोज (मोदक), प्रशांत तायडे, मी

21
डावीकडून शैलेंद्र कवाडे, डॉ. अमित समर्थ, प्रशांत तायडे, मी, सुमित कुलकर्णी

२०१७च्या सुरुवातीलाच माझ्या सायकलिस्ट मित्रांच्या ग्रूपमध्ये ५० कि.मी. x ७ दिवस आणि १०० कि.मी. x ७ दिवस असं चॅलेंज मांडलं होतं आणि त्यापैकी केवळ ५० कि.मी. सलग ७ दिवस चालवण्याचं चॅलेंज जानेवारी २०१७मध्ये पूर्ण करू शकलो होतो आणि १०० कि.मी.चं चॅलेंज खुणावतच होतं. १२ नोव्हेंबरला नगर-औरंगाबाद-नगर अशी २०० कि.मी.ची ब्रेव्हे १० तास १० मिनिटांत पूर्ण केली.
44
नितीन पाठक काका, श्रेयस, मी

आणि १०० कि.मी. चॅलेंज पूर्ण करता येईल असं वाटायला लागलं होतं. पण नेमके कोणते ७ दिवस नक्की करायचे, ह्या विचारातच डिसेंबरचा शेवटचा आठवडा आला आणि २०१७ वर्षाचे केवळ शेवटचे ७ दिवस उरले.....! पर्यायच नव्हता आणि २५ ते ३१ डिसेंबर असे रोजचे १०० कि.मी. चालवायला सुरू केलं. सकाळी चारला उठून साडेचार ते पावणेपाचपर्यंत घराबाहेर पडायचं आणि साडेनऊपर्यंत घरी पोहोचायचं, असं नित्यक्रमच होऊन बसला होता. चौथ्या दिवशी सकाळी उठल्यावर मी काय करतोय, कुठे आहे असा प्रश्न पडला होता आणि हा विचार करेपर्यंत माझे ४० कि.मी. चालवूनदेखील झाले होते;)) सकाळी १०० कि.मी. सायकलिंग, मग १०:३० ते ५:३० ओपीडी आणि लवकर उठायचं म्हणून ९ वाजेपर्यंत झोपणं ह्यात दिवस सरून जायचा. सातव्या दिवशी १०० कि.मी. करून आलो आणि इतकं छान वाटत होतं की विचारू नका. त्या ७ दिवसात ७१४ कि.मी. सायकलिंग झालं होतं आणि ७पैकी ५ दिवस श्रेयस अभ्यंकर हा माझा मित्र सोबत असल्याने मजादेखील आली होती.

2   3

4   5

6   12

13   7

अशक्यप्राय वाटणारी गोष्ट करू शकलो आणि तीदेखील रोजची सर्व कामं करत करत, ह्याचं श्रेय माझ्या बायकोला - गौरीला देतो, कारण तिच्याशिवाय हे शक्यच नव्हतं _/\_.
22 23 24

आजच्या घडीला भारतात SR झालेले केवळ ३३८ लोक आहेत आणि पुढच्या महिन्यात ६०० कि.मी.ची ब्रेव्हे पूर्ण झाली, तर मी एका वर्षात दोनदा SR होणाऱ्या १० लोकांमध्ये असेन, ही चांगलीच Achievement ठरू शकते.
41   42

43    27

मला स्वत:बद्दल अनेक बाबतीत नेहेमीच inferiority complex असायचा, जो सायकलिंगमध्ये मिळवलेल्या यशाने बऱ्याच प्रमाणात कमी झाला आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे गेल्या दोन वर्षांत आजारी पडण्याचं प्रमाण इतकं कमी झालेलं आहे की तापामुळे किंवा पोट बिघडल्यामुळे झोपून राहिलो किंवा सुटी घेतली असं आठवतच नाहीये!!
आजची शारीरिक क्षमता एवढी आहे की सायकलवर बसलो, तर २०० कि.मी. होऊन जातील आणि फारसा थकवा येणार नाही.

यूट्यूबवर एका व्हिडियोमध्ये एक मस्त कन्सेप्ट होता. त्यात असं सांगितलं गेलं होतं की अपयशापेक्षा यशाच्या विश्लेषण करणं जास्त महत्त्वाचं आहे आणि मला अपयशापेक्षा यशानेच जास्त शिकवलं आहे, असं मी अगदी ठामपणे सांगू शकतो.
30

असं सायकलिंग जमू शकतं, अगदी कोणीही करू शकतो/शकते. सायकल नियमित चालवत राहिलं तर काहीच अशक्य नाहीये, कारण ह्या सगळ्या Achievements एका सामान्य शारीरिक क्षमतेच्या माणसाच्या आहेत. ह्यामुळे मला सिक्स पॅक्स वगैरे काही आलेले नाहीत, तर - छोटीशी का होईना - ढेरी आहे, जिला मी Core Strength म्हणतो :))

मग आता पुढे काय करणार? असं विचार करायला गेलो, तर १००० आणि १२०० कि.मी.च्या ब्रेव्हे खुणावत आहेत, त्यासाठी पुढच्या वर्षी प्रयत्न करायचा आहे.

असंच एकदा जेवताना बाबांनी मला विचारलं की "सायकलिंगमध्ये तुझा काय Aim आहे?" त्यावर काय उत्तर द्यावं हे तेव्हा सुचलं नव्हतं. पण आज लिहिताना जाणवतं आहे की 'सायकलिंग' हाच माझा Aim आहे!

31

श्रीगणेश लेखमाला २०१८

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

23 Sep 2018 - 9:19 am | कुमार१

तुमचे ध्येय जबरदस्त आहे शुभेच्छा.

चंबा मुतनाळ's picture

23 Sep 2018 - 9:52 am | चंबा मुतनाळ

मस्त लेख झालाय डाॅक. संपूर्ण सायकलिंगचा ईतीहास ऊलगडून दाखवला आहे !!

खूप सुंदर लिहिलंय. आणि ह्या तुमच्या सर्व प्रवासाचा साक्षीदार असणारा सायकल सायकल ग्रुप चा भाग असल्याबद्दल अभिमान वाटतोय. _/\_

प्रशांत's picture

24 Sep 2018 - 5:51 pm | प्रशांत

ह्या तुमच्या सर्व प्रवासाचा साक्षीदार असणारा सायकल सायकल ग्रुप चा भाग असल्याबद्दल अभिमान वाटतोय.

असेच म्हणतो आणि १० X ५० किमि. रायचा प्रयत्न करतो

अत्यंत उत्कृष्ट.. झपाटलेले आहात. असंच नेहमी राहा.. शुभेच्छा..

डॉ श्रीहास's picture

23 Sep 2018 - 11:03 am | डॉ श्रीहास

हा लेख लिहावा की नाही ह्या भम्रात होतो आणि हे बोलून दाखवल्यावर माझे सायकलप्रेमी मिपाकर मित्र (धडपड्या) यांनी हे सांगितलं -

का लिहायचं? हा प्रश्नच कसा पडू शकतो?

स्वतःसाठी लिहा...
प्रवासाचा आनंद परत मिळवण्यासाठी लिहा...
झालेल्या चुका सुधारता येतील म्हणून लिहा...
आमच्या सारख्यांना प्रेरणा म्हणून लिहा...
नावख्यांना मार्गदर्शन म्हणून लिहा...

आणि सगळे किंतू मनातून बाजूला सारून लेख लिहीला .

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Sep 2018 - 11:12 am | डॉ सुहास म्हात्रे

जबरदस्त !!! असं एखादं वेड डोक्यात असल्याशिवाय जीवनात फार अर्थ आहे असं वाटत नाही.

असंच एकदा जेवताना बाबांनी मला विचारलं की "सायकलिंगमध्ये तुझा काय Aim आहे?" त्यावर काय उत्तर द्यावं हे तेव्हा सुचलं नव्हतं. पण आज लिहिताना जाणवतं आहे की 'सायकलिंग' हाच माझा Aim आहे! एक नंबर !

१००० आणि १२०० किमी च्या ब्रेव्हे आणि पुढचे इतर अनेक मैलांचे दगड पार करत सायकलिंग करण्यासाठी अनेकानेक शुभेच्छा !

तुषार काळभोर's picture

23 Sep 2018 - 12:28 pm | तुषार काळभोर

केल्याने होत आहे रे हे सार्थ ठरवणारे लेखन!!

असं काहीतरी आयुष्यात पाहिजे.

मोदक's picture

23 Sep 2018 - 12:36 pm | मोदक

झक्कास लेख हो डॉक..

पुढचे अनेक ज्ञात / अज्ञात माईलस्टोन पार करण्यासाठी अनेकानेक शुभेच्छा..!!!

तू मिपाचे मूळ दुचाकीपिशाच्च आहेस अशी मला शंका आहे.

किती जणांना बाधा केलीयस आत्तापर्यंत?

मोदक's picture

24 Sep 2018 - 10:15 am | मोदक

हा हा हा.... मी तर फक्त निमित्तमात्र हो गवि.

सध्या सायकलिंग कमी झाले आहे आणि भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथले सण / उत्सव बघणे सुरू आहे.

नाखु's picture

23 Sep 2018 - 1:10 pm | नाखु

आणि झपाटलेपण सलाम केला पाहिजे असं आहे.
एक अत्यंत बाळबोध प्रश्न ज्याने जुन्या सायकल वर साध्या हैंडलच्या त्यानं नव्या सायकलवर कसं जुळवून घेण्याची काही युक्त्या असतील तर सांगा.

मुलाच्या आधुनिक सायकल पाहूनच थबकलेला नाखु

मोदकाच्या कृपादृष्टी आपल्यावर कधी पडणार,देवाक काळजी

राम्राम काकानु... कसे हैसा..?

सायकल कंडीशन मध्ये करून घ्या. बोलू लवकरच.

प्रमोद देर्देकर's picture

23 Sep 2018 - 1:37 pm | प्रमोद देर्देकर

खूप छान डॉ.

मार्गी's picture

23 Sep 2018 - 4:59 pm | मार्गी

अफाट, जबरदस्त!!!! आणि खूप सुंदर उलगडून सांगितलंय!!

तेजस आठवले's picture

23 Sep 2018 - 7:19 pm | तेजस आठवले

जबरदस्त लेख. असेच उत्तम यश मिळवत राहा.

निनाद आचार्य's picture

24 Sep 2018 - 7:00 am | निनाद आचार्य

अभिनंदन!!! पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा!!
BTW या डॉक्टरनीच मला पहिली सायकल हायब्रीड घे असं औषध लिहून दिलं....

जबरा डॉक , तुमच्या ५०x७ सारख्या चॅलेंजेस चा भरपूर फायदा झाला. एन्ड्युरन्स वाढायला फारच मदत होते. इंज्युरी संपली कि येतोच परत.

कीप अप द गुड वर्क!__/\__

नितीन पाठक's picture

24 Sep 2018 - 10:45 am | नितीन पाठक

डॉ़क,
मस्त लेख. सगळ्या जुन्या आठवणी डोळ्या पुढे आल्या ......
पुढील वाटचाली साठी शुभेच्छा

मित्रहो's picture

24 Sep 2018 - 12:45 pm | मित्रहो

जबरदस्त सलाम. डबल एसआर ला शुभेच्छा. जबरदस्त. प्रचंड चिकाटी लागते. मानसिक आणि शारीरीक सक्षमतेची गरज आहे. सलाम

इथे हैद्राबादला एकदा साइ रामक्रिष्णाची भेट झाली होती. त्याने एका वर्षात (२०१५-१६) सहावेळा एसआर पूर्ण केली होती.

वेल्लाभट's picture

24 Sep 2018 - 12:51 pm | वेल्लाभट

कमालीची प्रेरक वाटचाल. वर्णन करायला शब्द नाहीत. तेंव्हा केवळ दंडवत. असेच पुढे जात रहा.

तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून अनेक लोक हरत नाहीत इतकं मात्र म्हणावं वाटतं.

देशपांडेमामा's picture

24 Sep 2018 - 1:44 pm | देशपांडेमामा

तुमच्या आजवरच्या सायकल प्रवासासारखाच लेख पण भारी झालाय !!!

पुढील अचिव्हमेंट्स करता मनःपूर्वक शुभेच्छा !

देश

केडी's picture

24 Sep 2018 - 3:10 pm | केडी

+१००...

शैलेन्द्र's picture

24 Sep 2018 - 2:47 pm | शैलेन्द्र

भारीच...

पद्मावति's picture

24 Sep 2018 - 2:59 pm | पद्मावति

मस्तच.

चिगो's picture

24 Sep 2018 - 4:30 pm | चिगो

अत्यंत स्फुर्तिदायक लेख.. पुढील माईलस्टोन्ससाठी शुभेच्छा..

मन की बातां : आता सायकलची सर्व्हिसिंग करुन सुरुवात केली पाहीजे..

ज्योति अळवणी's picture

24 Sep 2018 - 10:11 pm | ज्योति अळवणी

यूट्यूबवर एका व्हिडियोमध्ये एक मस्त कन्सेप्ट होता. त्यात असं सांगितलं गेलं होतं की अपयशापेक्षा यशाच्या विश्लेषण करणं जास्त महत्त्वाचं आहे आणि मला अपयशापेक्षा यशानेच जास्त शिकवलं आहे, असं मी अगदी ठामपणे सांगू शकतो.

एकदम मान्य!

अफाट लेख! आवडला

सुधीर कांदळकर's picture

25 Sep 2018 - 6:50 am | सुधीर कांदळकर

प्रेमात पडलो. लेख फारच आवडला. बीआरएम मधील बी = ब्रेव्हे. आर = ? आणि एम = ? ही प्रश्नचिन्हे राहिली.

सुरेख लेखाबद्दल धन्यवाद.

डॉ श्रीहास's picture

25 Sep 2018 - 7:22 am | डॉ श्रीहास

BREVETS DE RANDONNEUR MONDIAUX

https://www.audaxindia.org/events.php

डॉ श्रीहास's picture

25 Sep 2018 - 7:38 am | डॉ श्रीहास

व्यक्त आणि अव्यक्त अश्या सगळ्या मिपाकरांचे आभार .

हा लेख स्वत:पुरता मर्यादित ठेवून लिहीण्याचा प्रयत्न केला आहे, आपल्यापेक्षा कितीतरी लोकं अचाट कामगिरी करत आहेत ; त्या बघून हे यश झाकोळलं जात असं नेहमी वाटायचं पण नुकत्याच झालेलेल्या TRANS SIBERIAN EXTREME (९१०० किमी २५ दिवसात) ह्या जगातील सर्वात अवघड सायकलींग endurance race यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर डॉ. अमित समर्थ यांनी एक छोटासा ब्लॉग लिहीला Be your own hero हे वाचून परत स्वत:च्या कामगिरीबद्दल आदर वाटायला लागला आणि हे सगळं दखल घेण्याजोगं आहे पटलं.

पण सायकलींग माझ्यासाठी काय आहे हे विचार केल्यावर ह्याच भावना मनात येतात...
प्रत्येक राईड असते एक स्टोरी ...
तो तास दिड तास असतो मेडीटेशन आॅन व्हिल्स चा...

काही क्षणांसाठी सगळं विसरण्याचा , फक्त तुमचा आणि तुमचाच ....

मोठ्या राईड मध्ये तर extreme thoughtlessness अनुभवलाय मी (म्हणजे मेंदू स्थिर होऊन जातो, थोड्यावेळासाठी तर मनात विचार सुध्दा येईनासे होतात)

शब्दात अर्वणनीय असं अगदी असं होतच...

काही breathless moments असतात
तर काही emotional....

मार्गी's picture

2 Oct 2018 - 2:26 pm | मार्गी

हे खूपच भन्नाट लिहिलंय!!!!! त्रिवार नमन!

झेन's picture

18 Oct 2018 - 8:34 am | झेन

सलाम तूमच्या मोहीमांना

मोठ्या राईड मध्ये तर extreme thoughtlessness अनुभवलाय मी (म्हणजे मेंदू स्थिर होऊन जातो, थोड्यावेळासाठी तर मनात विचार सुध्दा येईनासे होतात)/blockquote>

यासाठी तरी लाँगराईडची साधना करायला हवी, वो सुबहः कभी तो आएगी.....

शित्रेउमेश's picture

25 Sep 2018 - 8:59 am | शित्रेउमेश

खूप भारी...

सध्या बातम्यांत असलेला अभिलाष टॉमी हादेखील या विलक्षण लोकांच्या समूहातला डेअरडेव्हिल आहे. त्याची महासागराच्या मध्यातून वादळात जखमी झाल्यानंतर तीन दिवसांनी सुखरूप सुटका झाली ही चांगली बातमी.

सुबोध खरे's picture

25 Sep 2018 - 10:20 am | सुबोध खरे

हायला
लोक कसलं भारी काम करतायत. आम्ही इथे फक्त खयाली पुलाव पकवतो.
३० ४० किमी मोटारसायकलने जायला पण आळस येतो. आणि लोक्स ३०० ४०० ६०० किमी सायकल वर करतात पाहून स्वतः ची लाज वाटायला लागलीये.

Nitin Palkar's picture

27 Sep 2018 - 9:30 pm | Nitin Palkar

जब्बरदस्त डॉक! मुलाला हा लेख वाचायला सांगितल्यावर तो म्हणाला, 'वाचलाय मी'; त्याला पुन्हा एकदा वाच असं सांगितलंय. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत याच सदिच्छा!

mayu4u's picture

29 Sep 2018 - 9:25 pm | mayu4u

प्रेरणादायी!

सविता००१'s picture

29 Sep 2018 - 9:39 pm | सविता००१

लेख आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Sep 2018 - 9:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टर साहेब, जबरदस्त अनुभव आणि मोठा प्रवास. मोठ मोठ्या राईडसाठी शुभेच्छा आहेतच. आम्हालाही नियमित सायकल चालविणे जमले पाहिजे असे आपला अनुभव वाचून वाटले.

-दिलीप बिरुटे

अनुप कोहळे's picture

30 Sep 2018 - 9:22 am | अनुप कोहळे

'सायकलिंग' हाच माझा Aim आहे!

शेवटचे वाक्य भलतेच आवडले आहे. माझा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद. प्रवासवर्णन एकदम भारी जमलय. परत एकदा सोबत BRM करु.

मुक्त विहारि's picture

2 Oct 2018 - 3:25 pm | मुक्त विहारि

दंडवत...