समुद्रकिनारा

मराठमोळा's picture
मराठमोळा in जे न देखे रवी...
12 Mar 2009 - 8:12 pm

सुखस्पर्शी लाटा अविरत वारा
अफाट जल अथांग
आणी हा समुद्रकिनारा

भावनांचा उद्रेक कधी उदासीनतेचा मारा
मनी आठवणींचे काहुर
आणी पारवा भिरभिरणारा

एकांताचा खडक विचारांचा झरा
कल्लोळ दाटलेला
आणी माझ्यातला मी तळमळणारा

मिटलेले ओठ डोळे पाणावले जरा
भरुन येई ऊर
आणी सुर्य मावळणारा

मन शांत होईपर्यंत बसे मी त्या समुद्रकिनार्‍यापाशी
तो विचारे मग मला, येशील ना रे उद्या?
आणी मी परतणारा..

कविता

प्रतिक्रिया

श्रीकृष्ण सामंत's picture

13 Mar 2009 - 1:07 am | श्रीकृष्ण सामंत

अहाहा! किती सुंदर कविता.
"तो विचारे मग मला, येशील ना रे उद्या?
आणी मी परतणारा.."

कसला उद्दा येतो.साता समुद्रा पलिकडे गेल्यावर?
"आठवतो मज तो वेसाव्याचा किनारा."

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

बेसनलाडू's picture

13 Mar 2009 - 1:34 am | बेसनलाडू

(एकटा)बेसनलाडू

धनंजय's picture

13 Mar 2009 - 3:33 am | धनंजय

कल्पना आवडली.

रचना कल्पक आहे. (पण स्वतःच पहिल्या दुसर्‍या कडव्यात घातलेले रचनेचे बंधन पुढे अर्धवट का तोडले आहे. पटत नाही.)

पक्या's picture

13 Mar 2009 - 1:37 am | पक्या

कविता आवडली.

सुंदर कविता ..

एकांताचा खडक विचारांचा झरा
कल्लोळ दाटलेला
आणी माझ्यातला मी तळमळणारा ....सुरेख !

मदनबाण's picture

13 Mar 2009 - 7:58 am | मदनबाण

सुंदर कविता...

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.