मिपावरच्या धाग्यात लाईक सदृश्य बटण कसे समाविष्ट करावे.

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in तंत्रजगत
5 Sep 2018 - 11:22 am

मागे एकदा मिपा वरील धाग्यांना रेटिंग असावे का? अशा प्रकारची चर्चा वाचनात आली होती. त्यावर आलेल्या प्रतिसादांमध्ये रेटिंग नको, परंतु वाचकांना लेखन आवडल्याची पोच देण्यासाठी लाईक सारखे बटण असावे असा सूर होता आणि तो योग्यही वाटला.

मिपावरच्या धाग्यांमध्ये 'Applause Button' ह्या थर्ड पार्टी सर्व्हिसचा वापर करून आपण वाचकांना ती सोय सहज उपलब्ध करून देऊ शकतो. रियल टाईम अपडेट होणाऱ्या ह्या बटणावर क्लिक करून मिपाचे सदस्य नसलेले नित्यवाचकही लॉग इन न करताही आपली पसंती कळवू शकतात.

खाली दिलेला १० ओळींचा छोटा कोड कॉपी करून लेखात सर्वात शेवटी पेस्ट करायचा. त्यातल्या 'लेखन आवडले !' 'च्या ऐवजी ''लेख आवडला' , 'कविता आवडली', 'कथा आवडली', 'पाककृती आवडली', 'माहिती आवडली' 'असे बदल देखील करता येऊ शकतात.

हे बटण धाग्याच्या url वर आधारित असल्याने प्रत्येक धाग्याला मिळालेल्या लाईक्स स्वतंत्रपणे साठवल्या जातात.

<html><meta name="viewport" content="width=device-width, initial-scale=1">
<meta charset="utf-8">
<link rel="stylesheet" href="https://unpkg.com/applause-button/dist/applause-button.css">
<script src="https://unpkg.com/applause-button/dist/applause-button.js"></script>
</head><body>
<table><tr><td style="padding:10px;">
लेखन आवडले !
</td>
<td style="padding:10px;"><applause-button style="width: 70px; height: 70px;"/></td></tr></table></body></html>

चला तर मग आपले लेखन जास्तीत जास्त परस्परसंवादी (Interactive) करण्यासाठी आपल्या धाग्यांमध्ये आजपासून हि सुविधा वापरायला सुरुवात करूया.

धाग्यात समाविष्ट केल्यावर ते बटण खालील प्रमाणे दिसेल, टाळी वाजवणाऱ्या हातांवर क्लिक करून वाचक आपली पसंती दर्शवू शकतात.

टर्मीनेटर

माहिती आवडली !

प्रतिक्रिया

हे ठीक आहे पण नियमन करावे लागेल.
१) तुमच्या लेखनास कितीही राइक्स करू शकतो. एकदा केल्यावर फ्रीज झाला पाहिजे कोड, परंतू सभासद नसणारे करू शकतात तर चेकिंग/स्पीड ब्रेकर कसा करेल ब्राउजर?
२) खफवर टेस्ट करून पाहिले. माझ्या लेखनास मीच लाइक करू शकतो कितीही वेळा!!
३)या स्थितीत अव्यवहार्य आहे.

टर्मीनेटर's picture

5 Sep 2018 - 1:15 pm | टर्मीनेटर

एकदा क्लिक केल्यावर बटण फ्रीज होते. हां, जर कोणी स्वतःच्या लेखानाच्या प्रेमात पडला असेल आणि भरपूर सारा फालतू वेळ त्याच्याकडे असेल तर नक्कीच तो सारखं पेज रिफ्रेश करून लाईक्स देऊ शकेल. परंतु तसे तर डूआयडी काढून प्रतिसादाद्वारे धागा वर आणण्याचे प्रकार होतातच कि सगळीकडे. पण लाईक दिल्यामुळे धागा वर येत नसल्याने काही अपवाद वगळता असे प्रकार कोणी करेल असे वाटत नाही. व्यवहार्य आहे कि नाही ते हि सर्व्हिस वापरून बघितली काही दिवस तर लक्षात येईलच कि. आणि हे ऐच्छिक आहे, नाही वाटलं चांगले तर धागा संपादित करून कोड कधीही काढून टाकता येणे सहज शक्य आहे.

कंजूस's picture

5 Sep 2018 - 2:17 pm | कंजूस

सध्या बिटा आहे.
सभासद असलेले फक्त एकदाच अपडेट करू शकतील( पेज रिफ्रेश करूनही )असे झाले तरच उपयुक्त. सभासद नसलेल्यांचा विचार करण्याची गरज नाही.
तसा कोड शक्य आहे ड्रुपलमध्ये. ऐसीची श्रेणीव्यवस्था पाहा.

कुमार१'s picture

5 Sep 2018 - 12:50 pm | कुमार१

ते कळते का ?

टर्मीनेटर's picture

5 Sep 2018 - 1:18 pm | टर्मीनेटर

कुठला सभासद करतो ते हि पद्धत वापरून नाही समजणार, त्यासाठी स्क्रिप्ट मिपामध्ये समाविष्ट केलेली असायला पाहिजे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Sep 2018 - 2:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

उत्तम कल्पना.

पण, एका सभासदाला फक्त एकदाच मत प्रदर्शित करता येईल असा काही कोड असल्याशिवाय, या व्यवस्थेचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे.

अभ्या..'s picture

5 Sep 2018 - 2:11 pm | अभ्या..

किंवा एक्ट्रा मत प्रदर्शित करण्यासाठी पैसे द्यावे लागावेत असे काहीतरी कोड केले तर त्या व्यवस्थेचा मात्र सदुपयोग होईल. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Sep 2018 - 2:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

ही "मॉनेटायझेशन" करण्याची चांगली कल्पना आहे.

पहिले मत फुकटात, दुसर्‍याला 'क्ष' किंमत, तिसर्‍याला '२क्ष', तिसर्‍याला '४क्ष', चवथ्याला '८क्ष'... असा अल्गोरिदम करायला मिपामालकांना प्रवृत्त कर. ;) :)

सतिश गावडे's picture

6 Sep 2018 - 11:18 am | सतिश गावडे

पहिले मत फुकटात, दुसर्‍याला 'क्ष' किंमत, तिसर्‍याला '२क्ष', तिसर्‍याला '४क्ष', चवथ्याला '८क्ष'... असा अल्गोरिदम करायला मिपामालकांना प्रवृत्त कर. ;) :)

हा अल्गोरिदम भारी आहे. प्रत्यक्षात कुणी वापरत असेल का असा प्रश्न पडला आहे मला. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Sep 2018 - 1:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

"कंपूवाले पेटले तर मिपाची चांदी होईल" असा गुप्त संदेश त्या अल्गोरिदममध्ये आहे ! ;)

अभ्या..'s picture

7 Sep 2018 - 1:28 pm | अभ्या..

"पेटवायचे का? " ;)

टर्मीनेटर's picture

5 Sep 2018 - 2:33 pm | टर्मीनेटर

:-)

धन्यवाद डॉक्टर, Applause Button च्या वेबसाईटवर त्यांनी सांगितलय कि बाय डीफॉल्ट युजर एकदाच Clap करू शकतो (सेटिंग्ज चेंज नाही केल्या तर) त्यासाठी त्यांनी काय parameters ठेवले आहेत त्याची कल्पना नाही, कदाचित कुकीज वर आधारित असू शकेल. काही दिवस वापरून बघितलं तर येईल लक्षात.

पद्मावति's picture

5 Sep 2018 - 2:09 pm | पद्मावति

कल्पना आवडली आणि लाईक करून लेख वरती काढता येणार नसल्यामुळे प्रॉब्लेम येणार नाही.

धन्यवाद पद्मावातिजी, काही दिवस टेस्टिंग साठी वापरून बघायला काहीच हरकत नाही.

प्रतिसाद आवडला ...

मराठी कथालेखक's picture

5 Sep 2018 - 4:03 pm | मराठी कथालेखक

आयला ... मस्तच की ..माझ्या प्रतिसादाला आयतेच लाईक्स मिळालेत..

:) हे बटण url च्या आधारावर चालत असल्याने मूळ धाग्याला मिळालेल्या लाईक्स तुमच्या प्रतिसादात पण दिसणार. कारण दोन्ही बटणे एकाच वेबपेज वर असल्याने त्यांचा url पण एकच आहे. :-)

तुषार काळभोर's picture

5 Sep 2018 - 4:14 pm | तुषार काळभोर

एफ वाय आय पी....
रिफ्रेश करून आकडा वाढतोय.

नुसतं रिफ्रेश केल्यावर आकडा नाही वाढणार पैलवानजी. तेवढ्या वेळात कोणीतरी क्लिक केले असणार.

तुषार काळभोर's picture

5 Sep 2018 - 5:31 pm | तुषार काळभोर

परत कन्फर्म केलं.
वाढतोय.

बबन ताम्बे's picture

5 Sep 2018 - 5:55 pm | बबन ताम्बे

मी ट्राय केले.

प्रचेतस's picture

5 Sep 2018 - 5:27 pm | प्रचेतस

उत्तम.

अशाच अजूनही छोट्या मोठ्या एचटीएमेल युक्त्या येऊ द्यात.

प्रसाद_१९८२'s picture

5 Sep 2018 - 6:26 pm | प्रसाद_१९८२

टेस्ट !

सतिश गावडे's picture

6 Sep 2018 - 11:23 am | सतिश गावडे

रिफ्रेश केल्यानंतर एकच सदस्य पुन्हा टाळी वाजवू शकतो. हे चुकीचे आहे. स्क्रीप्टमध्ये कुकीज वगैरे वाचून युनिक व्हिजीट असेल तरच टाळी वाजवू द्यायची असं काहीतरी करावे लागेल.

दुर्गविहारी's picture

7 Sep 2018 - 12:40 pm | दुर्गविहारी

कल्पना आवडली. धाग्यात वापरुन बघतो.

प्रत्येक वेळी मिपा उघडल्यावर टाळी देऊन येतो.
हे होता कामा नये.
ऐसीचा कोड वापरा श्रेणीचा, फक्त नावे बदला - उत्तम, बरा, आवडला वगैरे.

धन्यवाद प्रचेतस, प्रसाद_१९८२ आणि दुर्गविहारीजी _/\_