कळलावी

vcdatrange's picture
vcdatrange in जनातलं, मनातलं
16 Aug 2018 - 11:11 pm

सुलभ प्रसूतीसाठी आदिवासी आणि पारंपरिक औषधी पद्धतीमध्ये मुळाचा लेप ओटीपोटावर लावला जातो. बाळंतिणीला प्रसूतीच्या वेळी कळा आणण्यासाठी वापर होत असल्याने या वनस्पतीला "कळलावी' म्हटले जाते.

ा

कळलावीच्या फुलांच्या पाकळ्यांची टोके तांबडी व मधला भाग पिवळा असल्याने अग्निज्वाला असल्याचा भास होतो. अग्निज्वालाप्रमाणे असणार्‍या या पाकळ्या दुरून समईत ज्योती तेवल्याप्रमाणे दिसतात, म्हणूनच या वनस्पतीला ‘अग्निशिखा’ असेही म्हणतात.

पावसाळा सोडून इतर ऋतुत याचे कंद जमिनित जिवंत असतात. पाऊस पडला की सर्व कंद रुजतात आणि वरील फ़ोटोप्रमाणे आपल्या माना वर काढतात. महिन्याभरत या वेली पसरतात. पाहता पाहता फुलानी बहरुन जातात. पावसाच्या प्रत्येक थेंबानजिक यांच सौंदर्य आणखी खुलत जात. अग्निशिखा हे नाव पडण्यामागील कारण हे की एका झाडाला अगणित फूल येतात, इतकी की पानं त्या खाली झाकून जातात. त्यात फुलांचा रंग हा अर्धा पिवळा व अर्धा लाल म्हणजेच अग्निज्वाला सारखा भसतो आणि म्हणून ही अग्निशिखा.

अग्निशिखा ही Liliace कुळातील आहे. या फुलांची आणखी एक गंमत म्हणजे फुले सुरवतीला पूर्ण पिवळ्या रंगाची असतात. नंतर हळूहळू वरच्या टोकाकडून लाल रंग यायला सुरवात होतो, तोच पुढे वाढत जावून संपूर्ण पाकळ्या पिवळ्याच्या लाल होतात. हा रंगबदल पाहणे मोठे मजेशिर असते. सर्व पाकळ्या सुरवातीला वरच्या उलट दिशेने वळून गोल तयार करतात. पाकळ्यांची टोके एकमेकाना भीडतात. त्यातून एक पोकळि तयार होते, या पोकळीत फुलपाखरे, मधमाश्या किंवा इतर कीड़े अडकून पडतात. त्यांच्या स्वतःच्या सोडवणूकीत फुले हालतात आणि त्यातून परागिभवन सोपे होते.

अग्निशिखाचे कंद व संपूर्ण झाड़ हे अतिविषारी आहे, माणसाच्या खाण्यात चुकून ही वनस्पति आल्यास मृत्यु ओढवु शकतो. Liliace या कुळातील बाकी बरेच कंद हे खाण्यायोग्य आहेत पण अग्निशिखा त्या उलट आहे...

अौषधी उपयोग आहेत पण त्यासाठी तिच्यावर प्रकिया करावी लागते

औषधोपचार

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

16 Aug 2018 - 11:31 pm | मार्मिक गोडसे

फोटो दिसत नाही, परंतू माझे अत्यंत आवडीचे फुल.

सुमो's picture

17 Aug 2018 - 5:47 am | सुमो

या नावानेही ओळखली जाते.

images_q_tbn_ANd9_Gc_Tkki_SFLtfb_Vceb_YPxs_XXZPyi5s_GJPk5oi_FFC6q_Mhfk3_JClqa7qw_Sdxkuk_T2_A

प्राची अश्विनी's picture

17 Aug 2018 - 10:37 am | प्राची अश्विनी

माहिती चांगली आहे पण विकी, फेसबुकवरून घेतलीय का?

दुर्गविहारी's picture

17 Aug 2018 - 11:34 am | दुर्गविहारी

पुढच्या म्हणजे सप्टेंबर महिन्यात सह्याद्रीमधे हि वनस्पती मोठ्या प्रमाणात दिसते. सुरवातीला कळी हिरव्या रंगाची, नंतर पिवळ्या व लाल पाकळ्या व शेवटी तपकिरी रंगाचे फुल अशी रंगपंचमी हे फुल खेळते. हिचा कंद बाळंतपणाच्या कळा येण्यासाठी वापरतात. अर्थात कंद इतका विषारी असतो कि त्याला सुई टोचून केवळ चाटवली जाते. उत्तम ओळख करुन दिलीत.