आम्हा गरीबांचे बघा

अंकुश चव्हाण's picture
अंकुश चव्हाण in जे न देखे रवी...
12 Mar 2009 - 10:46 am

आम्हा गरीबांचे बघा
सारे पत्त्यांचे बंगले.
वेदनेच्या पायावर
आमच्या सुखांचे ईमले.

शीळ्या भाकरीचा घास,
तेही तुकडे जळके.
चार कुडाच्या या भिंती,
वर छप्पर गळके.

काजळल्या कन्दिलाचा
प्रकाशही काजळला.
सुख - सौख्याचा आस्वाद
आम्हा कधी ना कळला.

आमचे जग हे स्वप्नांचे
सारा स्वप्नांचाच खेळ.
आसु आणि हासूमध्ये
कधी नसतोय मेळ.

आम्हासाठी जीवन हे
असे अळवावरचे पाणी.
न भावे जगजेठी मना
सखी वाटते विराणी...

कविता

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

12 Mar 2009 - 10:51 am | प्रमोद देव

आवडली.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

जागु's picture

12 Mar 2009 - 12:49 pm | जागु

गरीबीचे खुप छान चित्रण केले आहे.

मदनबाण's picture

12 Mar 2009 - 12:53 pm | मदनबाण

व्वा.सुरेख कविता...

काजळल्या कन्दिलाचा
प्रकाशही काजळला.
सुख - सौख्याचा आस्वाद
आम्हा कधी ना कळला.

व्वा...

अवांतर :-- कंदिल कुमार श्री श्री श्री आंबोळी महाराज प्रथम यांचे स्मरण जाहले. :)

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

चन्द्रशेखर गोखले's picture

12 Mar 2009 - 12:54 pm | चन्द्रशेखर गोखले

खुप छान , अप्रतिम कविता...!!

परिकथेतील राजकुमार's picture

12 Mar 2009 - 12:55 pm | परिकथेतील राजकुमार

काय अंकुशराव काहितरी नविन वाचायला द्या की राव ;)

http://www.misalpav.com/node/3104

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य