झोंबू लागे सुखद गारवा, मंदसा पाऊस झाला
जाऊ या लोणावळ्याला, सखीस इशारा केला
.
मारली दांडी ऑफिसला, अन तिने हि कॉलेजला
ठरे भेटायचे ,सकाळीच, जिमखान्याच्या स्टॉपला
.
लो वेस्ट जिन वर, स्लीव्हलेस टॉप शोभत होता
तिच्या मधाळ स्मिताने ,मुड रोम्यान्टीक होता
.
नेली फटफटी पंपावर, म्हटले कर टाकी फुल्ल
सुटे गाडी भन्नाट,बुंगाट .असे वातावरण कूल
.
चाले रस्ता ,धावे रस्ता, झाडे मागे पडू लागली
टेकले उरोज पाठीला, मिठी तारुण्याची घातली.
.
लय भारी, क्षण भारी, रक्त तारुण्याचे सळसळे.
पुणेमुंबई रस्ता आहे , थांबव हे खट्याळ चाळे
.
घालून हातात हात ,मस्त हिंडलो लोणावळ्याला
केले, न सांगण्याजोगे, माहीत आमच्याच मनाला
.
परतिचा प्रवास सुरु झाला,वेळ निरोपाची आली
घेताना निरोप कॉफी शॉप मध्ये, घालमेल झाली
.
निरखताना समजले, डाव्या कानातले दिसत नव्हते
झटापटीत बहुदा ,कर्ण भूषणं कुठेतरी पडले होते.
.
सांगताच सुंदरीने घाईने ,चाचपली कानाची पाळी
लाजली ,डोळ्यानेच म्हणाली, आळी मिळी गुप चिळी
अकुकाका
प्रतिक्रिया
31 Jul 2018 - 8:35 am | प्रचेतस
अगागागागा =))
31 Jul 2018 - 8:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काका, कविता आवडली. सदरील कविता माझ्या एका मित्रावर बेतलेली आहे असे वाटले, नुकतीच त्यांनी तुमच्या चित्रात दाखवल्या प्रमाणे फटफ़टी घेतली असे ऐकले आहे, आता मागे घट्ट मीठी मारून बसणा-या मैत्रिणीसारखी त्यांना मैत्रीण आहे की नाही तेवढे कन्फर्म करावे लागेल. ;)
डिस्क्लेमर: सदरील प्रतिसाद जर आपल्याला उद्देशून लिहिला असेल असे कोणाला वाटले तर तो निव्वळ योगायोग समजावा. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
31 Jul 2018 - 9:42 am | अविनाशकुलकर्णी
कविता आवडली धन्यवाद
योगायोग असतो काही वेळेला
31 Jul 2018 - 10:22 am | गवि
चित्रातली फटाफटी नाई कै. रॉयल या शब्दाने सुरू होणाऱ्या एका कंपनीची बाईक घेतली आहे त्याने. ते छायाचित्र प्रतीकात्मक / प्रातिनिधिक आहे. बाकी सत्यघटना आहे असं तो मित्र म्हणत होता.
बाकी साम्य, योगायोग , दिलगिरी इत्यादि नेहमीचं ..
31 Jul 2018 - 2:05 pm | ट्रम्प
आणि त्ये लो वेस्ट जीन ला कॉइन बॉक्स म्हणत्यात !!!
31 Jul 2018 - 4:03 pm | खिलजि
काय राव , कॉईन बॉक्स नई काई .. त्याला आमच्या महाराष्ट्रात तुणतुना म्हणत्यात .. अक्कू काका , मला या कवितेमुळे एक मुखडा आठवतो
पाऊस मंदसा झाला ,
पाऊस मंदसा झाला
बोलावूनही ती आली नाही
म्हणून दुसरीबरोबरच केलं उलाला उलाला
इति --> अन्नू मलिककर
31 Jul 2018 - 8:08 pm | अनन्त्_यात्री
"गारवा" हे शीर्षक देऊन मिपावरच यापूर्वी प्रकाशित केली आहेत काका!
31 Jul 2018 - 8:08 pm | अनन्त्_यात्री
"गारवा" हे शीर्षक देऊन मिपावरच यापूर्वी प्रकाशित केली आहेत काका!
6 Aug 2018 - 6:42 pm | नाखु
पुन्हा पाऊस आल्याने पुनः प्रक्षेपित केली आहे.
गारठा पक्षी वाहन पाहीलेला नाखु
7 Aug 2018 - 11:25 am | जेम्स वांड
काकांचा शृंगार रस ऍक्टिव्हेट झालाय. चालायचंच
बाकी,
लय भारी, क्षण भारी, रक्त तारुण्याचे सळसळे.
पुणेमुंबई रस्ता आहे , थांबव हे खट्याळ चाळे
रस्ता सुरक्षा सप्ताहात वापरण्याचे वाक्य आहे हे तुफान!
7 Aug 2018 - 11:27 am | जेम्स वांड
ते रॉयल एंफिल्ड वाले मित्र कधीतरी लेणी सोडून मागे बसलेल्या सौंदर्याच्या लेण्यावर (उपलब्ध असलेच तर) लक्ष देतील काय? मला ते नवीन रॉयल एंफिल्डवाले मित्र कायम मिपाच्या भांगेतली तुळस वाटत आलेत. देवा ज्योतिबाराया प्रतिमाभंजन होऊ देऊ नकोस रे बाबा, नाहीतर आमचे मित्र एकदमच मूर्ती अभ्यासक बुतशिकन म्हणवतील
(सगळ्यांनी हलक्यात घेणे)