घे मिठीत

आकाश५०८९'s picture
आकाश५०८९ in जे न देखे रवी...
24 Jul 2018 - 1:52 pm

घे मिठीत, घे मनात जसा असेन मी
माझ्यापुरताही सखे माझा नसेन मी

रितेपण प्यालातले माझ्यात ओतले
ओत लोचनांनी मद्य तेव्हा भरेन मी

नको स्पर्धा, नको जीत अन्‌ हारही
तू जिंकशील कशी जेव्हा हरेन मी

मला विसरल्याचेही विसरलीस तू
तू लाग आठवावया तुला सुचेन मी

थांबवले मृत्योस तुला भेटण्या मी
तू ये सखे लवकरी खोटा ठरेन मी

आहे आकाश मी माझ्याचसारखा
जसा तुला हवा तसा कसा असेन मी

---- आकाश

कविता

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

24 Jul 2018 - 2:58 pm | चांदणे संदीप

मस्त..

Sandy

श्वेता२४'s picture

24 Jul 2018 - 4:28 pm | श्वेता२४

छानच खूप आवडली

खिलजि's picture

24 Jul 2018 - 7:46 pm | खिलजि

घेतले मिठीत तेव्हा

उमजली उलगडलीस तू

जवळ येणे बाकी जोवर

छान छान वाटलीस तू

मदनबाण's picture

24 Jul 2018 - 10:05 pm | मदनबाण
आकाश५०८९'s picture

10 May 2019 - 11:23 am | आकाश५०८९

धन्यवाद मित्रांनो !

गामा पैलवान's picture

10 May 2019 - 5:33 pm | गामा पैलवान

आकाश५०८९,

शीर्षक वाचून 'घे मुठीत' असं विडंबन करायचं मनी योजलं होतं. पण कविता वाचल्यावर करावंसं वाटलं नाही. बहुधा भावना सच्च्या असाव्यात. लगे राहो भाय! और आनदो !!

ही गझल आहे का की, केवळ कविता आहे ? माझं दोहोंचं आकलन फारसं नाही, म्हणून विचारतोय.

आ.न.,
-गा.पै.

राघव's picture

14 May 2019 - 4:30 pm | राघव

आवडली.

सस्नेह's picture

14 May 2019 - 9:11 pm | सस्नेह

छानेय कविता.
आणि कल्पना

ayush sharad wadnere's picture

17 May 2019 - 1:46 pm | ayush sharad wadnere

WOW NICE