मुस्लीम धर्मीय अंधश्रद्धांबाबत चर्चा करताना पहिला अडथळा तथाकथित पुरोगाम्यांचा असतो, कोणतीही उणीव घ्या ती
ईतरही धर्मात आहे ना ! मग मुस्लीमांच्या उणीवा अभ्यासल्या जाऊ नयेत असा हा युक्तीवाद असतो. खरेतर एकाच्या उणीवेने दुसर्यांची उणीव झाकली जात नाही. पण तरी सुद्धा तुम्ही मुस्लीमांसोबत चांगले मुद्दे लक्षात घेतलेत काय ? आणि इतरांच्या उणीवा मोजल्या आहेत का ? अगदी होय , धागा लेखाचा विषय पहाताच असे प्रश्न पडून धागा उघडणारे तथाकथित पिंकारु पुरोगामी असाल तर आपल्यासाठीच्या 'तथाकथीत पिंकारू पुरोगाम्यांचा नंबर पह्यला !' ह्या लेखाकडे जाण्यासाठी आभार षडरिपू म्हणजे राग, लोभ, द्वेष, मत्सर, अहंकार मुक्त केवळ भक्ती मार्गी तर्क आणि विज्ञाननिष्ठ श्रद्धावंत असाल तर आपल्या विश्वासांना डोळसपणे अभ्यासण्याची संधी मिळेल अशी आशा करुया. अब्राहमीक आणि मुस्लीम धर्म विषयक प्राथमिक ओळख मिप सदस्य मन यांच्या मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग या चार लेखांच्या धागा मालिकेतून घेता येते.
सध्याच्या मालेत पुढच्या लेखाचा विषय प्रबोधन आणि त्या नंतरचा धागा विवीध अभिव्यक्ती कलांमधील यशवंत मुस्लीमांच्या व्यक्ती चरीत्रांवर असावा असा मानस आहे.
तसे इतर कोणत्याही मनुष्यप्राण्या प्रमाणे इतर सर्वसाधारण अंधश्रधा मुस्लीम व्यक्तींमध्येही असू शकतात जसे की होरोस्कोप हा पाकीस्तानातून सर्वाधीक गूगल केल्या जाणार्या शब्दांपैकी एक आहे, महाराष्ट्रातील उर्दू साठी गूगल ट्रेंड तपासले तर उर्दु होरोस्कोप हि टर्म पण अत्याधीक सर्च होणार्या टर्म पैकी आहे हे दिसेल. गूगल ट्रेंडचा विषय निघाला आहे तर स्वप्नांचे अर्थ हा सुद्धा मुस्लीम अंधश्रद्धेचा भाग आंतरजालावर बर्यापैकी प्रमाणावर शोधला जाताना दिसतो. तसे या धागा लेखात या सर्वसाधारण अथवा शियादी छोट्या समुहातील अंधश्रद्धां चाही विचार मुख्य लक्ष्य नाही कारण अंधश्रद्धा अंधश्रद्धा म्हणून स्विकारल्या जातात तेथे इतर समस्या असल्या तरी किमान अंधश्रद्धा नसल्याची अंधश्रद्धा नसते. पण तेच कट्टर पंथीयांचे पाहिलेत तर अंधश्रद्धा नसल्याची अंधश्रद्धा बर्यापैकी प्रबळ दिसते. Holier-than-thou अॅटीट्यूड ने संस्कारीत झालेले असतात. त्याची त्यांना जी दोन मुख्य कारणे वाटतात ती की त्यांच्यात मुर्तीपुजा करत नाहीत आणि अनेक देवांना मानत नाहीत. केवळ या दोन गोष्टी अंधश्रद्धेच्या बिरुदावलीतून सुटण्यासाठी पुरेश्या असतात का ?
जेवढे देव आहेच किंवा नाहीच हे सिद्ध करणे जेवढे कठीण तेवढेच देवाचे स्वरुप आणि संख्या अमूकच आहे हा दावा करणेही कठीणच असावे. - वस्तुत: इश्वराला हात-पाय असे कोणकोणते अवयव आहेत किंवा नाही या बाबत अस्पष्टता असावी (संदर्भ: १ २, ३ ) कथित परिपूर्ण ग्रंथातील हि अस्पष्टता जराशी अनाकलनीय आहे - आणि इन एनी केस जर देव एकच आणि निराकार असेल आणि जे अस्तीत्वात नाही त्याला अस्तीत्व आहे असे चार माणसे म्हणाली -त्यांनी त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगले- तर आभाळ कोसळते का ? आभाळ नक्कीच कोसळत नसावे तरीही देवाचे अस्तीत्व स्वरुप ते संख्या या बाबत इतर मत असेल तर त्यांच्याशी फटकून वागणे ते दुश्वास ते हिंसा या स्तरावर पोहोचण्याची गरज मनात भिनवली जावी आणि ती भिनावी हि अंधश्रद्धा नव्हे काय ? बरे मुर्ती पूजा नाही म्हणून कर्मकांड रिच्युअलायझेशन नाही असे ही नाही रिच्युअलायझेशन ही तेवढ्याच अंधश्रद्धेने पाळले जातात.
पण तेही असू द्या आपण इतर अंधश्रद्धा आणि चमत्कारांचे स्वरुप अभ्यासूया. पण तत्पुर्वी एक लक्षात घेणे सयुक्तीक असावे की संस्कृत प्रमाणे अरेबीक सुद्धा एक जुनी आणि एकाच शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकणारी भाषा आहे, संबंधीत ग्रंथांचे संदर्भ कुणि कुठे दिले तरी ते अर्थ तंतोतंत अचूक आहेत याची खात्री देणे कठीण असावे. त्यामुळे गैरसोईची इंटरप्रीटेशन जशी इतर धर्मीयात ईंटरप्रीटेशन चुकले म्हणून नाकारली जाऊ शकतात तशी ती इकडेही नाकारली जाऊ शकतात किंवा सोईचेच अर्थ काढण्याचे आग्रह ही असू शकतात त्यामुळे तसे डिसक्लेमर सुरवातीसच असलेले बरे.
पाकीस्तानी वृत्तपत्र दि एक्सप्रेस ट्रिब्यून मधील Khalid ZaheerPublished: September 25, 2011 यांच्या Magic and superstition: An Islamic perspective लेखातील संदर्भ बरोबर असल्यास लेखातील खालील वाक्यांची नोंद घेणे क्रमप्राप्त असावे.
* The fact that Musa, AH, (Moses) confronted a bunch of magicians who caused ropes to appear like snakes is a case in point (Quran; 7:116).
* जादूला वाईट समजले तरी खरे समजले जात असावे
* A man during Solomon’s time, according to the Quran, for instance, was able to cause the throne of Queen Sheba (Bilqis) to be removed from its place of origin to another one in no time (Quran; Surah Al-Naml).
* संदर्भ
ईतर सुपरनॅचरल्स बघीतल्यस १) हुरी २) देवदूत ३) इब्लिस ४) इफ्रित ५) Qareen/Hamzad ६) बराक ७ ) ८) सैतानला अरेबीक शब्द काही वेगळा असावा आणि संबंधीत चमत्कारांचा समावेश व्हावा संदर्भ या शिवाय बर्यापैकी चमत्कार जसे काठीचा साप होणे , येशु जन्म इत्यादी असावेत. या मागे निराकार परमेश्वरी इच्छेच्या शक्तीचा प्रभाव मनावर बिंबवणे असा उद्देश्य असावा. निराकार परमेश्वर एखादी कल्पना कशी करु शकत असेल, या परमेश्वरी ईच्छांचे फिजीकल शक्तीत कसे रुपांतरण होत असेल, चमत्कारार्थ नेमकी कोणती विज्ञान तत्वे परमेश्वरास बाजूस ठेवता येतात अथवा वाकवता येतात आणि कोणत्या विज्ञान तत्वांचे बंधन परमेश्वरासही पाळावे लागते असे बाळबोध प्रश्न विज्ञानाच्या अभ्यासकांना पडल्यास त्याची नेमकी उत्तरे काय असतात याची कल्पना नाही - धार्मिक दृष्टीने बघायचे झाल्यास इतर सगळे चमत्कार करु शकणारा निराकार परमेश्वर स्वतःस साकार करण्याचा चमत्कार करु शकत नाही किंवा वस्तुमात्रांमध्ये प्रवेश करु शकत नाही तरीही परमेश्वराच्या इच्छाशक्तीचे प्रयोग होत रहातात. विज्ञान सनातन (अनादी) आहे, कि ईश्वर निर्मीत ? याचे त्यांचे ( एकेश्वरवाद्यांचे ) नेमके उत्तर काय असेल याची कल्पना नाही.
* सुर्याचा अस्त
ह्या सर्वच श्रद्धांचा मानवी जिवनावर परिणाम होतो असे नाही पण स्वप्नांना खरे मानण्याच्या श्रद्धांचा परिणाम होऊ शकत असावा . अगदी तान्ह्या बाळाचे नाजूक अंगावर सुंन्ता (सरकमसिजन) करण्याच्या हिरहिरीच्या समर्थनाने समस्त आंतरजाल व्यापलेले दिसेल तरीही अभारतीय आमेरीकी डॉक्टर आणि मानवाधिकार तत्ज्ञांचा doctors opposing circumcision हा एक गट (अभारतीय आहेत हे विशेषत्वाने नमुद करतो) सुंन्ता (सरकमसिजन) च्या हकनाक समर्थनाबद्दल सबळ साशंकता व्यक्त करताना दिसतो. त्यांच्या सगळा मांडणितील सुन्ता झालेले तान्हे बाळास स्तनपान करवण्यातील अडचण किती गंभीर असू शकेल हा विचार सर्वात कठीण वाटतो. लसीकरण विषयक अंधश्रद्धेमुळे केरळातील १,७०.००० मुलांचे लसीकरणच होऊ न शकल्याच्या बातम्या सप्टेंबर २०१५ च्या आसपास होत्या -बाकी भारत आणि जगातील स्थितीची कल्पना नाही- त्या संदर्भाने मिपावर एक धागालेख चर्चाही झालेली आहे. ग्रंथप्रामाण्याची अनुमती असल्याने पारिवारीक विवाह संबंधास प्रमाण वाढून भावी संततीच्या आरोय विषयक जोखीम वाढतात, पडदा पद्धतीमुळे डि व्हिटॅमीनच्या आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागते, तर सौदी अरेबिया सारख्या कर्मठ देशात स्त्रीस एकटीने हॉस्पीटलमध्ये सुद्धा जाण्याची अनुमती नसते . ग्रंथ प्रामाण्य आधारीत अंधश्रद्धांचा प्रभाव आर्थीक निर्णयांवर पडतो ज्यामुळे बँकींग व्यवहार करणे कठीण जाते , कर्जांचा वापर जिवनमान सुधारण्यासाठी होणे कठीण जाते , तेही ठिक इंशुरन्स सारख्या सुविधांपासून हकनाक दूर राहीले जाते.
या ग्रंथप्रामाण्यात नेमके काय असते की उत्क्रांतीचे सिद्धांत नाकारण्यासाठी अटी तटीला पडावे लागावे. मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, आर्कीऑलॉजी , भौतिक शास्त्र , शरीर विज्ञान आणि आरोग्यशास्त्र, तर्कशास्त्र अशा विषयातील या समुदायातील विद्यार्थी आणि अभ्यासकांची संख्या वाढल्यास अंधश्रद्धा निर्मुलन आणि प्रबोधनास हातभार लागू शकेल का?
हा लेख पूर्ण अद्ययावत आहे असा अजून दावा नाही, पुर्नमांडणी आणि प्रबोधन विषयक अभ्यास आणि लेखन समांतरपणे व्हावयास हवे, त्या बाबतच्या लेखनासोबत हा लेखही अधिक नेमका होऊ शकेल अशी अपेक्षा करु
* विज्ञान विषयक साशंकता : १
* अनेक पत्नी विवाहातील ज्येष्ठ पत्नींच्या समस्या अफगाणिसात रिपोर्ट , पॅलेस्तेनिअनरिपोर्ट सिरिया
मिडल इस्ट -गूगल पुस्तक भारताबाबत अद्याप असा सर्वे मिळाला नाही कुणाला गूगल वर प्राप्त झाल्यास द्यावा.
लेखन चालू
* https://nation.com.pk/25-Jan-2016/7-popular-superstitions-among-pakistanis
* Prevalence of Superstitions and Other Supernaturals in Rural Punjab: A Sociological Perspective By Farooq, Ayesha; Kayani, Ashraf K. पि..डि.एफ पाकीस्तानी वेबसाईट : http://results.pu.edu.pk/images/journal/csas/PDF/3%20Ayesha%20Farooq_V28...
* https://youtu.be/677lMXleqWI
* https://youtu.be/JGSTArbhMGM
* तथ्यात विसंगती आढळल्यास दुरुस्ती सुचवण्याचे अथवा मिपा संपादकांनी यथा योग्य बदल करण्याचे स्वागत असेल. चुभूदेघे.
* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतर तसेच चंद्र दाखवणार्याच्या बोटावर कॉमेंट म्हणजे व्यक्ती लक्ष्य तर्क दोष टाळण्यासाठी अनेक आभार.
*
प्रतिक्रिया
17 Jul 2018 - 8:54 pm | प्रसाद गोडबोले
एक लिंबु झेलु बै एक लिंबु झेलु
दोन लिंबु झेलु बै दोन लिंबु झेलु
तीन लिंबु झेलु बै तीन लिंबु झेलु
चार लिंबु झेलु बै चार लिंबु झेलु
पाच लिंबु झेलु बै पाच लिंबु झेलु .....
17 Jul 2018 - 9:02 pm | Ram ram
मागाजी तुमची इस्लामला कितीही प्रवाहात आणण्यासाची इच्छा असो पण हिंसक, रानटी व आधुनिक तंत्रज्ञान विज्ञानाचे सर्व फायदे घेऊनसुद्धा मध्य युगात जगणारी लोक अशी मुस्लिमांची प्रतिमा इतर धर्मीयांच्या मनात आहे व ती तशीच राहावी याला फतवे बहाद्दरांडून बळ दिलं जातंय.
18 Jul 2018 - 9:42 pm | चौथा कोनाडा
रामराम साहेब,
पाय ओढू नकात प्लिज ! एक मिपाकर कळकळीने मत मांडतो आहे, चरचा घडवतो आहे, काहीतरी धडपड करतो आहे, याचं कौतुक करा.
ते नविन कॉनफिग्युरेशन निरमाण करायचा मनापासून प्रयत्न करत आहेत असे जाणवते.
(मला जाणिव आहे आप्ल्यातले फार कमी मिपाकर यावर चरचा करू शकतिल. इन्क्लुडिंग मी स्वतः)
आता त्यांचे हे प्रयत्न भाबडेपणाचे वाटतील, परंतु या रोपट्याला पुढंमागं फळं येतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.
त्यांचा स्वतःचा असा वेगळा पंथ कदाचित निर्माण करतील. तात्पुरते मुस्लीम सत्यशोधक समाज जॉइन करायला हरकत नाही, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तिथेच पर्फेक्ट मिळतील (असे मला वाटते)
(टीपः हा प्रतिसाद गांभिर्याने दिला आहे याची नोंद घ्यावी)
19 Jul 2018 - 9:02 am | प्रकाश घाटपांडे
कट्टरपंथीयांमधे अंधश्रद्धा निर्मूलन तुलनेने अवघड असते.कारण त्यांच्याकडे प्रबोधनाचा वारसा फार नसतो.
20 Jul 2018 - 1:27 pm | माहितगार
मला खालील मुद्दे जाणवतात
* प्रबोधन आणि अंधश्रद्धा निर्मुलन या समांतर पण एकमेकांच्या हातात हात घालून प्रगती साधणार्या बाबी आहेत
* सर्वसाधारण पणे कोणत्याही समुदायात ५ टक्के नास्तिक १० टक्के मॉडरेट ७० टक्के जी बाजू पटेल तिकडे वळणारे मधले हे मतदान सहसा मॉडरेटला करणार पण समोर परंपरावादी आल्यास त्यांना मान डोलावणार दुसर्या टोकाला १० टक्के उदार परंपरावादी आणि ५ % अती कर्मठ हे प्रमाण आणि यातील प्रत्येक गटाचे प्रभाव , उत्पातमुल्ये इत्यादी स्थल काल समुह सापेक्ष बदलत असणार. यात ५ टक्के नास्तिक १० टक्के मॉडरेट ह्या गटांना शोधून नेटवर्क उभारुन प्रभावी होण्याच्या अधिक संधी देणे हा एक मार्ग असू शकेल.
* पाकीस्तानी पुरोगामी डॉ. अली रिझवी यांच्या मते प्रबोधनासाठी इस्लामीक नॅरेटीव्हचा प्रवास वर्ड ऑफ गॉड कडून इन्स्पिरेशन ऑफ गॉड कडे होण्याची गरज आहे (ते स्वतः नास्तिक असले तरी त्यांचे हे मार्गदर्शन आस्तिक बाजूने असावे)
* प्रा. हमेद अब्देल-समद यांच्या मते स्वतः मुस्लीम, मुस्लीम स्त्रीया आणि मुस्लीमेतरांच्या एकसमान १) (व्यक्ती) स्वातंत्र्य, २) मानवाधिकार, ३) सहिष्णूता, ४) कायद्या समोर समानता, ५) विवीधता (pluralism) या पाच गोष्टींच्या आग्रहाची संस्कृती बाणवणे ही प्रबोधनाची बेसिक प्रिंसीपल ची अंमल बजावणी महत्वाची आहे. प्रबोधन या विषयावर या दोघांच्या मतावर स्वतंत्र लेख लिहिणारच आहे.
* मानसशास्त्र, आधूनिक वैद्यकशास्त्र आणि शरिर विज्ञान, अनुवंशशास्त्र, पुरातत्व, भौतिक शास्त्र तर्कशास्त्र इत्यादी विज्ञानाबाबत चे त्यांचे स्वतःचे विद्यार्थी अभ्यासक आणि प्रबोधनकारी भाष्यकार वाढवणे आणि हि शास्त्रे जनसामान्यांपर्यंत नेणे.
* विवीध कलातील कलांच्या संधी आणि त्या कलाकारांच्या अधिकतम अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह , आणि प्रबोधनवादी आत्मचरित्रांना आणि कादंबरी लेखक लेखिका दिग्दर्शकांना संधी आणि उत्तेजन
* डॉ. अली रिझवी आणि प्रा. हमेद अब्देल-समद यांनी मांडलेली उपरोक्त तत्वे लक्षात घेऊन मुस्लीम जिवन पद्धतीचे अधिक प्लुरलीस्टक अधिक पर्याय उपलब्ध करणे
* आतीया अबावी आणि कॉराड एल्स्ट आपापल्या पद्धतीने मुस्लीमेतरांचे योगदानाचे महत्व विषद करताना दिसतात त्यालाही महत्व असावे. तर हा लेख नास्तिकांच्या योगदानाचे महत्व विषद करत असावा
कॉनराड एल्स्ट तथाकथीत पुरोगाम्यांच्या वर्तनाबद्दल साशंकता व्यक्त करताना म्हणतात
पुढे म्हणतात
आतीया अबावी काय म्हणतात पाहूया
20 Jul 2018 - 9:28 am | प्रकाश घाटपांडे
पुरोगाम्यांचा भयाण इतिहास
वाचला का?
20 Jul 2018 - 9:51 am | माहितगार
एकुण उपहास करुन विषय बदलू, पण निसटत्या बाजूंची जबाबदारी घेणार नाही ही वृत्ती त्या लेखातून सुस्पष्टपणे अधोरेखित होत असावी एकुण टोकाच्या परंपरावाद्यांमध्ये आणि पिंकारु आणि तथाकथित पुरोगाम्यांच्या वागण्याच्या बेसिक्स मध्ये फारसा फरक नसावा असे नोंदवावेसे वाटते . असो.
20 Jul 2018 - 5:01 pm | ट्रम्प
माहीतगार भाऊ , तुमचे प्रतिसाद वाचतांना का कुणास ठाऊक मला संत तुकाराम सारखे सिनेमे आठवतात .
त्या सिनेमा मधील डायलॉग डिलिव्हरी आणि तुमचे प्रतिसाद शेम टू शेम वाटतात .
खूप छान लिहता तुम्ही .
20 Jul 2018 - 7:16 pm | उगा काहितरीच
प्रतिसाद वाचता वाचता कळेनासं झालं आणि चुकून लेख तर ओपन नाही झाला ना हे बघायला जेव्हा जेव्हा वर स्कोल करतो तेव्हा तेव्हा तो प्रतिसाद माहितगार सरांचा असतो.
( माहितगार सर , हघ्या ! आणि अज्ञानी बालक समजून इग्नोर करा )
21 Jul 2018 - 8:01 am | माहितगार
:) ट्विटरोत्तरेच द्ययची तर ट्विटरच जॉईन केले असते ना काका. बरे प्रतिसादाची लांबी कमी व्हावी म्हणून वाकप्रचार म्हणी वापरल्यातर त्याही नाजूक मनांना खुपतात. नाही म्हणजे मनमोकळ्या प्रतिसादांचे तसे आम्ही नेहमीच मनमोकळे आभारी असतो नाही असे नाही. पण तरीही असे स्ट्रीयो टायपींग आम्हाला जायज वाटत नै . इथे आमच्या या दुसर्या धाग्यावर रंगलेली डॉ. म्हात्रे सर आणि गापैजींची जुगलबंदी बघा आणि असे मोठे प्रतिसाद लिहिणारे अनेकजण असतील. कारण हम असली मिपाकर है ट्विटर्पचे दुश्मन !
21 Jul 2018 - 8:03 am | माहितगार
सॉरी हा जुगलबंदीचा दुवा राह्यला की .