त्याचं काय ये, पिडांकाकांचा ड्रिंक्सवरचा काथ्याकूट वाचत होतो अवेळी (म्हणजे संध्या़काळी...) आणि पुर्वीचे दुवेही पाहीले .... त्यामुळे एकंदर माहोल असा झाला की आम्ही ग्लेनफिडीच बाइंना घरी आणायचे ठरवले... साधारणपणे सव्वा आठ ला जावून बघतोय तर काय आमच्या गावतील मधुशाळा बंद !!! (मी बे एरीयात राहतो, एस एफ ओ पासून वरती [पुण्यातलं वरती नाही] तासभर अंतरावर...) - त्यामुळे लक्षात आले की हे फक्त पुण्यातच होत नाही बाकी ठिकाणीही होवू शकते.... पण हिंमत न हारता आम्ही लांबवरच्या दुसर्या किराण्याच्या दुकानात ही बया शोधुन काढलीच... मग मस्त घरी चकना घेवून मिपा उघढून बसलो... सोबत ग्लेनफिडिच... मजा आली....
पण तेवढ्यात माशी शिंकली.... डॉ. दाढेसाहेबांचा 'पुणेरी पुणेकर' लेख वाचनत आला... लेखापेक्षा प्रतीक्रियापाहून आणखी वाइट वाटले... अरे काय चालले आहे? त्या सर्व प्रतीक्रिया वाचून काढल्या... ग्लेन होतीच बरोबर... (खरेतर त्यामुळेच शक्य झाले...) एकुणच वाचून झाल्यावर दोन गोष्टी मनात आल्या... पहिली गोष्टं म्हणजे 'हिंदी चिनी भाई भाई' .... डॉ. दाढे तुम्ही काय वेगळे केले हो ?? स्वतःला पुणेकर म्हणवताय... त्या लिहीलेल्या गोष्टींपैकी किती गोष्टी करता तुम्ही ?? तुम्ही म्हणता का रूपयाला डॉलर?? राग मानू नका पण तुम्ही दर रवीवारी पॅटीस खाता का ? अहो वैविध्यपुर्ण पाट्या लावणे ही जाहिरातबाजीची कला आहे... दुकानात जे मिळते त्याची पाटी येणारच. तुमच्या दाताच्या दवाखान्याबाहेर डेंटिस्ट चीच पाटी लावलीयना ? का वकीलाची लावलीय ? अहो 'उसाचा ताजा रस मिळेल' ह्या पाटीला पण खुप अर्थ आहे... त्या पाटी बरोबर त्या गुर्हाळाला घुंगरू लावलेले आसते...तो आवजही किणकिणत असतोच की... ही सगळी लोकांना आकर्शीत करायची योजना आहे बरं... (कुठेतरी आदिती ताईंनी लिवलय ...वांझोटं बोलणं ऐकू येत होतं पण ईमेल मधून लिहून आल्याखेरीज डोक्यात शिरणार नाही विज्ञानदीन....) असो एकंदर तुम्ही लेख लिहून झाल्यावर जी सफाई दिलीत कि 'मी पण पुणेकर आहे वैगेरे...' नाही पटत हो... तुम्हाला अजून पुणेकर समजलेलाच नाहीये.... पुणेकर व्हायची गोष्ट तर लांबची...माझा पुर्ण (म्हणजे असा ठाम की त्याउप्पर तुम्ही काही विचारणारच नाही :)) ) विश्वास आहे त्या पुराणकालीन ब्रुट्सचं एकतर आडनाव दाढे असेल किंव्वा तो डॉक्टर तरी असला पाहीजे...अजून एक... पुणेकर मुली कापड बांधून फिरतात... अगदी बरोबर... पण मला सांगा, तुम्ही नागपूरला गेलात का कधी ? मागच्या चार पाच वर्षात ? तिथेही अगदी अशीच पध्धत आहे... सर्व मुली तोंडाला फडके बांधून फिरतात... मागे आर एस एस वर हल्ला झाला तेंव्हा तिथल्या पोलीस अधिक्षकाने आदेश काढला होता कि कोणी फडके बांधयचे नाही म्हणून.... अशे तुम्ही किती ठिकाणी फिरून निष्कर्श कढला की ह्या गोष्टी पुण्यातच होतात....... (अवांतरः नागपूर जवळच्या अमरावतीत सांबारवडी नावाचा 'एक नंबर' प्रकार मिळतो... कहीसा पॅटीस सारखा..... त्याचा आणि सांबार ह्या पदार्थाचा काडीईतकाही संबंध नाही... म्हणून काय त्याची लज्जत कमी होत नाही.... किंव्वा त्याला फिदि फिदि हसायचिही गरज नाही.) तुमचा बिल्डींच्या नावाचा मुद्दा तर फारच आवडला मला... म्हणजे पुण्यात २५ वर्षे राहून मला कधीच हासू आले नाही मग मुंबईच्या लोकांना हासू का येते ते मला कळेना... मग ग्लेनचा दुसरा ग्लास भरला आणि गुगल वर पहीले कि बुवा मुंबै मधे काय प्रेक्षणिय (म्हणजे सामान्य लोकांची पर्यटनाची... तात्यांची प्रेक्षणीय नव्हे) स्थळे आहेत.... तर पहिलाच दुवा दाखवतो ... गेट्वे ओफ इंडीया , प्रिंस ओफ वेल्स मुझियम, जहांगिर आर्ट गॅलरी, जुहू बिच, छत्रपती शिवाजी टर्मिनस ....इंग्रजी नावांचा पगडा सगळीकडे आहे.... विषेषतः जिथे इंग्रज राहीले तिथे तो जास्त.... साउथ मंबईत जसे ते जाणवते तसेच ते पुण्यातही सापडेल.... जावू दे.... तुम्ही पुण्यापेक्षा ज्या गावावरून आला, मी येथे वाढलो असे सांगून, तिथली निरीक्षणे लिहीली असती, तर ती निरपेक्षपणे लिहीलीत असे वाटले असते....
तरीही तुमचा लेख वाचुन जेवढे वाईट वाटले नाही तेवढे बाकी प्रतीक्रिया वाचून वाटले.... एडीभौ नी रीक्षावाल्यां बद्दल अगदी समर्पक निरीक्षण केलेय. आहो तुमालाच काय पण मलाही आसेच आनुभव आलेत, फक्त ते मी पुण्याचा आणि रीक्षा मुंबई, बेंगलूरू किंव्वा चेन्नईतील असायची!!! मध्यंतरी २००६ मधे २ महिने मुंबईत काम होते. रोज मालाड ते मरोळ जायचो रीक्षाने..(ते ही सहा जण दोन रीक्षा करून) कधीही भाडे तेच आले नाही दरवेळी भाडे वेगळे (आम्ही शांतचित्ताने कंपनीला बिल फाडायचो ति गोष्ट वेगळी..) पण ९०% रीक्षावाले महाराष्ट्रियन. बंगरूलूमधेही तीच तर्हा... बानेरघट्टा ते जयनगर रीक्षा केली दहा वेळा पण भाडे कधीहि सारखे नाही (म्हणूनच बहूतेक याला भाडं म्हणत असावेत..) तात्पर्य काय रीक्षावाले सगळीकडे सारखेच... त्यावरून पुणेकरांच माप काढणं म्हणजे जरा जास्तच होतं. त्यावरून दुसरी गोष्ट मनात आली. ती म्हणजे अविनाष धर्माधिकारी यांचे भाषण !!! बे एरीया विष्व मराठी संमेलनातले. (झाले एकदाचे.) त्यांनी अंतंत्य कळवळीने मुद्दा मांडला की आपण महारष्ट्रियन मंडळीच आपल्या एकमेकांच्या आड जास्त येतो. दुसर्याचे काही चांगले म्हंटले किंव्वा झाले की आपल्याला कसेतरीच होते. सगळ्या प्रतीक्रियापाहून हे मात्र मनोमन पटले. आणि हाच सर्वात मोठा शत्रू आहे आपला. कुणी नागपूरला चांगले म्हणाले की बाकीच्यांनी त्यच्यावर तुटून पडायचे. पुणेकरांनी पुण्याचे गोडवे गायले की बाकी त्यावर कुरघोड करणार. मुंबईकरांनी मुंबईबद्दल आत्मियता दाखिवली की बाकी सांगणार मुंबई कशी महराष्ट्रात नाही ते... काय फायदा ह्या सगळ्या गोष्टींचा ? काही होतय का साध्य? सगळ्यांचीच गावे एकमेवाद्वितीय आहेत रे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असली तरी महाबळेश्वर आणि माथेरानची सर येणार का तिला? मुळा मुठा आणि पवना वाहात आसल्या पुण्यात तरी कर्हेकाठच्या वांग्यांची लज्जत काही न्यारीच नाही का ? अरे जगप्रसिध संत्रे आणि हलदीराम काय नागपूरकर एकटेच रीचवणार आहेत का? (इती ग्लेन लार्ज नं. ४) तेव्हा तुमच्या सर्वांच्या शहरं / गावांची स्तुती ऐकता ऐकता म्हातारं व्हायला मला नक्कीच आवडेल, पण म्हणुन तरूणपणी माझ्या पुण्याची निंदा नालस्ती नका करू.
पण खरं सांगू, मग पुणं तिथं काय उणं हे खरोखरचं खरं आहे का? (एकाच वाक्यात किती खर खर!!!) मला वाटते मुळीच नाही, पण तरीही कुठेतरी माझ्यात पुण्याबद्दल अभिमान आहे (लहानाचा मोठा झालो त्यामुळे काही गत्यंतर नाही). आहेत काही गोष्टी सुंदर आणि काही नाही एवढ्या सुंदर..... पुर्वजांच्या (माझ्या नाही.... ईतरांच्या) पुण्यायीने चांगला इतिहास आहे, तर कुठेतरी बेरकीपणाचा वर्तमानही आहे. शिक्षण्संस्थांच नको इतकं पसरलेलं जाळं आहे तर कुठे वाह्तुकशिस्तीचा अभाव... आहे हो हे सगळं.. पण तुम्ही जेवढी टिंगल टवाळी करताय तसं तर निश्चित नहीये पुणं.
बरं, तुर्तास एवढेच. मंडळी, एकमेकांची दुणी काढून आपण पुढे नाही जावू शकणार, त्यासाठी आपल्याकडे काय चांगले आहे ते सांगा इतरांना, आणि आपण बाकी लोकांकडून चांगले काय घेवू शकतो ते बघा. असे झाले तरच आपण महाराष्ट्रियन लोक आपोआप पुढे जावू, ( त्यासाठी गुजराती लोकांनी मार्गदर्शन करायची गरज राहणार नाही!)
बाकी सुज्ञास अधीक सांगणे न लगे....
(एक हळवा पुणेकर) अडाणि
प्रतिक्रिया
10 Mar 2009 - 5:20 pm | सँडी
सहमत!
तुम्चं ग्लेनमय लिखाण "जाम" आवड्लं!
तुम्हाला तिकडेहि "वरती" सापड्ल्याबद्दल अबिणंदन!
- सँडी
10 Mar 2009 - 7:22 pm | चिरोटा
माझ्यामते पुणे राज्याची सान्स्क्रुतिक राजधानी का काय म्हणतात ते असल्याने सर्वजण पुण्याला 'कोपच्यात' घेतात.
मी स्वत: ४.५ वर्षे पुण्यात होतो.परन्तु व्यक्ति तितक्या प्रक्रुति ह्या नियमानुसार काही चान्गलि माणसे भेटली,काही नाही भेटली.
भेन्डि-(बेन्गळुरु)
सोलापुर्,कोल्हापुर सह विशाल कर्नाटक झालाच पाहिजे.
11 Mar 2009 - 2:33 pm | घासू
अहो. तिकडेचे तिकडे ठेवा. आणि आमच्यातल काही मागू नका.
11 Mar 2009 - 3:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सोलापुर्,कोल्हापुर सह विशाल कर्नाटक झालाच पाहिजे.
१००% सहमत, आणि त्याची राज्यभाषा मराठी असली पाहिजे.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
11 Mar 2009 - 3:56 pm | सँडी
सोलापुर्,कोल्हापुर सह विशाल कर्नाटक झालाच पाहिजे.
१००% सहमत, आणि त्याची राज्यभाषा मराठी असली पाहिजे.
१०१%सहमत! आणि त्या "विशाल कर्नाटक" च नाव महाराष्ट्र असले पाहिजे!
10 Mar 2009 - 11:16 pm | उदय
एकदम खरे आहे. सहमत.
11 Mar 2009 - 3:25 am | अनामिक
सांबारवडी:
नागपूर भागात (विदर्भात) 'कोथिंबीर'साठी सांबार/सांभार हा शब्द वापरतात... ह्या कोथिंबीर्/सांभार घालून केलेल्या पाकृला सांभारवडी म्हणतात, त्यामुळे त्याचा तुम्ही म्हणताय त्या सांबाराशी काही एक संबंध नाही!
अनामिक
11 Mar 2009 - 5:19 am | अडाणि
सांबारवडीच्या माहितीबद्दल. मी पण ही माहिती देणारच होतो पण लेख वाढतच चालला होता. शिवाय, माझा मुद्दा साधा होता कि प्रत्येक ठिकाणी एखाद्या गोष्टीला वेगळी नावे असतील (जसे पॅटीस) पण म्हणून त्याला उगाचच नावं कशाला ठेवायची. चवीनं खा आणि मजा कराकी लेकांनो.
बरं मुख्य मुद्दा - सांबारवडी बे एरीयात कुठे मिळेल का खायला ? बरेच दिवस झाले खावून....
-
अफाट जगातील एक अडाणि.
12 Mar 2009 - 11:57 am | निखिल देशपांडे
तुमच्या प्रतिसादातुन..... अमरावती च्या रघुवीर मधल्या सांबार वडी चि आठवण आली......
11 Mar 2009 - 3:50 am | भाग्यश्री
हे खरंच मी वाचलं तसंच लिहीलेय ????? :O
पुण्याबद्दल इतकं आत्मियतेने बोलतंय कोणी हे पाहून गहीवरून आलं हो ! :)
तुम्ही जे लिहीलेत त्यावर १००% सहमती!
मी पुणे सोडून दुसरर्या गावाला कधी नावं ठेवली नाहीत...
पण जेव्हा लोकं दुसर्या गावातून येऊन, पुण्यातच राहून पुण्याबद्द्ल वाईट बोलतात तेव्हा डोकंच सरकतं...
असो.. परत ते गुर्हाळ नको.. पण तुम्ही छान लिहीले हे सांगायला आले..
http://bhagyashreee.blogspot.com/
11 Mar 2009 - 11:16 am | मराठी_माणूस
परत ते गुर्हाळ नको
पण आता कोणि चालु केले आहे ?
11 Mar 2009 - 9:59 pm | भाग्यश्री
हे चालू केले अडाणि यांनी! मी त्याला प्रतिसाद दिला..
वर आहे ना त्यांचे नाव... पाहीले नाही का? :|
http://bhagyashreee.blogspot.com/
11 Mar 2009 - 11:26 am | चिरोटा
पुणे हे भारतातिलच नव्हे तर जगातिल सर्व श्रेष्ठ शहर आहे.
बे एरिया,लन्डन्,सिडनि सह विशाल महाराष्ट्र झालाच पाहिजे.
11 Mar 2009 - 3:49 pm | प्रकाश घाटपांडे
तशे आमी पुनेकर. म्हजी लेट पुनेकर. बॉर्न ऍण्ड ब्रॉट अप नाई. आता पुने ईद्वानांच शहर. मान्य. महापौर हे शहराचे प्रथम नागरिक. मंग आमी म्हंतो कि ज्या पुन्याचे नागरिकच येवढे ईद्वान त्या शहराचे महापौर किती ईद्वान असले पाहिजे?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
11 Mar 2009 - 3:54 pm | चिरोटा
हे महापौर कुठे आले आता मधे?त्यान्च्या विद्वत्तेबद्दल कोणी सन्शय घेतला?
बे एरिया,लन्डन्,सिडनि सह विशाल महाराष्ट्र झालाच पाहिजे.
11 Mar 2009 - 5:10 pm | हरकाम्या
हा अडाणि पक्का यडचापच दिसतोय या लेखात चिन्यांविशयी काहीच लिहिलेले नाही
तरी लेखाचे नांव असे अडाण्यासारखे कसे ?
11 Mar 2009 - 6:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा अडाणि पक्का यडचापच दिसतोय या लेखात चिन्यांविशयी काहीच लिहिलेले नाही
तरी लेखाचे नांव असे अडाण्यासारखे कसे ?
स्सही बोल्ला रे ! :)
लेखाच्या शिर्षकावरुन तर बर्याचदा इथे डोकावलो नाही.
वाचून पाहिले तर..शिर्षकाचा आणि लेखाच्या मथळ्यातला अर्थ लागला नाही..असो,
आंतरजालावर सगळ्यांना सगळ्या गोष्टी समजल्याच पाहिजे असा अट्टाहास नाही करता येत.
ज्यांना नाही कळलं, त्यांनी सोडून द्या. इतकं काय त्यात? असे आपण म्हणाल नाही का ? ;)
-दिलीप बिरुटे
12 Mar 2009 - 3:46 am | अडाणि
हरकाम्या, तुम्हीच अगदी बरोबर ओळखले मला. एकदम पारखी नजर आहे हो तुमची.
-
अफाट जगातील एक अडाणि.
11 Mar 2009 - 6:01 pm | तिमा
पुन्याबद्दल आमची येकच कंप्लेन हाय. थितं रिक्शाचे जे रेट हायेत त्ये ममईच्या डब्बल हायेत, अन् आमचासारख्यांच्या खिशाला भारी चाट बसतीये , येक दिवस आल्लो न फिरलो तरी.
11 Mar 2009 - 6:38 pm | सूहास (not verified)
सुहास..
"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
11 Mar 2009 - 6:26 pm | चिरोटा
इकडे बेन्गळुरुमधेपण तोच प्रकार आहे. इकडे रिक्शावाल्यान्कडे १००/५०० चे सुटे नसतात्.तेव्हा खिशात थोडे सुटे ठेवाय्चे(साधारण भाडे होतिल इतके) आणि १००/५०० पण ठेवाय्चे. जास्त भाडे सागितले की ५०० ची नोट द्यायची. इकडे रिक्शावाले मुलखाचे आळशी आहेत्.दुकानात जावुन ५०० ची मोड घेण्यापेक्षा ते आहेत ते सुट्टे घेतात आणि समाधान मानतात.
भेन्डि
सोलापुर्,कोल्हापुर सह विशाल कर्नाटक झालाच पाहिजे.
11 Mar 2009 - 7:48 pm | सूहास (not verified)
सर्वात पहिले तो विषय बदला..
काय होते की बसप्रवाशी टू-व्हीलर वाल्याला ,टू-व्हीलर वाले कारवाल्या॑ना,कारवाले बसवाल्या॑ना आणी जर टू-व्हीलर वाला बस मध्ये बसला की तो पुन्हा टू-व्हीलर वाल्याला शिव्या घालेल्,हे चक्र चालु असते.तो एक मानवी स्वभाव आहे.जो जिथे असतो,वाढतो त्याला चा॑गल म्हणतो आणी बाकी वाईट्.
पण विषय पुण्याचा आहे.ऊगाच का म्हणुन एकायचे हे सर्व पुणेकरा॑ना माहीत आहे,कारण पुणे आणी पुणेकर याच्या स्वभावाचे एक वेगळेपण आहे.
ते वेगळेपण मलाही आहे आणी असेल.
पण तरीही कुठेतरी माझ्यात पुण्याबद्दल अभिमान आहे (लहानाचा मोठा झालो त्यामुळे काही गत्यंतर नाही)
हे एकच कारण सापडल का ? अभीमानाकरिता,जे ते असावे ते तसेच असावे."गत्यंतर"वगेरे काय आहे.
सुहास..
"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
12 Mar 2009 - 4:55 am | अडाणि
पण तरीही कुठेतरी माझ्यात पुण्याबद्दल अभिमान आहे (लहानाचा मोठा झालो त्यामुळे काही गत्यंतर नाही)
हे एकच कारण सापडल का ? अभीमानाकरिता,जे ते असावे ते तसेच असावे."गत्यंतर"वगेरे काय आहे.
लेखातील फारच महत्त्वाचे वाक्य निवडले तुम्ही. आणि मलाही ठासून तेच सांगायचे आहे. लहानपणापासून आजू-बाजूला असलेल्या संदर्भांचा एक वेगळा ठसा आपल्या मनावर असतो. प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात काही ना काही विषेश गोष्टी असतात. आणि तिथे लहानाचा मोठा झालेल्यांना अश्या गोष्टींची विषेश आपुलकी असते. त्यातूनच की काय बहूदा तो 'जाज्वल्य' अभिमान येत असावा. लेखाचा मुद्दा पुणे कसे चांगले किंव्वा पुणे खूप भारी आणि बाकी सगळे बकवास हा नाहीये. 'पुणेकर' लेख आणि त्यावरील प्रतिक्रीयांनी जी होळीपुर्व धुळवड उडाली होती, ती काही मला पटली नाही! म्हणून हा प्रपंच.
प्रतिक्रीया वाचून लगेच लक्षात येइल तुमच्यापण की या अभिमानाला गत्यंतरच नाहीये. अहो इथे सगळे पुणेकर एक होउन लढतोय, पण शाळांचा विषय काढा.. नु.म्.वि., भावे, कटारीया सगळे एकमेकावर तुटून पडू, नाही का? त्यामूळे मला वाटते कि ह्या अभिमानाला गत्यंतर नाहीये. मग फुकटच एकमेकांची उणी-दुणी कढत बसण्यापेक्षा गुण्या-गोविंदाने आनंद घ्या की मिपाचा.
-
अफाट जगातील एक अडाणि.
12 Mar 2009 - 3:00 pm | llपुण्याचे पेशवेll
प्रतिक्रीया वाचून लगेच लक्षात येइल तुमच्यापण की या अभिमानाला गत्यंतरच नाहीये. अहो इथे सगळे पुणेकर एक होउन लढतोय, पण शाळांचा विषय काढा.. नु.म्.वि., भावे, कटारीया सगळे एकमेकावर तुटून पडू, नाही का? त्यामूळे मला वाटते कि ह्या अभिमानाला गत्यंतर नाहीये. मग फुकटच एकमेकांची उणी-दुणी कढत बसण्यापेक्षा गुण्या-गोविंदाने आनंद घ्या की मिपाचा.
हेच म्हणतो.
(मएसो वाला)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
12 Mar 2009 - 1:56 am | प्राजु
आवडला.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 Mar 2009 - 10:08 am | भडकमकर मास्तर
(|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|:
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
13 Mar 2009 - 2:34 pm | मैत्र
मास्तर काय सध्या सारख्या जांभया देताय...
काही तरी लिहा फर्मास... फार दिवसात काही आलं नाही. जरा झोप घालवा आण मिपाकरांची झोप उडवणारं काही तरी लिहा.