व्यक्तिचित्रण

अण्णारती- विरहखंड भाग १

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
26 May 2017 - 11:19 am

येई हो अण्णा रे माझे माऊली ये ।
कीबोर्डवरी बोट ठेऊनी वाट मी पाहे ।। धृ।।

आलिया गेलिया कोणी धाडी निरोप ।
कराडमधी आहे माझा मायबाप ।। १।।

काळा शर्ट अन विजार कैसा सुंदर दिसला ।
घोड्यावर बैसोन अण्णा शुक्रवारी गेला ।। २।।

अण्णांचे चार शब्द आम्हा नित्य जाळ लावी ।
अण्णादास म्हणे आता कोण कळ लावी ।। ३।।

अदभूतअभय-काव्यआता मला वाटते भितीकाहीच्या काही कवितामराठीचे श्लोकरतीबाच्या कविताभयानकमुक्तकविडंबनव्यक्तिचित्रणमौजमजा

मराठी स्त्री-गीतातील स्वप्नातीत रामायण

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
16 Apr 2017 - 6:35 am

वाल्मिकी रामायणासहीत विवीध रामायणांचा परिचय असतोच, शिवाय गीत रामायण सोबतीला रामायणासंबधीत पॉपकॉर्नसारखे अधे मध्ये चघळायला वाद विषय, खरे म्हणजे हल्ली तोच तो पणा नकोसा झाल्याने कधी मधी गीत रामायणातल्या एखाद -दोन गीतांपलिकडे रामायण बद्दल मजल जात नाही.

संस्कृतीवाङ्मयविनोदव्यक्तिचित्रणआस्वाद

फुत्कार

संदीप-लेले's picture
संदीप-लेले in जनातलं, मनातलं
29 Mar 2017 - 8:04 pm

हिशोब ठेवता येणार नाही इतकी घरं मागे टाकून ती अवघड व्यक्ती प्रवास करते आहे. आतापर्यंतच्या प्रवासात अनेक दो-या तिच्या नाळेला जोडल्या होत्या. अनेक दिशांनी त्या दोऱ्या तिची नाळ खेचत आणि विवशतेने ती व्यक्ती त्या अगम्य शक्तींच्या निर्हेतुक खेचाखेचीत, नाळ तुटणार नाही अशा दिशेने फरफटत जाई. ती धूर्त व्यक्ती, हळूहळू एकेक दोरी कापत, आता अशा स्थितीत आहे की आपण फरफटतो आहोत याचे भान सुटले आहे. काळसर्पावर विजय मिळवल्याचा सामान्य मानवी उन्माद, तीव्र प्रकाशाने अधू झालेल्या तिच्या नजरेत गर्वाने फडकतो आहे.

कथाव्यक्तिचित्रण