बरेच दिवस झाले, ट्रेक झाला नाही


रातीत लाज ओली
शेजेवरी पहुडली
गंधीत मोगऱ्याच्या
चंद्रसवे नहाली.
पावली पैंजणाचा
वैरी भार होता
निजल्या स्वप्न पंखी
दुबळा आधार होता
घरट्यातले दु:ख ते
माझे मलाच माहीत
भळभळत्या जखमाच नुसत्या
घाव कुठेच नाहीत.
माथ्यावरी विस्कटल्या
रेखा संचिताच्या
माझे मला कोंडले मी
चंद्रात कुंकवाच्या...
कवी : अर्व (निशांत तेंडोलकर)
तिला पहिल्यांदा पाहिल तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो होतो
तिचे टपोरे डोळे, लांबसडक केस
आणि त्यात माळलेला तो मोगर्याचा गजरा
पण मला ह्यातले काहिच दिसले नव्हते
कारण ती माझ्या कडे बघुन जेव्हा हसली
तेव्हा तिच्या गालावर पडलेल्या खळीने मी घायाळ झालो होतो.
जळी स्थळी, काष्ठी पाषाणी मला तिच दिसत होती
प्रेम ही माझी गरज होती लग्न ही तिची
या आज्ज्यांच्या गॅलऱ्या, अशा मऊशार कशा?
कष्टाने खुरमुडले हात यांचे,
पाठीवरती मऊच कसे होतात?
कानाखाली लगावल्या कधी दोन,
आज त्यांचे गालगुच्चे कसे होतात?
या आज्ज्यांच्या गॅलऱ्या, अशा मऊशार कशा?
देव सारे पाण्यात बुडले,
तरी यांच्या श्रद्धा, गाथेसारख्या
कशा बरे तरतात?
बाग सारी उजाड झाली,
तरी नातीसाठी दोन फुले
कुठून बरे आणतात?
या आज्ज्यांच्या गॅलऱ्या, अशा मऊशार कशा?
दारि तुझ्या बैसुनी आहे
होवुन दारिची शिळा
का तरी ना भेटला मज
तु शामसुंदर घननिळा
जातोस तु लिला कराया
गोपिकांच्या सोबती
फोडीसी हंडे दह्याचे
गोपाळ घेउन संगती
जातो कधी समजेच ना
तुज पाहाया मी थांबलो
देउनी सर्वस्व माझे
तव पायरी वरी राहीलो
नाही मी अर्जुन अथवा
नाही मीराबाई रे
अरे मी वेडा पिसा
आलो तुझीया पायी रे
आज मजला भेट थोडा
तुज पाहण्याची संधी दे
वसुनी या नयनात
मजला जन्मांतरीची शांति दे
सावधान मत्स्य पुत्रानों आयुष्यभर मासे मारणारा बगळा आता मगरीचे रूप घेऊन अश्रू ढाळण्यासाठी येत आहे, त्याला अचानक मत्स्य पुत्रांचा पुळका कसा आला, काही एक कळत नाही.
आयुष्यभर बगळ्याने
मासे सारे फस्त केले .
घेऊनी वेश मगराचा.
ढाळतो अश्रू आता.
एका महानगरात एका मत्स्य पुत्राचा असाच जीव गेला:
भुलूनी मगर अश्रुना
जीव गेला मत्स्याचा.
अर्पिली गांधी "चित्रफुले"
ढाळूनी अश्रू मगरीने.
सावधान! मत्स्य पुत्रानों
आज मी माझा कुंचला कागदावर शिंपित आहे
लेखणी दवात डूबवतो आहे
कागदावर लेखणीच काय
कुंचलासुद्धा आज निष्प्रभ झालाय
कारण तू जाताना
माझी लेखणी माझा कुंचला
सोबत घेऊन गेलीस ते ही कायमची !
जाताना तेवढ माझं मन मात्र विसरलीस
माझं मन , माझा कुंचला , माझी लेखणी
आजही तेवढीच तळपते आहे
रंग भावनांचे, रंग उत्कटतेचे , रंग उसत्वाचे ,
रंग विरहाचे ,रंग प्रणयाचे ,रंग प्रेमाचे ,
रंग सदोदित संवादांचे
आताशा मी कागदावर उमटवत आहे
आजही तळपते आहे माझी लेखणी, माझा कुंचला !!
तुझी नेत्रापालवी औस्तुक्याने फुलते आहे
अगणित अत्याचार सोसलेस तू आई
आई, तुझ्या अंगावरचे मौल्यवान दागिने
लुटले आमच्या चैनीसाठी आम्ही
तू क्षमा केलीस
आई, तुझ्या हृदयावर चालवले आम्ही
असंख्य नांगरांचे फाळ
तू क्षमा केलीस
आई, तुझे दुधाने भरलेले स्तन
बुलडोझरने कापून टाकले आम्ही
तू क्षमा केलीस
आई, तुझ्या दुधात हलाहल
जहरिले वीष कालवले आम्ही
तू क्षमा केलीस
आई, आज पर्यंत आमचा प्रत्येक अपराध
तू पोटात घातलास
कृतघ्न उपजलो आम्ही
उन्मत्त झालो आम्ही
निव्वळ स्वार्थी, भ्रष्ट, नतद्रष्ट झालो आम्ही
आतातर निर्लज्ज, हलकट झालोय आम्ही
मन श्रावण ओला, मन यमुनेचा तीर
मन स्वैर पाखरू घुमणारे भिरभीर
मन लहर जळाची उसळे व्यर्थ दहादा
मन वृन्दावानिची अबोल वेडी राधा
मन मागे पडले खिन्न आर्त गोकूळ
मन माय एकटी अधिर, विरह-व्याकूळ
मन क्षीर शुभ्र, मन फुटलेला घट ओला
मन मोरपंख केसात जुना रुजलेला
मन वेडा कान्हा, मन ओला घननीळ
मन सांज केशरी, मन वेळूची शीळ
मन अथांग सागर, मन तुटलेले पाश
मन निर्मोही, निश्चयी द्वारकाधीश...
अदिती जोशी
|| शिवराय बोलले आज ||
वेळ आहे का थोडा
चार शब्द सांगायचेत
राहवत नाही म्हणून
काही जबाब मागायचेत
आधी आभार मानतो
मोठं केलत मला
पण खरंच सांगतो तुम्ही
खोटं केलत मला
अवघ्या तुमच्या जीवनात
व्यापून टाकलत मला
मनात सोडून सगळीकडे
छापून टाकलत मला
नाव माझं घेतलत
सण माझे केलेत
माझे छावे म्हणून
राडे सुद्धा केलेत