चॉकलेटचा बंगला ऽऽ
चॉकलेट चा बंगला अजून
आठवतो का हळूच मनात
खरं खरं सांगा बरं
गोष्ट राहील आपल्या आपल्यात...
लहानपण जर जपलं असेल
. बिस्किटांची गच्ची दिसेल
टॉफीच्या दारामधली
झुपकेवाली खार दिसेल ...
लेमनच्या खिडकीमधून
. उंच उंच झोका दिसेल
झोक्यावर बसलात तर
मैनेचा पिंजरा दिसेल
चॉकलेट डे च्या दिवशी आज
पुन्हा ऐकदा बंगला दिसला
तुझीच वाट पहात होतो
असं म्हणून हळूच हसला ...
चॉकलेट च्या या बंगल्यामध्ये
तुम्ही सुद्धा जाऊन या
बालपणीच्या आठवणी त
फेरफटका मारून या!