जे न देखे रवी...
सद्दीत सुमारांच्या ह्या
जटिलाच्या दारावरती
दुर्बोध देतसे थाप
भेटीत उमजले दोघा,
"उभयतांस एकच शाप
सद्दीत सुमारांच्या ह्या
उ:शाप नसे शापाला
अस्वस्थ उद्याची हाक
ऐकू ना येई कुणाला"
दुर्बोध जटिलसे हसले
दुर्बोधून जटिलही गेले
अन् विषण्ण होऊनी दोघे
आश्रयी कवीच्या गेले :)
शुष्क शब्दचित्र
पेर्णा चित्रगुप्त यांच्या सांजशकुनाच्या रमलप्रतिमा...
संपले का रंग तुमचे
का कुंचले मोडले
किंतान सोडून तुम्हीं
अभासी चित्र का काढले?
शब्द गुंत्यात भंजाळले ,
टकांळता कंटाळले का?
रंगांत न रंगुनी, शब्द गुंत्यातून
रंगीत चित्र कसे साधले?
देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाचीही चोरी?
देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाची चोरी?
देशद्रोही दरोडेखोर
भारतदेशाचे तुकडे करण्याचे
भाषण स्वातंत्र्य मागत
उड्या मारत मिरवून घेताना
असे कुणि देशद्रोही दरोडेखोर
माझा मुलगा मुलगी निघाले तरी
उभ्या चितेवर चढवण्याची शिक्षा असावी
एवढेही म्हणावयची
देशप्रेमींनाच चोरी?
अरण्यऋषीचं वनोपनिषद
'जंगलाचं देणं' जणु 'चकवाचांदणं'
'केशराचा पाऊस' ओते 'शब्दांचं धन'
'नवेगावबांधचे दिवस' जशी फुटे 'चैत्रपालवी'
'निळावंती' उलगडे तशी 'मृगपक्षीशास्त्रा'ची पोथी
'पक्षी जाय दिगंतरा' झाडांच्या कवेतून
'घरट्यापलीकडे' उभा 'रातवा' पाऊसथेंब पिऊन
'आनंददायी बगळे' करविती 'निसर्गवाचन'
'सुवर्णगरुड' झेपावे 'चित्रग्रीवां''च्या गर्दीतुन
तटबंदी
जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी
ओतप्रोत जे असे
सांग ते का न तुला दिसतसे?
त्रिमितीच्या पिंजर्या वेढुनी
अमित असे जे वसे
सांग ते का न तुला दिसतसे?
धन-ऋण एकाकार होती त्या-
-स्थळी शून्य जे वसे
सांग त्या अभाव मानू कसे?
जड-चेतन सीमेवर धूसर
तटबंदी जी असे
सांग ती का न मला दिसतसे?
मनोरथाच्या वाटेवर जरी
भू-कवचा विंधून धरेच्या
गाभ्याशी जाईन
शून्य गुरुत्वाकर्षण तिथले
अधांतरी मोजेन
निंबोणीचे रोप कोवळे
चन्द्रावर रुजवीन
अंगाईचे शब्द बदलूनी
पुन्हा लिहून काढीन
जर्द तांबडी मंगळमाती
शनीवरी शिंपीन
शनि-मंगळ मग युती अनोखी
एकवार पाहीन
पूणे ससून
इथं तीन लाख,
मिळतात बसून।
हो हे आहे,
पुण्याचे ससून।।
कसे बदलणार,
डाॅक्टरचे रक्त?
कुठे मिळणार,
'भ' विटामीन-रहीत
शुद्ध रक्त?!
कुणाकुणाचे
बदलणार रक्त?
पोलीस,RTO,
वकील,कस्टम,Excise,
जज,आमदार,बिल्डर?
त्यापेक्षा सोपी,
मजूरी सक्त ।।
नाळ
प्रश्न सुटता सुटता
माय उत्तरांची व्याली
प्रसवल्या उत्तरांच्या
प्रश्नचिन्ह शोभे भाळी
ललाटीचे लेकरांच्या
वाचुनिया फुंदे माय,
"प्रश्न घेऊनी जन्मल्या
उत्तरांचे करू काय?"
प्रश्नांकित उत्तरांची
गाठ घडोघडी पडे
एक सोडविण्याआधी
नवा प्रश्न ठाके पुढे
आदिमाय
तप्त तडिताघाताची
दीर्घ मेघगर्जनेची
मत्त सागरगाजेची
जातकुळी एक ना?
मोरपिसाच्या डोळ्याची
खोल पाणभोवर्याची
गूढ कृष्णविवराची
जातकुळी एक ना?
अगणित अभ्रिकांची
शतकोटी शक्यतांची
अनंताच्या उद्गमाची
आदिमाय एक ना?
इच्छापत्र
लेक मायेची खाण,माझ्या आईची सावली
जशी झुळूक वार्याची, ग्रिष्माच्या काहीली
लेक माझी प्राजक्त,मंद सुगंधाची जाण
गेला घेऊन कुठे वारा, सुने झाले आंगणं
ठायी ठायी विखुरल्या, तीच्या मखमली खुणा
गोळा करता येतो,आवंढा गळ्यात पुन्हा पुन्हा
लेक माझी गुणाची, तीचा पुनर्जन्म व्हावा
बाप मी तीचा,पुनर्जन्मी तीचा लेक व्हावा.
रे.....!
रे!!
रे तसा रोजच असतो सभोवताली
पण कधीतरी अचानक गवसतो.
आणि बघताबघता जीवाभावाचा रुहानी होतो.
रेषेसारखा जरी सरळ असला तरी तसा गडी थोडा तिरपागडीच.
म्हणजे रुढी रिवाजांच्या चौकटी न मानणारा.
भूत भविष्याचं ओझं न वाहणारा,
मोकळा, सुटसुटीत, आखीव रेखीव रे!
कधी, आलं अंगावर घेतलं शिंगावर असा रांगडा ,
गं...!
कसला वेल्हाळ आणि गोssड असतो हा 'गं'!
मागचे "सा रे" विसरायला लावणारा,
पुढलं "मा प" ओलांडू न देणारा,
"धा नी" रंगात मोहरवणारा,
पायाला हळूच मिठी मारणारा ठेहरावसा उंबराच जणू..
थोडासा सरळ, थोडासा वळणदार..
पण आतल्या गाठीचा मात्र बिलकुलच नाही.
कान्याला टेकून आपला ऐटीत उभा.
सुबक, कमनीय, गोजिरा अगदी!
आणि जेव्हा तो तुझ्या तोंडून ऐकते ना,
पाऊले चालती … विडंबन
पाऊले चालती बीजेपीची वाट
सद्य पक्षाची सोडूनिया साथ
गांजुनिया भारी इडी चौकशीने
पडता हातात बेड्यांची माळ
पाऊले चालती …
अण्णा आबा नेते कार्यकर्ते ते
पाहुनिया सारे फिरविती पाठ
पाऊले चालती …
येता होकार श्री पक्षश्रेष्ठींचा
तसा चौकशीचा व्हावा नायनाट
पाऊले चालती …
त्या तरूतळी
अशोकाच्या पारावर
सीतामाय उसासते
सोनमृगाच्या मोहाला
मनोमन धि:कारते
शमीवृक्षाचा विस्तार
शस्त्र पार्थाचे झाकतो
प्रत्यंचेला स्पर्शण्यास
शर अधीरसा होतो
वृद्ध बोधिवृक्षातळी
गौतम नि:संग बसे
बोधरवि उगवता
दिव्यप्रभा फाकतसे
अजानवृक्षाच्या तळी
ज्ञानयोगी अविचल
अभावाच्या कर्दमीही
प्रतिभेचा परिमळ
अनमोल आहे जीवन अपुले मित्रांनो
एक नवे वादळ आणू पाहात आहे
जीवनाला परखूं पाहात आहे
जे अपशब्दापायी बेचैनीत हरवले
त्यांना पुन्हा शोधावे असे वाटे मला
जीवनाशी प्रतिघात करता, जे थकले
अशासंगे हसत रहावे असे वाटे मला
अनमोल आहे जीवन अपुले, मित्रांनो
उत्सवी उघडपणे राजी व्हावे वाटे मला
(चार दिवस मिळाले असता )
पेरणा
वाचक सुज्ञ आहेत.
बसावे फक्त मित्रां सोबत अशी कल्पना आहे
दोन वेळा मधुशाले सोबत जिणे महनता आहे
फिरून कुणाची असुया नाही जगलो जरी कष्टाने
उज्वल भविष्याचा मार्ग दावला हर प्याल्या,चकण्याने
हे माझे भाग्य आहे,मित्रांसवे बसाया मिळाते
हरीवंशा विन मधुशालेचे महत्व कुणाला कळते
काय करावे
काय करावे तजवीज आहे
काय करावे मन उद्विग्न आहे
काय करावे काफिला मार्गस्थ
असताना स्तब्ध झाला आहे
काय करावे प्रसन्नता शोधीत
असताना अनुपस्थित झाली आहे
काय करावे मित्राची जरूरत
असताना नाराज झाला आहे
काय करावे संवाद मनस्थितीचा
असताना नियम लागू झाला आहे
काय करावे हर एक व्यक्ती
अपुला फायदा शोधीत आहे
सुंदर गीते ही स्मरणात येती
अवकाश आहे म्हणून बसता
जुन्या गोष्टी स्मरणात येती
कधी सत्याची,कधी असत्याची
सुंदर गीते ही स्मरणात येती
शताब्दी एकवीसावी अन् समय नवे
प्रकृतीने दान केलेली धनराशी स्मरते
कमजोर वासे घेऊन जूने घर वसवले
मनाशी जुळले ते सुंदर घर स्मरले
चार दिवस मिळाले असतां हसू खेळून निभवावे
जगावे फक्त मित्रांनो,बस अशी कल्पना आहे
दोन वेळेच्या भाकरीतून जिणे आहे मेहनता आहे
फिरून कुणाची असुया नाही जगलो जरी कष्टाने
हर स्वास्थ्यात मला आपातातून आहे वाचववणे
हे माझे भाग्य आहे,जे आज मला मिळावे
वेदना आज करून,का कुणाला दर्शवावे
चार दिवस मिळाले असतां, हसू खेळून निभवावे
स्विकारता आहे माझी,कसे ते मी व्यतीत करावे
- ‹ previous
- 7 of 468
- next ›