इच्छापत्र

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
24 May 2024 - 7:48 am

लेक मायेची खाण,माझ्या आईची सावली
जशी झुळूक वार्‍याची, ग्रिष्माच्या काहीली

लेक माझी प्राजक्त,मंद सुगंधाची जाण
गेला घेऊन कुठे वारा, सुने झाले आंगणं

ठायी ठायी विखुरल्या, तीच्या मखमली खुणा
गोळा करता येतो,आवंढा गळ्यात पुन्हा पुन्हा

लेक माझी गुणाची, तीचा पुनर्जन्म व्हावा
बाप मी तीचा,पुनर्जन्मी तीचा लेक व्हावा.

आयुष्यआयुष्याच्या वाटेवरकवळीकविता

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

24 May 2024 - 10:58 am | प्राची अश्विनी

वाह! कर्नलसाहेब, किती मायाळू कविता आहे!

अमरेंद्र बाहुबली's picture

24 May 2024 - 11:02 am | अमरेंद्र बाहुबली

आवडली.

चित्रगुप्त's picture

24 May 2024 - 1:40 pm | चित्रगुप्त

कविता आवडली पण अर्थ नाही कळला. 'इच्छापत्र' या शीर्षकामुळे अम्मळ कन्फुजलो आहे. कृपया उलगडा करावा.

कर्नलतपस्वी's picture

1 Jun 2024 - 1:55 pm | कर्नलतपस्वी

वडिलांवर जिवापाड प्रेम करते. रोल माॅडेल असतो बाप. तो ही तितकेच प्रेम करतो.

आई मुलाचे प्रेम जगजाहीर आहे. बापाला पुनर्जन्म मुलीच्या पट्टी घ्यावासा वाटतो.....

भागो's picture

26 May 2024 - 1:54 pm | भागो

बेटी म्हणजे तूप रोटी!

चौथा कोनाडा's picture

28 May 2024 - 6:04 pm | चौथा कोनाडा

सुंदर कविता ! दुधावरच्या सायीची स्निग्धता असलेली !

इच्छापत्र या नावावरून कायदेविषयक आहे की काय असं सुरुवातीला वाटलं पण यातल्या अत्युच्च भावना भावल्याने शिर्षक योग्य वाटले.

कुमार१'s picture

29 May 2024 - 8:48 am | कुमार१

आवडली.

Nitin Palkar's picture

1 Jun 2024 - 12:58 pm | Nitin Palkar

खूपच आवडली.

कर्नलतपस्वी's picture

1 Jun 2024 - 1:51 pm | कर्नलतपस्वी

मनापासून आभार.