थँक यू मिस्टर ड्रॅगन –2

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
15 Jan 2016 - 4:11 pm

मित्रांनो,
थँक यू मिस्टर ड्रॅगन –2

1

या मार्गाचा सुटसुटीत नकाशा डॉ. सुहास म्हात्रे यांनी भाग 1 मधे सादर केला असल्याने इथे परत देत नाही...

...मसूद अजहरला पकडल्यामुळे काही काळापासून मोदींच्या राजकारणातील चालींना काही प्रमाणात वलण लागल्याचे दिसत असताना चीनने काश्मिरचा प्रश्न मोडीत काढायचे ठरवले आहे. हे विधान वाचायला कसे वाटेल?

ही लेखमाला वाचा. संजीव ओकांनी राजमत न्यूजमधे हे लिखाण केले आहे. मिपाकरांसाठी सादर...

पाकला सुजलाम सुफलाम करणारा प्रकल्प असेच सीपीईसीचे वर्णन करावे लागेल. रस्ते, रेल्वे यांचे विस्तारणारे जाळे, वीज निर्मितीचे प्रकल्प यामुळे पाकमधील हजारो हातांना रोजगार तर मिळणार आहेच, त्याशिवाय चीन जी गुंतवणूक करत आहे, त्यात खासगी गुंतवणूकदारही आहेत. चीनला पश्चिम आशियात आपला विस्तार करण्यासाठी या सुविधांचा लाभ मिळणार आहे. तेलसाठ्यांवर अर्थातच चीनची नजर आहे. म्हणूनच हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणे, चीनसाठी आवश्यक आहे. त्याचवेळी पाकला आर्थिक सुबत्ता येण्यासाठी तो हवा आहे. त्याचवेळी पाकला आर्थिक स्थैर्य लाभले तर पाकमधील अंतर्गत अशांतता काही प्रमाणात कमी होईल, हेही नाकारता येणार नाही. अमेरिकेच्या मेहेरबानीवर पाक अवलंबून आहे. ज्याक्षणी पाकची गरज संपली असे अमेरिकेला वाटेल, त्यावेळी काय? हा प्रश्न पाकसमोर आहेच. म्हणूनच सीपीईसी हा पाकचे भवितव्य ठरणारा प्रकल्प आहे. त्यामुळेच काश्मीरप्रश्नी आपल्या भूमिकेत चीनने बदल केलेला दिसून येतो. यापूर्वी कधीही चीनने काश्मीरप्रश्नी थेट भाष्य केलेले नव्हते. तटस्थ राहून पाकशी हितसंबंध जोपासण्यावर चीनचा भर राहिला होता. मात्र, आता प्रथमच चीन पाकला हिंदुस्थानशी चर्चा करून, काश्मीरबाबत ठोस निर्णय घ्या, असे सांगत आहे.

पुढे वाचा...

धोरणमांडणीप्रकटनविचारमाध्यमवेध