दुष्काळवाडा..... अंतिम भाग
मिशन म्हणून लढण्याची गरज
सततच्या दुष्काळाने सैरभैर झालेली जनता. सुरु असलेले पैसेवारीच्या आकडेवारीचे खेळ, दुष्काळाचे राजकारण करत एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न असलेले राजकारणी या पाश्र्वभूमीवर तिशी पस्तीशीत मरण कवटाळणारे तरुण शेतकरी. मराठवाडा कडेलोटावर येऊन ठेपला आहे. मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर सारखे सह्रदय अभिनेते दुष्काळाच्या खाईत उतरुन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देत आहेत. त्यांना जगण्याचे आत्मिक बळ देण्याचा प्रयत्न करत आहेत.सरकार पातळीवर मात्र अजूनही सामसूम आहे. पैसेवारीचा अंदाज आल्यानंतर दुष्काळ की दुष्काळ सदृश्य असा घोळ घालून सरकार पॅकेज, मदत जाहीर करेलही तोपर्यत फार उशीर झालेला नसावा म्हणजे झाले.
पॅकेजच्या घोळात दुष्काळाशी दिर्घकालीन लढ्याच्या उपाययोजना फक्त कागदावरच राहतात . त्यातही अत्यंत हुशारीने अर्थसंकल्पातच तरतूद केलेल्या योजना पॅकेजमध्ये घुसडून दुष्काळी पॅकेज फुगवले जाते. वेळ मारुन नेण्यापुरता पॅकेजचा उद्देश सफल होतो. दुष्काळाशी सर्व स्तरावर मिशन म्हणून लढण्याची गरज असताना खोलात जाऊन मराठवाड्याच्या परिस्थितीचा विचार राजकीय हितसंबंधाआड लपवला जातो.
कृष्णा खोऱ्याचे २१ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळू नये यासाठीही पध्दतशीरपणे राजकीय खेळ्या खेळल्या जात आहेत. कृष्णेचे पाणी मराठवाड्याला मिळाले असते तर उस्मानाबाद, लातूर या दुष्काळी जिल्ह्यांचा पाणी प्रश्न बNयाच अंशी मिटला असता. जायकवाडीच्या पाण्याबाबतही अशाच खेळ्या खेळल्या जातात. पाऊस जास्त झाला तरच जायकवाडीला पाणी मिळते. सध्या दारणा, भंडारदरा, गंगापूर या प्रकल्पांमध्ये ६० ते ७० टक्के पाणी साठा आहे. तरीही मराठवाड्यासाठी जायकवाडीत पाणी सोडण्याची वेळ येताच अहमदनगर-नाशिक विरुध्द मराठवाडा असा वाद पेटवून देऊन जायकवाडीच्या समन्यायी पाणीवाटपाचा प्रश्न लटकवत ठेवला जातो. काहि दिवसांपूर्वी नांदूर मधमेश्वर एक्सप्रेस क्यानॉलचे हक्काचे पाणी मिळावे यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर मधील शेतकऱ्यांनी स्वतःच्या हातानेच स्वतःचे सरण रचून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मराठवाड्याच्या सिंचनाचा जो खेळखंडोबा झाला आहे तो सोडवला नाही तर दुष्काळ निवारणाच्या कामाला काहीच अर्थ राहणार नाही.
दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती कृषी नियोजनाची. सर्वात प्रथम कोरडवाहू मिशनचे सक्षमीकरण आणि जलआयुक्तालयाची मागणी पूर्णत्वास न्यावी लागेल. तरच कृषी विषयक नियोजन प्रत्यक्षात येऊ शकणार आहे. मराठवाड्यातील दुष्काळाचे सरसकट मोजमाप होऊ शकत नाही. कारण एका गावाच्या वरच्या भागात पाऊस पडतो तर खालच्या भागात नाही. येथील दुष्काळ स्थल आणि स्थिती दर्शक आहे. अशा परिस्थितीत शेतीचे नियोजन मायक्रो लेव्हलवर करावे लागेल. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना तत्कालीन कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सर्व कृषी विषयक कार्यालये औरंगाबादला हलवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पृथ्वीराज चव्हाणांनी बळ दिल्याने प्रस्ताव पुढे सरकला खरा पण कुठे माशी शिंकली कळले नाही. हा प्रस्ताव बारगळला. मराठवाडा आणि विदर्भाच्या दृष्टीने जलआयुक्लालय अतिशय महत्वाचे आहे. सिंचन विभागावर हजारो कोटी रुपये खर्च करुन कंत्राटी लॉबी पोसली जाते. पण मृदजलसंधारणासाठी सरकारच्या खिशातून पैसे मुश्कीलीने निघतात. मराठवाड्याला खरी गरज आहे ते भूजल वाढवण्याची. पण ज्यात आकाशाचे प्रतििंबब पडते अशा निळया पाण्याला राजाश्रय मिळतो आणि जमिनीतील ओलावा वाढवणाNया भूजलाकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले जाते. मृदजलसंधारणाकडे मिशन म्हणून पहायचे असेल तर जलआयुक्तालयाची मागणी तातडीने मार्गी लावावी लागेल.
मान्सून आणि मार्क्रेट हे दोन एम फ्याक्टर मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जिवनातील खलनायक आहेत. त्यांनी शेतीतील जमा खर्चाचे गणित बिघडवले. शेतीच्या अर्थकारणाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवणे हे आव्हान मोठे आहे. कर्जमुक्ती किंवा तातडीच्या मदतीने वर्षानुवर्षापासून विस्कटलेली ही घडी नीट बसणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांचेच संघटन करुन त्यांना शेती निविष्ठा एकत्रित खरेदी पासून शेतमालाच्या एकत्रित विपणनाचे धडे द्यावे लागतील. विविध योजनांतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकरी गट स्थापन होत आहेत. झाले आहेत. उस्मानाबादच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी तर एकही शेतकरी गटाबाहेर राहू नये यासाठी मोहीम राबवून जिल्ह्यात सुमारे वीस हजाराच्यावर शेतकरी गट स्थापन केले. केवळ उस्मानाबादच नाही तर संपूर्ण मराठवाड्यात शेतकरी गटांच्या चळवळीला बळ देण्याची गरज आहे. हे गट कागदावरच न राहता त्यांना क्रियाशिल बनवल्यास प्रत्येक शेतकऱ्यांसाठी ते आधार गट बनतील. शेतीचे अर्थकारण तेव्हाच साधता येईल ज्यावेळी कोरडवाहू मिशन सक्षमपणे काम करु लागेल. सिंचनासंबंधित मोठी कार्यालये नावाला औरंगाबादेत आहेत. गोदावरी मराठवाडा सिंचन महामंडळ पण पाणी नगर नाशिककडे, राज्य जलसंधारण कार्यालय पण निधी पश्चिम महाराष्ट्राकडे, कोरडवाहू मिशनचे कार्यालय नावालाच आहे.
दुष्काळाशी मिशन म्हणून लढताना सर्व प्रथम जास्तीत जास्त निर्णय आयुक्तालयाच्या स्तरावरुन कसे होतील हे पाहणेही गरजेचे आहे.दुष्काळ निवारणात काम करणारे पाणीपुरवठा, महसूल, आणि मदत व पुनर्वसन ही तीन कार्यालये एकाच दिशेने चालणे गरजेचे आहे. शासनस्तरावर ज्यावेळी अध्यादेश काढले जातात त्यावेळी या तिनही विभागाच्या अध्यादेशात विसंवाद दिसून येतो. त्यावेळी आयुक्तस्तरावरुन होणाऱ्या कामात अडथळे येतात. त्यात कालापव्यय होतो. कोट्यवधीची पॅकेजेस जाहीर करुन दुष्काळ हटत नाही. त्यामुळे टंचाई असो व दुष्काळ त्याचा मुकाबला मंत्रालयस्तरावरुन करण्यापेक्षा सक्षम आयुक्तालयातून केला जावा असेही जाता जाता सुचवावे वाटते.
प्रतिक्रिया
14 Sep 2015 - 4:53 pm | रेवती
लेखमाला वाचली. पाणीप्रश्न व त्यामुळे शेती करणे किती जिकिरीचे झाले आहे ते समजले.
14 Sep 2015 - 4:59 pm | मुक्त विहारि
आता सलग सगळे भाग वाचून मग प्रतिसाद देतो.....
14 Sep 2015 - 5:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
जमिनीवरची वस्तूस्थिती जमेस असल्याने जास्त विश्वासू असलेला अहवाल ! मूळ आजाराला उतारा न शोधता केवळ पॅकेजच्या अथवा कर्जमाफीच्या नावाने वर्षानुवर्षी गळे काढणार्यांच्या उघड गुपिताचे पितळ उघडे पाडून आतातरी ह्या काही (की बर्याच?) प्रमाणात तरी मानवी असलेल्या आपत्तीवर त्वरीत उपाय व "खरे दूरगामी ठोस" उपाय केले जावेत हीच सदिच्छा.
14 Sep 2015 - 5:29 pm | एस
बर्याच मुद्द्यांचे शक्य तितके विवेचन करणारी लेखमाला. यातून संबंधित घटकांनी काही बोध घेतला तर थोडे समाधान मिळेल.
14 Sep 2015 - 6:02 pm | नाखु
हे तिथपर्यंत पोहोचेल का नाही याचीच काळजी वाटते.
या अनुषंगाने दोन सुखद बातम्या
जल आयुक्तालय
एकाच पानावर योगायोगाने तीन बातम्या
नाखु
14 Sep 2015 - 5:35 pm | जेपी
लेखमालिका चांगली आहे.भुतकाळाचा आढावा चांगला घेतला आहे.
पण सतत कोरडवाहु मिशनचा उल्लेख का?
वर्तमानात काय घडतय याचा उल्लेख का नाही?
शेतकरी समुपदेशनाबद्दल उल्लेख नाही.?
भविष्याची चाहुल काय आहे?
14 Sep 2015 - 6:15 pm | pradnya deshpande
मिशन आवश्यकच
ही मालिका लिहताना दुष्काळाविषयीची सद्य परिस्थिती मांडण्याचा अधिक प्रयत्न होता. दुष्काळ निर्मूलनाचे सध्या काय प्रयत्न सुरु आहेत याबद्दलही या लेखमालेतून वेळोवेळी आले आहेच. कुठलेच ठोस प्रयत्न अद्याप झालेले नाहीत. मराठवाड्यात सध्या १५०० च्यावर टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. मागील आठवड्यात बीड, परभणी, लातूर आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांमध्ये चारा छावण्या उघडण्यात आल्या आहेत. त्यातील बीडची छावणी योग्य नियोजनाअभावी बंद पडण्याच्याच स्थितीत आहे. काँग्रेस राष्ट्रवादी हे पक्ष फक्त दौरे आणि आंदोलनाची भाषा करत आहेत. त्यांच्याकडून दुष्काळग्रस्तांना प्रत्यक्ष मदत कोणतीही झालेली नाही. भाजपाचे मंत्री आणि मुख्यमंत्री दुष्काग्रस्तांच्या दुःखावर पुंâकर घालून गेले त्यांच्याकडून मदतीचा दुष्काळच आहे. शिवसेनेच्यावतीने मात्र थोडेफार प्रयत्न सुरु असून उस्मानाबद आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकNयांच्या कुटुंबियांना अन्नधान्य आणि रोख मदत करण्याचे कार्यक्रम घेण्यात आले.
सरकार पातळीवर दुबार विंâवा रब्बीच्या पेरणीसाठी एकरी १५०० रुपयांची मदत, बीड जिल्ह्यात अन्नसुरक्षा योजनेतून पाच रुपये किलोने तांदूळ आणि २ रुपये किलोने गहू वाटप सुरु झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्ष शेतकNयांशी चर्चा केली असता त्यांनी काही ठिकाणीच ही योजना सुरु असल्याचे सांगितले. चांगली बाजू म्हणजे सर्वसामान्य नागरिक कोणत्या कोणत्या रुपाने शेतकNयांना मदत करत आहेत. एक गाव एक गणपती योजनेच्या माध्यमातून वाचलेले पैसे शेतकNयांना वाटप करण्यात येत आहेत. अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्याकडे मदतीचा ओघ सुरु झाला आहे. विविध सामाजिक संघटना पैसे, अन्नधान्याच्या स्वरुपात शेतकNयांना मदत करत आहेत.
दिलासाने शेतकरी आत्महत्यांचे सर्वेक्षण करुन जो अहवाल नाबार्डला दिला आहे त्यात शेतकNयांसाठी आधार गट आणि समुपदेशन वेंâद्रे सुरु करावीत असे सुचवले आहे. दिलासाचे मनोविकास वेंâद्र असून त्यामार्पâत बीड मधील शेतकNयांचे समुपदेशन सुरु झाले आहे. शिवसेनेने आधार वेंâद्र आणि शेतकरी प्रेरणा वेंâद्र स्थापन करण्याचे नुकतेच जाहीर केले आहे. तथापी या क्षेत्रात अधिक वेगाने प्रयत्न होण्याची गरज आहे हे खरे.
आता राहीला कोरडवाहू मिशनचा मुद्दा. मराठवाड्यावर कायम अन्याय झाला आहे. वर्षानुवर्षे मराठवाड्याचा अनुशेष कायम आहे. तो शेती विकासातही आहे. याकडे वेळीच लक्ष दिले असते तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. एखादी योजना जाहीर करायची पण तिच्यासाठी तरतूदच करायची नाही ही बाब मराठवाड्याच्या दृष्टrने नवी नाही. वर्तमान परिस्थितीत कोरडवाहू मिशन सक्रीय करण्याची मागणी लावून धरली नाही तर भविष्यात त्याचा फक्त वृध्दाश्रम होऊन बसेल. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी हे मिशन किती महत्वाचे आहे हे येथील नागरिकच जाणू शकतात.
15 Sep 2015 - 3:32 pm | नाखु
पीक पद्धतीत बदल अन् शंभर टक्के "ठिबक'ला प्राधान्य
अशीच पावले अंगिकारली तर दुष्काळाचा मुकाबला समर्थपणे करता येईल.
सुखद बातम्यांचा मागोवा घेण्यात हयगय न करणारा
सजग नाखु