जिव्हा शुद्धी एक राष्ट्रीय अभियान

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
22 Sep 2014 - 5:52 pm

जिव्हा शुद्धी एक राष्ट्रीय अभियान

पचा पच थुंकणे व तसेच येता जाता कशा न कशा कारणांनी शिव्या देणे हा आपला राष्ट्रीय टाईम पास आहे. माता व बहिणींवर अशा मेहरबानीयां फार होतात. `च्या यला` हे पालुपद जास्त अन् ग्राम्य शिवी कमी अशी आजची अवस्था आहे.
बामणांच्या चिकन मटन खाण्यामुळे मागणी वाढून भाव चढले असे चेष्टेने म्हणतात. खरे खोटे माहिती नाही. पण शिव्यांच्या मक्तेदारीत गैरब्राह्मण समाजाच्या मुक्त संचारात ब्राह्मणी जिव्हा तितक्याच जिव्हाळ्याने चालताना ऐकून, 'लगे रहो' असा पवित्र संदेश द्यावासा वाटतो...!
भाषा शुद्धीच्या चर्चा कानावर येतात. पण शिव्यांना 'चले जाव' करायला आपली जीभ का कचरावी?
यावरून आठवले पूर्वी हवाईदलातील कार्यकाळात माझ्या मुखी ब्लडी,बार्टर्ड, ईडीयट,उल्लू के पठ्ठे आदी हीन अभिरुचीचे शब्द न कळत वास करून होते. मुले झाल्यावर त्यांचा अभ्यास घ्यायला सुरुवात अशा शब्दांनी नको असे पत्नीने साध्या शब्दात सुचवून जागे केले व वेळीच मी सावध झालो. असो...
संस्कारक्षम बालवयातील मुलांसमोर वरिष्ठांनी मुखरस थुंकण्याच्या सवय़ीला व आपल्या ग्राम्य भाषा वैभवाला कटाक्षाने अव्हेरले तर ते योग्य ठरणार नाही काय?
असे एक राष्ट्रीय अभियान सुरू करायला नमोंनी १५ ऑगस्ट च्या मुहूर्तावर लाल किल्ल्यावरील आपल्या दणकेबाज शैलीत उद्घोषणा करायला हवी काय? ते मिपाकरांनी आपल्या पासून सुरुवात केली तर नाही का चालणार?

मांडणीसंस्कृतीभाषासमाजविचारसद्भावना

प्रतिक्रिया

पण तुम्ही नाशिक परिसरातील नाही , बरोब्बर ना ?

हा हा हा. नाही, काळजी नसावी.

>>'आत्ता गं बाया' टाईप

+१

प्रमोद देर्देकर's picture

24 Sep 2014 - 1:50 pm | प्रमोद देर्देकर

छगन = बिचवाला...'आत्ता गं बाया' टाईप (आम्हा मित्रांच्या शिव्या-शब्दकोषाप्रमाणे)

आम्ही तर शाळेत "मोहन" असा पण शब्दप्रयोग कारायचो.

ज्याला बोलायचो तो बहुदा श्रीकृष्णाचं एक नावाने मला हाक मारत आहेत असा समज करुन घ्यायचा.

जेम्स बॉन्ड ००७'s picture

23 Sep 2014 - 11:49 am | जेम्स बॉन्ड ००७

शिव्या ही माणसाची सहज प्रव्रुत्ती आहे. पुलं नी वस्त्रहरण नाटकाच्या १७५ व्या प्रयोगाच्या निमित्ताने केलेलं अध्यक्षिय भाषण मिळाल तर बघा..

श्रीगुरुजी's picture

23 Sep 2014 - 1:04 pm | श्रीगुरुजी

"इचिभन" म्हणजे नक्की काय? "शाळा" या चित्रपटात बर्‍याच वेळा सुर्‍या च्या तोंडात हा शब्द आलेला आहे.

बॅटमॅन's picture

23 Sep 2014 - 2:45 pm | बॅटमॅन

'तेच्यायला' >> 'हेच्यायला' >> इसकी मां का...

तसेच इचिभन>> इसकी (हेची-हिची: बोलीभाषेतील रूप) बहन का... असे असावे असा अंदाज.

चित्रगुप्त's picture

24 Sep 2014 - 8:21 pm | चित्रगुप्त

सांगली-मिरजेकडे "लई चॅप्टर बोड्याचा" आणि " बारा बोड्याचा" अनेकदा ऐकले आहे. याचा काय अर्थ म्हणायचा? संस्कृत शब्द कोणते?

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Sep 2014 - 12:11 am | डॉ सुहास म्हात्रे

ते संस्कृतच काय पण सुसंस्कृत शब्दही नाहीत ! :)

चित्रगुप्त's picture

26 Sep 2014 - 8:21 pm | चित्रगुप्त

अहो, वेदात नाही असे जगात काही नाही, आणि संस्कृतमधे ज्याला प्रतिशब्द नाही, असा कोणताही शब्द नाही असे म्हणतात ना?
की असे सांगणारेच चॅ. बो. म्हणायचे?

बॅटमॅन's picture

29 Sep 2014 - 3:05 pm | बॅटमॅन

काय आठवण करून दिलीत चित्रगुप्तजी....फीलिंग लैच नॉस्टॅल्जिक.

'बाराबोड्याचा' मागे काहीतरी व्युत्पत्ती आहे असे वाचल्याचे स्मरते. नक्की काय ते तूर्त माहिती नाही, पाहून सांगतो.

इन जण्रल, -बोड्याचा हा प्रत्यय म्ह. त्या अगोदरचा गुणधर्म अधोरेखित करण्यासाठी असतो. उदा. तो लै हरामखोर**ड्याचा आहे. इथे -**ड्याचा हा प्रत्यय, हरामखोरपणा हा गुणधर्म त्या व्यक्तीत आहे हे सूचित करण्यासाठी वापरला जातो. एखादा गुणधर्म माणसात आहे याचा अर्थ त्या विशिष्ट अवयवातही आहे अशी काहीशी ती धारणा आहे.

बॅटमॅन's picture

29 Sep 2014 - 3:07 pm | बॅटमॅन

काय आठवण करून दिलीत चित्रगुप्तजी....फीलिंग लैच नॉस्टॅल्जिक.

'बाराबोड्याचा' मागे काहीतरी व्युत्पत्ती आहे असे वाचल्याचे स्मरते. नक्की काय ते तूर्त माहिती नाही, पाहून सांगतो.

इन जण्रल, -बोड्याचा हा प्रत्यय म्ह. त्या अगोदरचा गुणधर्म अधोरेखित करण्यासाठी असतो. उदा. तो लै हरामखोर**ड्याचा आहे. इथे -**ड्याचा हा प्रत्यय, हरामखोरपणा हा गुणधर्म त्या व्यक्तीत आहे हे सूचित करण्यासाठी वापरला जातो. एखादा गुणधर्म माणसात आहे याचा अर्थ त्या विशिष्ट अवयवातही आहे अशी काहीशी ती धारणा आहे.

इरसाल's picture

23 Sep 2014 - 3:56 pm | इरसाल

इचि- त्याच्या/त्याच/, भन म्हणजे बहिण.

सूड's picture

23 Sep 2014 - 4:35 pm | सूड

तसं असेल तर शाळेच्या ग्रूपमध्ये जायलाच नको!! ;)

गधेगाळींमधली नेहमीचे तेहाची माय..सोडून इतर वेगळी शापवाचाने टंकू काय? ;)

सूड's picture

23 Sep 2014 - 4:43 pm | सूड

टंका टंका !! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

23 Sep 2014 - 5:02 pm | अत्रुप्त आत्मा

कंटा कंटा ! ;-)

आत्मूबुवांचा हा प्रतिसाद म्हणजे अंमळ सौदिंड्यन उच्चार वाट्टोय.

आय होप अर्थ समजण्यातले कंटक दूर झाले असतील ;)

सूड's picture

23 Sep 2014 - 4:43 pm | सूड

टंका टंका !! ;)

बॅटमॅन's picture

23 Sep 2014 - 5:56 pm | बॅटमॅन

टंका की ;)

वेल्लाभट's picture

23 Sep 2014 - 5:47 pm | वेल्लाभट

कुठल्या, कुठे, आणि कधी द्यायच्या एवढं कळलं; तर शिव्या दिल्या म्हणून बिघडत नाही. एक मत आपलं. बाकी चालूदे.

सूड's picture

23 Sep 2014 - 5:47 pm | सूड

काकांशी बाडिस!!

शशिकांत ओक's picture

23 Sep 2014 - 8:50 pm | शशिकांत ओक

मित्रांनो,
बडा प्रधान सेवक, न. मो. यांनी आज अशी हाक दिली की हे सर्व भारतीय नागरिकांनो, आपण आपल्या कामातून आठवड्यातील 2 तास सफाई अभियाना देऊ शकणार नाही काय...
त्याच प्रकारे मी सुचवतो हे मिपा मित्रांनो आठवड्यातील 2 तास आपण जिव्हाशुद्धी करता देऊ शकत नाही काय ... ज्यांना नाही द्यायचे त्यांना हे आवाहन नाही. पण जे राष्ट्र निर्मितीच्या विधायक कामात आपला सहभाग असावा असे कळकळीने मानतात व सक्रीय भाग घेतात त्यांनी काही तास आपल्या जिव्हेवर ताबा ठेवायला काय हरकत आहे...
विचार व्हावा....

प्रभाकर पेठकर's picture

23 Sep 2014 - 9:12 pm | प्रभाकर पेठकर

अपशब्दांचा अनावश्यक वापर करू नये असे मलाही वाटते. शिव्यांना सर्वस्वी बासनात बांधुन ठेवावं अस काही वाटत नाही.

>>>>जे राष्ट्र निर्मितीच्या विधायक कामात आपला सहभाग असावा असे कळकळीने मानतात व सक्रीय भाग घेतात त्यांनी काही तास आपल्या जिव्हेवर ताबा ठेवायला काय हरकत आहे...

राष्ट्रनिर्मितीच्या कामात शिव्यांमुळे अडथळा येतो? असे वाटत नाही. पश्चिमेकडची जी राष्ट्रे आपण प्रगत मानतो तिथली जनता येता जाता अपशब्द वापरत असतात. इतरांसाठी तसेच स्वतःच्या चुकासाठी स्वतःलाही.

राष्ट्रनिर्मिती आणि जिव्हाशुद्धीचा परस्परसंबंध लक्षात आला तर बरं होईल. आणि जिव्हाशुद्धीपेक्षाही आपण राहतो, कामासाठी जातो, वावरतो त्या परिसराच्या स्वच्छतेसाठी काही करता आलं तर पाहावं (अर्थात ज्याचं त्यानं)!! बाकी पेठकर काकांशी सहमत, शिव्यांचा अतिरिक्त वापरही नको आणि बासनात गुंडाळून ठेवणेही नको.

बाकी अष्टमी जवळ आलीच आहे, घागरी फुंकणं चालू देत!! ;)

सुहास..'s picture

23 Sep 2014 - 9:18 pm | सुहास..

काका ...शिरियस मोड ऑन >>>>

माझ्या मते शिव्या देण्याचे दोन प्रकार आहेत , एक म्हणजे लेव्हलच्या माणसाबरोबर लाडिक संवादात , उदा. काय रे भाड्या कुठे आहेस दोन दिवस ? या करिता लेव्हल लागतेच . उद्या मी जर हे पेठकर काकांशी बोलताना वापरल तर काका माझी छानशी रेसीपी तयार करुन घुबडांना खायला घालतील...शिवाय माझ्यासाठी जे आदरार्थी आहेत त्यांना अशी भाशा वापरायची माझी मजल देखील जात नाही.. .हे वरील वाक्यातील भकाराने सुरु होणारा शब्द मी तुमच्याशी, पका काकाशी पिंडा काकांशी बोलताना वापरु शकत नाही, मजल जात नाही ..पण समवयस्क , आणि गहरा दोस्ताना असलेल्याशी मात्र बोलु शकतो ..उदाहरणे खुप आहेत , आणि त्यांना मनसोक्त शिव्या ही द्यायच्या आहेत , त्यातही फरक आहे ...खानदेशी, कोल्हापुरचे ( जे एकमेकांशी जवळ आहेत ) त्यांच्या ऐकाल तर घाम फुटेल .. पण उद्या एखादा पुणेकर मला 'बैल रान्डीच्या' म्हटल्यावर मला आश्चर्य वाटेल ( अर्थात माझ्या सारख्याला बैल म्हणने म्हणजे तो बैल नक्की दुष्काळग्रस्त भागातला असावा ;) पहिल्यांदा जेव्हा ही शिवी ऐकली तेव्हा ....असो ) ...या झाल्या कॅज्युल गोष्टी ..

आता दुसरा प्रकार म्हणजे रागा-रागात शिव्या देणे ( मान्य आहे की या प्रकारात शिव्या देण्याने भो* पडत नाहीत ) पण मानसिक व्हेन्टिलेशन होते ..म्हणजे जिव्हा अशुध्द होत असली तरी मन शुध्द होते की !! मग कशाल अडचण ...बर्‍याच जेव्हा असे होते त्याला आपल्याला शारिरिक दुखापत करु शकत नाही, त्याच्यांकरिता हा शेवटचा पर्याय आहे ...

असो प्रेमचंद मुन्शी ची एक कथा आठवली ...
एक माणुस आपल्या बॉस च्या वागण्याने खुप परेशान असतो ..बॉसचा राग दिवस-रात्र बायका-पोरांवर , कधी मित्रांवर काढत असतो ...त्याच्या एक मित्र त्याला शेवटी विचारतो काय रे बाबा का चिड चिडा झाला आहेस हल्ली ? कारण सांगीतल्यावर मित्र आयडिया देतो ...याच वागणं बदलत ...शांत होतो ..बायकोशी आनि -पोराबाळांशी व्यवस्थित वागायला लागतो ...बायको ला कळत नाही ..ती जरा लक्ष देते ..तर समजते की हा दररोज अर्धा तास उशीरा येतो आहे ...एक दिवस ती त्याचा पिच्छा करते ...हा ऑफिसमधुन सरळ एक एकांताच्या ठिकाणी जातो अजिबात कुणी नसत ...एका झाडाला त्याच्या बॉस चा फोटो लावलेला असतो ...त्याच्या बॉस ला तो जे दणकुन शिव्या देत असतो फोटोवर दगड फेकत असतो ...सरते शेवटी पायातला जोडादेखील मारतो ..अर्धा तास खंड शिव्या दिल्यावर चेहर्‍यावर शातंता आणि हास्य दिसते ....बायकोला कारण कळत त्याच्या घरी शांत वागण्याच !!

असो ..बाकी आपकी मर्जी <<<< शिरीयस मोड ऑफ

योगी९००'s picture

24 Sep 2014 - 12:14 pm | योगी९००

माझ्या मते शिव्या देण्याचे दोन प्रकार आहेत
+१ फॉर दोन्ही प्रकार..

आता उदाहरणार्थ मा.चो. ही शिवी घ्या. (म्हणजे माखनचोर म्हणायचे आहे मला...) ... तुमच्या मित्राला प्रेमाने (किंवा लाडीकपणे) "काय रे मा.चो. ? काय म्हणतोस" असे म्हणा. त्याला काही शिवी दिली असे वाटणार नाही. पण हेच जर रागाने आणि दात ओठ खात "माखनचोर" असे म्हणा आणि बघा काय होते ते....

शशिकांत ओक's picture

23 Sep 2014 - 9:51 pm | शशिकांत ओक

मित्रांनो,
सलगी युक्त संभाषणातून असे अर्वाच्य शब्द वापरायची आपल्याला सवय झाली आहे, ठीक आहे, पण ती अन्य लोकांना संबोधित करण्यासाठी योग्य नाही याचे भान आपल्या कडून राखले जाते...
मित्रा `सवय` ही सबब होऊ शकत नाही. अयोग्य सवय सोडणे केंव्हा ही हितकर...

अत्रुप्त आत्मा's picture

23 Sep 2014 - 10:55 pm | अत्रुप्त आत्मा

@मित्रा `सवय` ही सबब होऊ शकत नाही.
@अयोग्य सवय सोडणे केंव्हा ही हितकर... >>> या परस्पर विसंगत वाक्यांचा अन्वय कसा साधायचा? ;)

शशिकांत ओक's picture

29 Sep 2014 - 12:04 am | शशिकांत ओक
शशिकांत ओक's picture

29 Sep 2014 - 12:07 am | शशिकांत ओक
शशिकांत ओक's picture

29 Sep 2014 - 12:04 am | शशिकांत ओक
शशिकांत ओक's picture

29 Sep 2014 - 12:04 am | शशिकांत ओक
मृत्युन्जय's picture

29 Sep 2014 - 4:19 pm | मृत्युन्जय

आम्हीच लिहिलेल्या एका लेखाची लिंक इथेच डकवतो आहे. विषयाला अनुसरौन असल्याने तेवढीच स्वतःच्या धाग्याची प्रसिद्धी करुन घेतो ;)

मृत्युन्जय's picture

29 Sep 2014 - 4:21 pm | मृत्युन्जय

आम्हीच लिहिलेल्या एका लेखाची लिंक इथेच डकवतो आहे. विषयाला अनुसरौन असल्याने तेवढीच स्वतःच्या धाग्याची प्रसिद्धी करुन घेतो ;)

भाषिक संपत्ती

http://misalpav.com/node/15135