जिव्हा शुद्धी एक राष्ट्रीय अभियान

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
22 Sep 2014 - 5:52 pm

जिव्हा शुद्धी एक राष्ट्रीय अभियान

पचा पच थुंकणे व तसेच येता जाता कशा न कशा कारणांनी शिव्या देणे हा आपला राष्ट्रीय टाईम पास आहे. माता व बहिणींवर अशा मेहरबानीयां फार होतात. `च्या यला` हे पालुपद जास्त अन् ग्राम्य शिवी कमी अशी आजची अवस्था आहे.
बामणांच्या चिकन मटन खाण्यामुळे मागणी वाढून भाव चढले असे चेष्टेने म्हणतात. खरे खोटे माहिती नाही. पण शिव्यांच्या मक्तेदारीत गैरब्राह्मण समाजाच्या मुक्त संचारात ब्राह्मणी जिव्हा तितक्याच जिव्हाळ्याने चालताना ऐकून, 'लगे रहो' असा पवित्र संदेश द्यावासा वाटतो...!
भाषा शुद्धीच्या चर्चा कानावर येतात. पण शिव्यांना 'चले जाव' करायला आपली जीभ का कचरावी?
यावरून आठवले पूर्वी हवाईदलातील कार्यकाळात माझ्या मुखी ब्लडी,बार्टर्ड, ईडीयट,उल्लू के पठ्ठे आदी हीन अभिरुचीचे शब्द न कळत वास करून होते. मुले झाल्यावर त्यांचा अभ्यास घ्यायला सुरुवात अशा शब्दांनी नको असे पत्नीने साध्या शब्दात सुचवून जागे केले व वेळीच मी सावध झालो. असो...
संस्कारक्षम बालवयातील मुलांसमोर वरिष्ठांनी मुखरस थुंकण्याच्या सवय़ीला व आपल्या ग्राम्य भाषा वैभवाला कटाक्षाने अव्हेरले तर ते योग्य ठरणार नाही काय?
असे एक राष्ट्रीय अभियान सुरू करायला नमोंनी १५ ऑगस्ट च्या मुहूर्तावर लाल किल्ल्यावरील आपल्या दणकेबाज शैलीत उद्घोषणा करायला हवी काय? ते मिपाकरांनी आपल्या पासून सुरुवात केली तर नाही का चालणार?

मांडणीसंस्कृतीभाषासमाजविचारसद्भावना

प्रतिक्रिया

विटेकर's picture

22 Sep 2014 - 6:09 pm | विटेकर

आहे खरा चघळण्याचा विषय !

मी पैला !

शशिकांत ओक's picture

22 Sep 2014 - 8:49 pm | शशिकांत ओक

चघळून थुंकण्याचा नाही!

मृगनयनी's picture

29 Sep 2014 - 11:45 am | मृगनयनी

+++ १००

शशिकांत ओक's picture

23 Sep 2014 - 1:31 am | शशिकांत ओक

1

प्रकाश घाटपांडे's picture

22 Sep 2014 - 7:15 pm | प्रकाश घाटपांडे

मेंदुच्या मनात या सुबोध जावडेकरांच्या पुस्तकात माणसे शिव्या का देतात? असे एक प्रकरण आहे.पुस्तक वाचनीय आहे.

काउबॉय's picture

22 Sep 2014 - 7:28 pm | काउबॉय

नाही थूंकने बाबत आक्षेप मान्य कारण ते आपोआप स्वच्छ होत नाही पण शिव्याही द्यायच्या नाहित म्हणजे....क्ष्क्ष्क्ष्फ़्फ़्ध्ब्द

काही पण! शिव्या द्यायला बंदी?? ऑरवेलच्या "थॉट पोलीस"ची आठवण झाली.

बॅटमॅन's picture

22 Sep 2014 - 7:37 pm | बॅटमॅन

पण शिव्या हा किमान गधेगाळकालीन वारसा आहे. अन तोही थेट मातृकुलाशी गर्दभाचा संबंध जोडणारा. ती पवित्र परंपरा टाकवेल तर लोकच "तेहाची माये...गाढवे...." इ.इ. उद्धार करतील =))

प्रचेतस's picture

23 Sep 2014 - 10:38 pm | प्रचेतस

=))

शिखर शिंगणापूर येथील महादेवाच्या देवळात १६३० सालचा एक घंटालेख आहे.

घंटेवर मराठी भाषेत पुढीलप्रमाणे मजकूर कोरलेला आहे.

वाग्या तुरंबेकार
हे कोण घेईल तो मात्रागमनी
१६३०"

बॅटमॅन's picture

23 Sep 2014 - 11:32 pm | बॅटमॅन

हाण तेच्या मारी =))

म्हणजे मात्रागमनी हा शब्द पेशवाईच्या अगोदरपासून लेखनप्रचारात आहे म्हणायचा!!! रोचक आहे. :)

मला आपले 'मात्रागमनी नजीब' इ.इ. च माहिती होते.

पोटे's picture

22 Sep 2014 - 8:09 pm | पोटे

पुलंच्या ती फुलराणी नाटकातही शिव्यांचे मनोवैज्ञानिक विश्लेषण केले आहे.

मराठी शिव्या वर्गातील आहेत...
पु ..... फो..... भो... मा.....
त्याचेही स्पष्टीकरण त्यात आहे.

:)

शशीकाका ..धागा बोल्ड मध्ये टाकण्याचे प्रयोजन समजले नाही ...की बोल्ड करुन पका काका ची विकेट काढायची होती ;)

( नारायण नारायण )
नारद मुनी ;)

शशिकांत ओक's picture

22 Sep 2014 - 8:58 pm | शशिकांत ओक

कळ काढतात त्यांच्या बद्दल न लिहिलेले बरे...
असा पौराणिक संदर्भ आहे असे म्हणतात.

सुहास..'s picture

22 Sep 2014 - 9:02 pm | सुहास..

कळ काढत होतो हे मान्य !! पण प्रश्न अनुत्तरीत ठेवलात :)

बाबा पाटील's picture

22 Sep 2014 - 9:03 pm | बाबा पाटील

उच्च रक्तदाब कमी करण्याचे व हिंसा टाळण्याचे अत्यंत महत्वपुर्ण साधन आहे हो,कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त भावना व्यक्त फक्त शिव्यांनेच होतात,शिव्या नाही दिल्या तर माणसे वेडी होतील नाहीतर सरळ एकमेकांवर हात उचलतील,चालेल का ?

कवितानागेश's picture

23 Sep 2014 - 3:25 pm | कवितानागेश

निदान मनातल्या मनात / किंवा तिसर्‍याच कुणासमोर तरी खच्चून शिव्या घालून सगळा वैताग vent out केलेला बरा असतो.
एकदम थंड वाटतं अश्या शिव्या घातल्या की. ;)

पिवळा डांबिस's picture

22 Sep 2014 - 9:34 pm | पिवळा डांबिस

ते मिपाकरांनी आपल्या पासून सुरुवात केली तर नाही का चालणार?

णाय चालनार!!!!!!!!!!!

अवो श्या देता येनार नसतील तर मग मिपाकर र्‍हायाचं कशाला? सरळ नमोगतीच होऊ की!!!
उलट तुमी असला कायतरी येडाखुळा इचार मांडल्याबद्दल प्रायाश्चित्त म्हणून आमाला आता पुढले सात दिवस खच्चून श्या देन्याचा संकल्प करावा लागतोय!!!
(संबंधितांनी नोंद घ्यावी!!)
:)

यसवायजी's picture

22 Sep 2014 - 9:46 pm | यसवायजी

जसे की 'गांx फाटणे' म्हणजे काही खरोखर फाटत नाही काही. रूपक आहे ते. :))
शिव्या ह्या आभूषण/अलंकार असतात. योग्य जागी वापरल्यास त्या भाषेची शोभा वाढवतात. पिलीज्य, असू देत की त्यांना.

शशिकांत ओक's picture

22 Sep 2014 - 9:48 pm | शशिकांत ओक

प्रतिज्ञा काही मानसिकता बदल करायला केल्या जाव्यात.
जे 'हम नही सुधरेंगे' असा हट्ट करून बसतात त्यांच्या साठी हा धागा नाही...

प्यारे१'s picture

22 Sep 2014 - 10:38 pm | प्यारे१

'श्या' देण्याच्या स्पेशल प्लेसेस फिक्स करुन अकॉर्डिंगली त्यांना एक्झिक्युट करावं.
श्या देणं अ‍ॅब्सोल्युटली बंद करणं इज इन्ज्युरस टु हेल्थ. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

22 Sep 2014 - 11:36 pm | अत्रुप्त आत्मा

ठीक आहे..मी ही असा संकल्प एक दोन वेळा केला(होता),काहि कालावधी पर्यंत पाळ्लाही(होता) पण मग मनात आलेल्या त्या अनुषंगिक भावना व्यक्त कश्या करायच्या कोणत्या भाषेत? उदा:- माझा शेजारी माझ्याकडून पैसे उसने घेतो,आणि नेहमी (स्वतःच) सांगितलेल्या वेळेच्या कित्येक दिवस पुढे नंतर देतो. ते ही जिन्यात येता जाता नजरानजर झाली..तर अश्यावेळी मी मागितले तर, "बुडवणार नाही हो तुमचे पैशे..देतो २ दिवसात" असे उर्मट उत्तर येते. मी मग त्याला, "अरे भिकारड्या ..अशी शिवी हसडून मनातला राग व्यक्त करतो. इमारतीतली आजुबाजुची लहानमुलं हे ऐकतात. आता तुमच्या म्हणण्यानुसार ,मग मी इथे काय करावं. शब्द बदलावे? की भावना बदलून शांत बोलावं??? ..ज्याचा त्या उर्मट शेजार्‍यावर अजिबातच परिणाम घडत नाही! :)

प्रभाकर पेठकर's picture

23 Sep 2014 - 1:14 am | प्रभाकर पेठकर

>>>>माझा शेजारी माझ्याकडून पैसे उसने घेतो,आणि नेहमी (स्वतःच) सांगितलेल्या वेळेच्या कित्येक दिवस पुढे नंतर देतो.

देता कशाला? देऊ नका.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Sep 2014 - 1:23 am | अत्रुप्त आत्मा

@देता कशाला? देऊ नका.>>> हां निर्णय अमलात आला सुद्धा कधीच!
पण तुम्ही दिलेलं उत्तर ही पळवाट झाली. त्याने मूळ समस्येवर तोडगा निघत नाही. कारण तुमची मांडणीच पायाहीन आणी निरर्थक आहे! :)

अत्रुप्त आत्मा's picture

23 Sep 2014 - 1:27 am | अत्रुप्त आत्मा

@कारण तुमची मांडणीच पायाहीन आणी निरर्थक आहे! >>> हे वाक्य रद्दबातल समजावं , ते ढागाविष याला लागू पडणार आहे. सदर प्रतिसाद ओकांचा वाटल्यामुळे ते लिहील गेलं.

प्रभाकर पेठकर's picture

23 Sep 2014 - 1:28 am | प्रभाकर पेठकर

>>> त्याने मूळ समस्येवर तोडगा निघत नाही. कारण तुमची मांडणीच पायाहीन आणी निरर्थक आहे!

नाही हो. तुम्हाला मनस्ताप होऊ नये आणि कोणाला शिव्या देण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये, इतका सोज्वळ विचार माझ्या प्रतिसादामागे आहे.

शशिकांत ओक's picture

22 Sep 2014 - 11:49 pm | शशिकांत ओक

मित्रा,
आपण प्रयत्न तरी केलात, पण अपशब्द बोलले म्हणून तुम्हाला पैसे मिळाले नाहीत. पण एक मानसिक समाधान मिळाल्यासारखे वाटले. पण ज्याला उद्देशून ते बोलले गेले त्यांनी निगरगट्टपणा सोडावा व आपले देणे परत करावे हा माफक उद्देश मात्र उलट न देण्यात परिवर्तित झाला असे ही होऊ शकेल.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Sep 2014 - 11:58 pm | अत्रुप्त आत्मा

दरवेळेसच्या शिवीप्रयोगानी किंवा तत्सम कृतीनीच पैसे मिळाले आहेत. त्या आधीच्या शांत बोलण्याच्या धोरणानी निराशा आणि वैफल्य पदरी आलं होतं. औरंगजेब शांततावचनांनी बदलत नसतात हो..तिथे शिव्याच पाहिजेत!

आँ बुवा तुम्हि सुद्धा??

अत्रुप्त आत्मा's picture

23 Sep 2014 - 1:17 am | अत्रुप्त आत्मा

@आँ बुवा तुम्हि सुद्धा??>>> :-D काय करणार दादा!? नाविलाज जाल्याव्? कै वेळे ला शिवी हाच मंत्र होतो,तर काही वेळे ला मंत्र ही पण शिवी होते! :-D
मानवी जीवन! नाविलाज रे नाविलाज!!!

खटपट्या's picture

23 Sep 2014 - 10:26 am | खटपट्या

एखाद्या लग्नकार्यात शिवी हासडू नका म्हणजे झालं

अत्रुप्त आत्मा's picture

23 Sep 2014 - 2:31 pm | अत्रुप्त आत्मा

@लग्नकार्यात शिवी हासडू नका म्हणजे झालं >>> छ्छे!!! तिथे (असं काहि झालं की!) मंत्रच हसडायचे! =))

शशिकांत ओक's picture

23 Sep 2014 - 12:30 am | शशिकांत ओक

पैसे द्या. शेजाऱ्याला टाळा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Sep 2014 - 12:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

मग तर अजूनच कठीण. श्या देण्याचा पर्यायही नाही ! डोक्याची केवळ मंडई होईल =))

विलासराव's picture

23 Sep 2014 - 12:16 pm | विलासराव

मग तर अजूनच कठीण. श्या देण्याचा पर्यायही नाही ! डोक्याची केवळ मंडई होईल

हा हा हा , अनुभव हाच गुरु.

श्या देण्याचा पर्यायही नाही !

बरोबर . पन ह्याला कायतरी पर्याय असावा हेच पटते. काय म्हणतात ना एक दरवाजा बंद झाला तर दुसरा उघडतो वगैरे.

आपल्याला तर श्या दिल्याशिवाय होत नाही बॉ. श्या नं देणं /देता येणं हे माझ्यासाठी विशेष कौशल्याचं काम आहे.
कूठे शिकवणी वगैरे चालते का ह्या विषयाची?

चित्रगुप्त's picture

23 Sep 2014 - 12:17 am | चित्रगुप्त

हल्ली अमेरिकेत पूर्वीच्या काही शब्दांऐवजी नवे जरा सभ्य शब्द वापरण्याचे फ्याड आहे म्हणे, त्याप्रमाणे धागाकर्त्याने मराठीतील ग्राम्य शब्दांऐवजी तोच अर्थ वहन करणार्‍या सुसंस्कृत नागरी शब्दांचा कोश निर्माण करावा, ही विनंती.
(उदा: गणिकामध्यस्थ, भगिनीमैथुनप्रवण इ.)

मार्क ट्वेन's picture

23 Sep 2014 - 12:26 am | मार्क ट्वेन

:) :) :) कसला भिक्षुणीगामी प्रतिसाद आहे!

शशिकांत ओक's picture

23 Sep 2014 - 12:33 am | शशिकांत ओक

काळ्ळ्यांना आफ्रो अमेरिकन असे म्हटले तरी माणसे तीच...
त्याच मापाने शिवी देणे सोडणार नाही फक्त फुल्या फुल्या असे म्हणून वेळ साजरी करेन....

हो.... माझा एक मित्र प्रेमाने दुसर्याला "यू रेंट" म्हणतो.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Sep 2014 - 1:32 am | अत्रुप्त आत्मा

धन्य.... =))

प्यारे१'s picture

23 Sep 2014 - 1:30 am | प्यारे१

___/\___

=))

टवाळ कार्टा's picture

23 Sep 2014 - 8:47 am | टवाळ कार्टा

(उदा: गणिकामध्यस्थ, भगिनीमैथुनप्रवण इ.)

=))

बॅटमॅन's picture

23 Sep 2014 - 12:58 pm | बॅटमॅन

हा हा हा =)) गणिकामध्यस्थ लैच आवडल्या गेले आहे _/\_

दुसर्‍या शब्दाला 'स्वस्रागमनी' हा एक सुटसुटीत पर्याय सुचवतो. आमच्या एका मित्राने तयार केलेला हा शब्द.

झालंच तर रासभीपुत्र, गणिकासुत, गमनव्याकुल, भगनंदन, इ.इ. पर्यायही विचारात घेतल्या जावेत ;)

प्यारे१'s picture

23 Sep 2014 - 1:00 pm | प्यारे१

अश्वारोहण हा शब्द उलट्या अर्थे वापरला गेलेला आठवला.

बॅटमॅन's picture

23 Sep 2014 - 2:46 pm | बॅटमॅन

वा!

तोही एक मस्त शब्द आहे.

सूड's picture

23 Sep 2014 - 4:39 pm | सूड

शष्प हाही एक सुरेख शब्द सापडलाय, आपल्याला बोलल्याचं समाधान आणि ऐकणार्‍याला शष्प चा अर्थ शष्प माहित नसल्याने त्याला सभ्य काहीतरी ऐकल्याचं समाधान!! ;)

या शष्पवरुन आमच्या मित्राने 'काय रे शष्पू!!' अशी एक नवीन हाक तयार केली आहे. =))))

या शष्पवरुन आमच्या मित्राने 'काय रे शष्पू!!' अशी एक नवीन हाक तयार केली आहे.
*LOL*

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

बॅटमॅन's picture

23 Sep 2014 - 5:55 pm | बॅटमॅन

शष्पू =)) =)) =)) =)) =)) धन्य _/\_

हे म्हणजे मुलाचं नाव शष्प असेल तर त्याच्या गर्लफ्रेंड किंवा बायकोने लाडात त्याला बिलगून वगैरे हाक मारल्यापैकी -

"ए काऽय रे शष्पू" इ.इ.इ.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

29 Sep 2014 - 11:37 am | विश्वनाथ मेहेंदळे

यावरून मिपावर काही महिन्यांपूर्वी झालेला किस्सा आठवला. एका स्त्री आयडीने एका पुरुष आयडीला असभ्य बोलण्यावरुन झापताना हा शब्द वापरला होता. तिला बिचारीला विरोधाभास लक्षात आला नसावा. ;-)

बॅटमॅन's picture

29 Sep 2014 - 2:59 pm | बॅटमॅन

नाही आला ते बरंच आहे, नैतर शष्प काही उरलं नस्तं मिपावरचं बरंचसं वाङ्मय ;)

बालगंधर्व's picture

29 Sep 2014 - 3:20 pm | बालगंधर्व

शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय असतो हे कुनि मला सनगेल का? म्हनजे तो चन्गला श्बद आहे का एक शिवि अहे?अनि तो अपन कुनासन्गे वपरु शत्को?

बालगंधर्व's picture

29 Sep 2014 - 3:20 pm | बालगंधर्व

शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय असतो हे कुनि मला सनगेल का? म्हनजे तो चन्गला श्बद आहे का एक शिवि अहे?अनि तो अपन कुनासन्गे वपरु शत्को?

बालगंधर्व's picture

29 Sep 2014 - 3:20 pm | बालगंधर्व

शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय असतो हे कुनि मला सनगेल का? म्हनजे तो चन्गला श्बद आहे का एक शिवि अहे?अनि तो अपन कुनासन्गे वपरु शत्को?

बालगंधर्व's picture

29 Sep 2014 - 3:21 pm | बालगंधर्व

शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय असतो हे कुनि मला सनगेल का? म्हनजे तो चन्गला श्बद आहे का एक शिवि अहे?अनि तो अपन कुनासन्गे वपरु शत्को?

बॅटमॅन's picture

29 Sep 2014 - 3:30 pm | बॅटमॅन

शष्पचा अर्थ काही असला तरी तुमची जिज्ञासा शष्प वाट पाहू शकत णाही हे बाकी शिद्द झाले ;)

४-४ वेळा विचारून देखील त्यांना ह्यातील शष्प काही कळणार नाही असं वाटतं. ;)

बॅटमॅन's picture

29 Sep 2014 - 3:38 pm | बॅटमॅन

अगदी अगदी ;)

मृत्युन्जय's picture

29 Sep 2014 - 4:12 pm | मृत्युन्जय

शष्प म्हणजे वाळलेल्या गवताची काडी :). लोकांनी उगा बदनाम केलाय हा शब्द ;)

सूड's picture

29 Sep 2014 - 4:44 pm | सूड

हो हो!!

बालगंधर्व's picture

30 Sep 2014 - 10:07 am | बालगंधर्व

माझया गावाला पूरवी एक मदरसा अले होति. तिच नाव शुबहनगी होता. गवातले सगले पोर तिचयावर मरयचि. मि पन मरयचो. मि तिच मोबयल नमबर मिलविला. तिला मेसेज केला. तिचा कदे मझे पेरेम बोलओलो. पन तिने मला शश्प रिसपोनस दिला.

खटपट्या's picture

30 Sep 2014 - 10:39 am | खटपट्या

"मदरसा" आली होते ?
म्हणजे नक्की कोण आली होती
तिचे नाव शुभहनगि म्हणजे शुभांगी होते का ?
पेरेम, रीसपोनस…. जावूदे…. काय ते सपष्ट लिवा वो ? मराटी मदी

प्यारे१'s picture

30 Sep 2014 - 12:33 pm | प्यारे१

फुलं काई जालं नाई ना? तुमी आजून पन ल्हानच वात्ता.

असू द्या असू द्या!

प्यारे१'s picture

30 Sep 2014 - 12:34 pm | प्यारे१

बा द वे, बालगंधर्व, सतिश, चुचु, जेनि... ह्यांची बाशासुद्दी जास्त म्हत्वाची हाये

बॅटमॅन's picture

30 Sep 2014 - 12:33 pm | बॅटमॅन

बॉर्र म्रुगनैनी.

मृगनयनी's picture

30 Sep 2014 - 12:46 pm | मृगनयनी

काय म्हणता बॅटमॅन? आज अचानक माझी आठवण कशी काय आली? :)

तुमची आठवण कुणाला नाय येणार ओ. :)

सूड's picture

30 Sep 2014 - 3:16 pm | सूड

हई कओनतई भआशा??

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Sep 2014 - 3:25 pm | ज्ञानोबाचे पैजार

गणिकामध्यस्थ
हे लै म्हणजे लैच आवडले आहे हे नम्रपणे नमुद करुन

अशा संस्कृतोद्भव श्या देण्या मुळे त्या श्यांमधला जोर निघुन जातो (शिवी देताना आणि घेताना अर्थ कोणी लक्षात घेतो का? उदा. टिनपाट, सरमाळ्या ) . शिवी कोणती आहे या पेक्षा ती कोणी व कशी उच्चारली या वरुन तीच्या परीणामाची तिव्रता ठरते.

कल्पना करा आत्मुगुरुजी त्यांच्या देणेकर्‍याला म्हणत आहेत "अरे गणिकामध्यस्था माझे ॠण कधी चुकते करणार आहेस?" तो कधीच पैसे द्यायचा नाही. त्या ऐवजी "भा* दे ना पैसे" कसे वजनदार वाटते म्हणणार्‍याला पण आणि ऐकणार्‍याला पण.

शिवी देताना गुर्मी दिसलीच पाहिजे.

पैजारबुवा,

अत्रुप्त आत्मा's picture

23 Sep 2014 - 3:41 pm | अत्रुप्त आत्मा

@त्या ऐवजी "भा* दे ना पैसे">>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif

अहो त्या संस्कृतवाल्या श्या फक्त ग्रंथनिविष्ट करायला म्हणून. खर्‍या हातघाईच्या प्रसंगी प्राकृतच लागते!

रागाचा निचरा करण्यासाठी 'भ' ची बाराखाडी म्हणणे आवश्यक आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. ;)

टवाळ कार्टा's picture

23 Sep 2014 - 8:47 am | टवाळ कार्टा

नुस्ता भ नाही...सगळे "ग म भ न" आले पाहिजे ;)

पिवळा डांबिस's picture

23 Sep 2014 - 9:34 am | पिवळा डांबिस

प्रतिसादांचे अवलोकन केले असता (प्रस्तुत धागाकर्त्याचे, फॉर रीझन ऑफ बायस, आणि उपप्रतिसादांचे गणन न करता) हा प्रस्ताव ६-१२ प्रतिसादांनी हरला आहे!!!!
मिपाचे मूळ स्थान, त्याची प्रतिष्ठानापासूनची भूमिका, धागाकर्त्यांच्या लक्षात न आल्याबद्दल त्यांचे सांत्वन!
आणि, मिपासंस्थापक तात्या अभ्यंकरांच्या शाब्दिक पुण्याईचा विजय असो!!!!!
:)

प्यारे१'s picture

30 Sep 2014 - 4:01 pm | प्यारे१

आता स्कोअर अपडेट करायचा का? डावानं पराभव झाला असणार. :)

सर्वसाक्षी's picture

23 Sep 2014 - 10:30 am | सर्वसाक्षी

ओकसाहेब

जिवश्च कंठश्च मित्र कोण? माझी व्याख्या सोपी आहे. "ज्याचे सहर्ष स्वागत आपण चार शिव्या घालुन करतो तो!"
ज्यांना शिव्या दिलेल्या आवडत नाहीत किंवा ज्यांना उघड शिव्या देणे परवडणारे नसते त्यांना कुणी शिव्या देत नाही. आजुबाजुला अपरिचीत स्त्रिया असतील शिवी देणे टाळले जाते. रस्त्यावरील भांडणे, हमरीतुमरीचा भाग वगळता शिव्या या आपुलकीनेच दिल्या जातात. शिव्या नसल्या तर मित्रांचे संभाषण कसे होईल?

मुळात बहुत्वेकरुन शिव्या या उद्गारवाचक चिन्हांऐवजी वापरल्या जातात, त्या कुणाला उद्देशून वगैरे नसतात.

शिव्या देणे बंद वगैरे करणे अमान्य. अर्थात आजुबाजुला कोण आहे आणि आपण कुठे आहोत याचे थोडे तारतम्य अवश्य बाळगावे.

नि३सोलपुरकर's picture

24 Sep 2014 - 10:25 am | नि३सोलपुरकर

जिवश्च कंठश्च मित्र कोण? माझी व्याख्या सोपी आहे. "ज्याचे सहर्ष स्वागत आपण चार शिव्या घालुन करतो तो!"--१०० % राईट्ट ,
सर्वसाक्षी साहेबांशी सहमत ,आताच बोर्डावर आलेला पटाईत साहेबांचा लेख ही हेच मत व्यक्त करतोय असे वाटते.

शिव्यांशिवाय कम्युनिकेशन, आय जस्ट कान्ट इमॅजिन यू नो ! ;)
मी शक्यतो शिव्या देत नाही, दिल्याच तर त्या मनातल्या मनात देण्यावर जास्त भर असतो. ट्रॅफिक जाम मुळे आणि अतरंगी वाहन चालकांमुळे मात्र हल्ली टाळक सटकुन २-४ सॉफ्टकोअर शिव्या हासडतो... परवाच हायवेवर मधेच बाईक वळवु का नओ वळवु का नको अशा विचार मग्न असलेल्या पोराने माझी दुचाकी जवळ येताच मधेच बाईक वळवली ! मी ओरडले ! अरे छगन च्यायला डोक घरी ठेवुन आलास काय ? भाउला राग आला ! पुढे जाउन त्याने बाईक थांबवली आणि वाद घालायला सुरुवात केली,मी म्हंटल काय प्रॉब्लेम झाला, तर तो बोलाला की चूक झाली म्हणुन काय झालं छगन कशाला म्हणालास ? तो आग्री बाला आहे हे त्याच्या बोलण्यावरुन कळले, मी त्याला विचारले की छगन म्हणु नको तर काय म्हणु ? कन्फुज झाला आणि कीक मारुन मुकाट निघुन गेला.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

पिवळा डांबिस's picture

23 Sep 2014 - 11:23 am | पिवळा डांबिस

मी त्याला विचारले की छगन म्हणु नको तर काय म्हणु ?

"मिथुन' म्हण!!!!
जल्लां सगलां काय नांवानच हाय!!!
:)

काळा पहाड's picture

30 Sep 2014 - 11:17 am | काळा पहाड

छगन म्हणु नको तर काय म्हणु

आम्ही रुत्विक, चिन्मय, बाबूराव इ. नावं वापरतो.

विटेकर's picture

23 Sep 2014 - 11:35 am | विटेकर

"छगन" ही शिवी आहे का ?
शिव्यांचा काही भौगोलिक मापदंड ( जी आय) असतो का?
नाशिक परिसरात " छगन" ही शिवा नसावी ( असे वाटते )

अहो विटुकाका... ती शिवी नाही, पण ते सुद्धा लोकांना सहन होत नाही !
शिव्यांचा काहीही मापदंड नसतो ! देणारा सुद्धा गमतीने देउ शकतो आणि घेणारा सुद्धा गमतीने घेउ शकतो ! अर्थात पुरुष मित्रपरिवारात हे सहज होत्,स्त्रीयांचे काय माहित नाही... बहुधा परवा पमाकडे {प्रमिला}मंगळागौर झाली, काय सुरेख कार्यक्रम झाला होता ! पण आंबेडाळ काय नीट जमली नव्हती ! या पलिकडे कदाचीत त्यांचा संवाद जात नसावा ! { आपला अंदाज हो} ;)

बाकी प्रकाकांनी दिलेला कोणत्या तरी स्त्रीचा *** पिळीन असा संवाद आठवतोय ! बहुधा त्यांनीच अशाच विषयावर धागा काढला होता का ? ते नीट आढवत नाही आता ! प्रकाका यावर अधिक प्रकाश टाकु शकतात याची बेशर्त गॅरेंटी देतो. ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

या पलिकडे कदाचीत त्यांचा संवाद जात नसावा ! { आपला अंदाज हो} Wink
अगदी अगदी !
फार तरं " पण तू काहीही म्हण , पमाचा नवरा अगदीच हेंदरट आहे " ही परमावधी !

जेम्स बॉन्ड ००७'s picture

23 Sep 2014 - 11:56 am | जेम्स बॉन्ड ००७

हेंदरट म्ह्ण्जे नक्की काय वो?

पमीच्या नवर्‍यालाच विचारायला पाहिजेल.
पण आशी पमा कोण हे मदनबाण यांना विचारायला हवे.

बॅटमॅन's picture

23 Sep 2014 - 12:59 pm | बॅटमॅन

त्याचा अर्थ आहे वेंधळा. हा शब्द कोल्लापूर साईडला जास्त फेमस आहे. हेंदरट, हेंदर्‍या, इ.इ.

खटपट्या's picture

23 Sep 2014 - 10:07 pm | खटपट्या

असं आहे होय? बदलापुरात एका जागेचे नाव हेन्द्रपाडा आहे.

चौकातली पाटी पाह्यलीत का त्या? ती पाह्यलीत की कळेल त्याला हेंद्रेपाडा का म्हणतात ते!!

खटपट्या's picture

25 Sep 2014 - 10:50 am | खटपट्या

नाही पाहीली ब्वॉ !!
सान्गातरी, मी काही बदलापूरचा नाही.

>>मी काही बदलापूरचा नाही.

बरं, मग एकदा या आणि बघा.

धन्यवाद !!

शिद's picture

23 Sep 2014 - 2:17 pm | शिद

"छगन" ही शिवी आहे का ?

छगन = बिचवाला...'आत्ता गं बाया' टाईप (आम्हा मित्रांच्या शिव्या-शब्दकोषाप्रमाणे)

विटेकर's picture

23 Sep 2014 - 2:29 pm | विटेकर

अरे बाप रे !
( की अग बाई गं !) म्हणावे ?
की दोन्ही लागू
की दोन्ही गैरलागू?

.
.
.

पण तुम्ही नाशिक परिसरातील नाही , बरोब्बर ना ?