कोण होती ती.... (१०)
डोळ्यातील पाणी पुसत पुसत त्याने डोळे उघडले ..
बघतो तर काय ...............
खोलीमध्ये लख्ख प्रकाश .....
घड्याळात सकाळचे ९ वाजले होते...
एक क्षण सुन्न झाला ......
काल रात्री भांडण करून झोपलो होतो तिच्याशी
.
तिला नाही नाही ते बोललो....
तीने फक्त ऐकून घेतले समजुतदारपणाने ...
तिच्याशिवाय अपूर्ण आहे आयुष्य ....
हेच खरे होते ....स्वप्नात झालेली तळमळ ...
ते झुरलेले मन ..तो आक्रोश ....फक्त तिच्यासाठीच होता ...
"ती माझ्याच जवळ आहे " म्हणून
परमेश्वराचे लाख लाख आभार मानत
त्याने हात जोडले सूर्याला.....
एवढ्यात तिने चहा आणला आणि आदळला
त्याने मिश्कील हसून "सॉरी" म्हटले ,
तिने लटक्या रागाने एक कटाक्ष टाकला ,
हसली गालात.......आणि हळवी होऊन म्हणाली......
" दोष न तुझा न माझा, या अबोल प्रेमाचा..... !!!"
प्रतिक्रिया
2 Jan 2012 - 12:25 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त!!
2 Jan 2012 - 12:29 pm | निश
मस्त कविता