कोण होती ती.... (3)

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
23 Nov 2011 - 10:15 am

कोण होती ती.... (3)

जाऊदे.. मला काय त्याचे.. कोण कुठली
मग मी का उगाच ....कशासाठी ....
न ओळख न पाळख कशाला तसदी घ्या ...
अरे मग एवढा विचार तरी कशाला....
निघताना तिथून पण ....एक नजर टाकली होती .....

ती तिथेच उभी होती....तशीच .....

तिच्या नजरेने मला जखमा झाल्या होत्या ...
बंद केलेले दरवाजे उघडले जात होते ..
घुसमट होत होती माझी .....
कधी हा पाऊस संपणार ......
जावे तडक परत आणि विचारावे सरळ सरळ ....
काय .... कुणाला.... तिला ?.... कशाबद्दल ....
माहीत नाही ......

पण
ती तिथेच उभी होती....तशीच .....

ती मात्र अगदी निरपेक्ष उभी होती
कसलाच गोंगाट नाही कलकलाट नाही
कसलाच आनंद नाही आणि दुख्खहि
एक निरागस शांतता घेऊन .....

ती तिथेच उभी होती....तशीच .....

कविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

23 Nov 2011 - 10:58 am | मिसळलेला काव्यप्रेमी

३ ही कविता छान आहेत.

प्रभाकर पेठकर's picture

23 Nov 2011 - 11:24 am | प्रभाकर पेठकर

अवस्थ करणारा काव्यानुभव.

बाय द वे... नक्की कुठे उभी आहे ती?

विदेश's picture

24 Nov 2011 - 9:05 am | विदेश

कसलाच आनंद नाही आणि दुख्खहि
एक निरागस शांतता घेऊन .....

ती तिथेच उभी होती....तशीच .....

ओळी आवडल्या .

कविता ४ मधे पुढे काय झाले ...? लिहा .