भाग १ ते ७ याआधि प्रकाशित केलेले आहेत !!
कोण होती ती.... (८)
त्याच्या विरहात तिने युगे पार केली होती
अपार प्रेमाची गाथा तिने गायली होती
वाळवंटात मृगजळाच्या मागे ती धावली होती
फक्त त्याच्यासाठी तिने श्वासांची लय थांबवली होती
पण
तो तिथेच उभा होता ...तसाच ....
आसवांनी भरलेल्या डोळ्यांची ती ...
चातकासारखी वाट पाहणारी ती ..
बोलण्यासाठी अधीर झालेली ती ..
सावळ्याच्या दर्शनासाठी आतुरलेली ती..
पण
तो तिथेच उभा होता ...तसाच ....
भरलेल्या डोळ्यांनी ती एवेढेच म्हणाली
" माझी "मी" न राहिले, तुझी "मी" फक्त उरले
दोन श्वासांतील अंतर सुद्धा युगासमान भासले ,
सजले जरी कितीदा शृंगार अपुरा राहिला,
रमुनी साऱ्या या जगात श्वास परका राहिला,
सावळ्याची हि प्रतीक्षा ,प्रतीक्षाच राहली ,
सावळ्याच्या स्पर्शाविनाच हि मीरा... राधा जाहली . .".
ऐकत होता ....
तो तिथेच उभा होता ...तसाच ....
त्याच्या डोळ्यातून आता आसवे गळत होती
मला हे सगळे का आधी कळले नाही
स्वतालाच तो दोष देत होता......
तिला म्हणाला " चल माझ्याबरोबर ....."
पण
ती तिथेच उभी होती ....तशीच ....