कोण होती ती.... ( ५)
काय वर्णन करावे तिचे मी ...
गौर वर्णी काया रातराणीच्या सुगंधात
अप्सरा माझ्या समोर जणू चंद्र प्रकाशात
आणि वाट पाहणारे डोळे.....
पण
ती तिथेच उभी होती....तशीच .....
त्या सात्विक सौंदर्याला अखेर विचारले ....
“कोण तू .......इथे कशी .......”
क्षितीजास टेकलेल्या तिच्या नजरेतून सुटला,
उत्कट श्वासांची उब असलेला एक अश्रू ,
अवचित निसटला आणि जीवाला माझ्या घोर लावून
धरती वर आदळला .....
पण
ती तिथेच उभी होती....तशीच .....
नजर तिची ढळली नाही मुळी पण ,
माझ्या हातात एक कागद दिला तिने ,
आणि क्षणात असंख्य सूर्याचे तेज असावे अशी
वीज चमकली डोळ्यासमोर आणि ...
कागदावर नजर गेली ......
कागदावर तीनच शब्द .." तुझ्याच प्रतीक्षेत.... अजूनही ...."
प्रतिक्रिया
26 Nov 2011 - 12:16 am | अत्रुप्त आत्मा
पण नक्की कोण ती मग? ;-)
27 Nov 2011 - 3:13 pm | वाहीदा
कविता आवडली !