कोण होती ती.... (१)

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
23 Nov 2011 - 10:12 am

कोण होती ती.... (१)

अनोळखी चेहरा...
थोडा आठवणींतला..अन् बरास्सा धूसर...
तिला पाहून मनात काहूर... कां?

पण
ती तिथेच उभी होती....तशीच .....

सोसाट्याचा वारा ओसाड वाळवंटात जणू
कोसळणार आभाळ उसळणाऱ्या सागरात जणू
निस्तब्ध करणारे तिच्या डोळ्यातले भाव
मनात निर्माण झालेली निर्वात पोकळी जणू ..
मी आता नजरेला नजर देऊ शकत नव्हतो .....

पण
ती तिथेच उभी होती....तशीच .....

काहीतरी सांगायचे होते तिला
तग मग होत होती तिची , मला जाणवत होते ..
रणरणत्या उन्हाने माझे डोळे थकले होते..
आता तीही अस्पष्ट दिसत होती ....

पण
ती तिथेच उभी होती....तशीच .....

कविता