एक स्वतःची भाषा

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
15 Sep 2011 - 12:14 am

मिसळीवर वावरताना
आपल्या लक्षात येइल. मिसळीची एक स्वतःची भाषा आहे.

काही स्वतःचे शब्द आहेत. आपण त्याची यादी करुया

उदा...

मोठे व्हा
जिलब्यापाडू लिखाण
हलवाई
भंपक

आपल्याला आठवणार्‍या शब्दांची आपण भर घालावी

---

नृत्यधोरणसंस्कृतीम्हणीभाषावाक्प्रचारवाङ्मयशिक्षणप्रकटनविचारमतप्रतिसाद

प्रतिक्रिया

आशु जोग's picture

15 Sep 2011 - 12:15 am | आशु जोग

मिसळीची जशी स्वतःची भाषा आहे
तशीच स्वतःची एक वॄत्ती आहे

ती आमचे काही आदरणीय सदस्य लवकरच दाखवतील
(बस ! थोडासा इंतजार)

भुमन्यु's picture

22 Feb 2013 - 1:50 pm | भुमन्यु

+१ ....

आगदी सहमत.....
प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत....

मी-सौरभ's picture

15 Sep 2011 - 12:45 am | मी-सौरभ

:)

पिवळा डांबिस's picture

15 Sep 2011 - 2:30 am | पिवळा डांबिस

अजून काही....
१. बाजार उठवला
२. टेंपोत बसवला
३. या वीकांताला नक्की करीन
४. ड्वाळे पानावले
५. इनो घ्या
.
.
.
.
१०. फक्त निरिक्षण नोंदवले. बाकी चालू द्या...
:)

चेतन सुभाष गुगळे's picture

15 Sep 2011 - 1:10 am | चेतन सुभाष गुगळे

इथले काही सदस्य सर्रास दुसर्‍या सदस्याच्या नावाचा अपभ्रंश करतात. ज्याने टोपण नाव धारण केले आहे त्याला कदाचित वाईट वाटत नसेल, पण ज्यांची खरी नावे आहेत त्यांना असे केल्यावर त्रास होतोच ना?

अजुन एक प्रकार म्हणजे नावाचे आणि आडनावाचे पहिले अक्षर जोडून भलताच शब्द बनविणे. हजारो शब्द टंकण्याची क्षमता असलेले लोक केवळ श्रम वाचविण्याकरिता असले उपद्व्याप करतात असे मला वाटत नाही. (खरं तर copy paste ची सुविधा असताना श्रम कसले पडतात?) यात त्या सदस्याला चिडविण्याचाच उद्देश दिसून येतो. निदान मला तरी कोणी माझा अशा प्रकारे उल्लेख केलेला आवडत नाही.

काहीतरी गैरसमज होतोय का?
इथे नावाचे संक्षिप्त रुप हे सहजगत्या दिले जाते. उदा. गवी असो की घासुगुर्जी, मुसुशेठ असोत किंवा विप्र, श्रामो असोत की बिका... कुणीही कुणाची टर उडवण्याकरता असे करत नाहीत. शिवाय ज्यांच्या नावाचे संक्षिप्तरुप केले जाते त्यांचाही काही आक्षेप नाही. त्या-त्या सदस्याशी बोलताना सोपे पडावे म्हणून असे केले जात असावे, आणि एकदा का ते नाव रुळले की सर्रास वापरात येणे होणारच.

चेतन सुभाष गुगळे's picture

15 Sep 2011 - 1:49 am | चेतन सुभाष गुगळे

गवि हे संक्षिप्तरूप नाही. इथे पाहा.

http://www.misalpav.com/user/12865

त्यांनी धारण केलेले नाव तितकेच आहे.

अनामिक's picture

15 Sep 2011 - 2:02 am | अनामिक

नाही आधिचे त्यांचे नाव गगनविहारी होते... सगळे त्यांना गवी म्हणायला लागल्यावर त्यांनी त्यांचा आयडीच गवी एवढा मर्यादित ठेवलाय.

कोणत्या गोष्टीचा बाऊ करायचा आणि कोणत्या गोष्टीचे वाईट वाटून घ्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2011 - 2:06 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अनामिक असं नाव धारण करणारा आयडीचे नावाबद्दलचे विचार वाचून सुसंगती जाणवली.

(दोन नावांची तरीही नावं ठेवणारी) अदिती

अनामिक's picture

15 Sep 2011 - 2:12 am | अनामिक

(दोन नावांची तरीही नावं ठेवणारी) अदिती

कोणती, कोणती? आता अभ्यास वाढवा म्हणू नकोस.

Nile's picture

15 Sep 2011 - 2:13 am | Nile

सहमत आहे. हो विक्षिप्त काकू, चला नाव घ्या आता!

तु नाव घ्या म्हंटल्यावर अदिती अगदी लाजून "घड्यावर घडे, सात सात घडे...." असं काहीतरी तर सुरु नाही ना करणार असं वाटून गेलं बघ!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2011 - 2:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

इश्श! असं कसं नाव घ्यायचं सगळ्यांसमोर?

पाषाणभेद's picture

15 Sep 2011 - 2:45 am | पाषाणभेद

काय नाय ओ. चालतंय की. आता एवढे नाव घ्या नाव घ्या म्हनुं र्‍हायलेत तर घ्या की ओ नाव.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2011 - 2:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अच्रत, बव्लत

योगी९००'s picture

15 Sep 2011 - 9:42 am | योगी९००

अच्रत, बव्लत
छान नावे घेतली तुम्ही....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2011 - 9:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

;-)

नितिन थत्ते's picture

15 Sep 2011 - 9:52 am | नितिन थत्ते

ओ, तुम्हाला नावं घ्यायला सांगितली. त्यांना तुम्ही घरात काय म्हणता ते नाही विचारलं !!!! ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2011 - 10:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वानुभवाचा "फायदा" झालेला दिसतोय! ;-)

नेहेमीप्रमाणे अंमळ गल्लत होते आहे चिच्चा तुमची! माझी दोन नावं आहेत, तीसुद्धा जन्मदात्यांनीच ठेवलेली.

विजुभाऊ's picture

16 Sep 2011 - 4:00 pm | विजुभाऊ

इश्श!
बापरे......... तुम्हाला असे काही शब्द माहीत असतील असे वाट्ले नव्हते.

ऋषिकेश's picture

15 Sep 2011 - 9:52 am | ऋषिकेश

म्हंटल्यावर अदिती अगदी लाजून "घड्यावर घडे, सात सात घडे...." असं काहीतरी तर सुरु नाही ना करणार असं वाटून गेलं

छ्या! मला वाटलं 'सूर्यमालेच्या कोनाड्यात ठेवले सात ग्रह आणि अबकचं नाव घेते माझा ग्रह पहिला' असा उखाणा असेल म्हणून

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2011 - 10:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

भलतेच ग्रह हां तुझे ऋ! असलं काहीतरी बोलले तर माझेच ग्रह फिरतील.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Sep 2011 - 3:12 pm | बिपिन कार्यकर्ते

'सूर्यमालेच्या कोनाड्यात ठेवले सात ग्रह आणि अबकचं नाव घेते माझा ग्रह पहिला'

=)) ... अगदी दोन अक्षरांनी हुकला बघ उखाणा! ;)

बाकी असला अगदी वर्जिनल उखाणा लिहिल्याबद्दल ऋचे अभि?नंदन!

मी ऋचा's picture

15 Sep 2011 - 10:41 am | मी ऋचा

>>कोणत्या गोष्टीचा बाऊ करायचा

प्रतिक्रियेत वर गविंचे नाव आल्याने वरील वाक्य चुकुन "कोणत्या गोष्टीचा ब्राऊ करायचा असे वाचले ;)

योगी९००'s picture

15 Sep 2011 - 11:12 am | योगी९००

प्रतिक्रियेत वर गविंचे नाव आल्याने वरील वाक्य चुकुन "कोणत्या गोष्टीचा ब्राऊ करायचा असे वाचले
हॅ हॅ हॅ

चेतन आणि अनामिक तुम्ही शाजी पराठा कट्ट्याला आला असता ना तर तुम्हाला बरंच काही कळालं असतं गगनविहारी ते गवि बद्दल असो..

आमाला शाजी पराठा खायला कोणी बोलावलंच नाही :(
आणि आमी बोलावणं आल्याशिवाय कुट्टं बी जात न्हाई :)

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Sep 2011 - 3:10 pm | बिपिन कार्यकर्ते

गवी असो की घासुगुर्जी, मुसुशेठ असोत किंवा विप्र, श्रामो असोत की बिका...

बरोबर रे अन्या! मला तर ते नाव चिकटलेच आहे.. इतके की मला अगदी लहानपणापासून ओळखणारी एक व्यक्ती आता त्याच नावाने हाक मारते मला! :( ... मला तर अजिबात आवडत नाही ते नाव... पण काय करणार! मागे त्या चक्रम अदितीने एक भले मोठ्ठे लांबलचक नाव पाडले होते मला त्यापेक्षा हे बरे! असो.

निदान मला तरी कोणी माझा अशा प्रकारे उल्लेख केलेला आवडत नाही.

तुमच्या आवडीनिवडींची जेवढी काळजी घेता तेवढीच दुसर्‍यांच्याही घेत चला.
इथे टोपणनाव घेउन वावारणार्‍यांचा एक उद्देश असतो टोपणनाव घेण्याचा. तुम्ही मात्र सगळ्यांच्या खर्‍या नावाचा उल्लेख कर करुन प्रतिसादावर प्रतिसाद देत असता. ह्यावर काही जणांनी निषेध नोंदवला आहेच ऑलरेडी. मलाही मला माझ्या इथल्या टोपणनावाने संबोधले गेलेले आवडते.

आशा आहे आपण ह्यापुढे दुसर्‍यांच्या आवडीनिवडींपण विचार कराल.

- (टोपणनाव आवडणारा) सोकाजी

विश्वनाथ मेहेंदळे's picture

15 Sep 2011 - 11:51 am | विश्वनाथ मेहेंदळे

अगदी हेच म्हणणार होतो.

शाहिर's picture

15 Sep 2011 - 4:39 pm | शाहिर

तुम्ही सुद्धा ज्याम्ची खरोकर्चि नावे महित अहेत तीच वापरता ,,
ए खाद्या संस्थळावर जर एक व्यक्ती टोपण नावाने असेल तर तुम्ही त्यांचे खरे नाव घेउन ) प्रतिसादा मधे) त्या व्यक्तीची प्रायव्हसी भंग करत आहत ..हे टोपण नावांपेक्षा वाइट अहे..

चेतन सुभाष गुगळे's picture

15 Sep 2011 - 1:44 am | चेतन सुभाष गुगळे

<< ज्याने टोपण नाव धारण केले आहे त्याला कदाचित वाईट वाटत नसेल, पण ज्यांची खरी नावे आहेत त्यांना असे केल्यावर त्रास होतोच ना? >>

<< निदान मला तरी कोणी माझा अशा प्रकारे उल्लेख केलेला आवडत नाही >>

इतरांचं मला माहीत नाही, पण माझ्याबाबतीत तरी मी अनेकदा स्पष्ट सांगितलंय तरी काही जण मुद्दाम असं करतात...

तुमच्या << शिवाय ज्यांच्या नावाचे संक्षिप्तरुप केले जाते त्यांचाही काही आक्षेप नाही. >> ह्या वाक्याला काहीच अर्थ नाही, कारण माझा आक्षेप मी नोंदविला आहेच...

नगरीनिरंजन's picture

15 Sep 2011 - 6:17 am | नगरीनिरंजन

बरं झालं तुम्ही हे स्पष्ट सांगितलंत. इथून पुढे मी तरी तुम्हाला चेतन सुभाष गुगळे या पूर्ण नावानेच संबोधिन.

चेतन सुभाष गुगळे's picture

15 Sep 2011 - 10:43 am | चेतन सुभाष गुगळे

नावांचा उल्ले़ख करण्याच्या काही पद्धती आहेत (मी ठरविलेल्या नाहीत, पुर्वीपासूनच आहेत). त्या अशा :-

नाव - मधले नाव - आडनाव
वामन हरी पेठे
नाव - आडनाव
लता मंगेशकर
आडनाव - नाव - मधले नाव
सरकारी कागदपत्रांमध्ये अवलंबिली जाणारी पद्धत
नावाचे आद्याक्षर - मधल्या नावाचे आद्याक्षर - आडनाव
पु. ल. देशपांडे
नावाचे इंग्रजी आद्याक्षर - मधल्या नावाचे इंग्रजी आद्याक्षर - आडनाव
जी. ए. कुलकर्णी

वरीलपैकी कुठल्याही पद्धतीत आडनावाचा पुर्ण उल्लेख केला जातो. आडनावाचे आद्याक्षर घेतले गेल्यास ते इंग्रजी असते.

वी. शांताराम

आडनावाचे केवळ मराठी आद्याक्षर घेण्याची कुठली ही रुढ पद्धत मला तरी दिसून आलेली नाही. इथे असे करण्यात चिडविण्याचा हेतू दिसून येतो. त्यामुळेच मी या पद्धतीवर आक्षेप नोंदविला आहे.

बाकी आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

15 Sep 2011 - 11:40 am | विश्वनाथ मेहेंदळे

>>आडनावाचे केवळ मराठी आद्याक्षर घेण्याची कुठली ही रुढ पद्धत मला तरी दिसून आलेली नाही.
तुम्ही गोनीदा हे नाव ऐकले आहे का हो ?? त्यातील "दा" हा बंगालीतला "दा" नाही असे निरीक्षण नोंदवू इच्छितो.

>>इथे असे करण्यात चिडविण्याचा हेतू दिसून येतो. त्यामुळेच मी या पद्धतीवर आक्षेप नोंदविला आहे.
गुगळे, आपण (म्हणजे आपण सगळे) इयत्ता तिसरी किंवा चौथीत आहोत का हो ? अपमान करण्याच्या अनेक चांगल्या पद्धती असताना, हे असे कोण कशाला चिडवेल ?

चेतन सुभाष गुगळे's picture

15 Sep 2011 - 12:07 pm | चेतन सुभाष गुगळे

<< तुम्ही गोनीदा हे नाव ऐकले आहे का हो ?? त्यातील "दा" हा बंगालीतला "दा" नाही असे निरीक्षण नोंदवू इच्छितो.>>

त्यांच्या आडनावाचे आद्याक्षर असेल तर दा वर अनुस्वार हवा.

<< आपण (म्हणजे आपण सगळे) इयत्ता तिसरी किंवा चौथीत आहोत का हो ? >>

आपण सगळे एकाच वर्गवारीत येतो का? म्हणजे तुम्ही, मी व इतर अनेक मान्यवर सोडले तर काही मंडळी तिसरी चौथीच्याही खालच्या पातळीवर येऊन प्रतिसाद देतात. म्हणूनच संपादकांना नंतर त्यांचे प्रतिसाद उडवावे लागतात. या धाग्यावर काल रात्री दिसणारे काही प्रतिसाद आज गायब झालेले तुम्हाला जाणवले नाही का?

<< अपमान करण्याच्या अनेक चांगल्या पद्धती असताना, हे असे कोण कशाला चिडवेल ? >>

त्या पद्धती समजण्यासाठी तेवढी बौद्धिक पात्रता सगळ्यांकडे असतेच असे नाही. शिवाय हे झटपट आणि आयतं उपलब्ध होतं.

शिवाय तुम्ही म्हणता तसे हे अपमान करण्यासाठी वापरण्यात येणारे संबोधन नसेल तर आद्याक्षरानंतर ठिपका देण्यात यावा अन्यथा वेगळाच अर्थ निघतो. जसे की इथल्याच संकेतस्थळावरील एक ज्येष्ठ व मान्यव सदस्य यांचे नाव सुधीर काळे आहे. जर त्यांचे नाव या पद्धतीत लिहायचे झाले तर सु.का. असे लिहायला हवे. टिंब वगळून एकापुढे एक आद्याक्षरे मांडल्यास तिसरा वेगळाच शब्द होईल व त्याचा भलताच अर्थ होईल. ज्याला असा अर्थ अभिप्रेत आहे, ती व्यक्ती मुद्दाम च तसा उल्लेख करण्याची शक्यता आहे.

बाकी अत्रे पीके आये है आणि देसाई माका दूध पी रहे है सारखे विनोद टिंब वगळल्यामुळेच घडले आहेत. शिवाय ही मंडळी तेव्हा तिसरी / चौथीत नव्हती तरी त्यांनी अशी चिडवा चिडवी केलीच की.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

15 Sep 2011 - 2:05 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>त्यांच्या आडनावाचे आद्याक्षर असेल तर दा वर अनुस्वार हवा.
तुम्हाला खरोखरच असे वाटते का की तो "दा" दाण्डेकर (हा शब्द असाही लिहितात) मधला नाही आहे? केवळ वादासाठी वाद घालत असाल तर चालू द्या.

तुम्ही बै भारीच गंभीर होता हो चेगुसु!!

प्रास's picture

15 Sep 2011 - 11:49 am | प्रास

खर्रं खर्रं सांगा हं....

तुम्हाला 'चेसुगु' म्हणायचं होतं ना....? ;-)

नगरीनिरंजन's picture

15 Sep 2011 - 11:52 am | नगरीनिरंजन

नाहीतर ते मिपा सोडून जातील आणि आपण पुढील काळातल्या वाचनानंदाला मुकू.

चेतन सुभाष गुगळे's picture

15 Sep 2011 - 12:50 pm | चेतन सुभाष गुगळे

<< नाहीतर ते मिपा सोडून जातील आणि आपण पुढील काळातल्या वाचनानंदाला मुकू. >>

अनेकदा सोडून गेलो आहे, पण ज्यांना माझे लेखन आवडते ते मला व्यक्तिगत संपर्क करतात आणि इथे लेख टाकण्यास सुचवितात. त्यामुळे मी सुखावतो आणि पुन्हा इथे लेख प्रकाशित करतो.

काल मात्र एका व्यक्तीने यातलंही रहस्य उघड केलं. त्यांच्या मते माझं लेखन इथे कुणालाच आवडत नाही, किंवा कुणी असलेच तर ते अत्यल्पसंख्य आहेत. पुन्हा बोलावणारी मंडळी वाचनानंदासाठी बोलवितात असा गोSSड गैरसमज करण्यात काहीच अर्थ नसून या लेखांवर चिडवाचिडवी करायला मिळावी म्हणून ही मंडळी नेहमीच एखाद्या गिर्‍हाईकाच्या शोधात असतात.

मी त्यांचे आभार मानले आणि भेजा फ्राय (रजत कपूर, विनय पाठक) बघण्यास सांगितले.

नगरीनिरंजन's picture

15 Sep 2011 - 1:06 pm | नगरीनिरंजन

>>. त्यांच्या मते माझं लेखन इथे कुणालाच आवडत नाही, किंवा कुणी असलेच तर ते अत्यल्पसंख्य आहेत. पुन्हा बोलावणारी मंडळी वाचनानंदासाठी बोलवितात असा गोSSड गैरसमज करण्यात काहीच अर्थ नसून या लेखांवर चिडवाचिडवी करायला मिळावी म्हणून ही मंडळी नेहमीच एखाद्या गिर्‍हाईकाच्या शोधात असतात.

हे असं सरसकटीकरण चुकीचे आहे. लेख चांगला असेल तर इथे लोक चांगलंच म्हणतात असा अनुभव आहे. चिडवणारेही विखारी भावनेने चिडवत नाहीत. ते मोकळ्या मनाने घ्या आणि सोडून द्या. स्वतः लेख टाकण्याबरोबरच इतरांच्या लेखनाची दखल घेणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. एकदा तुम्ही मिसळून गेलात आणि इथल्या संस्कृतीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला कळेल की इथला एकही सदस्य खोडसाळ नाही.

मराठी_माणूस's picture

15 Sep 2011 - 1:19 pm | मराठी_माणूस

इथला एकही सदस्य खोडसाळ नाही.

खुप धाडसी विधान आहे.

नगरीनिरंजन's picture

15 Sep 2011 - 1:44 pm | नगरीनिरंजन

>>खुप धाडसी विधान आहे
तुमच्या काही प्रतिसादांमधले अवांतर आणि तुमचे धागे पाहून आता असं वाटतंय खरं ;)

मराठी_माणूस's picture

15 Sep 2011 - 3:14 pm | मराठी_माणूस

व्याख्येत तफावत आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

15 Sep 2011 - 5:48 pm | विश्वनाथ मेहेंदळे

विनोदी ला धाडसी हा समानार्थी शब्द आहे की काय ?

बाकी ननि, तुमचे मूळ विधान हे पण सरसकटीकरणच आहे.

नगरीनिरंजन's picture

15 Sep 2011 - 8:56 pm | नगरीनिरंजन

>>तुमचे मूळ विधान हे पण सरसकटीकरणच आहे
होय. पण कमीतकमी ते (फॉल्स का होईना) पॉझिटिव्ह तरी आहे ;-)

अवांतरः
विमे,
तुमचे लग्न होऊन मुलेबाळे होतील तेव्हासाठी एक टिप:
नवरा किंवा बायको यापैकी एक जण मुलांना रागावत किंवा समजावत असेल तर दुसर्‍याने मध्ये मध्ये बोलून चुका काढू नये. :)

Nile's picture

15 Sep 2011 - 9:00 pm | Nile

>>नवरा किंवा बायको यापैकी एक जण मुलांना रागावत किंवा समजावत असेल तर दुसर्‍याने मध्ये मध्ये बोलून चुका काढू नये.
=))
ननिकाका आपल्या मुलाला समजावत आहेत आणि विमे काकू "असूद्या हो, लहान आहे तो अजून" वगैरे म्हणत आहेत असे चित्र डोळ्यांसमोर आले. ;-)

बाकी विमेकाका सद्ध्या समुपदेशन मोड मध्ये दिसताहेत, इतरांनाच असे करा, तसे करू नका वगैरे सांगत आहेत. आणि आता त्यांनाच असे-तसे करू नका असा प्रतिसाद आल्याने सर्कल कसे पुर्ण झाल्यासारखे वाटले. ;-) (ह. घेणे, अन समुपदेशन चालू ठेवणे हो विमे! :P )

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2011 - 9:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ननि आणि निळ्या _ /\ _

चेतन सुभाष गुगळे's picture

15 Sep 2011 - 1:29 pm | चेतन सुभाष गुगळे

<< हे असं सरसकटीकरण चुकीचे आहे. >>

मी केलेलं नाहीय. माझ्याशी काल संपर्क करणार्‍या त्या विशिष्ट सदस्याचं हे वैयक्तिक मत आहे. ते मी इथे मांडलंय.

<< लेख चांगला असेल तर इथे लोक चांगलंच म्हणतात असा अनुभव आहे. >>

कदाचित त्यांना माझे लेख चांगले वाटत नसतील.

<< चिडवणारेही विखारी भावनेने चिडवत नाहीत. ते मोकळ्या मनाने घ्या आणि सोडून द्या. >>

तसेच करतो की. उदाहरण म्हणून सांगतो. इथली भांडणं इथंच. बाहेर त्याचा उल्लेखही मी करीत नाही. इथले एक मान्यवर सदस्य यांनी माझ्या मागच्या धाग्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यानंतर पुन्हा स्वतंत्र धागा काढून त्या लेखाची जोरदार खिल्ली उडविली आणि या संकेतस्थळावर असं चालु असतानाच शेजारी दुसर्‍या खिडकीतून फेसबुक उघडून मला त्यांनी तिकडे मित्र बनविले. माझा निवासी पत्ता विचारला, छान मैत्रीपुर्ण गप्पा मारल्या. मी थोडीच तिकडे इकडचा उल्लेख करतोय? सोडूनच द्यावं लागतं..

कारण तिकडे ते खर्‍या नावाने माझे खरे खुरे मित्र झालेत आणि इकडे मात्र त्यांच्या टोपणनावाने माझी खोटी खोटीच चेष्टा करताहेत. आपल्या दोन्ही संकेतस्थळांवरच्या भुमिकेतला फरक मला स्पष्टपणे कळावा म्हणून आता त्यांनी मला सूचना केलीय की इथे खर्‍या नावाचा उल्लेख ही करू नका. टोपण नावानेच संबोधा.

<< स्वतः लेख टाकण्याबरोबरच इतरांच्या लेखनाची दखल घेणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. >>

तुम्ही माझ्या इतर धाग्यांवरील प्रतिक्रिया वाचूनही असे मत मांडताय म्हणजे कमाल आहे. आताही माझी ही प्रतिक्रिया श्री. आशु जोग यांच्या धाग्यावर प्रकाशित होत आहे, माझ्या धाग्यावर नव्हे.

<< इथला एकही सदस्य खोडसाळ नाही. >>

हे असं सरसकटीकरण नक्कीच चुकीचे आहे.

नगरीनिरंजन's picture

15 Sep 2011 - 1:34 pm | नगरीनिरंजन

तुम्हाला एवढं सगळं माहिती आहे तर मग अडचण येणार नाही. विषय संपला.

नितिन थत्ते's picture

15 Sep 2011 - 3:41 pm | नितिन थत्ते

<< लेख चांगला असेल तर इथे लोक चांगलंच म्हणतात असा अनुभव आहे. >>

कदाचित त्यांना माझे लेख चांगले वाटत नसतील.

तुमचा जैन समाजाविषयीचा दुसरा लेख बहुतेक सर्वांनी उचलून धरला आहे आणि थट्टा मस्करी केलेली नाही ही गोष्ट लक्षात घ्यावी.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Sep 2011 - 3:03 pm | बिपिन कार्यकर्ते

कळले तुमचे मित्र कोण ते... त्यांना नाही उद्योग! ;)

(खुलासा: हा टोमणा तुमच्या त्या मित्रांना आहे, तुम्हाला नाही. कृपया हलकेच घ्या आणि प्रतिसादखेचर फेकून मारू नये ही विनंती!) ;)

स्मिता.'s picture

16 Sep 2011 - 3:31 pm | स्मिता.

हा टोमणा तुमच्या त्या मित्रांना आहे, तुम्हाला नाही. कृपया हलकेच घ्या आणि प्रतिसादखेचर फेकून मारू नये ही विनंती!

अधोरेखित शब्दाच्या जागी तुम्हाला 'प्रतिसादखेटर' म्हणायचंय का हो श्री. बिपिन कार्यकर्ते*? खेटर फेकून मारल्याचं ऐकलं होतं पण खेचर फेकून मारणं जरा नवीनच वाटतंय :P

*वर एका प्रतिसादात तुम्हाला मिळालेले बिका नाव आवडत नाही असे लिहिले असल्याने त्याची नोंद घेवून येथे संपूर्ण नाव लिहिले आहे ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Sep 2011 - 3:37 pm | बिपिन कार्यकर्ते

स्मिता.जी, सर्वप्रथम आपण माझा इतका आदरपूर्वक उल्लेख केल्यामुळे मी पाणावलो! आय मीन माझे डोळे पाणावले. त्यामुळे मी आपले आभार मानतो.

आणि तो शब्द खेचर असाच आहे. खरडखेचर / प्रतिसादखेचर असे शब्द या या मिसळीनेच मराठी भाषेला दिले आहेत. अभ्यास वाढवा असे नम्रपणे सुचवतो.

;)

स्मिता.'s picture

16 Sep 2011 - 3:52 pm | स्मिता.

आ. श्री. बिपिन कर्यकर्ते,

"तो शब्द खेचर असाच आहे. खरडखेचर / प्रतिसादखेचर असे शब्द या या मिसळीनेच मराठी भाषेला दिले आहेत. अभ्यास वाढवा असे नम्रपणे सुचवतो."

या आपल्या नम्र सुचवणीबद्दल शतशः आभार! 'प्रतिसादखेचर मारून फेकणे' हा वाक्प्रयोग आम्हाला नवीनच असल्याने वरील प्रतिक्रिया देण्याचा क्षुद्र प्रयोग आम्ही केला.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Sep 2011 - 4:07 pm | बिपिन कार्यकर्ते

क्षमा केल्या गेली आहे.

आ. म्हणजे काय? आपले, आमचे, आदरणिय, आज्ञाकारी, आज्ञाधारक, आचरट, आम्बट, की अजून काही?

स्मिता.'s picture

16 Sep 2011 - 4:20 pm | स्मिता.

एखाद्या शब्दाचे संक्षिप्त रूप लिहिताना पहिले अक्षर आणि पुढे टिंब चालते म्हणून आम्ही 'आ.' असे लिहिले. तसे करून तुम्हाला प्रश्नात टाकण्याचा आमचा उद्देश नव्हता. तरी आ. म्हणजे आदरणीय हे आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवावे ही नम्र विनंती.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2011 - 7:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आमचे मित्र श्री. बिपिनचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब यांचा असा नावाने उल्लेख करून तुम्ही आमच्या मित्राचा अपमान केला आहात. असं करण्याचं काही कारण असल्यास तीन दिवस १४ तासांच्या आत ते कळवावे नाहीतर कारवाईस सामोरे जावे.

चेतन सुभाष गुगळे's picture

16 Sep 2011 - 6:20 pm | चेतन सुभाष गुगळे

<< कृपया हलकेच घ्या आणि प्रतिसादखेचर फेकून मारू नये ही विनंती!) >>

ह्या तुमच्या विनंतीला मान देऊन मी गप्प बसलो होतो. पण काय झालं शेवटी? मी नाही पण दुसर्‍या कोणीतरी मारलीच ना प्रतिसादखेचरं? शिवाय त्यांना खेचराऐवजी खेटरं अभिप्रेत होती. घ्या म्हणजे काय अपेक्षा होती आणि काय झालं? अर्थात तुम्हाला जेन्ट्स खेटरांऐवजी लेडीज खेटरं बहुधा कमी तीव्रतेने लागली असतील हाच काय तो त्यातल्या त्यात दिलासा.

परिकथेतील राजकुमार's picture

16 Sep 2011 - 6:26 pm | परिकथेतील राजकुमार

शब्द संपले.....

अगागागागा

कुणाला कशाचे आन बोडक्याला केसाचे. ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Sep 2011 - 7:55 pm | बिपिन कार्यकर्ते

मी पण रे!!! =))

आजकाल खर्च किती वाढलेत!!

पैसा's picture

17 Sep 2011 - 9:49 pm | पैसा

तुमच्या कुंपणीला २ गिर्हाईकं आपल्या पायानी (उलट्या?) चालून आली!!

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Sep 2011 - 7:56 pm | बिपिन कार्यकर्ते

श्री. चेतन सुभाष गुगळे साहेब, लेडीज खेटरांचं भय कधीच वाटलं नाही! जेन्ट्स खेटरं मात्र कधीच हवीशी वाटली नाहीत! ;)

एक (खरंच) निरागस प्रश्न : तुम्ही कधी हसता का? तुमचा चेपुवरचा फोटोपण अगदीच गंभीर आहे हो!

चेपुवर भलत्या पुरुषांचे फोटो पाहण्यापेक्षा विधायक काहीतरी करा, देशाचं कल्याण होईल!!

इथे भलत्या अन भल्या-भल्यामध्ये गोंधळ करु नये.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2011 - 8:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे निळ्या बोलतोय. काय पण ...

चेतन सुभाष गुगळे's picture

16 Sep 2011 - 11:48 pm | चेतन सुभाष गुगळे

श्री. बिपिन कार्यकर्ते साहेब,

कृपया उत्तराकरिता आपला संदेश inbox पाहावा.

शिल्पा ब's picture

17 Sep 2011 - 12:35 am | शिल्पा ब

<<<ज्यांना माझे लेखन आवडते ते मला व्यक्तिगत संपर्क करतात आणि इथे लेख टाकण्यास सुचवितात.

काय सांगता? जरा नावं द्या बरं त्यांची..

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Sep 2011 - 12:51 am | चेतन सुभाष गुगळे

<< काय सांगता? जरा नावं द्या बरं त्यांची.. >>

ज्यांना स्वत:ची नावे उघड झालेली चालतात ते खरडवहीतून माझ्याशी संपर्क साधतात. तुम्ही तिथे ती वाचू शकता.

ज्यांना स्वत:ची नावे उघड होऊ द्यायची नसतात (तसा त्यांचा स्पष्ट आग्रह असतो) ते इतर माध्यमातून (व्य.नि., इमेल, भ्रमणध्वनी, इत्यादी) संपर्क साधतात. त्यांची नावे मी इथे उघड करणे हा औचित्यभंग ठरेल.

माझा या आठवड्यात प्रकाशित झालेला लेख श्री. सागर बोरकर (वल्ली) यांच्या आग्रहावरून या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याचा उल्लेख मी त्या धाग्यावर केलेला आहेच.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Sep 2011 - 12:06 pm | विश्वनाथ मेहेंदळे

ओ चेगु, तुम्हाला तुमच्या नावाचा संक्षेप केलेला आवडत नाही म्हणून इतरांनी तो करू नये असे वाटते. मग इतरांना न आवडणाऱ्या गोष्टी (आयडी ऐवजी खऱ्या नावाने उल्लेख करणे) मुद्दाम कशाला करता.
आजपासून माझ्यासाठी तुम्ही "चेगु"च..

विमे

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Sep 2011 - 2:45 pm | बिपिन कार्यकर्ते

विमे यांच्या आक्षेपाशी सहमत आहे. गुगळे, तुम्हारा चुक्याच.

नगरीनिरंजन's picture

18 Sep 2011 - 2:54 pm | नगरीनिरंजन

ओ बिका,
तुम्हाला खेचरांचं व्यसन लागलंय वाटतं. ;-)

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Sep 2011 - 2:56 pm | बिपिन कार्यकर्ते

असं काय करता हो ननि! कधी नव्हे तर काही बोललोय तर तुम्ही लगेच भिती घालता? असं नाय हां करायचं! जीव घाबरतो हो!

चेतन सुभाष गुगळे's picture

18 Sep 2011 - 4:09 pm | चेतन सुभाष गुगळे

विश्वनाथ मेहेंदळे,

होय, तुमचा हा असाच उल्लेख करतो मी. तुम्हाला यावर काही आक्षेप आहे का? मग इतरांची बाजू घेऊन तुम्ही कशाला माझ्याशी वाद घालताय आणि मला न आवडणार्‍या पद्धतीने माझा उल्लेख करताय?

उत्तर द्या.

यसवायजी's picture

23 Feb 2013 - 12:23 pm | यसवायजी

काय भावा भांडत बसलैस? सोडुन दे की. बारका* हैस काय आता?
---------------------------------------------
धागा कसला? काय चाल्लय??
---------------------------------------------
संपादक मंडळास विनंती:- यांना १ शेप्रेट धागा काढुन द्याल काय?
---------------------------------------------
(* बारका:- नन्हा/लहान्/छोटा/पिल्लु/कुक्कुलं बाळ)

सविता's picture

15 Sep 2011 - 12:02 pm | सविता

किती कीस ( बटाट्याचा , रताळ्याचा पाडतात तो) पाडता हो एखाद्या गोष्टीचा?

मला जेवढे माहित आहे तुम्ही फक्त इथेच नाही बझ इतर बर्‍याच ठिकाणी अ‍ॅक्टिव आहात... मी पण आहे आणि अशा सगळ्या ठिकाणी नावाचे/धारण केलेल्या नावाचे असे संक्षिप्त रूप केलेले मी पाहिले आहे. आश्चर्य आहे तुम्ही कसे नाही पाहीले?

तुम्ही ना लोकांना फुल्टॉस चेंडू देता आणि मग त्यांनी सीमेपार भिरकावला की त्याबद्दल नापसंती व्यक्त करता..

ऐसन कैसन चलेगा बबुवा?

Nile's picture

15 Sep 2011 - 12:08 pm | Nile

मला जेवढे माहित आहे तुम्ही

अहो त्यांना असं सर्वनामाने संबोधू नका हो, नाहीतर लगेच एक लंबाचौडा प्रतिसाद येईल. तेव्हढं संपादकांना सांगून ते तुम्हीचं संपुर्ण चेसुगु करून घ्या पाहू. (संपादकांपैकी कोणीतरी माझा प्रतिसाद उडवायला येईलच, फार शोधावं लागणार नाही. ;-) )

वपाडाव's picture

15 Sep 2011 - 12:43 pm | वपाडाव

तुम्ही ना लोकांना फुल्टॉस चेंडू देता आणि मग त्यांनी सीमेपार भिरकावला की त्याबद्दल नापसंती व्यक्त करता..

फुल्टॉस तर देतातच अन ओउट्साइड ऑफ स्टंप पण देत्तात....
अन तोच मग यांना यॉर्कर मारतो अन यांची दांडी गुल होते.....

बाकी सविता, आपलं निरीक्षण का काय ते ज्याम भारी आहे हो !!!

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Sep 2011 - 3:16 pm | बिपिन कार्यकर्ते

आडनावाचे केवळ मराठी आद्याक्षर घेण्याची कुठली ही रुढ पद्धत मला तरी दिसून आलेली नाही. इथे असे करण्यात चिडविण्याचा हेतू दिसून येतो. त्यामुळेच मी या पद्धतीवर आक्षेप नोंदविला आहे.

श्री. गुगळे, तुमचा अभ्यास कमी पडतोय का? शिवाय तुम्हाला माहित आहे तेवढेच अंतिम आहे का? पहिले नाव आणि त्या नंतर मधल्या नावाचे आणि अंतिम नावाचे केवळ अद्याक्षर, टिंबासहित, असे संपूर्ण नाव लिहिणारे बरेच आहेत. माझ्या माहितीतही आहेत. प्रसिद्ध समाजवादी कार्यकर्त्या सुनीती सु. र. हे एक ठळक उदाहरण.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2011 - 7:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काय हो कार्यकर्ते, टोपणनावावर तुमचा आक्षेप काय आहे? विंदा, कुसुमाग्रज, केशवकुमार, केशवसुत अशी बरीच जुनी परंपरा आहेत मराठीत.

पाषाणभेद's picture

17 Sep 2011 - 1:06 am | पाषाणभेद

हे तर काहीच नाही. शाळा कॉलेजात आम्ही मुले एकमेकांना परस्परांच्या बापाच्या नावाने हाका मारत असू.
एकदा तर माझा मित्र दुसर्‍या मित्राच्या घरी गेला. (मोबाईलपुर्व कालखंड) त्याचे वडील दारात होते. ह्याने विचारले, "रमेश आहे का?" ते म्हणाले आहे. हा म्हणाला "पाठवा त्याला." मित्राचे वडील गोंधळल्यासारखे झाले. इकडे भेटायला गेलेल्या मित्राच्या हा गोंधळ लक्षात आला. नंतर त्याने बाजू सावरली अन मग त्याने मित्राचे नाव घेतले.

निवेदिता-ताई's picture

15 Sep 2011 - 8:56 am | निवेदिता-ताई

चालू द्यात...

सुहास झेले's picture

15 Sep 2011 - 10:21 am | सुहास झेले

वाचतोय... वाचतोय.... !!

मिसळपाववर प्रचलित झालेले मजेदार शब्द संकलित करण्याचा गंमतीदार उद्देश आहे की त्या निमित्ताने मिसळपावची कसलीशी वृत्ती आहे ती कशी उघड पडेल बघा आता गंमत..किंवा मिपावरील काही लोकांविषयी आणि प्रवृत्तींविषयी ग्रिव्हियन्स फ़ोरम असा काही उपहेतू आहे?

प्रास's picture

15 Sep 2011 - 11:46 am | प्रास

काय आहे गविभौ, धाग्यांचे अवांतर करण्याचीही मिपा(करां)ची वृत्ती आहे.

आता धाग्याकर्त्यांनी त्यांच्या पहिल्याच प्रतिसादामध्ये या वा अशा मिपा(करां)च्या वृत्तीचा उल्लेख केलाय आणि सदस्य ती दाखवतीलच असा विश्वासही व्यक्त केलाय तेव्हा जे इथे चालू आहे ते कुणाला (विशेषतः धागाकर्त्यांना) अनपेक्षित असे नाहीच आहे.

तेव्हा सध्या आपण तरी, "उगी रहावे नि जे जे होईल ते ते पहावे" ही (ही आणखी एक मिपा) 'वृत्ती' दाखवावी असा विचार करतोय.....

:-)

आशु जोग's picture

1 Sep 2012 - 2:37 pm | आशु जोग

किल्ला लढवायचा
दुसरं काय

विश्वनाथ मेहेंदळे's picture

15 Sep 2011 - 11:47 am | विश्वनाथ मेहेंदळे

उद्देश काहीही असो, मज्जा येते आहे ;-)

Nile's picture

15 Sep 2011 - 12:00 pm | Nile

अय्या, माझे प्रतिसाद कुठे गेले!!

स्पा's picture

15 Sep 2011 - 12:24 pm | स्पा

प्र का टा आ :)