तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (भाग -२)

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
8 Mar 2011 - 5:59 pm

तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (भाग -२/४)
आधीचा भागः http://www.misalpav.com/node/17161

पुर्वरंगः
(सोबती: वा वा शाहीर, गण तर लई फसकलास झाला. आक्षी आदर्श झाला बघा. मन लई परसन्न झालं. आता परंपरेनुसार गणानंतर गौळण बी झ्याक होवूंद्या. पब्लीक कसं खुष व्हाया पायजेल. आसं खुष, आसं खुष की त्येंनी सगळे घोटाळे, महागाई, प्रेटोल दरवाढ, भारनियमन, मुख्यमंत्री बदलाबदली समदं विसरायला पायजे, काय?

शाहीरः आसं म्हनता. मंग होवून जावूदे!
(ढोलकीचा ताल सुरू होतो अन त्या ठेक्यावर डोक्यावर माठ घेतल्याच्या आव आणत मावशी येते.)

पुढे वाचा........

बतावणी सुरू होते

मावशी: राधे आगं राधे चल निघ ना बाहेर. आतमधी काय करूं र्‍हायलीय. तिकडं मुन्नी बदनाम व्हईल ना. चल लवकर मथुरेच्या बाजाराला.

राधा: मावशे आगं तुझ्या जिभंला काही हाड हाय का न्हाई. आगं मुन्नी बदनाम कशी गं व्हईल?

मावशी: आगं राधे, तुझ्या आसं उशीर करण्यामुळं मुन्नी गवळणीचं दुध बाजारात विकाया नेण्याच्या आधीच नासलं तर ती बदनाम व्हईल आसं म्हनायचं व्हतं मला. चल आता लवकर. तो दह्याचा माठ घे डोक्यावर आन निघ. म्होरल्या चौकात मुन्नी आन शीला वाट बघत असत्याल. तू चल म्होरं मी शब्बो शहाबादीलाबी आनती संगती.
(रंगमंचाच्या एका कोपर्‍यात दोन गवळणी उभ्या आहेत.)

एक गवळण: या बया, मावशी आन राधा काय येईना बया. किती येळ झाला आता.

दुसरी गवळणः मला तर वाटतं मावशीला कुणीतरी भेटल आसल वाटतं अन मावशी बसली आसल. तिला जिथं तिथं बसायची लई वाईट खोड हाय बघ.

मावशी: हे पुरींनो, आले बघा मी. म्या काय शेंट्रल रेल्वे हाय का उशीरा यायला? हि काय राधा बी आलीच. जमल्या ना सगळ्या? मुन्नी, शीला, शब्बो तुमीबी हायेत ना. मला वाटलं तुमी कुठं आयटम डॅन्सलाच गेल्या का काय?

राधा: मावशे आमी सगळ्यांनी दही, दुध, लोणी डोक्यावर घेतलंय. तु ग काय घेतलंस बाजारात विकाया?

मावशी: मला काय विकाया लागत नाही. मलाच कोनी विकत घेतयं का ते पहायला म्या बाजारात चालले. (तोंड वेंगाडून) म्हनं, तु ग काय घेतलंस बाजारात विकाया? कलमाडीची चौकशी करतात तसं तु विचारू राह्यलीस जनूं. चला गं बिगीबिगी.

गवळणः मावशे, जरा हात लाव गं?
(मावशी गवळणीलाच हात लावालया निघते.)

गवळणः ए मावशे आगं म्या माठाला हात लावाया सांगितला, मला नव्हं.

मावशी: मंग त्वा कुठं तसं सांगिटलं. आता लावते माठाला हात. ए बाकीच्या साळकायांनो, तुमी का त्यांड बघून र्‍हायल्यात? चला लवकर. न्हायतर बाजार सापडायचा न्हाई. चला माझ्या मागं, मी व्हती तुमच्याम्होरं.
(सर्व जणी डोक्यावर दह्या दुधाचे माठ घेतल्याचा अभिनय करत रंगमंचावर गोल गोल फिरतात. तेवढ्यात पेंद्या येतो.)

पेंद्या: इश्टाप! इश्टाप!! इश्टाप!!!

मावशी: ए मुडद्या काय "इश्टाप इश्टाप इश्टाप" करतूया? इथं काय लपाछपीचा खेळ चालू हाय का?

पेंद्या: इश्टाप इश्टाप इश्टाप म्हंजे विंग्रजीत "Do not Start" आपनबी आता 'हासुरे' विंग्रजीचा क्लास लावलाय सध्या.

गवळणः ये बाबा जरा मराठीत समजल आसं बोल. नायतर मनसे बोलाया लावीन बघ.

पेंद्या: आगं बायांना मराठीत बोलतू "थांबा! थांबा!! थांबा!!"

मावशी: पाळणा "लांबवा लांबवा लांबवा"

राधा: बरं आमी थांबलो. तुझं म्हननं तरी काय ते तर सांगशील? का तुला आमचं दही दुध विकत घ्यायचंय?

पेंद्या: बरूबर. मला तुमच्यावालं दहि दुधच पाह्यजेल. पन विकत नाय काय.

मावशी: आमच्यावालं दहि दुध? येतोस का कोपच्यात? मंग देते तुला माझ्यावालं दहि दुध.

पेंद्या: ये बाबो. (घाबरतो). आगं तुमच्यावालं म्हनजे तुमच्या डोक्यावरल्या माठातलं दहि दुध म्हनायचं व्हतं ग मला.

मावशी: मंग, सरळ बोल की मेल्या. आनं काय रे तू कोन? आन आमाला का अडवितो?

पेंद्या: म्या पेंद्या हाय. आन किसनदेवाचा. म्या सरकारी शेवक हाय. माझ्या ह्या खाकी डेरेसवरनं तुमी वळखलं नाय? आहो खाकी म्हंजे खा की. नाशिकच्या मुन्शिपाल्टीत सरकारी मान्सं येईल ते खात्यात म्हनून आमचा डेरेस चा रंग बी खा की असलाच ठेवलाय. किसनद्येवानं सांगितलय की ह्या वाटनं कोनबी बाईम्हना मानूसम्हना आपाआपलं सामानसुमान घेवून जाईल त्यांना कर भरावा लागलं. म्हजी मराठीत हप्ता भरावा लागलं.

मावशी: आरं तु म्हणतुयास "कोनबी बाईमानूस सामानसुमान घेवून जाईल त्यांना कर भरावा लागलं". माझ्याकडं कायबी सामान न्हाई तर मी जावू का?

गवळणः मावशे तुझ्याकडं कायबी सामानसुमान नसनाका. पन आमाला मथुरेच्या बाजाराला नेयाची जबाबदारी तुझ्याकडं हाय हे विसरली का काय?

मावशी: आग माझे बाई, मी हा पेंद्या किती पान्यात हाय ते पाहन्यासाठी त्याची परीक्षा घेत व्हते.

पेंद्या: तर थोडक्यात तुमी बायांनी इथं टॅक्सच्या रुपात कायतरी द्यायला पाहिजे. आपला टॅक्स वेळेवर भरा व राष्ट्राच्या विकासात सहभागी व्हा. हि सुचना जनहितार्थ इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून प्रसारीत. सुचना समाप्त.

राधा: अरे बाबा हा टोल फ्री रस्ता आहे. आताच तर आण्णांनी हजारदा उपोषण करून हा रस्ता टोल फ्री केला होता ना?

पेंद्या: मला बाबा म्हणू नका, आबा म्हणू नका, दादाही म्हणू नका. मी काही पुढारी नाही. मी सरकारी माणूस आहे. अन हा रस्ता मुंबई-पुणे सारखा अजूनही टोलवालाच आहे. याचा वापर करणार्‍यांना टॅक्स द्यावाच लागतो.
(तेव्हढ्यात किसनदेव तेथे येतात.)

पेंद्या: देवा किसनदेवा, या गवळणी ह्या मावशीसंगट सामानासुमानासहीत या रस्त्यानं जात आहेत आन टॅक्सही भरत नाहीत.

किसनदेवः काय ग मावशे, हा काय म्हनतो आहे? अन तुमालातर टॅक्स द्यावाच लागेल. ते माठ खाली ठिवा आधी. किती येळ समईसारख्या उभ्या राहाल. उगाच मानेला आकडन यायची आन मानमोडी व्हायची.

राधा: पन आमी टॅक्स दिलाच न्हाई तर? सोड आम्हाला. येळ व्हतोय बाजाराला.

किसनदेवः तरीबी तुमाला टॅक्स द्यावाच लागल.

मावशी: आग ह्यो आसं नाय ऐकायचा. तु हो मागं. म्याच बघते तो काय म्हनते ते. कारं बाबा, आधीच बाजाराला जायाची येळ निघून गेली. आजकाल पब्लीक मॉलमधीच जातयं दहिदुध घ्यायला. मंग बाजारात कुत्रतरी सापडल का दहि विकाया? आन त्ये परराज्यातले भैये लोकंबी आधीच येतात माल विकाया. सोड आम्हास्नी.

किसनदेवः बरं बरं, तुमची इच्छा दहि दुध द्येयाची नसंल तरीबी ठिक हाय. तुमी मंग एखादं गाणं नाचून दाखवा. मंग आमाला आमचा कर मिळाला आसं आमी समजू. आन कराची रक्कम आमच्या खिशातून सरकारी खजिन्यात जमा करू.

राधा: ठिक आहे. आम्ही नाचतो. पण आम्हाला लवकर सोड.
(राधा अन गवळणी 'वगातली गौळण' सुरू करतात.)

क्रमशः

पुढचा भाग:
तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (भाग -३/४)

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०३/२०११

नृत्यनाट्यसंगीतकथाकविताप्रेमकाव्यभाषाविनोदमौजमजाचित्रपटआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

गणेशा's picture

8 Mar 2011 - 6:27 pm | गणेशा

जबर्‍या ..
अतिशय भन्नाट लिहिल आहे..

लोकनाट्य एकदम पॉवरफुल होत चालले आहे ...
गवळन येवुद्या आता झकास

...

वगातली गौळण म्हणजे .. वग तर शेवटी असतो ना ....

वपाडाव's picture

8 Mar 2011 - 6:32 pm | वपाडाव

मावशींच जी. के. ( अन ईतर नालेज)वाचुन लैच न्यानी माव्शी शोधल्याबद्दल आपले अभिणंदण....

बाकी : वगाची वाट पाहतोय....

प्रास's picture

8 Mar 2011 - 6:36 pm | प्रास

हे तर लई म्हणता लईच झ्याक होऊ लाग्लया, भौ.....

ते फुडचं लिवा लौकरात्लौकर.....

बाकी किसनद्येवालाच भय्यांविरुद्ध गा-हानं घालायचं...... ये तर आनखीनच भन्नाट बुवा.....

भले शाबास..... :-)

नगरीनिरंजन's picture

8 Mar 2011 - 7:59 pm | नगरीनिरंजन

लै भारी भौ. येऊन्द्या वगा वगानी.

बहुगुणी's picture

8 Mar 2011 - 11:16 pm | बहुगुणी

येऊ द्या आणखी लवकर!

स्पंदना's picture

9 Mar 2011 - 2:23 pm | स्पंदना

पा भे काय नविन शिल्प खोदणी सुरु दिसते?

चला या निमित्ताने वग तरी ऐकायला मिळेल.

नितीन बोरगे's picture

9 Mar 2011 - 10:24 pm | नितीन बोरगे

गणाप्रमाणे बतावनीही छान झाली आहे..

प्राजु's picture

9 Mar 2011 - 10:44 pm | प्राजु

मस्त!!