हे फक्त माणसातच !

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
7 Apr 2017 - 12:48 am

रात्री मासे आणणाऱ्या एकाकी माणसाला
बोकेमांजरे चहुबाजूने घेरतात.
माणूस पळू लागला कि,
त्याच्यावर झेप घेऊन त्याला बोचकारतात.
त्याच्या हातातील मासे क्षणार्धात लंपास होतात.
मासे मिळताच बोकेमांजरे
माणसाला तिथेच सोडून देतात.
हे सगळे किती विश्वासाहार्य, predictable आहे!

मासे मिळाल्यावर,
मासे तर फस्त करायचेच
पण माणसाची आतडी बाहेर येईपर्यंत
त्याला ओरबाडत, बोचकारत रहायचे,
मग, रात्रीच्या भयाण शांततेत फिस्कारत हिंडायचे .......
हे मात्र फक्त माणसातच !

- शिवकन्या.

इशाराकविता माझीभयानकबिभत्सरौद्ररसमांडणीवावरवाङ्मयकवितासाहित्यिकसमाजजीवनमान

प्रतिक्रिया

तुमची कविता आली की मी बरेचदा वाचतेच. ही कविताही आवडली.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Apr 2017 - 6:01 pm | अत्रुप्त आत्मा

ठिक!

जव्हेरगंज's picture

7 Apr 2017 - 6:42 pm | जव्हेरगंज

याप्रकारच्या कविता तुमचा ब्रँड आहे!

येऊंद्या!!

पुढील 'फक्त माणसांत' कवितेच्या प्रतीक्षेत. काही दिवसांपूर्वीच तुमची आठवण काढली होती. छान कविता.

फार दिवसांनी तुमची कविता आली. आवडली.

माहितगार's picture

13 Apr 2017 - 11:53 am | माहितगार

दाद

पद्मावति's picture

13 Apr 2017 - 2:24 pm | पद्मावति

आवडली.

वेल्लाभट's picture

13 Apr 2017 - 3:22 pm | वेल्लाभट

त्रोटक वाटली.