धावते विचार :)

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
26 Dec 2016 - 5:01 pm

---------काल गावाकडून पुण्याकडे एशियाड्मधून येत होतो. तेव्हाचं डोक्यातलं विचारचक्र ------
पंधरा नम्बरची सीट मिळालेये मस्त.अगदि मध्यभागी बसच्या.शिवनेरी वॉल्वो ऐवजी ह्यावेळी एशियाड घेउन किती स्मार्टपणा केलाय बॉस मी. संध्याकाळची वेळ. मस्त आल्हाद गारवाय हवेत. वाहती हवा. अगदि गरमी म्हणावी अशीही हवा नाही, आणि अगदि गारठून वैतागावे अशीही थंडी नै. मी स्वतःवरच खुश. आपण किती स्मार्ट आहोत त्याबद्दल. एरव्ही खूपदा शिवनेरीने जातो असह्य उकाडा वाटला तर. साडे तीनशे ऐवजी ऑल्मोस्ट सातशे रुपये पडतं भाडं इन द्याट केस.
.
.
एशियाडच्या साडे तीनशे ऐवजी जवळपास दुप्पट... म्हंजे सातशे रुपये भाडं शिवनेरीचं. मी किती आरामात प्रवास करतोय, तरी पैसे वाचवलेत. काय भारिये मी.पण मी तिसर्‍या चौथ्या रांगेत बसलोय. म्हंजे पहिल्या रांगेत बसलेले लोक माझ्या आधी पुण्याला पोचणार. म्हंजे पुढची सीट ही नेहमीच मागच्या सीटपेक्षा सेकंदाचा शतांश भाग का असेना आधी पोचतेच! पहिल्या सीटवरचा माणूस त्याच बसमधल्या शेवटच्या माणसापेक्षा थोडातरी आधी पोचतोच.
अरेरे! मी किती मागे पडतोय. किती किती वाईटे हे!!!
छे छे. मागं पडायचं नाही. आपण सर्वात आधी. अधिकाधिक पुढे असायला हवं. आपण मगे पडतोच कसे ? पुणं यायला अजून तास दोन तास असतील. आपण आपलं लागलिच जाउन उभं रहावं दाराजवळ. त्या पुढच्या रांगेत बसलेल्या माणसापेक्षाही आधी मीच पोचणार. वा वा वा. खूपच छान आयडिया. चला लवकर. मनोबा, दाराजवळ जाउन नम्बर पकडून ठेवू.
घडर्र घडर्र घडर्र्र....
घ्रिंग्ग्ग घिश्श......
नुसताच बसचा आवाज. आणि आजूबाजूहून जाणारी काही चुकार वाहनं. काही बैलगाड्याही.काही कार, काही बसेस्,काही काही लोक तर बाइकवरुनही चाल्लेत. अगदि ट्रिपल सीट चाल्लेत. नवरा-बायको नि त्यांचा चिमुकला असावा. वावावा. किती बरय. त्या माणसाचं स्वतःचं कुटुंबय. त्याच्या लोकांसोबत त्याला फिरायला मिळतय. पण बिचार्‍याला बसचं तिकिट नसेल का परवडत एका गावाहून दुसर्‍या गावाला पोचायला? आणि तिघांनी असं गाडीवरुन जायचं म्हंजे रिस्कच. जीवाला धोकाच कितीही नाही म्हटलं तरी.
अरे ? लाज नै वाटत आपल्या बायका मुलांचा जीव धोक्यात घालायला ? का ? करतोस रे बाबा असा ?
पण तो खरच प्रॉब्लेम मध्ये आहे, हे तरी त्याला माहितिये का ? येउ देत जवळ. समजावेन इथूनच. बसच दर उघडून सम्जावेन, नैतर खिडकीतून मुंडकं काढून.पण का ? त्याच्या भल्याचं टेन्शन मी का घेउ ? त्याचं त्यानं बघावं की. नकोच ते. त्याचं त्याला करु देत जे काय असेल ते.
थोडावेळ निघून गेलाय.
आता उभं राहून पाय दुखु लागलेत. ताटकळलोय.
.
.

मी त्यांच्या पुढे गेलो तरी पुढच्या रांगेतल्या लोकांना फिकिरच नाहिये. आरामात डुलक्या घेताहेत. कुणी पेपर वाचतय. माझ्या शेजारच्यानं माझ्याकडे एक कटाक्ष टाकलाय; भुवई वर करुन. आणी पुन्हा खिडकीबाहेर बघतोय. पायाला कळ लागलिये. पुन्हा गुमान जागेवर बसावं हेच बरं.
माझ्याशेजारुन आता एक शिवनेरी चाललिये. खिडकीवरचा पडदा सारुन ती एक मुलगी बाहेर पाहते आहे. बघितल्यावर स्मार्ट तर वाटतिये बुवा. चांगल्या बांध्याची मुलगी जीन्स टी शर्टवर बसलीये. मला लगेच तिला ओरडून सांगावंसं वाटतं

"मलाही परवडते शिवनेरी आरामात. नेहमीच ये-जा करतो त्यानं. पण फुकट उधळायला आवडत नै पैसे. इथे इथे बघ. मी मस्त मजेते. ऐक ना ऐक. माझं मस्त सुरुये. उलट वाहती फ्रेश ताजी हवा बरी त्या कोंदट ए सीच्या प्लास्टिकछाप खोट्या गारव्यापेक्षा." माझी नजरानजर होते. तिला माझी असूया वाटते आहे. खरच? खरच वाटतिये ? हो हो. वाटत असेलच. वाटायलाच हवी. वाटत नसेल तरी आपण तसच मानायला हवं. घट् घट् घट्... घोटभर पाणी पिउन आता बरं वाटतय. अर्रे...पण... तेवढ्यात गेली की तिची बस पुढे निघून.

उगी उगी मनोबा. तिला तुझी असूया वाटते आहेच.
जाइना का ती. पुढे जाउन शहराच्या ट्राफिकमध्ये तिची ही ssss भलीथोरली बस अडकणारच्चे. माझी त्यापेक्षा लहान एशियाड अशी सुळ्ळकन् निघून जाइल. आधी मीच पोचणार. पण नक्की तिच्या आधी पोचलो तर नेमकं काय होणारे ? म्हंजे मला ज्या वेळेला पोचायचय त्या वेळेला मी पोचलो तर बरं. तिच्या आधी असो नैतर नंतर. समजा ट्राफिक जॅममध्ये दोघांच्या बसेस दोन दोन तास अडकून लै वेळ गेला. आणि दोघांनाही उशीर झाला तर ? सारखाच उशीर करायचा होता तर हे sss इतकं महागड्या गाडित पेट्रोल जाळत यायचं कशाला होतं ?
पण मरु देत ना. मी तिचा इतका विचार करुच कशाला ? ती आहे तरी कोण ? आणि तसंही मी तिच्या आधी पोचलो तरी माझ्या पुढच्या रांगेतले सगळे माझ्याआधीच पोचणारेत. कैतरी करायला हवच.
अच्छा. इतका विचार करेपरेंत आलं का एकदाचं पुणं. माझ्या समोरचेही पोचलेच की.
.
.
.

हां. बरं झालं. उतरलो अन् झटकन् शेअरिंगवाली का असेना ओला कॅब मिळाली ते. छान वाटातय मस्त गुबगुबीत. अन् ह्या शेजारुन जाणार्‍या पी एम टी मध्ये ती मघाची शिवनेरीवाली बसलेलीये की काय. ओरडून सांगावं काय तिला
"बघ बघ. मी कसा मजेत आहे. चिंधीगिरी करत नाही चार पैशासाठी. कम्फर्ट महत्वाचा कम्फर्ट. रॉयल, शाही वागणूक आहे माझी." पण शेवटी ओला कॅब ऐवजी पी एम टी वापरुन तिचे पैसे वाचणार तर आहेतच.

मुक्तकजीवनमानराहणीप्रवासमौजमजाप्रकटनविचारलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

26 Dec 2016 - 5:09 pm | संजय पाटिल

=)

संजय क्षीरसागर's picture

26 Dec 2016 - 7:19 pm | संजय क्षीरसागर

छान .

वरुण मोहिते's picture

26 Dec 2016 - 7:50 pm | वरुण मोहिते

जमलाय लेख

ज्योति अळवणी's picture

26 Dec 2016 - 8:38 pm | ज्योति अळवणी

मस्त

प्रचेतस's picture

27 Dec 2016 - 7:00 am | प्रचेतस

टिपिकल मनोबा

लालगरूड's picture

27 Dec 2016 - 8:25 am | लालगरूड

भरत जाधव च्या स्टाईल मध्ये वाचले(गलगले).... मजा आली

मन१'s picture

27 Dec 2016 - 11:14 am | मन१

सर्व वाचक प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार

संजय पाटिल's picture

27 Dec 2016 - 11:34 am | संजय पाटिल

दोन्ही आयडी तुमचेच आहेत का?

मन१'s picture

27 Dec 2016 - 11:50 am | मन१

हो

मनोबा चक्रम आहे.

धन्यवाद.

संजय पाटिल's picture

27 Dec 2016 - 12:02 pm | संजय पाटिल

=))

नीलमोहर's picture

27 Dec 2016 - 11:50 am | नीलमोहर

:)

पुंबा's picture

27 Dec 2016 - 12:22 pm | पुंबा

मस्त...

लाल डब्यातनं जा. आणखी पैसे वाचतील.

रातराणी's picture

27 Dec 2016 - 12:48 pm | रातराणी

:)

पाटीलभाऊ's picture

27 Dec 2016 - 3:30 pm | पाटीलभाऊ

मस्त

कायबी राव, मज्जा आली पण, हेहेहेहेहेहेहेहे

मितान's picture

30 Dec 2016 - 8:40 pm | मितान

मस्तच !

मदनबाण's picture

30 Dec 2016 - 8:43 pm | मदनबाण

"मन" आणि त्याचे... धावते विचार ! ;)

मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- The Weeknd - Starboy (official) ft. Daft Punk

औरंगजेब's picture

6 Jan 2017 - 9:44 am | औरंगजेब

मलाही एशियाडच आवडते शिवनेरीपेक्षा.