आमचे एक मिपाकर परममित्र आणी त्यांच्या हिरवीनीला समर्पित! :)
______________________________________________
अरे हटाव बाजू, हिमालया
आन फेअर ॲन्ड लवलीच्या
कापूसभरल्या भावल्यांना
तूच माझी खरी हिरवीन ग!
एकच बावनकशी ब्युटी ग!
झालो तर्राट आन लैच्च सैराट
खुळा झालोय, सकाळ संध्याकाळ
लोकं बघणार कायबाय बोलणार,
तरीबी, तुझच ध्यान काढीत बसणार ग!
आता ही येवढीच माझी ड्युटी ग!
काय सांगू, दिसते कशी तू
फुलावरली जणू पाकुळीच मऊ
ग्वाड गुलाबजाम पाकातला
आन रसमलाई सगळी फिकी ग!
तूच ग माझी, हायेस लै क्यूटी ग!
- संदीप चांदणे
प्रतिक्रिया
24 May 2016 - 1:42 pm | टवाळ कार्टा
कोण मिपाकर म्हणे हे ;)
24 May 2016 - 2:33 pm | चांदणे संदीप
गेसा! ;)
24 May 2016 - 2:55 pm | अभ्या..
.
असलं कायतरी लिव्हशील वाटले शेवटी. ;)
24 May 2016 - 3:14 pm | चांदणे संदीप
याला म्हणतात... - - - - - - - -
For - - - - डायल १०० नंतर १०१ नंतर १०२....
.....काय फायदा नाय... व्यनि करा... सांगतो!
Sandy
25 May 2016 - 12:55 am | रातराणी
स्कूटीची आठवण कशाला काढली बे :(
25 May 2016 - 8:35 am | अभ्या..
स्वपन्या लका घे कि पल्सर बिल्सर, किती दिवस भैनीची गाडी तंगाडणारेस?
25 May 2016 - 10:42 am | टवाळ कार्टा
भन कशाव्रून ;)
24 May 2016 - 2:58 pm | नाखु
आयना असल्याबिगर मायना नाही असे सांगून मी खाली बसतो..
प्रेक्षक बाकडा क्रं ५
24 May 2016 - 4:50 pm | प्रचेतस
कोण रे हे? =))
24 May 2016 - 5:00 pm | अभ्या..
असं स्वतःच विचारतेत व्हय?
का "प्रचू डार्लिंग" ऐकून घेऊसे वाटू लागलेय?
24 May 2016 - 5:09 pm | चांदणे संदीप
=))
24 May 2016 - 5:18 pm | प्रचेतस
चेष्टा करताय हाय व्हय गरिबाची.
आमची हिरवीन तिकडं यवतला राहते.
24 May 2016 - 8:17 pm | चांदणे संदीप
रैवारीच जाऊन आलो बघा तुमच्या 'दसु' कडे!! अंधार पडला तरी पाय निघत नव्हता!
(फोटो फक्त पुराव्यादाखल आहे... लगेच पोज वगैरेवर (कुणीही!) कमेण्टू नये!) ;)
Sandy
24 May 2016 - 8:22 pm | चांदणे संदीप
वल्लीदा, ह्या कवितेचा आणि तुमचा 'अजून'तरी संबध नाहीय्ये हे नम्रपणे सांगू इच्छितो! ही कविता मिपावरच्या अत्यंत लाडक्या, मराठीत-गुड सेन्स ऑफ ह्यूमर असणारा, मनमिळाऊ, हजरजबाबी, हुश्शार(माझ्यापेक्षा थोड कमी), पुण्यात न राहणारा आणि विशेषण कमी पडतील अशा अवलीयासाठी आहे! ;)
Sandy
24 May 2016 - 8:25 pm | प्रचेतस
हे दुसरं तिसरं कुणी नसून आमचं अभ्याच हाय.
24 May 2016 - 10:07 pm | अभ्या..
इश्श .......
म्या कुठे अवलिया, आमची आयटम आलिया.
24 May 2016 - 8:29 pm | प्रचेतस
दिसली का आमची?
बाकी तुमच्या उजवीकडे जी मूर्ती आहे ती तीन शिरे, एक धड आणि चार पाय असलेली भासमान नरमूर्ती आहे.
24 May 2016 - 8:30 pm | प्रचेतस
वृत्तांत येऊ दे रे भुलेश्वर भेटीचा.
25 May 2016 - 10:19 am | एस
तिथे कशाला चढलात?
26 May 2016 - 4:22 pm | सूड
नायतर काय राव!!
24 May 2016 - 5:28 pm | पथिक
आवडलं !
24 May 2016 - 7:19 pm | जव्हेरगंज
ख्याक्क!
24 May 2016 - 8:01 pm | चांदणे संदीप
जिथ गुर्जींनी आमच्या सरांच्या तोंडावरच दार आपटलय... तिथ आम्हाला कोण इचारतंय!!
बाकी, हे 'त्यातले'1 नसून 'आतले'2 आहे!
१. त्यातले = तांब्यातले
२. आतले = मनातले
Sandy
24 May 2016 - 8:43 pm | चौथा कोनाडा
सॅण्डीभौ, सैराट-अ मधल्या आर्चीवर लैच फिदा झालेले दिसतात !
(आमच्या हिशेबाने सैराट-ब वर सैराट-अ फ्री आस ड्युयल प्याक करुन सैराट म्हुन श्यान इकलय. काय, मंडळी बरुबर हायkका? )
25 May 2016 - 12:56 am | रातराणी
चला चांदणेबुवांची खव खोदली पाहिजे आता. :)
25 May 2016 - 10:38 am | नाईकांचा बहिर्जी
हान तेज्यमारी लैच भारी हो sandy भाऊ
25 May 2016 - 10:53 am | कानडाऊ योगेशु
खिक्क!
बाकी मिपावर प्रेमज्वर पसरलाय वाटते.! ;)
25 May 2016 - 11:08 am | चांदणे संदीप
कापराला कापूर चिकटून जसा भुरभूर आग पसरवत सगळा ढीग पेट घेतो तसा आहे हा रोग!! ;)
Sandy