तीन वर्षापूर्वी आमच्या मुलीचं (कॅप्टन पुनव गोडबोलेचं) लग्न झालं. तेव्हां समारंभ करण्याऐवजी आम्ही ती सगळी रक्कम एका फौंडेशनला दिली जे गेली तीस वर्ष अनाथ मुली आणि निराधार वृद्धांना निवारा आणि शिक्षण देताहेत.
साधारण वर्षभरानंतर फौंडेशनचा कुठलासा कार्यक्रम होता जिकडे बरेच महत्वाचे आणि धनाड्य लोक येणार होते. तिथे मी त्यांना काही motivational सांगावं असं फौंडेशनच्या संचालकांनी सुचवलं. बौद्धिक घेणारी भाषणं रटाळ आणि कंटाळवाणी होतात असं माझं मत पण इलाज नव्हता.
माझी बोलायची वेळ आली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सगळ्यांना भुका लागल्या होत्या, चिडचिड झाली होती, स्वर चढले होते. आता माझं तयार केलेलं भाषण ठोकणं म्हणजे मूर्खपणाच झाला असता. हलकं फुलकं आणि मुख्य म्हणजे अगदी short करणंच योग्य होतं.
विनातयारीची भाषणं बहुदा तोंडघाशी पडतात. पण हे बर्यापैकी जमलं. ते स्वीट टॉकरीणबाईंनी मोबाइलवर विडियो रेकॉर्ड केलं. ते youtube वर टाकलं. त्याची लिंक एम्बेड करंत आहे. सुरवातीचं एक मिनिट कट झालं आहे. क्षमस्व.
प्रतिक्रिया
20 May 2016 - 7:53 pm | फेरफटका
तुमचे लेख जसे खुसखुशीत आणी काहीतरी 'देणारे' असतात, तसच तुमचं बोलणं सुद्धा आहे. स्वतःच्या मनाला पटणारी कृती केल्याबद्दल आणी करू शकल्याबद्दल अभिनंदन.
20 May 2016 - 8:05 pm | मुक्त विहारि
"तीन वर्षापूर्वी आमच्या मुलीचं (कॅप्टन पुनव गोडबोलेचं) लग्न झालं. तेव्हां समारंभ करण्याऐवजी आम्ही ती सगळी रक्कम एका फौंडेशनला दिली जे गेली तीस वर्ष अनाथ मुली आणि निराधार वृद्धांना निवारा आणि शिक्षण देताहेत." ह्या वाक्याने आणि तुमच्या भाषणामुळे, आता मात्र तुम्हाला भेटण्याची ओढ निर्माण झाली आहे...
20 May 2016 - 8:10 pm | मी-सौरभ
कट्टाव्यसनी मुवीशी सहमत
20 May 2016 - 9:16 pm | पद्मावति
जितके छान तुम्ही लिहिता तेव्हडंच भाषणही मस्तं.
सुरेख!! मनापासून आवडलं.
20 May 2016 - 9:20 pm | जव्हेरगंज
उद्या पाहण्यात येईल !
पण छानच !
21 May 2016 - 6:59 pm | जव्हेरगंज
क्या बात है!!
मस्त वक्तृत्व आहे तुमचं !!
20 May 2016 - 11:28 pm | रातराणी
खूपच सुंदर!
21 May 2016 - 1:16 am | बोका-ए-आझम
मुविंच्या प्रतिसादाशी सहमत!
21 May 2016 - 6:49 am | रुस्तम
Mastach
21 May 2016 - 8:23 am | रेवती
छान.
21 May 2016 - 8:55 am | कंजूस
उपक्रम स्तुत्य आहे.
21 May 2016 - 9:01 am | नाखु
हुकल्याची चुटपुट अजून वाढविली "गोडबोले" दांपत्याने !
आप्ल्या मनाजोगो करण्याबद्दल मिळालेल्या मुलीचे सहभागी सह्कार्याबद्दल तीचेही कौतुक आणि शुभेच्छा!!!
मिपा वारकरी नाखु
21 May 2016 - 10:27 am | सिरुसेरि
छान उपक्रम . सामाजिक सुधारणांची सुरुवात स्वतापासुन करावी लागते असे म्हणतात ते खरे आहे .
21 May 2016 - 10:53 am | अजया
_/\_
Thanks for inspiring!
21 May 2016 - 11:34 am | चतुरंग
हेच आधी स्तुत्य आहे; त्यानंतर ती कल्पना सगळ्या सामाजिक, कौटुंबिक, मानसिक दबावांना झुगारुन प्रत्यक्षात आणण्याची कठिण कामगिरी पार पाडणे हे त्याहूनही कौतुकास्पद आहे!
तुम्हा दोघा पतीपत्नींचे आणि कन्येचे मनःपूर्वन अभिनंदन!!
(तुमचे निवेदन अतिशय खुसखुशीत, प्रांजळ आणि सहज आहे. खरोखर कोणताही बडेजाव नाही.)
__/\__चतुरंग
21 May 2016 - 6:58 pm | स्वीट टॉकर
सर्वजण,
मनापासून धन्यवाद!
आता सगळेच इतके broad minded झाले आहेत की सामाजिक, कौटुंबिक, मानसिक दबाव अजिबात आलाच नाही. व्याह्यांनी देखील कोठल्याही प्रकारचा विरोध केला नाही.
मु वि - तुमच्या मुलाशी आज फोनची वेळ ठरवली आहे.
23 May 2016 - 3:56 pm | जिन्गल बेल
__/\__
23 May 2016 - 4:03 pm | गवि
एक मोठी रक्कम विशिष्ट चांगल्या कामासाठी थेट (सत्पात्री टार्गेटेड) स्वरुपात देता आली हे फार उत्तम झालं. इतर अनेकांनी हे प्रथा चालू ठेवायला हरकत नाही.
फक्त जाताजाता, असं फार जास्त लोकांनीही करु नये. असं न करता सढळ हस्ते ऐपतीनुसार खर्च करुन लग्न करणारे (किंवा कोणताही सोहळा करणारे) हेदेखील नॉन स्पेसिफिक नॉन टार्गेटेड पण समाजाच्या सर्वच थरांना उपयुक्त आणि अत्यावश्यक आर्थिक अभिसरण करत असतात हेही डिसक्रेडिट होऊ नये म्हणून मांडावंसं वाटतं. इनफॅक्ट जितकी जास्त (तथाकथित) उधळपट्टी तितका अर्थकारणाला जास्त हातभार. जास्तीतजास्त गरीबांच्या (!) घरात अन्नाचे चार घास.
13 Jul 2016 - 1:13 am | संदीप डांगे
पण गविंशीही सहमत. नुकतंच एक बिग फ्याट इन्डियन वेडिंग अटेन्ड केलं. तिथं राबणार्या आणि विविध व्यावसायिकांच्या कर्तबगारीकडे व त्यातून निर्माण होणार्या रोजगाराकडे, उलाढालीकडे सकारात्मक दृष्टीकोणातून बघितलं तर काहीच चुकीचं वाटलं नाही. खरंतर अशा लग्नांमुळे 'साठवलेला काळा पैसा' बाहेर पडून बाजारात येतो हे त्याहून चांगले.
(थाटामाटात लग्न करणारे सगळे काळापैसावाले असा अर्थ घेऊ नये)
13 Jul 2016 - 10:08 am | स्वीट टॉकर
उधळपट्टीमधून रोजगार निर्माण होतो हा निष्कर्ष अर्थशास्त्रांच्या नियमाविरुद्ध आहे. अर्थशास्त्राप्रमाणे जर पैसे लगेच परत सिर्क्युलेशनमध्ये आणायचे असले तर ते अशांना द्यावे ज्यांच्याकडे पैशाची वानवा आहे, कारण त्यांना ते लगेच खर्च करावेच लागतात.
लग्नाच्या उधळपट्टीतून ज्यांना नफा होतो, उदा. ज्वेलर्स, लग्नाच्या हॉलचे मालक, उंची साड्यांचे व्यापारी हे काही लगेच खर्च करायला बाहेर पडंत नाहीत. ते आपापल्या कारागीरांना पगार देतात हे कबूल, पण बाकीचा पैसा आपल्याकडे ठेवतात.
या उलट अशा सेवाभावी संस्थांची कायम हातातोंडाची गाठ पडतेच असं नाही.त्यांना ते लगेच खर्च करावेच लागतात.
शिवाय एखाद्या ज्वेलरने दहा हजार रुपयांची उंची मद्याची बाटली विकत घेणे आणि त्याच दहा हजार रुपयात अडीचशे निराधार मुलांची एका जेवणाची व्यवस्था होणे ह्यांची आर्थिक तुलना मी कधीच करू शकणार नाही.
13 Jul 2016 - 10:35 am | गवि
यावर वेगळी चर्चा होऊ शकेल. दोन्ही बाजूंचे अधिकउणे मुद्दे आहेत.
पण इथे तो काथ्याकूट औचित्याला धरुन होणार नाही कारण तुम्ही निवडलेला मार्गदेखील चांगलाच आहे.
13 Jul 2016 - 10:43 pm | संदीप डांगे
सहमत. वेगळा धागा काढूयात. विषय चांगला आहेच. :)
सरतेशेवटी, कुणाला कशात सुख मिळतं आणि ते तो कसे मिळवतो हे ज्याच्यात्याच्या मानण्यावर आहे. असो. वेगळ्या धाग्यात अधिक चर्चा करु.