चांदोबा असतोच तसा आजन्म उपाशी
तुपात पडलीयेना त्याच्या माशी !
तुपरोटी तो कसला खातो
चिरेबंदी गाण्यातली अंगाई ऐकत
मामा होऊन भटकत राहतो !
निंबोणीच्या झाडात गंधर्व होऊन
विराणी कुठलीशी गात राहतो.
बाबा ?, की आईनेच चांदोबाचा भागाकार केला,
म्हणूनतर नाही ना चांदोबा निंबोणीमागे लपला ?
* माझ्या उपरोक्त विडंबनास खरे तर एका पेक्षा अधिक शीर्षके सुचत होती, तुम्हाला काही चपखल शीर्षक सुचलेतर प्रतिसादातून जरुर नोंदवा.
* उपरोक्त विडंबन खालील बडबड गीताचे आहे :
चांदोबा चांदोबा भागलास का
निंबोणीच्या झाडामागे लपलास का
निंबोणीचं झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी
मामाच्या वाड्यात येऊन जा
तूपरोटी खाऊन जा
तुपात पडली माशी
चांदोबा राहिला उपाशी
* कुणास गदिमा लिखीत काव्य माहित असल्यास तुप/ तुपरोटी च्या जागी दुध / दुध-शेवई ठेऊन विडंबन पुन्हा वाचण्यास हरकत नसावी.
प्रतिक्रिया
6 Dec 2015 - 2:23 pm | अजया
माहितगार यु टु!
वाङमय शेती काहीच्या काही जमून आलीये ;)
8 Dec 2015 - 8:08 am | माहितगार
प्रतिसादासाठी आभारी आहे.
6 Dec 2015 - 2:38 pm | दमामि
निंबोणीमागे लपलेल्या चांदोबा वरून पालीमागं लपलेल्या ठाकरांची आठवण आली.
6 Dec 2015 - 4:04 pm | कविता१९७८
विडम्बन जमलय
6 Dec 2015 - 7:12 pm | जव्हेरगंज
मुळ गाणं असं आहे ना ( यात माशी कुठे पडलीय?)
चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !
आई-बाबांवर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?
आता तरी परतुनी जाशील का ?
दूध न् शेवया खाशील का ?
आई बिचारी रडत बसेल
बाबांचा पारा चढत असेल !
असाच बसून राहशील का ?
बाबांची बोलणी खाशील का ?
चांदोबा, चांदोबा कुठे रे गेलास ?
दिसता दिसता गडप झालास !
हाकेला 'ओ' माझ्या देशील का ?
पुन्हा कधी आम्हांला दिसशील का ?
6 Dec 2015 - 7:26 pm | माहितगार
चांदोबा चांदोबा भागलास का
निंबोणीच्या झाडामागे लपलास का
निंबोणीचं झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी
मामाच्या वाड्यात येऊन जा
तूपरोटी खाऊन जा
तुपात पडली माशी
चांदोबा राहिला उपाशी
चे कवि कोण आणि/ किंवा रचना केव्हा झाली आहे हे मला माहित नाही. मी लहानपणापासून ऐकलेले बडबडगीत वरील प्रमाणेच. आपण दिलेले अंगाई गीताचे कवि बहुधा गदीमा असावेत संदर्भ gadima.com
यातील कोणती व्हर्शन अधीक जुनी नक्की माहित नाही पण 'तुपात पडली माशी, चांदोबा राहिला उपाशी' हि त्रोटक आणि खास फिनीश नसलेली लोकगीत व्हर्शन असण्याची शक्यता वाटते पण हा केवळ तर्क आहे पूर्णतः चुकीचाही असु शकतो.
'तुपात पडली माशी, चांदोबा राहिला उपाशी' व्हर्शन केव्हा पासून ऐकली आहे हे जुन्या जाणत्या लोकांनी सांगीतल्यास कोणती आधीची हे निश्चीत करणे सोपे जावे. गदीमांचा जन्म त्यांच्या संस्थळावर १ ऑक्टोबर १९१९ चा दिला आहे असे दिसते.
6 Dec 2015 - 7:31 pm | माहितगार
'तूपरोटी' हा शब्दोपयोग बहुधा 'चलरे भोपळ्या टुणूक टुणूक' या लोक कथेत 'लेकी घरी जाईन तूपरोटी खाईन' असा ऐकलेला आहे. त्या मुळे कदाचीत तो त्या नंतर रचलेल्या बडबडगीतात आला असू शकेल ? हा माझा व्यक्तीगत केवळ अंदाज जाणकारांनी अधिक माहितीद्यावी.
6 Dec 2015 - 7:46 pm | माहितगार
Sañcaya Bhavanishanker Shridhar Pandit Vidarbha Marāṭhavāḍā Buka Kaṃpanī, 1966 - 292 pages
यात तुपरोटी व्हर्शन दिसते आहे.
6 Dec 2015 - 7:31 pm | तिमा
तुपात पडली माशी, चांदोबा राहिला उपाशी'
आम्हीही लहानपणापासून हेच ऐकलंय! (१९५२)
6 Dec 2015 - 9:55 pm | परिकथेतील राजकुमार
एकदा माझ्या ९० च्या पेग मध्ये पडलेली :(
पण मी चांदोबा सारखा माजोरी नसल्याने माशी फेकली आणि गळा ओला केला.
6 Dec 2015 - 10:17 pm | जव्हेरगंज
माशीला कसली चढली असेल ना.. बापरे..!!
6 Dec 2015 - 10:25 pm | परिकथेतील राजकुमार
अहो बार मधली माशी ती.
6 Dec 2015 - 10:25 pm | नाव आडनाव
दिल मधला अनुपम खेर आठवला :)
6 Dec 2015 - 10:59 pm | अत्रुप्त आत्मा
मला पण इडंबण सुचल!
पां डुब्बा पां डुब्बा जागलास का?
डोंबोलिच्या ट्रेनमागे लागलास का?
डोंबोलीची ट्रेन बारा डब्बी....
त्यात भेट्ली पांडु ला... पां डुब्बी!
6 Dec 2015 - 11:10 pm | माहितगार
=))
7 Dec 2015 - 1:27 pm | टवाळ कार्टा
=))
7 Dec 2015 - 7:37 pm | प्रचेतस
(हताश) पांडुब्बा उवाच -
मला लागली कुणाची उचकी
(कोरसमध्ये मिपाकर -कुणाची रं कुणाची ? ह्याची का त्याची ? लाजू नको, लाजू नको सांग की)
बुवाची रं बुवाची रं बुवाची..!!!
7 Dec 2015 - 7:53 pm | सूड
तरणीताठा, बाप्या शेलाटा, चढलो मी बांधावर
अटकर बांधा, गोरा गोरा खांदा, सदरा वार्यावर
आला आला ठोंब्या, बघा वाजला त्याचा तांब्या
माझ्या उरात भरली धडकी
7 Dec 2015 - 10:32 pm | सतिश गावडे
काहीतरीच अगलतगल हां सूड.
7 Dec 2015 - 11:08 pm | सूड
अगलतगल कुठे, हे त्यामानाने फारच तगलतगल आहे.
7 Dec 2015 - 11:21 pm | सतिश गावडे
असे तुला वाटले. मला हे अगलतगल वाटले.
7 Dec 2015 - 11:51 pm | सूड
चालू द्या तुमचे निरर्थक आत्ममंथन!!
8 Dec 2015 - 12:08 am | बॅटमॅन
अश्लील =)) =)) =))
7 Dec 2015 - 10:42 pm | टवाळ कार्टा
बुस्पांचा धागा हैज्याक कर्ण्याचा प्रेत्न
7 Dec 2015 - 11:38 pm | प्रचेतस
खी खी खी =))
लैच अगलतगल.
7 Dec 2015 - 8:29 am | जेपी
याच सरकारी व्हर्जन हाय एक..थोड आठवतय..
चांदोबा चांदोबा श्रमलास का ?,निबोंणीच्या व्रुक्षामागे दडलास का?,
बगा सापडतय का??
7 Dec 2015 - 9:34 am | माहितगार
'चंद्रम्या चंद्रम्या श्रमलास का ?' http://www.maayboli.com/node/37820 हे पु. ल कृत आहे ?
7 Dec 2015 - 9:43 am | माहितगार
पण त्यात 'निबोंणीच्या व्रुक्षामागे दडलास का?' दिसत नाहीए
7 Dec 2015 - 10:24 am | जेपी
पण त्यात 'निबोंणीच्या व्रुक्षामागे दडलास का?' दिसत नाहीए
असेल फारसे आठवत नाही..
7 Dec 2015 - 10:27 pm | पैसा
विडंबन आवडले!
तुपात पडली माशी हे मूळ बडबडगीत आहे. दुसरे "चांदोबा चांदोबा भागलास का" हे आशा भोसले यांच्या आवाजात कोणत्यातरी सिनेमासाठी लिहिले आहे.
7 Dec 2015 - 11:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
काय नाय हो ! ही अत्रंग नवी पिढी रात्री बागेत, समुद्राकाठी बसून कायबाय चाळे करत असते. त्यामुळे चांदोबा शरमेने निंबोणीमागे लपला आसणार बघा !
8 Dec 2015 - 8:00 am | माहितगार
एनी कॉमेंट्स ?
8 Dec 2015 - 10:06 am | नाव आडनाव
रात्री बागेत, समुद्राकाठी बसून कायबाय चाळे करत असते. त्यामुळे चांदोबा शरमेने निंबोणीमागे लपला
चूक. ह्या सिचुएशन मधे चंद्र काय करत आहे ह्याचं एक्स्प्लनेशन "राधा ही बावरी" ह्या गाण्यात आहे -
हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयांचे पाही