अर्धसत्य आणि सत्याचे प्रकटीकरण:
आपणांस माहिती असेल की महाभारतातील युद्धात कौरवांच्या बाजूने लढत असलेल्या द्रोणाचार्यांचे धैर्य खच्चीकरण करण्यासाठी आणि त्यांनी शस्त्र त्यागण्यासाठी त्यांचा मुलगा अश्वत्थामा युद्धात मारला गेला असे त्यांना खोटे सांगण्यासाठी कृष्णाने सत्यवादी युधिष्ठिराला त्यांचेकडे पाठवले. पण युधिष्ठिर मोठा सत्यवादी. त्याचेकडून खोटे बोलणे शक्य नव्हते. मग अश्वत्थामा नावाचा एक हत्ती भीमाने मारला आणि मग युधिष्ठिरानं द्रोणाला सांगितलं, "हो अश्वत्थामा मेला" आणि मग हळूच त्यांना ऎकू येणार नाही असे बोलला," पण तो हत्ती होता" द्रोणांनी शस्त्रं त्यागली.
खरं तर अश्वत्थामा अमर आहे हे माहिती असूनही केवळ युधिष्ठिराच्या सत्यवादीपणावर विश्वास ठेवून द्रोणांनी ते खरे मानले.
हे झाले अर्धसत्य!
तर यावरून मला असे लक्षात येते की आपल्याला हवे तसे आभासी चित्र इतरांसमोर निर्माण करण्यासाठी आणि स्वार्थासाठी बोललेले अर्धसत्य हे असत्यापेक्षाही निर्दयी आणि भयंकर नुकसानकारक असते...
पण सर्वांचे मोठे नुकसान टाळण्यासाठी आणि सैतानी शक्तींपासून रक्षण करण्यासाठी सांगितलेले अर्धसत्य हे प्रत्यक्ष सत्यापेक्षाही श्रेष्ठ असते.
तसेच कधीही काही कारणास्तव तुम्ही सत्य सांगू शकत नसाल तर संपूर्णपणे असत्य बोलण्यापेक्षा केव्हाही अर्धसत्य बोलणे श्रेयस्कर असते!!
वेळ आली की सत्य समोर येतेच येते. पण ती वेळ साधणे महत्त्वाचे असते. वेगवेगळ्या वेळेला प्रकट झालेल्या सत्याचा त्या त्या वेळेनुसार व परिस्थितीनुसार वेगवेगळा परिणाम होत असतो.
(सुचना: महाभारत हे आजपर्यंत अनेक पुस्तके आणि सिरियल्स मधून माझ्यासमोर आले आहे. त्या आधारे मी हे लिहितो आहे. एकाच प्रसंगाबाबतचा दृष्टीकोन अनेक पुस्तकात आणि लोककथेत आणि सिरियल्स मध्ये वेगवेगळा आढळला आहे. तेव्हा मला जे प्रसंग वाचून, ऐकून किंवा मालिकेतून पाहून माहित झाले आहेत त्याच्या आधारे मी काही प्रसंग मांडत आहे. त्याबद्दल मतभेद असू शकतात.)
प्रतिक्रिया
26 Aug 2015 - 6:11 pm | gogglya
"नरो वा कुंजरो वा' असे वचन आहे.
27 Aug 2015 - 4:37 pm | मनीषा
तसेच कधीही काही कारणास्तव तुम्ही सत्य सांगू शकत नसाल तर संपूर्णपणे असत्य बोलण्यापेक्षा केव्हाही अर्धसत्य बोलणे श्रेयस्कर असते!
वेळ आली की सत्य समोर येतेच येते. पण ती वेळ साधणे महत्त्वाचे असते. वेगवेगळ्या वेळेला प्रकट झालेल्या सत्याचा त्या त्या वेळेनुसार व परिस्थितीनुसार वेगवेगळा परिणाम होत असतो.
याला मराठीत संधीसाधूपणा असे म्हणतात. आणि असं वागणार्या व्यक्तीला साळसूद असं म्हणतात.
आणि जाणुनबुजुन संपूर्ण असत्य बोलणार्याला किंवा सत्य लपवून ठेवणार्याला खोटा किंवा लबाड म्हणतात.
27 Aug 2015 - 5:40 pm | अभ्या..
महाभारत लै लोकांनी लिवलय ओ.
तुमच्या विनिंग शशकचा सिक्वल कुठाय? सापडेना मला. :(
27 Aug 2015 - 5:42 pm | अद्द्या
पण तो हत्ती होता"
^^
तो हत्ती होता कि माणूस हे नाही माहित
असं म्हणाला होता ना ?
बाकी . अर्ध सत्य बोलून दुसऱ्याला फसवण्यापेक्षा जे काही आहे ते सरळ सागून जास्ती फायद्यात राहतो माणूस असा आजवरचा अनुभव .
(महाभारतात हि ते केलेलं मला पटलेलं नाही . पण त्याने काय फरक पडतो म्हणा )
इतर वेळी आम्हीच कसे न्याय्य बाजूने लढतोय आणि आमचीच कशी बाजू सत्याची म्हणणारे पांडव या घटनेत फसवाफसवी करतात .
असो . तुम्ही मेहनतीने लिहिताय . तर पुढल्या लेखाला शुभेच्चा
27 Aug 2015 - 7:29 pm | प्रसाद गोडबोले
ह्या वाक्यावर हसावे की रडावे हेच कळेना ! =))
27 Aug 2015 - 7:40 pm | अत्रुप्त आत्मा
:-D
27 Aug 2015 - 8:19 pm | प्रदीप साळुंखे
कारण ,द्रोणांनी आपला मुलगा अश्वत्थामा या आशयाने दुखी होऊन विचारले होते.आणि तो 'आशय' युधिष्ठरला न कळण्याइतका तो अडाणी नव्हता हे नक्कीच. म्हणूनच पूर्ण असत्यच बोलला युधिष्ठिर.
27 Aug 2015 - 9:20 pm | कूल बाळ
'खरं तर अश्वत्थामा अमर आहे हे माहिती असूनही केवळ युधिष्ठिराच्या सत्यवादीपणावर विश्वास ठेवून द्रोणांनी ते खरे मानले.'
अश्वत्थामा अमर नव्हे, चिरन्जीव होता...
27 Aug 2015 - 10:12 pm | संचित
चिरन्जीव आणि अमर यात काय फरक आहे?
27 Aug 2015 - 10:19 pm | मांत्रिक
मी पण हाच विचार करतोय? :(
28 Aug 2015 - 1:43 pm | कूल बाळ
अमर म्हणजे ज्याना मरण / शेवट नाही.
चिरन्जीव म्हणजे दीर्घयुशी किंवा जे अनेक युगे जगले / जगतील.
सात चिरन्जीव पुढीलप्रमाणे:
बळी
परशुराम
हनुमान
विभीषण
व्यासमुनी
कृपाचार्य
अश्वत्थामा
27 Aug 2015 - 9:36 pm | कूल बाळ
एक वाचलेली जुनी गोष्ट.
युधिष्टीराचा रथ जमिनिपासून चार अंगुले(फुट??) वर चालायचा (की धावायचा?).
नरोवाकुंजरोवा मुळे रथ जमिनीवर आला.
27 Aug 2015 - 9:41 pm | मांत्रिक
हं ऐकल्ये. पण अंगुले म्हणजे बोटे असावे, फुटे नव्हे. :)
28 Aug 2015 - 1:52 pm | अन्या दातार
सुंदर विवेचन. पुभालटा