कॉलेज चालू होऊन थोडेच दिवस झाले होते. अशाच एका संध्याकाळी माझ्या एका मित्र्ाने एका अमुक एक ठिकाणाच्या मंदिराकडे जाणार असल्याचे ठरवले.
ते ठिकाण जवळपास ३ तासांच्या अंतरावर होते. अमुक एक तिथीला मित्र्ाच्या घरचे तिथे जात असत. यावेळेस हा जाणार होता. सोबतीसाठी त्याने मला विचारले.मी लगेच राजी झालो.
सकाळी ८ च्या आासपास आम्हाला बस मिळाली. खडडयातुन आमची गाडी मंदगतीने पुढे सरकत होती. थोड्याच वेळात आमच्या गप्पांना आम्हीच कंटाळलो आणि झोपी गेलो.
यथावकाश ती बस एकदाची पोहचली. तीन तासाचा प्रवास आणि जवळपास शंभराहुन जास्त पैसे मोजुन आम्ही तिथे पोहचलो.
तिथे अर्थातच गर्दी पसरली होती. तिथे लाईन ( त्याला दर्शनरांग (!!) असे म्हणतात.) होती साक्ष्ात त्या देवतेचे दर्शन घेण्यासाठी. त्यात तिन तास सहज गेले असते. म्हणुन मित्र्ाने पेड लाईनचा मार्ग निवडला. ज्याची फी फक्त ३० रुपये होती.
इथे आमची तत्वे आड आली मी स्पष्ट शब्दात यासाठी नकार दिला. त्याने दुष्टीने मी मुर्खपणा करत होतो. आणि येवढ्या लांबुन येऊन असे करणे अर्थातच योग्य ठरणार नव्हते. तरीही मी पाठ फिरवली आणि बाहेर त्याची वाट बघत थांबलो.
बाहेर जाताना त्या देवतेच्या बाहेर लावलेल्या फोटेकडे पाहीले. जागेवरुन मनापासुन नमस्कार घातला. वर पाहिलं तेव्हा ती देवता हसत असल्याचा भास झाला
ती का हसली असेल असे तुम्हाला वाटते. ?
प्रतिक्रिया
16 Jul 2015 - 1:10 pm | खेडूत
अहो , बरोब्बर आदल्या दिवशी मी पण तिथंच गेलेलो !
सेम तसंच केलं .
देवीनं बराबर वळीकलंन आला हा पण अजून एक मिपाकर म्हणून!
16 Jul 2015 - 2:02 pm | एस
बाजार मांडियेला...
16 Jul 2015 - 2:09 pm | पगला गजोधर
देवी हसत म्हणत असेल कदाचित, जे काम/बिझिनेस/शिक्षण/कर्तव्य करत असशील, ते करतानाच फक्त मानःतून माझं एक क्षण नामस्मरण केलं असतेस तरी चालले असते एवढ्या लांब प्रवास करून व पैसे खर्चून बाहेरच्या फोटोला नमस्कार करण्यापेक्षा.
देवाचं / देवीचं त्याच्या लोकप्रसिद्ध मंदिरात जावून, पेड रांगेतून प्रत्यक्ष मूर्तीचं दर्शन घायलाच पाहिजे असं काही देवाचं कम्पल्शन नसतं, जरी भेट दिलीच, तर खर्चिक पूजेचं ताट / अभिषेक / दक्षिणा / शाल / निज्पाद दर्शन / पेड दर्शन, वैगरे वर खर्च केलाच पाहिजे असेही देव म्हणत नाही.