<<<<<पंगत-नवमिपाकरांची-भाग ३(अंतीम)>>>>>>

जेपी's picture
जेपी in जनातलं, मनातलं
23 Nov 2014 - 11:23 am

http://www.misalpav.com/node/29468 भाग दोन...http://www.misalpav.com/node/29344...भाग एक

आता सगळे मुद्दे संपले होते.पंगतीची तारीख ठरली. गुरुजीनीं निरोपाचे विडे दिले आणी निरोप घेतला.
मी कुटलेला काथ्था पोत्यात भरला.वाया जायला नको.घरी जाऊन दोर वळत बसलो.
भेटु आता पंगतीत.

================================================================================
>>>>
ठरल्या तारखेला पुण्यात पोहचलो आणी स्वारगेटला समोरच गुरुजी आपल्या उडनखटोल्यावर मांडीघालुन बसल्या
अवस्थेत आमच्या स्वागताला हजर दिसले.या वेळेस जवळ पायरेट छाप बंदुक होती.ईथे काही मिपाकरांच्या कपाटात
एक बंदुक आसल्याचे माहीत आहे,गुरुजींच्या कपाटात किती बंदुका आहेत हे शोधुन काढायचे हे मनात पक्के करुन
गुरुजींना नमस्कार केला.
"अरे किती वेळ ? तिकडे सगळे मिपाकर खोळंबलेत आजुन बल्लवाचा पत्ता नाय!! चल बस गाडीवर"
"कसा बसु?"
"तुला जस बसायचय तस्स बस!! मांडी घाल! एकसाईड बस नायतर झोप! मी ऑलराऊडंर आहे कसाही गाडी चालविन"
दोघ मांडी घातल्या अवस्थेत हॉलवर पोहोचलो.गेटवरच सतिश गावडे.मामलेदाराचा पंखा आनी टवाळ कार्टा हि तिकडी
उभी होती.गुरुजी" हे तिन पोर आणी मी अशी 'फंटास्टिक फोर' तुला मुदपाकखान्यात मदत करु.चल लवकर".
फंटास्टीक फोर!!!!! पक्की चांडाळ चोकडी आहेत चारीपण.
आंवढा गिळत ईकडे तिकडे न बघता आत गेलो.मुदपाकखान्यात गेलो."हि घे सामग्री आणी ट्क्या, माप ला घेऊन कामाला
लाग.मी आणी सगा मिळुन स्विट डिश बनवतोत"
सामग्रीवर नजर टाकली टोमॅटो फ्लॉवर गाजर पनीर डाळींब केळी ओलंखोबर, दुधीभोपळ मिर्ची दिसली.
हे तर माझ्या थाळीत नव्ह्त,डोक तडकल! वस्सकन बोललो"ओ गुरुजी, काय कालच्या पुजेतुन आणलय का?माझ थाळीच साहीत्य कुठेय?"
" आँ.......दु.....दु.....तु.....मला...नाव...ठेवतो!!!!!"ते बदुंक घेऊन अंगावर आले.
"त्या बंदूकेने ढेकुण पण मरणार नाय तर मला काय होणार"मी.....तेवढ्यात सगा धावुन आला"जेप्या.हे थम्स अप घे"
"थम्स अप ठेव बाजुला,माझी मस्ताणी कुठाय!!साला आल्यापासुन साध पाणी पण विचारल नाय.सारख आपल लाग कामाला लाग कामाला चाललय तुमच"मी त्याच्यावरली भडास काढुन घेतली.
थोड शांत झाल्यावर या सामनात कस काम करायच ते विचार करत माप आणी टका कडे वळलो.
हि दोघ तोंड फुगवुन बसली होती" आता तुम्हाला काय झाल ?"मी.
माप" जेप्या कशाला मेहनत करत बसायच्,सगळ चोप्य पस्ते आपल ते आयत मागवु ना बाहेरुन"
"जेप्या,आईक माझ्,आरे पुण्यात आलोत, तर जरा एफसी रोड ला फिरुन येवु. तेवढ्च माझ फ्रस्टेशन कमी होईल."
"ये शान्यांनो,गपचुप काम करा,नायतर तुमच्या दोघांची कंदुरी करुन सगळ्यानां खाऊ घालीन्,चला कामाला लागा"
मुविंचा आजुन पत्या नव्हता.एका कोपर्‍यात आदुबाळ शांत पणे सगळ न्याहाळत बसला होता.त्याच्याकडे गेलो."आदुदादु,किती जेवण बनवावे लागेल जरा विश्लेषन करुन सांगतो का?"त्याने झरकन आलेल्या लोकावर नजर
टाकली आणी फर्रकन विश्लेषण काढल"हे बघ जेपी भाव,हे हे एवढ लागल तरी पाच मानाचे गणपती सागंतो,
ते बघ तिथे वेल्लाभट पुशअप काढत आहे,सुडच्या दोरी उड्या चे दोन सेट झाले आहेत.मजें दोघ पण जोर बेठका
काढुन ताव मारणार.वल्ली आणी माप पण चागंलाच आडवा हात मारतील.ते बघ अनाहिता मंडळ भिंगरीने आणलेले
भरले बटरवड्याचां फन्ना उडवत आहे पण त्यांच्यातील एक जण मानाच्या गणपतीत स्थान मिळवेल."
त्याचे आभार मानुन सूड ला हाक मारली"काय सूड! कसा आहेस?"
"गंप राव र! वशाड मेलो.माझ उड्या मोजण चुकतय"
त्याचा नाद सोडुन दुसरी कडे नजर टाकली.यसवायजी स्वतः ला आरश्यात न्याहाळत बॅटमॅनशी कन्नड मधे कुडकुडत होता.
गाढवाच्या मागे आणी बॅट्याच्या पुढे कधी जायच नसत्,गेल तरी डवचायच नसत.सॉल्लीड लाथ बसु शकते.
स्पा येताना दिसला माझ्याकडे बघुन'ख्खिक' केल आणी गुरुजींकडे गेला,म्हणाला," काय रे पंगतीला तर बोलवलास लाडु कधे देणार आहेस?!!"गुरुजी," आं...दु..दु..पांडु..हाणु... का..तुला...दाडु,,"त्यांचा सामना रंगला.
तेवढ्यात मुवि येताना दिसले.सोबत भाते आणी कंजुस काका होते.
काका"आरे काय हे!कुठे तरी निसर्गाच्या सानिध्यात पंगत भरवायची तर ईथे कुठे शहरात भरवली."
त्यांच्या नांगीवर पाय देण्यात अर्थ नव्हता.मोर्चा मुविकडे वळवला"काय ओ साहेब्,सत्यनारायण तुमचा! राबतोय आमी,
आणी तुम्ही या आरामात"
मुवि" आयला जेप्या,तु आजकाल फार लवकर भडकायला लागलास.तुला लवकरात लवकर बाबाकडे घेऊन जायला
पायजे. घे! थम्सअप घे आणी शांत हो."
"तुमचे बाबा सल्ला देऊन पण गेले आणी तुमला ठावुकच नाही.आणी मी थम्सअप आरोग्याला चांगल नसत म्हणुन
व्हिस्की पण निट घेतो हे तुम्हाला माहीतय की!"
मुवि,"जेप्या व्हिस्कीच्या गोष्टी पंगतीत बोलायच्या नसतात्,तो खयाली पुलाव आपण नंतर पकवु.चल झाल का स्वयपाक
तयार ? झाला आसल्यास बसवतो सगळ्यांना"
मी," झाल सगळ,गुरुजीचीं आणखीन स्विटडिश अजुन तयार नाही."
"अरे स्विटडीश तशी हि शेवटीच द्यायची आहे.चल बसवु सगळ्यानां"
सर्वानां बसवले गेले.गुरुजींनी संकल्प सोडला आणी पंगत चालु झाली.माप आणी टका वाढत होते.मी मुविंसोबत फिरत
आग्रह करत फिरु लागलो.हळुच महिला मंडळाचा कानोसा घेतला.
"बाई बाई,काय मेली दळभद्री पंगत भरवली आहे याने ! .फँटसी कश्याशी खातात कळत का मेल्याला,
बघ याच विंडबन पाडते का नाही मी आता."स्नेहांकीता
"अग भरवली तर भरवली,पण नऊवारीचा आग्रह कशाला ? आता काय नेसता येते का आमाला.शिवुन घ्यावी लागली मला". आनंदिता बोलली."ये जेप्या, आमच बोलण चोरुन आईकतोस काय? पळ ईथुन"माऊ ओरडली.
आता कुणाला तरी खिजवायचा विचार करुन अर्पणाताय ला म्हणालो"काय ओ,! आजकाल तुमचे पण प्रतिसाद उडायले कि,आता काय करायच ?."
अर्पणाताई"अरे हे सगळ डब्बल बॅरेल वाल्यांच आणी पेसाताईच कारस्थान आहे.एकदा देते त्यांना कोल्हापुरी ठसका !मग बसतील ओरडत."
"ये जेप्या,आमच्यात भांडण लावलास तर कान उपटीन,काय समजला"पेसाताई ओरडली.
"हि हि हि ,मला संपादक केल्याशिवाय मी तुम्हा लोकांचा पिच्छा सोडणार नाही"मी बोललो.
"दात उपटीन हसलास तर, ते पण भुल न देता.निघ ईथुन"अजयाताई म्हणाली.
मी तोंड पाडुन निघणात तेवढ्यात आतिवास ताईंच्या ताटात जेवणारी आन्जी म्हणाली' जेप्या दादा,नाराज नाय व्हायच.
मी मोठी व्ह्यपत्तुर तु सन्पादक होशील.हि बघ माझी लाल रिबिन.आज मला कुनी चा कापी दिल नाय.बानविटा दिल." शतशब्द बोलल्याशिवाय न थांबणारी पोरगी २५ शब्दात थांबलेली पाहुन धक्का बसला. आजुन धक्के बाकी होते.
श्रीगुरुजी,क्लिंटन आणी सुहास..मांडीला माडींला लावुन जेवत होते.
"आमचा नाना असा कसा अचानक गेला.मी त्याला नान्या,नेफळ्या काही बोललो तरी मला मात्र आदरानेच बोलायचा".
श्रिगुरुजी सोग्याने डोळे पुसत म्हणाले.
"नाना सारखे लोक अमर आसतात श्रिगुरुजी.सांभाळा स्वतःला." क्लिंटन ने त्याचं सांत्वन केल.
"काय रे जेप्या,काही खाल्लास का?" सुहास..ने विचारल."नाही ना सुहास..भाऊ तुमच आटपल्यावर आमच"मी.
"हुं..... घे मिसळीच पार्सल.गुपचुप खावुन ये." सुहास..
पार्सल घेऊन पुढे सरकलो,तेवढ्यात जॅक डॅनीयल ने हाक मारली.त्याच्या मांडीवर एक धामीण पहुडली होती.
म्हणाला"माझ्या धामीणीला उंदीर कबाब पायजेत्,ती बाकी काय खात नाय."
मी"पण आता उंदर कुठुन आनु?".
जेडी,"ते मला माहीत नाही,नाही दिल्यास,हिला तुझ्या अंगावर टाकुन फोटो काढीन आणी सगळ्यांना दाखवीन."
त्याच्या धमकींने घाबरलो आसतानाच गवी बोलले," हे घे दोन उंदीर.मला माहित होत अस काहीतरी होईल.आमच्या गव्हाणी घुबडाला चिकन देऊन त्याबदल्यात आणलेत."
ते उंदर घेऊन पुढे निघालो.दोन डॉ़क्टर शेजारी शेजारी बसले होते.
सुबोध खरे,"मी नौदलात आसताना विक्रांतवर पण अशीच पंगत भरली होती.त्याचा किस्सा कधी तरी लिहायचा विचार आहे,एक्का साहेब..तुमची पण जॉर्डन सफर संपली आहे आता कुठल्या सफरीवर नेणार आहात आम्हाला?."
इस्पीकचा एक्का साहेब,"मी आता जरा वेगळी सफर लिहीणार आहे,आदीमानवा पासुन आजपर्यंत पंगतीचा प्रवास कसा
झाला हे पुढच्या लेखमालेत असेल्,त्यासाठी माझ संशोधन चालु आहे."
"मला हि मराठी विकीपीडीया साठी माहीती हवी आहे,इंग्रजी डिनरचा उल्लेख आहे पण मराठीत पंगतीचा काहीच उल्लेख नाही
अर्थात तुमची माहीती प्रातधिकार मुक्त आसेल असे गृहीत धरतो."माहीतगार मधेच डोकावले.
तेवढयात मुविनीं हाक मारली.तिकडे गेलो,म्हणाले," आरे आपोष्णी द्यायची वेळ आली,गुरुजींची स्विट डिश झाली.?"
"झाल...झाल. अहो चांगला पदार्थ बनायला वेळ लागतो."गुरुजी.
पदार्थ ताटात जाऊ लागला आणी पंगतीचा शेवट जवळ आल्याच जाणवल.
गुरुजी वाढत जाऊ लागले.बॅट्यापर्यंत पोहचले.बॅट्या आधीच समोर बसुन स्मित( का कुत्सित?) हास्य करणार्‍या पिलीयन रायडर मुळे अस्वस्थ होता.पदार्थ ताटात पडताच त्याचा भडका उडाला.......शिकरण......!!!!
बॅट्या "गुरुजी मला आसल शिक्रणछाप पदार्थ नाही आवडत...माहीत नाही का तुम्हाला......हा मी निघालो ईथुन.."
"बॅट्या...चाललास...माझ्या शुभेच्छा घेऊन जा..." पिलीयन रायडर...
"तुम्ही आधी मोठ्ठे व्हा!!!!" बॅट्या..
"तुम्ही लहान व्हा,"अजया...
"तुम्हाला,पुस्पगुच्च माझ्याकडुन." बॅट्या..
"बॅट्या तुझ लॉजीक गंडलय..." पैसाताय बोलली.
"अंमळ तुमचा लॉजीक हा शब्द गंडलाय..तो कुठुन आला हे आधी सांगा. लज्जा या संस्कृत शब्दावरुन की लाज या मराठी
शब्दातुन..तदुपरी ग्रिकांनी रोमणांवर केलेल्या आक्रमणानंतर लॅटीनच काय झाल बघण जास्त रोचक ठरेल".
"बॅट्या..ग्रिकांनी रोमणांवर जेंव्हा आक्रामण केले तेंव्हा आपले क्षत्रप आनंदाने शिकरण खात होते.याचा उल्लेख सातवाहनकालीन एका शिलालेखात सापडतो.तु पण आनंदाने शिकरण खा."वल्ली मधस्थी करु लागला.
बॅट्याने माझ्याकडे रागाने बघत खाली बसला.यसवायजी सोबत कन्नड मधे कुडकुडु लागला.
माझ्या डोक्याची मंडई झालती.मुवि नि सगळ्यानां शांत केल आणी एकदाची जेवण संपली.
आमची जेवण आटपल गुरुजीनी दिलेल गावरान पान खात मी सगळ्यांचा निरोप घेतला.
गावच्या रस्त्याला लागलो.अचानक दोन बुरखाधारी लोकांनी मला पकडल."आमाला शिकरण खावु घालतो काय,?"एक जण.
दुसरा,"अरे कन्नड बोल त्याला कळत नाय.,,"
एकाने मानगुट पकडुन खाली पाडल,दुसरा माझ्या छाताडावर नाचु लागला....डोळ्यापुढे अंधारी आली ...अरे ...देवा..हे... काय?
"अरे मामा उठ...उठ किती झोपयो...उठ.."खाडकन डोळे उघडले..भाचा छातीवर उड्या मारत होता.
आयला सगळ स्वप्न होत तर...मी जवळचा मोबाईल ऊचलला..हॉटेलात आलो....आणी म्हणालो........
.
.
.
सुप्रभात.
समाप्त.
जेपी's picture
नवीन
You 1 sec ago

मिटवा

http://www.misalpav.com/node/29468 भाग दोन...http://www.misalpav.com/node/29344...भाग एक

वावरइतिहासमुक्तकविडंबनप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

अजया's picture

23 Nov 2014 - 11:43 am | अजया

जेप्या,मेल्या!! भारी लिवलं आहेस.मजा अाली वाचायला =))
रच्याकने,मिपाचं कुलसंमेलन झालं पायजे एकदा.

प्रचेतस's picture

23 Nov 2014 - 12:04 pm | प्रचेतस

=))
अगागागागाग्गागागागागा...

तुफ्फान लिवलंय. फुल्टू धम्माल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Nov 2014 - 12:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं लिहीलंय. पण एका वाक्यात बोळवण करण्यापेक्षा जरा जास्त विस्ताराने चिमटे काढले असते तर अजून मजा आली असती :)

टवाळ कार्टा's picture

23 Nov 2014 - 12:10 pm | टवाळ कार्टा

भ...न्ना...ट्ट \m/

खटपट्या's picture

23 Nov 2014 - 12:41 pm | खटपट्या

हाण तेच्या आयला !!

विवेकपटाईत's picture

23 Nov 2014 - 12:44 pm | विवेकपटाईत

असल्या पंगतीचा अनुभव करायला एकदा तरी पुण्याला यावे लागेल.....

पैसा's picture

23 Nov 2014 - 1:22 pm | पैसा

धम्माल लिहिलंय जेप्या! फुल्ल मार्क्स तुला!!

प्रचेतस's picture

23 Nov 2014 - 2:10 pm | प्रचेतस

बाकी सतीश गावडे कधीही स्वयंपाक करणार नाही. मुलखाचा आळशी आहे लेकाचा. आणि गुर्जी पण गावरान पान देणार नाहीत कधीच. त्यांना बनारस का फुलचंदच लागते म्हणे.

अगायायायायाञायायायायाया =)) =)) =)) =)) =))

धन्य आहेस बे जेपी. _/\_

सुहास झेले's picture

23 Nov 2014 - 2:42 pm | सुहास झेले

तुफान... =)) आता असे आभासी कट्टे भरावयाचे कंत्राट तुलाच ;-) :D

प्यारे१'s picture

23 Nov 2014 - 3:28 pm | प्यारे१

खतराच्च!

कवितानागेश's picture

23 Nov 2014 - 4:04 pm | कवितानागेश

हेहेहे!!!
मस्तच.

आतिवास's picture

23 Nov 2014 - 4:41 pm | आतिवास

मस्त, मजा आली.
'मिपा'चा भरपूर अभ्यास दिसतोय ;-)

त्रिवेणी's picture

23 Nov 2014 - 5:43 pm | त्रिवेणी

आम्हाला नाय बोलवल कट्याला.

किसन शिंदे's picture

23 Nov 2014 - 5:53 pm | किसन शिंदे

हिहिहिहि..मस्त खयाली पुलाव बनवलास रे जेपी. मज्जा आली वाचायला.

मुक्त विहारि's picture

24 Nov 2014 - 12:59 am | मुक्त विहारि

छान झाला पंगतीचा व्रुत्तांत...

आता, खरोखरच एक जोरदार "मिपा संमेलन" भरवलेच पाहिजे.

आनन्दिता's picture

24 Nov 2014 - 5:20 am | आनन्दिता

शिवलेली नऊवारी. =))

धमाल मज्जा आली वाचायला.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Nov 2014 - 6:18 am | अत्रुप्त आत्मा

@गाढवाच्या मागे आणी बॅट्याच्या पुढे कधी जायच नसत्,>> =))))

नाखु's picture

24 Nov 2014 - 9:20 am | नाखु

स्वगतःकसोटीला एक दिवसीय सामना बनवल्याबद्दल निशेढ.

नाखु's picture

24 Nov 2014 - 9:21 am | नाखु

स्वगत : कसोटीला पन्नास षट्कात बसवल्याबद्दल निषेढ!!!

स्पंदना's picture

24 Nov 2014 - 6:38 am | स्पंदना

अश्ब्द झाले आहे!!!

बॅटमॅन's picture

24 Nov 2014 - 1:02 pm | बॅटमॅन

अश्ब्द

म्हणजे काय =))

सूड's picture

24 Nov 2014 - 8:03 am | सूड

(माझा दोरीउड्यांसकट उल्लेख केल्यामुळे मला असं वाटलं की काय देव जाणे) पण हा भाग बर्‍यापैकी जमलाय

सस्नेह's picture

24 Nov 2014 - 9:36 am | सस्नेह

'चिमटे'काढू-मणी जेपी *lol*

जेपी's picture

25 Nov 2014 - 10:10 am | जेपी

सर्वाचें आभार.
जाता जाता= दिवाळीत जुने लेख वाचताना पिडां काकाचीं पंगत दिसली.
त्यांच्या उष्ट्या पत्रावळीत आपल्याजेवता येईल का ते आसा विचार डोक्यात आला आणी लेख लिहिला.
काल पिडां काकानीं पंगत भरवली,आज मी भरवली,उद्या आणखीन कोनी,पिडां किंवा जेपी पंगत भरवेल.
चालु राहु द्या.
पुन्हा एकदा सर्वांचे आभार.