मुळ प्रेरणा :- पिवळा डाबिंस यांचे हे दोन लेख.भाग १ आणी भाग २
डिसक्लेमियरः- १) सदरिल लेखातिल पात्रे जरी खरी असली तरी प्रसंग काल्पनीक आहे. भविष्यात आसे काहि घडल्यास
जबाबदारी माझी नाहि.
२) सर्वानीं हलके घ्यावे. जड घेतल्यास त्याची हि जबाबदारी माझी नाहि.
३) आता बास कि का इथच भाग संपवु..
===================================================================================
दोन दिवसापुर्वी सकाळी झोपेतुन जागा झाल्यावर नेहमीच्या सवयी प्रमाणे जवळाचा मोबाइल उचलला
आणी हॉटेलात सुप्रभात करायला आलो.
हॉटेलात आल्याआल्या "तुम्हाला १ संदेश आला आहे" अशी पाटी दिसली आणी काळजात धस्स ! झाल.
( या व्यनी चा हल्ली मि धसकाच घेतलाय. सारखी भिती वाटते संम चा तंबी देणारा निरोप आला कि
काय)
घाबरत घाबरत व्यनी चेक केला तर मुक्तविहारी सायबांचा होता. हुश्श करुन जरा श्वास घेतला आणी
व्यनी वाचु लागलो.व्यनीचा मजकुर खालील प्रमाणे होता.
मुवि:- जेपी, लवकरच नवमिपाकरानां जेवायला बोलावुन पंगत भरवायचा विचार आहे.
निमंत्रीताच्या यादीत तुझाच नाव पयला टाकला आहे.
तु कट्ट्याला तर येत नाहिस या पंगतिला जरुर हजेरी लाव.
व्यनि वाचुन डोक्यात काय उजेड पडला नाय. पुन्हा हॉटेलात नजर टाकली, मुवि हजर सदस्यात दिसत
होते. चला व्यनि -व्यनि खेळायला हरकत नाहि.आसा विचार करुन मुवि सायबांसोबत व्यनिचा खेळ
चालु केला. या खेळात घडलेला संवाद खाली देत आहे,
जेपी:- सरजी,कसली पंगत ? केंव्हा होणार आहे ? कुठे होणार आहे ? कोणकोण येणार आहे ?
मुवि:- जेपी, आजुन काहि पुर्ण तयारी झाली नाहि.मी आणी पुणेकर अत्रुप्त आत्मा आयोजक आहोत.
आज रात्री माझी अत्रुप्त आत्मा यांच्या सोबत मिटींग आहे तेव्हां सगळ फायनल होईल.
जेपी:- ओके ,सरजी फायनल झाल की कळवा मला. मी नक्की येईन.
एवढा बोलुन बाकीच्या कामाला लागलो तर आणखीन एक व्यनी आला. पुन्हा मुविंचा होता.
मुवि:- जेपी, सर्वाधिक मिपाकर पुणे आणी मुबंईत आहेत.
मुबंईकराचा प्रतिनीधी मी आहे, पुणेकरांचे प्रतिनीधी म्हनुन अआ गुरुजी येत आहेत.
बा़की सर्व तिसर्या जगातील सर्व मीपाकरांचा प्रतिनीधी म्हणुन तु का येत नाहिस
आयोजन मंडळावर.संध्याकाळी व्हि सी द्वारे भेटणार का ?
व्यनी वाचुन मी बसल्या जागी उड्या मारायला चालु केल्या. हुर्रे !! मला संपादक मंडळावर तर
घेत नाहीत , निदान पंगतीच्या आयोजन मंडळावर तर घेत आहेत. संधि का सोडा ?
लगे हात मुविंना होकार कळवला नाही संध्याकाळची वाट पाहु लागलो.
क्रमशः
प्रतिक्रिया
6 Nov 2014 - 10:51 am | माम्लेदारचा पन्खा
ख्या ख्या ख्या....... ;-)
अवांतर- जरा मोठा भाग टाक रे... पुढचं आंदोलन कधी?
6 Nov 2014 - 11:01 am | खटपट्या
चांगलंय !!!
6 Nov 2014 - 11:52 am | मुक्त विहारि
आपले तर ठरले होते ना? की नक्की काही झाल्याशिवाय इथे काही टाकायचे नाही म्हणून...
कुणाची दात-दुखी ऐनवेळी सुरु होईल, ते सांगता येत नाही.
असो,
संध्याकाळी भेटूच...
6 Nov 2014 - 12:38 pm | जेपी
एक सुचना- पिडां काकाच्यां लेखाचा क्रम चुकला आहे.
भाग एक हा भाग दोन आहे.आणी भाग दोन हा भाग एक आहे.
संमने जमल्यास सुधारणा करावी
6 Nov 2014 - 12:53 pm | अजया
जेपी भौना वाटदिवसाच्या शुबेच्चा अाणि पुस्प्गुच्च!!
=))
6 Nov 2014 - 2:08 pm | टवाळ कार्टा
:(
6 Nov 2014 - 2:09 pm | टवाळ कार्टा
*** म्हणजे "संपादकिय" ;)
6 Nov 2014 - 5:45 pm | स्वप्नज
टकाजी, संपादकीय म्हणायचे असेल तर ५ * लिहा ***** असे.
*** म्हणजे ३ अक्षरी शब्द वाटतो.
बादवे *** मधला तिसरा * दीर्घ ना हो....
6 Nov 2014 - 6:25 pm | टवाळ कार्टा
भावनाओंको समझो ;)
6 Nov 2014 - 12:59 pm | गवि
तंबी वापरा धागा लांबवा... आय मीन धागा वाचवा..
6 Nov 2014 - 1:33 pm | जेपी
हा काय प्रकार आहे.
पुडच्या भागात वाट लावु का संमची *wink*
6 Nov 2014 - 2:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>> पुडच्या भागात वाट लावु का संमची.
जेपी इकडे तिकडे वेळ घालवन्यापेक्षा.
चांगलं काहीतरी लिहा. पाहा कसं जमतं ते !
-दिलीप बिरुटे.
6 Nov 2014 - 3:51 pm | मुक्त विहारि
व्य.नि. करतो...
6 Nov 2014 - 5:50 pm | कंजूस
कालमानाप्रमाणे मेन्यूत पंजाबी 'ढी'श आणि लस्सीऐवजी उंधियो आणि छाश आहे का ?पोटाची वाट लागणार नाही मुखवास असेल.
6 Nov 2014 - 6:33 pm | जेपी
कंजूस काका -मेन्यु आसला जबर्या हाय ना की भल्याभल्याला घाम फुटल =))
6 Nov 2014 - 7:02 pm | कंजूस
कुटं कुटं भेटायचं ,कुणाकुणाची वाट लावायची, काही गुप्त फावण्यांना व्यनी०कुरून बुलवून फिटा बांधणार, घाम-फुटल-छाप-जबर्या-मेन्यु बी हाय, फारच गूढ हुत चाललंया फंगत-परकरण. यिक इचारतो. मुंब्हई -फुणेकर यिणार म्हंजी कार्ल्याला हाय का? नवमिपाकऱ्हांची सोभा न्हाई ना करणार मुरल्याली लोकं? अगुदर तारीक कळीवल्यास तय्यारी कुरून ठिवतो.{आपला नम्र की काय कदी लिवतात ते }किरपाभिलाषी कंजूस.
6 Nov 2014 - 7:24 pm | जेपी
काका वाचताना बी घाम फुटला =))
6 Nov 2014 - 8:17 pm | कंजूस
आमची ऱ्हास ऱ्हुच्चिक.हाकडि धेखा लेकिन न्हांगी न्हाई धेखा ।या सहयादऱ्हीच्या धुंड्या धुंड्याखाली असतोया हाम्ही .घाम फुटला तर पंखा हाई, न्हांगी ल्हागली तर हिलिकोपटरच बुलवावं ल्हागतंया .
6 Nov 2014 - 10:32 pm | अत्रुप्त आत्मा
@ जेपी:- सरजी,कसली पंगत ? केंव्हा होणार आहे ? कुठे होणार आहे ? कोणकोण येणार आहे ?
मुवि:- जेपी, आजुन काहि पुर्ण तयारी झाली नाहि.मी आणी पुणेकर अत्रुप्त आत्मा आयोजक आहोत.
आज रात्री माझी अत्रुप्त आत्मा यांच्या सोबत (प्लँचेट नावाच्या प्लॅन चॅटवर) मिटींग आहे >>> असं पायजे! :D
आंम्ही प्लँचेटवर(बोलावले तर.. ;) ) भेटतो..!
7 Nov 2014 - 12:02 am | खटपट्या
आता ही भुताट्की खयनं ईली ?? :)
7 Nov 2014 - 12:15 am | सतिश गावडे
अहो ते स्वतःच अत्रुप्त आत्मा आहेत. भुताटकी आणायला त्यांना काही विशेष काही करावे लागत असेल असं वाटत नाही. भुतांना बोलवायचे दोन चार मंत्रही त्यांना माहिती असतील. :)
7 Nov 2014 - 12:48 am | खटपट्या
बा रवळनाथा वाचव रे बाबा !
7 Nov 2014 - 11:03 am | सूड
रवळनाथच काय रजनीकांत इलो तरी तू वाचशील असा वाटत नाय !! ;)
6 Nov 2014 - 11:59 pm | पिवळा डांबिस
चांगलं येतंय, आवडतंय.
भाग अजून थोडे मोठे टाकता येतील तर बघा....
अवांतरः तुम्ही दिलेल्या लिंका वापरून माझेच ते पूर्वीचे दोन भाग आज बर्याच काळानंतर वाचले. मिपावरच्या आता नसलेल्या, असलेल्या आणि असून दुरावलेल्या मित्रांच्या आठवणीने मन खूप सुखावलं! एखाद्या खूप जुन्या अत्तराचा कडवट-गोड वास घेतांना मन सुखावतं, तसंच! तो अनुभव दिल्याबद्दल अनेक धन्यवाद!!
7 Nov 2014 - 3:24 am | स्पंदना
अतिशय सुरेख प्रतिसाद.
बघा जेपी हे अस लिहायच असत, तुमच्या धाग्यातल्या लेखणापेक्षा हा प्रतिसाद अतिशय सुंदर वाटला.
शिका जरा, आणि लिहा असल काहीतरी. नाहीतर एका दिवसात स्टार बनायच्या कल्पनाविश्वात खरोखरचे तारे दिसायचे.
7 Nov 2014 - 10:18 am | जेपी
१)
जेपी भौना वाटदिवसाच्या शुबेच्चा अाणि पुस्प्गुच्च!!
२)
जेपी इकडे तिकडे वेळ घालवन्यापेक्षा.
चांगलं काहीतरी लिहा. पाहा कसं जमतं ते !
-दिलीप बिरुटे.
३) वल्लीदा चा प्रतिसाद काढला गेला.
जरा स्पष्टच बोला की नेमक काय चुकल. आडुन बोलायची सवय नाही , त्यामुळे आडुन बोललेले कळ्त पण नाही.
आणखीन एक.
प्रतिसाद आवडला.
aparna akshay - Fri, 07/11/2014 - 03:24
अतिशय सुरेख प्रतिसाद.
मलाही प्रतिसाद आवडला.
बघा जेपी हे अस लिहायच असत,
हम्म, पिडां काकाला जितका अनुभव आसेल तेव्हढ माझ वय हि नाहि.
तुमच्या धाग्यातल्या लेखणापेक्षा हा प्रतिसाद अतिशय सुंदर वाटला.
बरोबर आहे. पण सगळ्यानां चागंल लिहिता यायला पायजे आस काहि नसत ना.
शिका जरा, आणि लिहा असल काहीतरी.
हम्म प्रयत्न करतो.
नाहीतर एका दिवसात स्टार बनायच्या कल्पनाविश्वात खरोखरचे तारे दिसायचे.
याचा आणी लेखाचा काय सबंध. स्टार लोकांना ईथे लिहायसाठी काय मानधन मिळत का ?
8 Nov 2014 - 12:32 am | स्वप्नज
शेकोटी पेटणार बहुतेक....!!!!
-(गारठलेला)
स्वप्नज
8 Nov 2014 - 7:39 am | जेपी
दुसर्याच्या शेकोटीवर शेकत बसु नये.भडका उडाल्यास पोळण्याचा संभव असतो.
जमल्यास स्वत: शेकोटी पेटवावी पायजे असल्यास लाकड (पक्षी-काड्या) घेऊन येतो.
9 Nov 2014 - 10:19 am | पिवळा डांबिस
उगाचच शेकोट्या पेटवायची जरूर नाही.
जेपींचा हा पहिला भाग आम्हाला आवडला आहे. किंबहुना ते पुढचे भाग कधी टाकतात या प्रतिक्षेत आम्ही आहोत.
बाकी प्रत्येक लेखकाची स्टाईल निरनिराळी असते. अपर्णाने केलेल्या सूचना या कळकळीने केल्यात असं आम्हाला वाटलं (आता कोल्हापूरकरीण असल्याने जरा तिखट थोडं जास्त असायचंच!! ;) त्याला विलाज न्हायी!!)
तेंव्हा जेपी, तुम्ही या प्रतिसादांच्या युद्धात न गुंतता पुढले भाग लवकर टाकावेत हे उत्तम!
प्रतिक्षेत आहे....
9 Nov 2014 - 10:59 am | जेपी
धन्यवाद.
पिडां काका,
जमल तेव्हढ लवकर
लिहीन.
9 Nov 2014 - 10:56 pm | एस
अच्छा असंय होय? मला आधी द्वितिया, तृतिया, चतुर्थी,..., अष्टमी, असली 'नवमी'ची पंगत वाटली! नवमीला पाखरं बोलावलीत की काय अशा धास्तीनेच धागा उघडला! ;-)