ताई दीर तुझा गं वेडा

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
6 Aug 2014 - 9:43 am

वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट २०१४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते.

असा चित्रपट आपण मराठीतही करायचा हे आम्ही त्याच वेळी ठरवले होते. त्याच्या आधिच, म्हणजे साधारण १९९४ सालच्या आधिच आम्ही एक गाणे लिहिले होते. ते आमच्या आगामी चित्रपटासाठी योग्य आहे असे आम्हाला वाटले. आज आम्ही ते रसिकांच्या चरणी अर्पण करत आहोत.

तरी सुध्दा एक खुलासा करावासा वाटतो. ही कविता संपूर्ण पणे स्वतंत्र आहे आणि तीचा इतर कोणत्याही मराठी किंवा हिंदि किंवा इतर कोणत्याही भाषेत प्रकाशित झालेल्या कवितेशी कोणताही संबंध नाही. जर असा संबंध आहे असे कोणाला वाटले तर तो केवळ योगायोग आहे असे समजून तो विषय तिकडेच सोडून द्यावा व कवितेचा आनंद लुटावा.

मोठ्या वहिनीच्या बहिणी बरोबर सगळ्या होतकरु तरुणांना जवळीक साधायची असते. अनेक हिंदी सिनेमातुन झालेल्या संस्कारातून निर्माण झालेली ही परंपरा आहे. अशाच एका संस्कारी कुटूंबातील एका तरुणीचे मनोगत या कवितेत मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. त्या नंतर शेवटच्या काही कडव्यांमधे एका संस्कारक्षम व परंपरा जपणार्‍या होतकरु तरुणाचे मनोगत आहे. आशा आहे ही कविता तुम्हाला नक्की आवडेल.

ती.......

ताई दीर तुझा गं वेडा, -२

बाई गं, मुलींना मारतो खडा

मोठा याच्या खोड्यांचा पाढा,

बाई गं, मुलींना मारतो खडा ||धृ||

ल ल्ल ला लै लै लै लै ला ल ला -२

चिंचा आणायाला, मी पाठवला त्याला ,

खुळ्या सारखा खजुर घेउन तो आला

डचमळले मला, तर वाटून काळाजी,

कलिंगड आणले, त्याने लिंबा ऐवजी

वेडा आहे बाई तो थोडा, -२

बाई गं, मुलींना मारतो खडा ||१||

मी म्हणाले त्याला, आण थोडेसे ताक,

बावळट घेउन आला, गं साखरेचा पाक,

अणाया धाडले, मी अंबट काही,

बाजारातुन घेउन, तो आला मिठाई,

ओय ओय ओय ओय

बनतो येडा खाउन तो पेढा,

बाई गं, मुलींना मारतो खडा ||२||

तो.....

वहिनी तुझ्या बहिणीस नमस्कार,

सध्याचे, मुलांचे दिवस बेकार

देवा काही कर रे चमत्कार,

सध्याचे, मुलांचे दिवस बेकार ||ध्रु||

राप पा, तुरु तुरु तुरु तुरु ता ररा -२

निर्देश मी आपले, नाहि हो पाळले,

क्षमस्व मला, मर्म नाही समजले

शासन जे मिळेल, त्याचा स्विकार होईल ,

दुविधा या मनाची, कशी दुर होइल?

होईल केव्हा मला सा़क्षात्कार,

सध्याचे, मुलांचे दिवस बेकार,||३||

----(फुटकळ सुपारीबाज कवी) पैजारबुवा,----

अभंगआरोग्यदायी पाककृतीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडगोवाभूछत्रीमार्गदर्शनवाङ्मयशेतीश्लोकसंस्कृतीइतिहासशब्दक्रीडाऔषधोपचारकृष्णमुर्तीचित्रपट

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Aug 2014 - 9:45 am | ज्ञानोबाचे पैजार

वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट २०१४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते.

च्या ऐवजी

वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट १९९४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते.

असे वाचावे

पैजारबुवा,

कविता१९७८'s picture

6 Aug 2014 - 9:47 am | कविता१९७८

मराठी भाषांतर आवडलं

मृगनयनी's picture

6 Aug 2014 - 10:30 am | मृगनयनी

निर्देश मी आपले, नाहि हो पाळले,

क्षमस्व मला, मर्म नाही समजले

शासन जे मिळेल, त्याचा स्विकार होईल ,

दुविधा या मनाची, कशी दुर होइल?

हाऊ स्वीईईईईईट्ट्ट्ट ट्रान्स्लेशन!!! ... अ‍ॅक्चुअल मूव्हीत.. या (हिन्दी) ओळींवर सलमान'ने दिलेले एक्स्प्रेशन्स......... ला ज वा ब !!! .. कदाचित "तसे" एक्स्प्रेशन्स तो स्वतःही आत्ता देऊ शकणार नाही.... :)
लव यु.. सलमान!!!!! :) :)

यसवायजी's picture

6 Aug 2014 - 9:49 am | यसवायजी

पैजारबुवा _/\_
Lai bhaaree

सुहास..'s picture

6 Aug 2014 - 9:52 am | सुहास..

बुवा पेटलेत ;)

राप पा, तुरु तुरु तुरु तुरु ता ररा -२ >>>

लयच !! =)) =))

psajid's picture

6 Aug 2014 - 10:28 am | psajid

छान भाषांतर !

स्पा's picture

6 Aug 2014 - 10:53 am | स्पा

=))

लईच फुटकळ

हल्ली स्पा शी सहमत असतो. ;)

धन्या's picture

6 Aug 2014 - 11:11 am | धन्या

भावस्पर्शी भावानुवाद !!!

प्रसाद गोडबोले's picture

6 Aug 2014 - 9:53 pm | प्रसाद गोडबोले

ताई दीर तुझा गं वेडा,

ह्यातील 'दीर तुझा वेडा गं' ह्याचा अर्थ 'तुझा दीर वेडा आहे' असा आहे हे समजायला बराच वेळ लागला ...तोवर 'दीर तुझा वेडा आहे' असा अर्थ लागत असल्याने भलताच अनर्थ होत होता *lol*

यसवायजी's picture

6 Aug 2014 - 10:05 pm | यसवायजी

दीर आए.. दुरुस्ताए.

श्रीरंग_जोशी's picture

6 Aug 2014 - 10:38 pm | श्रीरंग_जोशी

छाऊन गेले गुरू.... :-).

रेवती's picture

7 Aug 2014 - 12:45 am | रेवती

हा हा हा. काहीही.

प्यारे१'s picture

7 Aug 2014 - 12:55 am | प्यारे१

का ही ही....

बाकी आमच्या एका मित्रानं 'टवाळ भुंगे हळू हळू गातात' असं 'एका गाण्याचं' भाषांतर केलेलं आठवतंय.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Aug 2014 - 1:04 am | अत्रुप्त आत्मा

ओळीओळोंनी येतय हसू =)) इतकच वाचून मी गप कसा बसू! ;)
तस्मात .. अजून येऊ द्या! *biggrin*

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

7 Aug 2014 - 5:10 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

क्या बात क्या बात.. लईच भारी...

बाकी

----(फुटकळ सुपारीबाज कवी) पैजारबुवा,----

हि स्वाक्षरी वाचून डॉले पाणावले...

तिमा's picture

7 Aug 2014 - 6:41 pm | तिमा

हेडिंग वाचून लीलाधराची कविता असेल असे वाटले होते. म्हणजे, साय आणि तत्सम काहीतरी वाचायला मिळेल असे वाटले होते. पण पैजारबुवांची कविता आहे म्हटल्यावर धागा उघडलाच.
ओरिजिनल गाणे पाठ नसल्याने पहिल्या वाचनात भाषांतर समजले नाही. स्तुत्य प्रयत्न!

हेडिंग वाचून लीलाधराची कविता असेल असे वाटले होते. म्हणजे, साय आणि तत्सम काहीतरी वाचायला मिळेल असे वाटले होते.

लीलाधर यांच्यासारख्या महान कवीचे साहित्यिक मुल्यमापन त्यांच्या केवळ साय या काव्यावरुन "तत्सम काहीतरी" असे करणे म्हणजे शाहीर दादा कोंडकेंचे "अंजनीच्या सुता" हे गाणं ऐकून शाहीर केवळ भक्तीगीते लिहित असत असे म्हणण्यासारखे आहे.

आपण लीलाधर यांच्या फळा आणि एक बिचारे आण्णा या सामाजिक आशयाने ओतप्रोत भरलेल्या कविता जरुर वाचाव्यात.

तिमा's picture

11 Aug 2014 - 12:48 pm | तिमा

तसं नव्हे हो धनाजीराव! लीलाधराची योग्यता आम्ही काय जाणत नाही ? पण दीर म्हटला की साय कविता आठवते, इतकी ती पावरबाज आहे. त्यांच्या इतर कवितांइतकीच 'साय' ही कविता आम्हाला आवडली होती.

>> पण दीर म्हटला की साय कविता आठवते, इतकी ती पावरबाज आहे.
हे अगदी एकशे एक टक्के खरे आहे. :)

एकेकाळी आम्ही केलेला असा एक भावानुवाद आठवला.
हरवला हरवला चंद्र, मोकळं आकाश
डोळ्यात सारी रात्र जाईल, तुलाही कश्शी झोप येईल

>>डोळ्यात सारी रात्र जाईल
आजवर डोळ्यात बोट जातं एवढंच माहित होतं.

आजवर डोळ्यात बोट जातं एवढंच माहित होतं.

ते कवी आहेत. जे न देखे रवी, ते देखे कवी.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Aug 2014 - 2:29 pm | निनाद मुक्काम प...

लय भारी