नमस्कार!
लोकांना पैसे खर्च न करता युनिकोड मध्ये टाईप करता यायलाच हवे ह्या निकषावर मी गमभन चकटफु केले त्याला आता जवळपास नऊ वर्षं होत आली. आज हॅन्डहेल्ड डिव्हाइसेस आलेली असताना - गमभन चे तंत्र कालबाह्य होईल हे नक्की आहे. Physical किबोर्ड नसल्याने त्याला येणार्या मर्यादाच नाहीत त्यामुळे हे बदल स्वाभाविक आहेत. पण ह्या सर्वाचा विचार करता एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे मोबाईल किंवा तत्सम डिव्हाइसेसच्या लहान स्क्रीन आणि सारखे scroll करावे लागताना होणारा त्रास. ह्या नादात वाचनावरही (आणि बर्याच प्रमाणात लिखाणावरही) ह्या आकाराच्या मर्यादा पडतात असे वाटलिखाणावरही)च लेखन श्राव्य माध्यमातही नेण्याचे मनात आले आणि त्यासाठी गमभन.ऑर्ग हा प्रकल्य हाती घेतला.
त्याचा पहिला टप्पा म्हणून gamabhana.org इथे ऑनलाईन मराठी लेखकांचे/लेखिकांची निवडक लेख श्राव्य माध्यमात आणण्याचे प्रयत्न सुरू करतो आहोत. ह्यावेळी माझ्यासोबत माझा समविचारी मित्र प्रसन्न हाही आहे. ह्या प्रकल्पाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे
१) ब्लॉग, फेसबुक आणि विविध मराठी संस्थळांवर लेखन करणार्या सर्वांसाठी हे व्यासपीठ खुले आहे.
२) ज्यांना आपल्या लेखाचे Recording करावयाची इच्छा असेल त्यांनी submit @ gamabhana . org यावर इमेल पाठवून लेख, त्याचा संदर्भ/दुवा, पूर्वप्रसिद्धीचे संदर्भ/दुवे , संपर्क क्र. पाठवावे.
३) Recording not only includes vocal performance but also background scores and special sound effects supporting the content.
४) ज्यांना स्वतःच्या आवाजात ध्वनिमुद्रण करायचे आहे त्यांनी साधारण ३० सेकंदांचे ध्वनिमुद्रण चाचणीकरता इमेल सोबत पाठवावे. पत्ता, वेळ त्यानंतर ठरवले जाईल.
५) लेखाचे स्वमित्त्व हक्क लेखक/लेखिकेचेच असतील. ध्वनिमुद्रणात तसा उल्लेख येईल. परंतु ध्वनिमुद्रितांचे अधिकार गमभन.ऑर्ग कडे राहतील. ( Terms of services would be revised and updated by end of May 2014)
६) हा सर्व प्रपंच चकटफु आहे!
*टीपः लेखक/लेखिकेस स्वतःच्या आवाजात मुद्रण करायचे असल्यास मुंबई/पुणे येथे येण्या जाण्याचा स्वतःचा खर्च आणि तीन माणसांकरता एकवेळ जेवणाचा डबा (स्वत: लेखक/लेखिका, मी आणि प्रसन्न) हा खर्च मात्र करावा लगेल Smile
का?
कारण १: श्राव्य माध्यमात आंतरजालावरचे मराठी साहित्य आले पाहिजे असे एक ठाम कारण आहे. आजघडीला मोबाईलवरून हे साहित्य वाचण्याऐवजी ऐकणे अधिक सोपे , जलद आहे. श्राव्य स्वरूपात वाचना पेक्षा अधिक प्रयोगशीलता आणि सर्जनतेला वाव आहे.
(कारण २: मला आणि माझ्या मित्राला हे करायची आवड, हौस आणि वेळ आहे. )
चकटफु?
गमभन लेखन सुविधा देतानाही लोकांनी हा प्रश्न विचारला होता - फुकट का आणि कसे? Studio Recording with background scores चा खर्च जमेस धरल्यास एखादा ५ मिनिटांचा लेख ध्वनिमुद्रित करणेही बरीच खर्चिक बाब ठरेल. मन असे असताना आम्ही हे चकटफु कसे देऊ शकतो हा प्रश्न पडणे सहाजिक आहे. कारण वरती नमूद केले आहेच. एखाद्या लेखकाला अथवा लेखिकेला हा खर्च करावा लागू नये म्हणून आम्ही ही सोय मोफत देत आहोत. मोफत कसे जमते - ह्याचे उत्तर सवडीने देऊ!
काय काय वगळले जाईलः
ज्या लेखक/लेखिकांचे प्रताधिकार प्रकाशक अथवा इतर कोणाकडे असतील त्यांचे साहित्य, स्वतःचे लेखन आहे असे सप्रमाण न दाखवता आलेले लेखन, सुमार साहित्य, २ मि. पेक्षा कमी अथवा ५ मि. पेक्षा जास्ती वेळ लागेल असे साहित्य, अ-मराठी सहित्य. प्रस्थापित लेखकांच्या साहित्याचे प्रताधिकार प्रकाशन संस्था अथवा त्यांच्या स्वत:कडे किंवा पुढच्या पीढीकडे असल्याने - हे लेखन ध्वनिमुद्रिक करून मोफत उपलब्ध करून देणे शक्य नाही.
प्रकल्पाविषयी:
हा प्रकल्प नुकताच सुरू झाला आहे. त्यामुळे स्थळ, काळ यांचा जम बसवतच Recording Sessions होतील. We do not work with deadlines, we enjoy doing it so we take our own time. सारी मुद्रणे gamabhana.org वर चकटफु उपलब्ध असतील. त्या त्या साहित्यिकाला ध्वनिमुद्रण प्रकाशित करण्यापूर्वी ऐकता येईल. MP3, OGG ध्वनिमुद्रिते डाऊनलोडकरता आणि/अथवा ऐकण्याकरता ठेवली जातील. आपल्या संदर्भासाठी दोन लेखांचे वाचन गमभन.ऑर्ग वर आपल्याला सद्ध्या ऐकता येईल.
अधिक माहितीसाठी info @ gamabhana . org वर संपर्क करावा.
प्रतिक्रिया
19 May 2014 - 10:44 pm | आत्मशून्य
ऑडीओबुक्स हा तसाही अतिशय आवडता प्रकार आहे. प्रकल्पाला शुभेच्छा.
19 May 2014 - 10:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्रशंसनिय प्रकल्प ! हार्दीक शुभेच्छा !!
19 May 2014 - 10:55 pm | प्रीत-मोहर
शुभेच्छा!!!
19 May 2014 - 11:02 pm | मुक्त विहारि
छान...
19 May 2014 - 11:05 pm | आतिवास
प्रकल्पाला शुभेच्छा!
19 May 2014 - 11:07 pm | यशोधरा
शुभेच्छा!
19 May 2014 - 11:21 pm | चौथा कोनाडा
खुप छान उपक्रम ! वाटचालीस शुभेच्छा !
19 May 2014 - 11:41 pm | लॉरी टांगटूंगकर
शुभेच्छा!!!
! लहान मोठी चिन्धी कामे करायला वॉलेन्टीयर हवे असल्यास हाक मारणे.
19 May 2014 - 11:51 pm | कवितानागेश
छान उपक्रम. :)
20 May 2014 - 12:48 am | तुमचा अभिषेक
शुभेच्छा आणि अभिनंदन !
मोफत कसे जमते हा प्रश्न (माझ्या बालबुद्धीला) पडला मात्र खरा..
20 May 2014 - 3:01 pm | विश्वनाथ मेहेंदळे
ध्वनिमुद्रितांचे अधिकार गमभन.ऑर्ग कडे राहतील.
यात उत्तर आहे असे मला वाटते.
20 May 2014 - 6:21 pm | ॐकार
फुकटात म्हणजे पैसे न घेता इतकेच. त्यासाठीचे तंत्र, कौशल्य, कला , वेळ इ . इ. आवड आणि हौस म्हणून करत असल्याने तसेच सर्वांसाठी मोफत ठेवायचे असल्याने Kind is pref. over cash. अधिकाराच्या कक्षेत ही ध्वनिमुद्रणे विकणे किंवा नाव बदलून , काटछाट करून पुनर्संपादित करणे इ.इ. बाबी येतील. We are seeking GPL/LGPL version for such a media content. याव्यतिरिक्त अधिकार लादण्याची इच्छा आणि शक्तीही नाही :)
20 May 2014 - 6:32 am | मदनबाण
प्रकल्पाला हार्दिक शुभेच्छा. :)
20 May 2014 - 6:41 am | विकास
गमभन चे आम्ही पंखे आहोत, त्यामुळे विशेष शुभेच्छा! :)
बाकी रेकॉर्डींग हे आपले आपण करणे सध्याच्या तंत्रज्ञानामुळे शक्य आहे. त्यामुळे विशिष्ठ स्टूडीओत का यायला हवे? (उद्या नाहीतर मला बॉस्टनहून येयचे झाले तर एकावेळ पेक्षा जास्त डबा आणावा लागेल म्हणून विचारत आहे. ;) )
20 May 2014 - 6:11 pm | ॐकार
स्टुडिओ मधे यायची गरज नाही. तुम्ही स्वतः Noiseless recording करून wav file पाठवल्यासही चालेल. आमचा स्टुडिओ नाही. आम्हीही घरबसल्याच रेकॉर्डिंग करतो - फक्त Microphone, Mixer इ. साधने प्रत्येकाकडे उपलब्ध असतातच असे नाही. उत्तम प्रतीचे Vocal Recording पाठवता येणार असेल तर उत्तमच आहे.
20 May 2014 - 6:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ॐकार सेठ उपक्रमाला शुभेच्छा. गमभन फुकट उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही वाचक आपले कायम ऋणी आहोत.
-दिलीप बिरुटे
20 May 2014 - 10:16 am | मित्रहो
सुंदर प्रकल्प असेच उत्तमोत्तम प्रकल्प करीत रहा.
20 May 2014 - 11:32 am | रामदास
माझ्याकडे तयार असलेली पाच मिनीटापेक्षा जास्त अशी मुद्रणे प्रकाशित करता येतील का ? मुद्रणावर माझे अधिकार कायम असतील का ?
20 May 2014 - 6:14 pm | ॐकार
तुमच्याकडे तयारच असतील तर आम्ही कोण हक्क सांगणारे :D . त्यात Background scores, sound effects इ. नको असेल तर ते तुमचेच आहे आणि त्याच अधिकारत आम्ही आनंदात ठेऊ गमभनवर
21 May 2014 - 3:06 am | बहुगुणी
रामदासांनी पाच मिनिटंच काय पाच तासांचं ध्वनिमुद्रण जरी ऐकवलं तर माझ्यासारखे असंख्य श्रोते वाट पाहतील! कृपया कराच, रामदासजी!
'मनकर्णिका' (मराठीतील नवीन कर्णिका") या नावाने असा प्रयत्न मी याआधी मिपावरच लेख लिहून केला होता, ज्यात मिपावर खूप प्रशंसल्या गेलेल्या 'वामनसुत'-लिखित 'स्मृतीगंध' लेखमालिकेचे श्राव्य रुपांतर धनिमुद्रित केलेलं होतं. ते सगळं जिथे एका विनामूल्य सर्व्हर टाकलेलं होतं, तो सर्व्हरच आता गायब झाल्याने, आता उपलब्ध नाही, पण एक भाग सापडला जो खाली देतो आहे
http://www.divshare.com/download/25576646-5c9
असं ध्वनिमुद्रण चालणार असेल तर कळवा, नक्की सहभाग घ्यायला आवडेल.
20 May 2014 - 4:44 pm | अमोल केळकर
शुभेच्छा
संपर्क करावयास आवडेल
अमोल केळकर
20 May 2014 - 6:44 pm | अत्रुप्त आत्मा
20 May 2014 - 8:20 pm | भाते
पुढील वाटचालीकरता शुभेच्छा!
21 May 2014 - 12:56 am | आदूबाळ
एक सुचवू का?
Audio books या प्रकल्पापेक्षा मराठी जालजगताला OCR / handwritten text recognition या प्रकाराची जास्त निकड आहे. ते साध्य झाल्यास मिपा सारख्या संस्थळांवरच्या लेखनाची संख्या exponentially वाढेल.
21 May 2014 - 10:05 pm | इन्दुसुता
शुभेच्छा
24 May 2014 - 8:58 am | नरेंद्र गोळे
वाचन संस्कृतीला, अभिनव, श्राव्य-आयाम प्रदान करणार्या ह्या अलौकिक प्रकल्पास हार्दिक शुभेच्छा!
ह्यात सक्रिय सहभागाची अभिलाषा निर्माण झाली आहे. ती संतृप्त होवो!
24 May 2014 - 11:15 am | पैसा
गमभनसाठी धन्यवाद आणि पुढच्या नवीन सर्वच कल्पना आणि प्रकल्पांसाठी शुभेच्छा!
24 May 2014 - 11:55 am | सुधीर जी
आदुबाळ यांनि सुचवलेले
Audio books या प्रकल्पापेक्षा मराठी जालजगताला OCR / handwritten text recognition
या सुविधेचि खरच फार गरज आहे