कोकणस्थ सिनेमाची थोडक्यात गोष्ट...

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
7 May 2013 - 5:14 pm

गोखले नावाचा बॅंकेतला एक अधिकारी असतो. तो स्वेच्छानिवृत्ती स्वीकारतो. त्याच्या निरोपसमारंभात त्याचे गुणवर्णन चालू आहे. त्याच्या हाताखालचा अधिकारी साहेबांनी आम्हाला अमुक शिकवलं, ढमुक शिकवलं , साहेब मोठ्ठे गुणी, " एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स "हे सगळं दीड मिन्टाच्या भाषणात जाणवेल असं.. वेळ असला तर प्रत्येक गुण दर्शवणारे ब्यांकेतले प्रसंग.. प्रेक्षकांत त्याची बायको. ती शाळेत अर्थातच शिक्षिका असते. " एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स " असतेच कारण तीही कोकणस्थ. वेळ असला तर प्रत्येक गुण दर्शवणारे तिच्या शाळेतले प्रसंग... हल्ली गोखल्यांची पाठ सारखी दुखते. समारंभात त्यांना अचानक पाठदुखीचा ऍटॅक येतो पण ते सावरतात.
समारंभ संपताना आईला मुलाचा फोन येतो. मुलगा परदेशात. बहुधा पश्चिमेला. लंडन. मुलाला ऒर्कुट फ़ेस्बुक समाजसेवा करायची सवय अस्ते. मुलाचं नाव श्याम.श्यामच्या आजोबांचंच नाव त्याला ठेवलेलं. श्यामचे आजोबा कोकणात माध्यमिक शाळेत उपमुख्याध्यापक होऊन निवृत्त. तिकडे त्यांची आंब्याची काही कलमं. तेही कोकणस्थ असल्याने ए लॉअ पील सोस्टे नोनॉ अस्तातच.
मुलगा यांच्या जातीचा फ़ेस्बुक ग्रुप चालवत असतो.हे तो आईला सांगतानाएक फोनवरचा संवाद...
“ जात म्हणू नये. जात शब्द फ़ार जातीय वाटतो श्याम.. समाज म्हणावं.” श्यामची आई.
“पण जातीय म्हणजे काय?”
“ जातीय म्हणजे अश्लील”
“ ओके मॉम, यापुढे समाज म्हणेन ”
असा हा आईचं ऐकणारा श्याम दर महिन्याला काही ज्वलंत विषयांवर प्रत्यक्ष मीटिंगा घेत असतो.“आपण्न्क्कीकुठूनआलो?” या विषयावरच्या मीटिंगला श्याम अर्थातच एका (ए लॉअ पील सोस्टे नोनॉ) मुलीच्या प्रेमात पडतो. “आपणएव्ढेहुशार्कसे?” या विषयावरच्या पुढच्या मीटिंगला तो तिला प्रपोज करतो आणि “ हल्लीआप्ल्यामुलीबाहेर्जातीतलग्नंकाकर्तात?” या ज्वलंत विषयावरच्या मीटिंगमध्ये ती त्याला होकार देते. आता होकार मिळाल्यावर एकूणच श्यामचे समाजाच्या मीटिंगमधले लक्ष उडते. लग्नच वगैरे ठरवल्याने आता या समाजसेवेची आपली गरज संपली हे त्याच्या लक्षात येते. मग तो तिच्याबरोबर माय्देशी परततो.

दरम्यानच्या काळात मुंबईत काही मिशावाले राजकारण राजकारण खेळत असतात. काही प्युअर पोलिटिकल गेम असतात तर काही भेसळीचे पोलिटिकल गेम असतात.तर काय होतं, मध्येच बच्कन दोन रहस्यमय खून होतात .. या खुनांचं खापर की काय ते श्यामवर फुटतं आणि श्यामला अटक होते. ती अर्थातच मिशावाल्या मंडळींची राजकीय खेळी असते. गोखले विविध वकील मंडळी, पोलीस खात्यातली मंडळींकडे संसदीय पद्धतीने प्रयत्न करून पाहतात... अर्ज विनन्त्या करतात पण काहीच होत नाही. अचानक एका पोलीसस्टेशनमध्ये त्यांची पाठ परत दुखायला लागते आणि ते चक्कर येऊन पडतात. मग जोरात झांजा वाजत वाजत...

मध्यंतर

त्यांचा पाठीचा विकार बळावलेला असतो. आणि गोखल्यांना इस्पितळात दाखल व्हायला लागते. तपासणीत असे कळते की गोखल्यांना पाठीचा कणा आहे पण जो आहे तो खूपच मृदू आहे, तकलादू आहे... त्यामुळे तो कणा ताठ राहत नाही. दु:खी गोखल्यांचे त्राण इतके गेलेले असते की मला ऑप्रेशन नको असे ते ओरडत असतात. त्याच वेळी त्यांची पत्नी एक अफलातून उपाय करते.गोखले इस्पितळात असतानाच त्यांची पत्नी टेप रेकॉर्डरवर ती मदरलॅन्डची प्रेयर वाजवते. "नमस्ते सदा.." ची ती लहानपणी ऐकलेली म्हटलेली ट्यून ऐकून गोखले गहिवरतात, आनंदाने नाचू लागतात, पाठीचे दुखणे कुठल्या कुठे पळून जातं. नर्सेस, वॉर्डबॉय, हाउसमन, कन्सल्टंट सारं हॉस्पिटल आनंदी होते, मग काय कदम ताल करत ते आनंदाने ऑप्रेशन थिएटरकडे जातात. . मग गोखल्यांचे त्याच दिवशी ऑप्रेशन होते आणि त्यांच्या पाठीत लाकडी रॉड बसवतात. मग त्यांचा कणा एकदम ताठ होउन जातो. भुलीच्या गुंगीतही त्यांना ती लहानपणची शिस्त आठवते... काय ती शिस्त अन काय ती बौद्धिकं...
मग गोखल्यांना ऑप्रेशनच्या रात्री स्वप्न पडतं, त्यात त्यांचे बाबा आठवतात...शाखेवरती रोज लाठीकाठीचे खेळ शिकलेले आठवतात. मल्लखांब तलवारबाजी, कबड्डी, दोरीवरचा मल्लखांब असले मराठी मर्दानी खेळ दिसायला लागतात. “ताठ कणा हाच बाणा “ हे त्यांचं ब्रीदवाक्य त्यांना आठवतं...

मग ते अचानक उजव्या हाताने छाती पिटत "माज आहे मला माज आहे मला" असे ओरडत उठतात. इस्पितळाचा ड्रेस काढून पांढरा शर्ट आणि खाकी अर्धी विजार चढवतात . डॉक्टर त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात पण तरी गोखले मात्र “ मेलो तरी बेहत्तर पण लढाई माझी आहे” असं सांगतात. मग मागे झान्जा वाजायला लागतात."कोकणस्थ " अशी आरती सुरू होते. मदरलॆंडची प्रेयर घुमायला लागते.. हातात कालच्या सर्जरीतून उरलेला दांडका घेऊन ते धावायला लागलेले पाहून डॉक्टर हबकतात. मागे सारी मराठी असल्याचा माज असलेली जनता एकही मराठी शब्द न बोलता "एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स " अशा घोषणा देत ताठ कण्याने धावू लागते.

मग वाटेत येणारे सारे "अनएड्युकेटेड लॉब्रेकर्स पीसहेटर्स सोशली अन्स्टेबल नॉनसेन्स" गुंड दंडाचा प्रसाद खातात , ताठ कण्याच्या लाथा खातात , , गोखले ताठ कण्याने जोरात भाषण करायला लागतात “ आम्ही भित्रे नाही, आम्ही बुद्धिमान आहोत”... आता हे बौद्धिक घेणार या भीतीने सारे वाईट्ट लोक थरथर कापू लागतात, रडायला लागतात, बनावट साक्षीदार पळून जातात, खर्यात साक्षी दिल्या जातात, मिशावाले गुंड सरळ येतात. मग श्यामला जामीन मिळतो . मग डी एस पी आणि जज साहेब “हाच खरा शूर “ असं म्हणत गोखल्यांचं अभिनन्दन करतात.. मग परत भाषण, “ मी कोकणस्थ आहे पण मी जातीय नाही, मी संघात जायचो पण मी पोलिटिकल नाही, मी रस्त्यात मारामारी करतो पण मी गुंड नाही... “ वगैरे वगैरे ... असे हा आहे पण तो नाही असे भाषण सोळा मिनिटे चालल्यावर “कोकणस्थ” असा जोरात आवाज काढून आरती संपते. सिनेमाही संपतो.

मग नावं येताना ----
श्याम घरी येतो आणि त्याचं लग्न होतं आणि तो पुन्हा जालीय समाजसेवेत बुडून जातो ... त्या वर्षीचा भारतरत्न पुरस्कार गोखल्यांना मिळतो...पुरस्कार स्वीकारायला ते अर्थातच खाकी विजार आणि पांढर्या शर्टात जातात.

मुक्तकविडंबनप्रकटनविचारप्रतिसाद

प्रतिक्रिया

अर्धवट's picture

7 May 2013 - 5:21 pm | अर्धवट

आइग्गं..
हे सगळं खरंच असं आहे का गम्मत म्हणून लिहिलंय..

तुमचा अभिषेक's picture

7 May 2013 - 5:24 pm | तुमचा अभिषेक

मला पण हेच जाणून घ्यायचे आहे... यात गंमत काय अन खरे किती.. हे वाचताना जे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले तंतोतंत तसे तर नसणार एवढे नक्की..

इनिगोय's picture

7 May 2013 - 5:32 pm | इनिगोय

हे कोकणस्थ नावाच्या टॅमिल सिनेमाचं वर्णन आहे असं वाटतंय.

प्यारे१'s picture

7 May 2013 - 6:51 pm | प्यारे१

+९१२

परा ला चेपुवर विचारलेला 'प्रश्ण' पुन्हा विचारतो. ३.५ % तले किती कोकणस्थ? त्यातले किती शिणेमे बघणार? कसा पिच्चर चालणार?
संघात कोकणस्थ असतात का हा पुरवणी प्रश्ण कुणीतरी विचारला होता.

- 'स्व'स्थ प्यारे

तुमचा अभिषेक's picture

7 May 2013 - 8:02 pm | तुमचा अभिषेक

कोकणस्थांवरचा सिनेमा कोकणस्थच बघणार हे गृहीतकच चुकीचे आहे, उत्सुकता नॉनकोकणस्थांनाच आधी खेचून नेईल जसे या धाग्यात होणार आहे..

भडकमकर मास्तर's picture

7 May 2013 - 6:18 pm | भडकमकर मास्तर

डिस्क्लेमर : हे सिनेमाचं परीक्षण नाही..सिमेनेमा रिलीज व्हायचाय.. तो न पाहता , दिग्दर्शकाची इंग्रजी शब्दांनी भरलेली " मराठी माज" मुलाखत बघून लिहिलेली अंदाजे गोष्ट आहे...

पिक्चर पहायचा की नाही, आवडतो की नाही ते आपापले थेटरात जाऊन पाहून ठरवावे :)

हे डिस्क्लेमर लेखाच्या शेवटी टाकायचं की. इथे टाकून काय उपयोग?

भडकमकर मास्तर's picture

7 May 2013 - 6:26 pm | भडकमकर मास्तर

..

जोन's picture

4 Sep 2016 - 11:42 pm | जोन

पित्त फारच जस्त झालेल दिस्तय!!!!

आजच टीव्हीवर ह्या सिनेमाची जाहिरात पाहिलेली आहे. त्यातही असेच कोणी कोकणऽऽस्थऽऽ असे गात होते!

स्पा's picture

7 May 2013 - 5:28 pm | स्पा

काहीच समजलं नाही :(

विसोबा खेचर's picture

7 May 2013 - 5:47 pm | विसोबा खेचर

भडमकरमास्तरांचं नेहमीप्रमाणेच लै भारी लिखाण..! :)

उदय के'सागर's picture

7 May 2013 - 5:49 pm | उदय के'सागर

काहीही!!!

बाळ सप्रे's picture

7 May 2013 - 5:57 pm | बाळ सप्रे

बराच वेळ लागला समजायला. मग सकाळमधल्या चित्रपटांच्या जाहीरातीच पान बघितलं. सचिन खेडेकरचं शाखेच्या गणवेषातल चित्र आठवलं पण चित्रपटाच नाव "कोकणस्थ" आहे हे नीट वाचलं नव्हतं..

तर्री's picture

7 May 2013 - 5:58 pm | तर्री

कोकणस्थ ( स्वा-खर्चाने तिकीट काढून ) सिनेमाला जातात आणि कोकणस्थांच्या गुण अवगुण यांचे चर्वितचर्वण करणारे ही जातात - एकुणात निर्मात्याचा बक्कळ फायदा. कथा यथातथाच दिसतीय !

त्या संघाला मात्र उगा कोकणस्थांच्या दावणीला बांधलाय. संघात परभाषिक ब्राम्हण व मराठा समाजाचे कार्यकर्ते , स्वयंसेवक अधिक आहेत.

परिक्षण कमी आणि चेष्टाच वाटतेय. करा बिंदास. कुणी येत नाही तुमच्या घरावर दगड मारायला किंवा तोडफोड करायला. घ्या झोडून.

बाळ सप्रे's picture

7 May 2013 - 6:10 pm | बाळ सप्रे

ह. घ्या.
चेष्टा असली तरी चित्रपटाची आहे..

विसोबा खेचर's picture

7 May 2013 - 6:12 pm | विसोबा खेचर

कुणी येत नाही तुमच्या घरावर दगड मारायला किंवा तोडफोड करायला. घ्या झोडून.

क्या बात है,
हे मात्र खरं...!

जोन's picture

4 Sep 2016 - 7:58 pm | जोन

आणि घर तर नक्किच़़ ़जाळनार नाहित!!!!!

रेवती's picture

7 May 2013 - 5:59 pm | रेवती

काळ्ळं नाय.

अमित's picture

7 May 2013 - 6:03 pm | अमित

हॉस्पीटलच्या सीनची प्रेरणा मा. मनोजकुमारांच्या सदाबहार 'क्लर्क' वरून घेतल्यासारखी वाटते.

आदूबाळ's picture

7 May 2013 - 7:29 pm | आदूबाळ

अगदी अगदी. मी वाचता वाचता दुसर्‍या खिडकीत तूनळी उघडून तो प्रसंग शोधला सुद्धा!

मृगनयना's picture

7 May 2013 - 7:50 pm | मृगनयना

मलाही हाच सीन आठवलेला. .
बाकी लेख उत्तम . . .

स्पंदना's picture

8 May 2013 - 5:34 am | स्पंदना

हेच हेच म्हणणार होते.
भडकमकर मास्तर ष्टुरी चोरली तुम्ही.

काकाकाकू's picture

7 May 2013 - 6:04 pm | काकाकाकू

झकास आहे!! -

....हातात कालच्या सर्जरीतून उरलेला दांडका घेऊन ते धावायला लागलेले पाहून डॉक्टर हबकतात....

पूर्वी कुठेतरी सुधीर गाडगीळांचा लेख वाचला होता. एका ब्लॉगवर त्याची कॉपी सापडली. तिथली मूळ लिंकच इथे डकवत आहे. त्या ब्लॉगवरील यूआरएल

http://marathijagatratlam.blogspot.in/2010/04/koknastha.html

इति मूळ संस्थळाचा स्पष्ट उल्लेख आणि श्रेयनिर्देश.

सगळंच काही खरं किंवा कोंकणस्थांशी स्पेसिफिक नाही, पण निरीक्षणं मजेशीर आहेत. :)

A

B

मोजूनमापून विनोदी लेख आहे.बाकी काय बोलावे?

श्रीरंग_जोशी's picture

7 May 2013 - 7:00 pm | श्रीरंग_जोशी

सुधीर गाडगीळांचा लेख आवडला.

बाकी मूळ लेखही आवडला पणा भडकमकर मास्तरांचे पूर्वीचे अजरामर लेख अनेकदा वाचले असल्याने यावेळी जरा अपेक्षाभंग झाला.

अवांतर - कर्मधर्मसंयोगाने जाती, पोटजाती याविषयी जुजबीच माहिती आजवर मिळाल्याने कोकणस्थ, देशस्थ व कराडे (की कर्‍हाडे) यापलिकडली नावं ऐकली की गोंधळ होतो जसे सारस्वत, चित्पावन वगैरे. यावर जालावरील सुटसूटीतपणे कोणी समजावून सांगेल का कॄपया? जालावर बरीच माहिती आहे अन क्लिष्टही वाटली.

आदूबाळ's picture

7 May 2013 - 7:33 pm | आदूबाळ

"चहा चाचणी" करा.

चहाच्या कपाला (बर्‍याचदा) रेघ असते. त्या रेघेखाली चहा असेल तर को. बरोब्बर रेघेला टेकला असेल तर क. रेघ ओलांडून बशीत सांडला असेल तर दे. आणि चहाबरोबर खायला पण आलं असेल तर गौ.सा.

श्रीरंग_जोशी's picture

7 May 2013 - 7:39 pm | श्रीरंग_जोशी

धन्यवाद!!

रोचक आहे चाचणी. गौ.सा. हे केवळ 'अक्षता' जाहिरातींमध्येच वाचलय. प्रत्यक्षात कुणी भेटलं असेलही पण ठावूक नाही.

चहाबरोबर खायला देणे हे गौ.सा.चे च लक्षण नाही असे नोंदवू इच्छितो. दे. मध्येही कैकदा हे पाहिले आहे.

चाचणी रोचक, तरीही दे. घरी ताट भरुन अन्न अन मन भरुन माया अनुभवली आहे. तिची गोडी न्यारीच.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 May 2013 - 2:04 am | विश्वनाथ मेहेंदळे

चित्पावन = कोकणस्थ

सारस्वत = सर्वात चलाख जात. ब्राह्मण्य पण टिकवले आणि मांसाहाराचा हक्क पण मिळवला. (हे माझ्या एका मराठा मित्राचे मत). तर ही चलाख जात सर्वसाधारणपणे गोवा, कारवार आणि सिंधुदुर्ग या भागात रहात असे. त्यापूर्वी सरस्वतीच्या किनारी रहात असे. आता कुठेही राहतात, अगदी मुंबई पुणे किंवा अमेरिका वगैरे.

अधिक माहिती हवी असेल तर सांगा, पैसातैंबरोबर मिळून टीम सारस्वत सुरु करेन आणि लेखमाला काढेन.

श्रीरंग_जोशी's picture

8 May 2013 - 7:13 am | श्रीरंग_जोशी

चित्पावन हा शब्द बरेचदा ऐकला पण चित्पावन = कोकणस्थ हे एवढे स्पष्टपणे प्रथमच वाचावयास मिळाले.

द्वारकानाथ संझगिरींच्या सामाजिक भानाची पवित्र जाणीव या लेखाद्वारे सारस्वतांबद्दल चांगली माहिती मिळाली होती.

मिपाच्या धोरणांत बसत असेल तर या विषयावर लिहिले गेल्यास समाधान वाटेल.

पैसा's picture

8 May 2013 - 9:00 am | पैसा

कर सुरू. मी कीबोर्ड घेऊन तैयार हैच्च!

पिलीयन रायडर's picture

8 May 2013 - 12:04 pm | पिलीयन रायडर

मला गाडगीळांचे सगळे मान्य आहे
कोकणस्थ असतात खरे आटोपशीर, वक्तशीर.. घोळ घालणे, पसारा करणे हे त्यंच्या स्वभावातच नाही..
देशस्थांच्या घोळ घालण्याचा मला कधी कधी फार राग येतो.
कोकणस्थ लोक इतरांच्या फंदात पडत नाहीत.. म्हणजे नातेवाईक उगाच घरात जास्त लुड्बुड करत नाहीत असे मला वाटते आणि आवडतेही..
फक्त दिड दिवसाचा गणपती आणि खड्याच्या गौरी हे मात्र मला न झेपणारे आहे.. तिथे मात्र देशस्थीच पसारा आवडतो..!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 May 2013 - 1:26 pm | निनाद मुक्काम प...

तुम्ही विषयांतर करत कोकणस्थ व देशस्थ अशी फुकाची तुलना करत प्रतिसाद लिहिला म्हणूनच बहुदा त्याला पंख लागले.
बात निकलेगी तो बहुत दूर जायेगी.
पेशवाईत न रमणारा देशस्थ

पिलीयन रायडर's picture

8 May 2013 - 1:35 pm | पिलीयन रायडर

आँ??
मी आहे देशस्थ...
मला कोकणस्थ लोकांच्या सवयी आवडतात असं लिहिलं..
बरं दोघातही काही चांगले गुण असतात असंही लिहिलं..
आणि उगच कोकणस्थ लोकांना "पुणेरी" म्हणुन हिणवतात जे मला खटकतं अस लिहिलम..
ह्यात काय फुकाचा वाद??

अवंतरः- प्रतिसाद टाकल्या क्षणी मला वेब पेज एरर आला.. आणि २ मिनिटात परत पाहिलं तर अक्खा प्रतिसाद उडाला!!

संपादक मंडळ's picture

8 May 2013 - 1:50 pm | संपादक मंडळ

तुमचा प्रतिसाद कुणीही उडवला नाही.
तांत्रीक अडचणींमुळे नीट सेव्ह झाला नसावा.

पिलीयन रायडर's picture

8 May 2013 - 2:11 pm | पिलीयन रायडर

हो मला ९९% हेच वाटत होतं की तुम्ही तो उडवला नाही..
पण निनाद ह्यांनी तो वाचला आणि आता दिसत नाही ह्याचं आश्चर्य वाटलं म्हणुन १% डाउट आला!!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 May 2013 - 4:12 pm | निनाद मुक्काम प...

कोणाच्या सवयी आवडतांना त्या आवडतात हे सांगण्यासाठी इतरांना कोपरखळ्या कश्याला मारायच्या ते मला समजत नाही ,
ह्या गाडगीळ महाशय स्वतःच्या लोकांचे कोड कौतुक , वैशिष्ट्ये सांगताना इतरांना कमी लेखून हा लेख एकांगी केला होता.
अनेक देब्रा कम्युनिटी वर ह्याला प्रत्युत्तर देणारे लेख म्हणूनच निर्माण झाले.
त्यात चिंता करीतो विश्वाची म्हणणारे ठोसर व चिंता करीतो खंगलेल्या पोटाशी असे म्हणणारा अंतू बर्वा अशी तुलना केली होती ,
कोकणस्थ समाजात संत का निर्माण करू शकले नाही असेही विचारण्यात आले.

सी के पी समूहाला ब्राह्मण समाजातून बेदखल कोणी केले असे सुद्धा विचारण्यात आले.
मुळात देब्रा व कोब्रा ह्यांची तुलना करायचे प्रयोजनच काय
समाजात तेढ निर्माण होईल असे लिखाण करावेच कशाला
अशीच लोक बिग्रेडी मनोवृत्तीला नकळत खतपाणी घालतात. व कोकणस्थ सिनेमातून
आपली पोळी पिकवून घेण्याचा प्रयत्न करतात.

महाराष्ट्रात इतर जाती नाहीत का
असा मला खरच प्रश्न पडतो.

पिलीयन रायडर's picture

8 May 2013 - 4:23 pm | पिलीयन रायडर

बर जे काही तुम्हाला वाटते ते तुम्ही गाडगीळांना बोला.. मला का सांगताय?
मला त्यांचे मुद्दे पटले.. मी देशस्थ असुनही.. कारण ते गुण दिसतात जागोजागी.. आता प्रत्येक वाक्यावर उत्तर असतच की हो.. त्यामुळे फेसबुक वर तसे लिहिल्या गेले ह्यात आश्चर्य ते काय? कोकणस्थांमध्ये दुर्गुण नाहितच असं कोण म्हणतय?
माझ्या प्रतिसादात तुम्हाला फुकाचा वाद कुठे दिसला ते सांगा..
मी जे म्हणलच नाही ते तुम्हाला वाटत असण्याची दाट शक्यता आहे..

आणि महाराष्ट्रात इतर जाती आहेत की नाहीत ह्याचा उहापोह करण्यात मला स्वारस्य नाही..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 May 2013 - 4:53 pm | निनाद मुक्काम प...

@मला का सांगताय?
त्यांच्या लेखाचा संधर्भ घेऊन तुम्ही येथे अवांतर केले
तुमच्या प्रतिसादात देब्रा व कोब्रा ह्यांची तुलना पहिली म्हणून खरडले.
म्हणून तुमचा उल्लेख केला.

पिलीयन रायडर's picture

8 May 2013 - 5:13 pm | पिलीयन रायडर

दादा..
इथे सी.के.पि.. त्यांच्या सुंदर /खडुस मुली पासुन ते मनोजकुमारचा क्लर्क पर्यंत गप्पा चालु आहेत.. त्या अवांतराबद्दल पण बोला ना..
आणि तुलना ना।इच केली.. कारण तुलनेमध्ये आपन एक गोष्ट दुसरिपेक्षा वरचढ आहे असे आपल्याला सुचवायचे अस्ते.. मी असं काहीही केलेलं नाहीये..

असो.. एक तर दोन देशस्थ कोकणस्था वरुन वाद घालत आहेत हेच फार ऑड आहे..
आणि इत्क्या फाल्तु मुद्द्यावर लिहीत बसायचा टंकाळा आल्याने मी पुढे लिहीनच ह्याची शश्वति नाही ...त्यामुळे पुरे आता...

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 May 2013 - 5:15 pm | निनाद मुक्काम प...

मला जे खटकले त्यावर मी खरडले
इतकेच

कोणाच्या सवयी आवडतांना त्या आवडतात हे सांगण्यासाठी इतरांना कोपरखळ्या कश्याला मारायच्या ते मला समजत नाही ,

हेच म्हणतो. याचमुळे गाडगिळांचा लेख गंडला आहे.

"राशीचक्र" मधे कसे लोकांचे नमुने वर्णिले आहेत. ते ऐकताना हसू येतं. त्या त्या नमुनाप्रकाराचा राशीशी जोडलेला संबंध अगदीच रँडम असतो. त्यात खूप जनरलायझेशन असतं. सर्वत्र दिसणार्‍या लक्षणसमूहांचे ते केवळ एकत्रीकरण आहे आणि "अरे.. पाहिलाय मीही असला मनुष्य माझ्या आजुबाजूला" ही ओळख पटते.

तितकीच त्यातली गंमत. गाडगीळांच्या लेखात कोंकणस्थांचे म्हणून दिलेले गुण अनेक अ-कोंकणस्थात बर्‍याच जास्त प्रमाणात पाहिलेले आहेत. याहीपुढे जाऊन असं म्हणावंसं वाटतं की हा जो काही तथाकथित शिस्तशीरपणा, टाईट लिप प्रवृत्ती, सगळीकडे थोडक्यात अन आटोपशीर, मोजून मापून असणं, सगळीकडे नियमित असणं, वेंधळेपणा नसणं अशी लक्षणं मनुष्यप्राण्याची उत्तम लक्षणं आहेत यावरच माझा विश्वास नाही.

कशाला हवा तो इतका टोकदार पर्फेक्शनिस्ट अप्रोच.. असू दे घर जरा पसरलेलं.. जाऊदे लोणच्याचा ओघळ जरा मिठात.. सांडू दे चहा बशीत.. पिऊ की फुर्र करुन.. थांबू दे की पंगत कोणा आत्याबाईंचा येण्यासाठी.. कशाला उरकून घ्यायचं?

असू दे की जरा ढिसाळपणा आयुष्यात.. निवांत मजेत सुशेगाद जगावं... त्यालाच तर मनुष्य म्हणायचं..

राशीचक्र" मधे कसे लोकांचे नमुने वर्णिले आहेत. ते ऐकताना हसू येतं. त्या त्या नमुनाप्रकाराचा राशीशी जोडलेला संबंध अगदीच रँडम असतो. त्यात खूप जनरलायझेशन असतं. सर्वत्र दिसणार्‍या लक्षणसमूहांचे ते केवळ एकत्रीकरण आहे आणि "अरे.. पाहिलाय मीही असला मनुष्य माझ्या आजुबाजूला" ही ओळख पटते.

तितकीच त्यातली गंमत.

एकदम सहमत.

कशाला हवा तो इतका टोकदार पर्फेक्शनिस्ट अप्रोच.. असू दे घर जरा पसरलेलं.. जाऊदे लोणच्याचा ओघळ जरा मिठात.. सांडू दे चहा बशीत.. पिऊ की फुर्र करुन.. थांबू दे की पंगत कोणा आत्याबाईंचा येण्यासाठी.. कशाला उरकून घ्यायचं?

असू दे की जरा ढिसाळपणा आयुष्यात.. निवांत मजेत सुशेगाद जगावं... त्यालाच तर मनुष्य म्हणायचं..

बाकी प्रतिसादही उत्तमच, पण हा पोर्शन म्हंजे खास गविटच :) याबद्दल एक जोर्दार देशस्थी दाद दिल्या गेली आहे तुम्हाला ;)

पिलीयन रायडर's picture

8 May 2013 - 5:05 pm | पिलीयन रायडर

हो मी पण १०००० वेळा सहमत..
थोडा ऐसपैसपणा आवडतोच आपल्यला.. रक्तातच आहे ना..
पण फक्त काही टिपीकल कोकणस्थी गोष्टी पण मस्त असतात..
ते नारळ बिरळ खवुन घालतात सगळ्यात.. फारच मस्त..!!
आणि त्यांच्यावर काही बाबतीत विश्वास टाकता येतो.. जेव्हा ४ म्हणतील तेव्हा ४ वाजताच येतील.. सांगितील तेवढेच येतिल.. आनि सुचना पण नीट.. "आम्ही ४ ला दोघे जण येत आहोत, जेवाय्ला थांबणार नाही"..
हेच आम्च्या घरात " येतोय संध्याकाळी" असा (नशीब) फोन (तरि) करतात!! किती, कोण, कधी, कशाला ह्याच काही उत्तर नसतं.. पण तरि आपलीच माणसं आहेत.. जास्त आली एक्दम तरी चटाचटा मदत पण करतील!!

बॅटमॅन's picture

8 May 2013 - 5:07 pm | बॅटमॅन

:) रैट्ट यू आर.

पैसा's picture

8 May 2013 - 5:32 pm | पैसा

एक वाक्य वाचलं होतं.

कोकणस्थांकडे किती आणि देशस्थांकडे कधी जेवायला मिळेल याचा भरवसा नाही!

पळा!!!

सूड's picture

8 May 2013 - 5:37 pm | सूड

=)) =))

बॅटमॅन's picture

8 May 2013 - 5:48 pm | बॅटमॅन

हॅ हॅ हॅ.

असल्या खरवडींना आम्ही दाद देत नाही.

-श्रेयअव्हेर: बाजीप्रभू फ्रॉम पावनखिंड.

बाळ सप्रे's picture

8 May 2013 - 5:07 pm | बाळ सप्रे

तितकीच त्यातली गंमत

सहमत..

परंतु उपाध्येंचे आजकालचे टीव्हीवरील कार्यक्रम पाहता "तेवढी गंमत" सोडून आजकाल फक्त राशींचीच कास धरून अक्षरशः बुवाबा़जी केल्यासारखी वाटते..

नशीब गाडगीळांनी काही ह्यालेखापुढे आणखी कोकणस्थांची री नाही ओढली .. तेवढीच गंमत राखली..

बाळ सप्रे's picture

8 May 2013 - 1:31 pm | बाळ सप्रे

पण निरीक्षणं मजेशीर आहेत

एवढंच खर !!

सुधीर मुतालीक's picture

7 May 2013 - 6:44 pm | सुधीर मुतालीक

लिखाण भन्नाट !

कारण चित्रपट न बघता केवळ दिग्दर्शकाची इंग्रजी शब्दांनी भरलेली "मराठी माज" मुलाखत बघूनच आपण आपल्या कल्पनाशक्तिचा विस्तार केलाय म्हणजे दाद तर द्यावीच... पण म्हणुनच त्याची निखळताही हरवली आहे व टारगेटेड झालय.

असो यापुढे पहिल्यांदा विडंबन व नंतर मुख्य धागा प्रकाशित व्हायचाही पायंडा पडल्यास त्याला जबाबदार संस्थळ असेल.

तिमा's picture

7 May 2013 - 9:03 pm | तिमा

मास्तरांनी लिहिलेली गोष्ट जर खरी असेल तर, हा चित्रपट निव्वळ कोकणस्थांची चेष्टा करण्यासाठीच काढला आहे असे वाटते. कोकणस्थांचे जे गुण-अवगुण आहेत ते सार्‍यांना माहिती आहेत. पण ते अधोरेखित करुन, त्यांना मुद्दामहून प्रकाशझोतात आणण्याचे काम गेली काही वर्षे हे नाटक-सिनेमा व सिरियलवाले करत आहेत. मग ते अत्यंत कृत्रिम सानुनासिक संवाद, त्या काळ्या टोप्या, त्या काळ्याभोर मिशा, ती लाल आलवणे,यांचा रतीब घातला जातो. बाकीच्यांना काय, आयतेच 'तोंडीलावणे' मिळते. ब्रिगेडवाल्यांचे लक्ष जाऊन, आपोआपच काडी टाकली जाते. हे सगळे अगदी पद्धतशीर चालू आहे असे वाटते. आम्हाला फक्त शांतपणे जगू द्या, एवढीच आमची किमान अपेक्षा आहे.
- एक स्वाभिमानी कोकणस्थ, तिमा.

मुक्त विहारि's picture

7 May 2013 - 9:21 pm | मुक्त विहारि

सोडून द्या...

श्रीरंग_जोशी's picture

7 May 2013 - 9:33 pm | श्रीरंग_जोशी

हेच म्हणतो.

वर माझ्या प्रतिसादामुळे चर्चा किंचीत नको त्या दिशेला वळत आहे त्याबद्दल क्षमस्व.

माझ्या सुदैवाने रोजच्या व्यवहारात जात व धर्माचा विचारही न करण्याच्या परिस्थितीत व अनेक जातिधर्मांच्या शेजार्‍यांच्या व मित्रंडळींच्या सहवासात मी लहानाचा मोठा झाल्याने अशा विचारांपासून नेहमीच दूर राहिलोय.

मुक्त विहारि's picture

7 May 2013 - 9:39 pm | मुक्त विहारि

जाती बाबतीत ठीक आहे पण धर्मा बद्दल म्हणाल तर माझे अनुभव फार वाईट आहेत..

तिमांच्या पूर्ण प्रतिसादाशी सहमत. विशेषतः कृत्रिम सानुनासिक संवाद सर्वांत जास्त डोक्यात जातात.

बाकी, देशस्थांनाही अंमळ हायलाईट करावे असे कधी कधी वाटते. ब्राह्मण म्हटले की कोकणस्थ हेच डिफॉल्ट क्यारेक्टर घेणे हा अतिशय तर्कदुष्ट प्रकार आहे. त्या निमित्ताने बाकीच्या पोटजाती किमान अस्तित्वात आहेत इतके कळाले तरी लै झाले. असो.

-एक स्वाभिमानी देशस्थ, बॅटमॅन.

श्रीरंग_जोशी's picture

8 May 2013 - 12:35 am | श्रीरंग_जोशी

तीन वर्षांपूर्वी एका मिपाकराने (छोटा डॉन की टारझन?) पूणे आयपीएल संघनिर्मिती झाल्यावर एकाहून एक पुणेरी संवाद लिहिले होते (जसे आम्ही फक्त दिवसाच सामना खेळणार, रात्रीच्या सामन्याचे दुप्पट पैसे लागतील) जे जालावर भयंकर वेगाने फिरत होते.

तर बहुधा स्टार माझा ने ते ध्वनिफितीच्या रुपाने प्रसिद्ध केले होते व त्यात ते अतिरेकी सानुनासिकपणे म्हंटले गेले होते.
मी तरी आजवर इतके सानुनासिक बोलणार्‍या कुणालाही प्रत्यक्ष भेटलो नाही. जुन्या मराठी चित्रपटांमध्ये तसे बोलणारी पात्रे असायची.

बॅटमॅन's picture

8 May 2013 - 1:17 am | बॅटमॅन

ओह ओक्के. पण जुनी मराठी, त्यातसुद्धा पुणे परिसरातील ब्राह्मणी "शुद्ध मराठी" नामक बोली सानुनासिक होती हे खरेच आहे. लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया मध्ये १९२२ साली पुण्यातील कोणी घारू प्रधान नामक माणसाने एक कथा वाचून दाखवली त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे ते तिथे ऐकता येईल. ती साईट फार सुंदर आहे, जुनी कोंकणी, वर्‍हाडी, इ. बर्‍याचि बोली ऐकावयास मिळतील. तसेच संपूर्ण भारतातील विविध भाषा १०० वर्षांपूर्वी प्रत्यक्ष बोलल्या कशा जायच्या, त्याचे प्रत्यंतर मिळेल. हा लै मोठा खजिना आहे.

तूर्त १९१९ सालचे पुणेरी मराठीतील रेकॉर्डिंग इथे ऐकता येईल.

ढालगज भवानी's picture

8 May 2013 - 1:48 am | ढालगज भवानी

ह्म्म प्रधान = सी के पी :)
______________________

काय रे बॅटमन तूच "अस्मितांची गळवे" हा शब्दप्रयोग रुढ केलास ना?
आता तूच देशस्थी अस्मिता दाखवतोयस ;)

बॅटमॅन's picture

8 May 2013 - 1:56 am | बॅटमॅन

हम्म :)

बाकी अस्मितागळवे हा माझा शब्दप्रयोग नाही. त्याच्या लोकप्रियतेत अजून काहींचा हातभारही आहे.

आणि हे बरंय च्यायला, देशस्थांनी जरा काही लिहिलं की आलेच ;)

ढालगज भवानी's picture

8 May 2013 - 2:02 am | ढालगज भवानी

हाहाहा :) अरे मग जरा सी के पींच्या बाजूनेही बोल की. मग बघ कसा फुल सपोर्ट करते :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 May 2013 - 2:10 am | विश्वनाथ मेहेंदळे

सीकेपी मुली दिसायला सॉलिड असतात.

अवांतर :- रेवती आज्जीच्या मंडळात काही मला एन्ट्री मिळणार नाही, तुम्ही मंडळ सुरु केलेत तर सांगा हां :-)

(सीकेपीण प्रेमी) विमे

ढालगज भवानी's picture

8 May 2013 - 2:12 am | ढालगज भवानी

हाहाहा खरय खरय शीकेपी मुली चान चान असतात :) :)

(ठांकू ठांकू बरं का)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 May 2013 - 2:33 am | विश्वनाथ मेहेंदळे

हाहाहा खरय खरय शीकेपी मुली चान चान असतात
(ठांकू ठांकू बरं का)

घसा खाकराल्याचा आवाज ;-)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 May 2013 - 2:34 am | विश्वनाथ मेहेंदळे

आणि ते मंडळाचे सांगा की. त्याला बगल देऊ देणार नाही मी...

घोट्याला बाशिंग बांधून तयार असलेला विमे

ढालगज भवानी's picture

8 May 2013 - 2:38 am | ढालगज भवानी

बगल नका देऊ, काख द्या =)) =))

(ही ही पी जे) ;)

सूड's picture

8 May 2013 - 9:06 am | सूड

सिकेपींच्या पोरी सुंदर असतात यात वादच नाही पण कधीकधी प्रश्न पडतो की महाराष्ट्रात देशस्थ, कोकणस्थ, क-हाडे, सारस्वत येवढे सोडून बाकी जाती नसतातच की काय !! ;)

गवि's picture

8 May 2013 - 10:07 am | गवि

A

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 May 2013 - 10:12 am | विश्वनाथ मेहेंदळे

जोशींनी जितके विचारले तितके मी सांगितले. ते ही माहित होते म्हणून.
इतर जातींवर ऐसी अक्षरे वर अख्खी लेखमाला आली होती, इच्छुकांनी ती वाचावी.

ढालगज भवानी's picture

8 May 2013 - 11:56 am | ढालगज भवानी

आहेत ना!! सूड, माझी सासू सोनार आहे. इथे फक्त ही माफक अपेक्षा आहे की प्रत्येकाने आपल्या जातीची माहीती द्या. जितकी माहीती मिळेल उत्तम आहे. शेअर करा हीच हेल्दी अपेक्षा आहे. अन कोणी कोणाला अडवलं नाहीये.

ढालगज भवानी's picture

8 May 2013 - 1:15 pm | ढालगज भवानी

सोनार हा व्यवसाय झाला मला वाटतं "दैवज्ञ ब्राह्मण" ही जात झाली. बहुगुणी यांनी अतिशय दैवज्ञांच्या खाद्यसंस्कृतीवर सुंदर लेख दाखविला होता. आईंना , मला खूप आवडला. इथे शेअर करत आहे.

सूड's picture

8 May 2013 - 2:02 pm | सूड

>>इथे फक्त ही माफक अपेक्षा आहे की प्रत्येकाने आपल्या जातीची माहीती द्या. जितकी माहीती मिळेल उत्तम आहे.
एखादा लेख, जमल्यास लेखमालाच पाडीन म्हणतो सोनारांच्या जाती-पोटजातींबद्दल*. एखादवेळेस तुझ्या सासूबाईंची मदत घ्यावी लागेल. :)

*मला सविस्तर आणि पूर्ण माहिती मिळाल्यानंतरच, अन्यथा नाही. :)

ढालगज भवानी's picture

8 May 2013 - 2:22 pm | ढालगज भवानी

अरे जरूर. मी आईंना विचारून हवी ती मदत करेन.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 May 2013 - 1:18 pm | निनाद मुक्काम प...

देशस्थ व सी के पी मुलींचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे
सोनाली आणि ममता ह्या बॉलीवूड अभिनेत्री आहेत.
सी के पी मुली नुसत्या सुंदर नसतात तर अतिशय सुगरण असतात. व त्यांना जातीने त्यांचे पारंपारिक खाद्यपदार्थ शिकवले जातात.
हे त्यांचे वैशिष्ट्ये आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 May 2013 - 2:07 am | विश्वनाथ मेहेंदळे

च्यायला, कॉपीराईट घेऊन टाकायला हवा पटकन :-)

ढालगज भवानी's picture

8 May 2013 - 2:09 am | ढालगज भवानी

ओ सारस्वत गपा ;)

(शीकेपी) - ढालगज

अभ्या..'s picture

8 May 2013 - 2:56 am | अभ्या..

ते काल काय तरी सांगत होतीस ना शुचितै. ते सुंदर = खडूस वगैरे.
ते हेच ना?

ढालगज भवानी's picture

8 May 2013 - 3:10 am | ढालगज भवानी

आयला विमेंनी कॉपी राईटचा खडूसपणा केला म्हणून मी बॅटीची बाजू घेऊन दाखवली. आता खडूस कोण? विमे!!! ते सुंदर असतील तर मला माहीत नाही ;)

अभ्या..'s picture

8 May 2013 - 3:15 am | अभ्या..

बॅट्या स्वभावाने फारच चांगला आहे बुवा. =)) =)) =))
झाला का कॉन्वर्स सिध्द?
(आता हाणतय...पळा ;) )

अब्याडब्या, आमचा मास्क असतो मध्ये, त्याआडचा चेहरा कुणाला दिष्णार म्हणे? ;)

पैसा's picture

8 May 2013 - 9:02 am | पैसा

फक्त कोकणस्थच नव्हे तर कोकणातले बहुतांश लोक बोलतात. कोंकणी भाषा ऐकून बघा कधी तरी.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 May 2013 - 2:14 am | निनाद मुक्काम प...

महेश चा विरुद्ध सिनेमाचा मराठी रिमेक म्हणजे कोकणस्थ
आता हिंदीत जेमतेम चाललेल्या ह्या सिनेमाचा देशी अवतार आणून त्यामागे कोकणस्थ लेबेल लावून त्यात नायकाच्या अंगावर संघाचा पोशाख चढवून
ताठ कणा हाच बाणा हे वाक्य राज ठाकरे ह्यांना सिनेमाच्या प्रमोशन मध्ये बोलायला लावून मांजरेकर शिळ्या कढीला परत उत आणत आहेत.
सलमान व बच्चन ह्यात ऐश्वर्या सोडली तर महेश हा अजून एक समान धागा आहे.
ते दोघे सुद्धा ह्या सिनेमाचे प्रमोशन आपल्या परीने करत आहेत,
संघाचा पोशाख असलेला नायक ह्यामुळेच सिनेमाची बरेवाईट प्रसिद्धी आपसूकच होते जी आजच्या काळात गरजेची झाली आहे.
सध्या महाराष्ट्रात जातीय राजकारण करण्याचे प्रयत्न जोरात चालू आहेत.
ब्रिगेड मराठ्यांना कट्टर व्हा असे सांगते,
आत्ता त्याला उत्तर म्हणून ब्राह्मणांनी सुद्धा कट्टर व्हावे अशी विचार धारा आभासी जगतात वाचायला मिळते. त्याला असे शिणेमे खतपाणी घालतात.
अवांतर
ह्या शिनेमात आमचा खेडेकर का बरे घेतला.
महेशने बर्व्यांच्या सुनील ला खरे तर कोकणस्थ म्हणून कोकणस्थ ह्या सिनेमात प्राधान्य द्यायला हवे होते.