कोकणस्थ सिनेमाची थोडक्यात गोष्ट...

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
7 May 2013 - 5:14 pm

गोखले नावाचा बॅंकेतला एक अधिकारी असतो. तो स्वेच्छानिवृत्ती स्वीकारतो. त्याच्या निरोपसमारंभात त्याचे गुणवर्णन चालू आहे. त्याच्या हाताखालचा अधिकारी साहेबांनी आम्हाला अमुक शिकवलं, ढमुक शिकवलं , साहेब मोठ्ठे गुणी, " एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स "हे सगळं दीड मिन्टाच्या भाषणात जाणवेल असं.. वेळ असला तर प्रत्येक गुण दर्शवणारे ब्यांकेतले प्रसंग.. प्रेक्षकांत त्याची बायको. ती शाळेत अर्थातच शिक्षिका असते. " एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स " असतेच कारण तीही कोकणस्थ. वेळ असला तर प्रत्येक गुण दर्शवणारे तिच्या शाळेतले प्रसंग... हल्ली गोखल्यांची पाठ सारखी दुखते. समारंभात त्यांना अचानक पाठदुखीचा ऍटॅक येतो पण ते सावरतात.
समारंभ संपताना आईला मुलाचा फोन येतो. मुलगा परदेशात. बहुधा पश्चिमेला. लंडन. मुलाला ऒर्कुट फ़ेस्बुक समाजसेवा करायची सवय अस्ते. मुलाचं नाव श्याम.श्यामच्या आजोबांचंच नाव त्याला ठेवलेलं. श्यामचे आजोबा कोकणात माध्यमिक शाळेत उपमुख्याध्यापक होऊन निवृत्त. तिकडे त्यांची आंब्याची काही कलमं. तेही कोकणस्थ असल्याने ए लॉअ पील सोस्टे नोनॉ अस्तातच.
मुलगा यांच्या जातीचा फ़ेस्बुक ग्रुप चालवत असतो.हे तो आईला सांगतानाएक फोनवरचा संवाद...
“ जात म्हणू नये. जात शब्द फ़ार जातीय वाटतो श्याम.. समाज म्हणावं.” श्यामची आई.
“पण जातीय म्हणजे काय?”
“ जातीय म्हणजे अश्लील”
“ ओके मॉम, यापुढे समाज म्हणेन ”
असा हा आईचं ऐकणारा श्याम दर महिन्याला काही ज्वलंत विषयांवर प्रत्यक्ष मीटिंगा घेत असतो.“आपण्न्क्कीकुठूनआलो?” या विषयावरच्या मीटिंगला श्याम अर्थातच एका (ए लॉअ पील सोस्टे नोनॉ) मुलीच्या प्रेमात पडतो. “आपणएव्ढेहुशार्कसे?” या विषयावरच्या पुढच्या मीटिंगला तो तिला प्रपोज करतो आणि “ हल्लीआप्ल्यामुलीबाहेर्जातीतलग्नंकाकर्तात?” या ज्वलंत विषयावरच्या मीटिंगमध्ये ती त्याला होकार देते. आता होकार मिळाल्यावर एकूणच श्यामचे समाजाच्या मीटिंगमधले लक्ष उडते. लग्नच वगैरे ठरवल्याने आता या समाजसेवेची आपली गरज संपली हे त्याच्या लक्षात येते. मग तो तिच्याबरोबर माय्देशी परततो.

दरम्यानच्या काळात मुंबईत काही मिशावाले राजकारण राजकारण खेळत असतात. काही प्युअर पोलिटिकल गेम असतात तर काही भेसळीचे पोलिटिकल गेम असतात.तर काय होतं, मध्येच बच्कन दोन रहस्यमय खून होतात .. या खुनांचं खापर की काय ते श्यामवर फुटतं आणि श्यामला अटक होते. ती अर्थातच मिशावाल्या मंडळींची राजकीय खेळी असते. गोखले विविध वकील मंडळी, पोलीस खात्यातली मंडळींकडे संसदीय पद्धतीने प्रयत्न करून पाहतात... अर्ज विनन्त्या करतात पण काहीच होत नाही. अचानक एका पोलीसस्टेशनमध्ये त्यांची पाठ परत दुखायला लागते आणि ते चक्कर येऊन पडतात. मग जोरात झांजा वाजत वाजत...

मध्यंतर

त्यांचा पाठीचा विकार बळावलेला असतो. आणि गोखल्यांना इस्पितळात दाखल व्हायला लागते. तपासणीत असे कळते की गोखल्यांना पाठीचा कणा आहे पण जो आहे तो खूपच मृदू आहे, तकलादू आहे... त्यामुळे तो कणा ताठ राहत नाही. दु:खी गोखल्यांचे त्राण इतके गेलेले असते की मला ऑप्रेशन नको असे ते ओरडत असतात. त्याच वेळी त्यांची पत्नी एक अफलातून उपाय करते.गोखले इस्पितळात असतानाच त्यांची पत्नी टेप रेकॉर्डरवर ती मदरलॅन्डची प्रेयर वाजवते. "नमस्ते सदा.." ची ती लहानपणी ऐकलेली म्हटलेली ट्यून ऐकून गोखले गहिवरतात, आनंदाने नाचू लागतात, पाठीचे दुखणे कुठल्या कुठे पळून जातं. नर्सेस, वॉर्डबॉय, हाउसमन, कन्सल्टंट सारं हॉस्पिटल आनंदी होते, मग काय कदम ताल करत ते आनंदाने ऑप्रेशन थिएटरकडे जातात. . मग गोखल्यांचे त्याच दिवशी ऑप्रेशन होते आणि त्यांच्या पाठीत लाकडी रॉड बसवतात. मग त्यांचा कणा एकदम ताठ होउन जातो. भुलीच्या गुंगीतही त्यांना ती लहानपणची शिस्त आठवते... काय ती शिस्त अन काय ती बौद्धिकं...
मग गोखल्यांना ऑप्रेशनच्या रात्री स्वप्न पडतं, त्यात त्यांचे बाबा आठवतात...शाखेवरती रोज लाठीकाठीचे खेळ शिकलेले आठवतात. मल्लखांब तलवारबाजी, कबड्डी, दोरीवरचा मल्लखांब असले मराठी मर्दानी खेळ दिसायला लागतात. “ताठ कणा हाच बाणा “ हे त्यांचं ब्रीदवाक्य त्यांना आठवतं...

मग ते अचानक उजव्या हाताने छाती पिटत "माज आहे मला माज आहे मला" असे ओरडत उठतात. इस्पितळाचा ड्रेस काढून पांढरा शर्ट आणि खाकी अर्धी विजार चढवतात . डॉक्टर त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात पण तरी गोखले मात्र “ मेलो तरी बेहत्तर पण लढाई माझी आहे” असं सांगतात. मग मागे झान्जा वाजायला लागतात."कोकणस्थ " अशी आरती सुरू होते. मदरलॆंडची प्रेयर घुमायला लागते.. हातात कालच्या सर्जरीतून उरलेला दांडका घेऊन ते धावायला लागलेले पाहून डॉक्टर हबकतात. मागे सारी मराठी असल्याचा माज असलेली जनता एकही मराठी शब्द न बोलता "एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स " अशा घोषणा देत ताठ कण्याने धावू लागते.

मग वाटेत येणारे सारे "अनएड्युकेटेड लॉब्रेकर्स पीसहेटर्स सोशली अन्स्टेबल नॉनसेन्स" गुंड दंडाचा प्रसाद खातात , ताठ कण्याच्या लाथा खातात , , गोखले ताठ कण्याने जोरात भाषण करायला लागतात “ आम्ही भित्रे नाही, आम्ही बुद्धिमान आहोत”... आता हे बौद्धिक घेणार या भीतीने सारे वाईट्ट लोक थरथर कापू लागतात, रडायला लागतात, बनावट साक्षीदार पळून जातात, खर्यात साक्षी दिल्या जातात, मिशावाले गुंड सरळ येतात. मग श्यामला जामीन मिळतो . मग डी एस पी आणि जज साहेब “हाच खरा शूर “ असं म्हणत गोखल्यांचं अभिनन्दन करतात.. मग परत भाषण, “ मी कोकणस्थ आहे पण मी जातीय नाही, मी संघात जायचो पण मी पोलिटिकल नाही, मी रस्त्यात मारामारी करतो पण मी गुंड नाही... “ वगैरे वगैरे ... असे हा आहे पण तो नाही असे भाषण सोळा मिनिटे चालल्यावर “कोकणस्थ” असा जोरात आवाज काढून आरती संपते. सिनेमाही संपतो.

मग नावं येताना ----
श्याम घरी येतो आणि त्याचं लग्न होतं आणि तो पुन्हा जालीय समाजसेवेत बुडून जातो ... त्या वर्षीचा भारतरत्न पुरस्कार गोखल्यांना मिळतो...पुरस्कार स्वीकारायला ते अर्थातच खाकी विजार आणि पांढर्या शर्टात जातात.

मुक्तकविडंबनप्रकटनविचारप्रतिसाद

प्रतिक्रिया

सिनेमाची गोष्ट खरी नाही.. मी इथे नेहमी येत नाही पण धाग्यात जे काही आहे ते निव्वळ म्हणजे
हा निव्वळ आचरटपणा अहे... खरंतर घोर अपमान आहे.. काहीच्या काही लिहितात झालं लोक...
१. कणा ताठ करण्यासाठी कोणीही डॉक्टर लाकडी दंडुका पाठीत बसवणार नाही.. अ श क्य
२. दोन खून नक्की कोणाचे होतात हे लिहिलेले नाही. अर्धवट काहीतरी ज्ञान आहे...
३. आणि किती ते परत परत इंग्लिश? लॉ अबायडिंग की काय ते?
४. रस्त्यात मारामारी केली म्हणून कोणाला भारतरत्न मिळेल काय?

माझा या गोष्टीचा आणि गोष्ट लिहिणार्‍याचा निषेध.. स्पष्ट बोलायला मी काही घाबरत नाही. इथे लोक असले काही भयंकर वाचून आनंद घेत आहेत बघून सखेद आश्चर्य वाटले.

प्यारे१'s picture

7 May 2013 - 10:02 pm | प्यारे१

शांत व्हा तै. कुठे त्या मास्तरांच्या नादी लागता?
(एक शब्द आहे ह्यासाठी काय ते आत्म... का काय्तरी वाईट्ट शब्द आहे.)
लिहीणारा लिहून जातो आपल्याला त्रास देऊन जातो,
ह्याच्यापुढची ओळ काही जमेना हो.
तुम्ही बर्‍याच दिवसात कविता नाहीत केली ती? जरा कराना पूर्ण. कराना प्लीज.

सूड's picture

7 May 2013 - 10:57 pm | सूड

हाच शब्द का हो प्यारेकाका?

अवांतरः ह्या भडकमकरमास्तरांकडे कुठे लक्ष देता, एक झक्कपैकी कविता होऊन जाऊदेत. ;)

नाही शरदिनीताई तुम्ही शांत होउ नका.
उअद्याचा सुर्य या भडकमकर मास्तरांनी पाहिला नाही पाहिजे.
अशे कविता पाडा;अशी कविता पाडा की ती मनातल्या मनातही वाचताना जीभ वळुन वळुन तीचा पार गुंताळा झाला पाह्यजे. मग बघु मजा या मास्तरांची.

भडकमकर मास्तर's picture

8 May 2013 - 1:00 pm | भडकमकर मास्तर

अरेरे !!!! कस्ल्या कस्ल्या अश्लील सुपार्‍या देताय त्यांना...

अत्रुप्त आत्मा's picture

7 May 2013 - 10:45 pm | अत्रुप्त आत्मा

बाप रे.........!!! इतका भयावह झालाय शिनूमा ?

हैला! असा सिनेमा खरच आहे हे तूनळीवर पाहून खात्री केली राव!
मला वाटलं मास्तर नेहमीप्रमाणे चेष्टा करतायत. यावेळी अशा लेखाला फसायचे नाही असे पक्के ठरवले होते. मागल्यावेळी (जालिंदर जलालाबादीच्यावेळी) खरच असे लेखक असल्याचे वाटले होते. मी मारे देशस्थ अशा शिर्षकाचा लेख पाडायला घेतला होता. ;) आता कंफूजन झाले. मास्तरांवर विश्वास ठेवायचा की नाही? असच मला शरदिनीताईंबद्दल वाटतं.

२०१३-१४ साठीचे झी टीव्हीचे बेस्ट मराठी चित्रपटासाठीचे सगळे पुरस्कार या सिनेमास मिळतील..!

पण आपणतरी हा चित्रपट टीव्हीवर आलाच (आणि वेळ मिळाला) तरच पाहू.. कारण आम्ही संजय दत्त, संजय गुप्ता, महेश मांजरेकर, अनिल कपूर यांचे पिक्चर (स्वतःचे पैसे देऊन) पाहणे हा देशद्रोह समजतो...

जादा माहीतीसाठी खालील लिंक पहा..
http://www.outlookindia.com/article.aspx?216640

--सुहास

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 May 2013 - 7:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मास्तर, पाय लागो. आजच्या दिवसाची सुरुवात झकास झाली. चित्रपटाची उत्तम ओळख करुन दिली असेच म्हणेन. धन्स.

लेखनातील काही प्रसंगांनी हहपुवा झाली. 'हल्लीआप्ल्यामुलीबाहेर्जातीतलग्नंकाकर्तात” आणि 'आम्ही भित्रे नाही, आम्ही बुद्धिमान आहोत” या अशा बौद्धिकांनी प्रचंड गंभीर झालो. ;)
(चित्रपट पाहतांना हे प्रसंग मजा आणतील)

चित्रपट नक्की पाहीन. चित्रपटाकडे जाण्याची पायवाट दाखवल्याबद्दल मन:पूर्वक आभार. आणि मास्तर येत चला. शर्दिनीतैलाही नमस्कार सांगा.

अवांतर : काल सचिन खेडेकर आणि आणि त्या कुलकर्णीबै कोणत्या तरी मराठी वाहिन्यांवर होते. (हिंदी चित्रपटाच्या धर्तीवर) आणि चित्रपटातल्या भूमिका कशा जीव ओतून केल्यावर ती कलाकृती कशी श्रेष्ठ होते वगैरे सांगत होते. आपण प्रेक्षकातील एक झालो की 'काही गोष्टी, विषय चित्रपटात आणतांना काय केलं पाहिजे, संवाद कसे असले पाहिजे, हे लक्षात येतं म्हणाले. एक प्रेक्षक म्हणून त्यांना काय म्हणायचं आहे आणायचे आहे ते मला तरी उत्तम समजलं.

-दिलीप बिरुटे

इरसाल's picture

8 May 2013 - 10:03 am | इरसाल

डु आयडी ने आपल्या स्वतःच्या धाग्यावर प्रतिसाद देता येतो :)

कुंदन's picture

8 May 2013 - 1:38 pm | कुंदन

आमचे २ कोंकणीं मित्र आहेत एक आपटे न एक अभ्यंकर , त्यांची या निमित्ताने आठवण झाली.

पैसा's picture

8 May 2013 - 6:01 pm | पैसा

कोण रे? कोण रे ते?

तर्री's picture

8 May 2013 - 4:34 pm | तर्री

अवांतर -
सी .के.पी. भोजनावर "शिरीष कणेकर" यांनी एक अप्रतिम लेख लिहिला होता. तो वाचून आपण किती मराठी पदार्थ अजून खाल्ले नाहित असे वाटले होते. " निवडक शिरीष कणेकर" हया पुस्तकात सुध्दा तो आहे.
शिरीष कणेकरांची ची भाषा आणि खाण्याचा विषय असल्यामुळे मि.पा. च्या तमाम वाचकांना आनंद मिळेल.
जाणकार मंडळी - कृपा करून "दुवा" द्या !

सीकेपी भोजन उत्तम आणि माणसे साधी व मराठी भाषा प्रेमी असतात हे माझे वैयक्तिक मत.

माणूसपणाच्या जातीचं आहे का हो कोणी?

माणूसपणाची जात - ज्या जातीचे लोक सर्वाधिक कट्टर आणि प्रो अ‍ॅलर्जी असतात तीच ना?

एक जात स्वीकारायचीच असं ठरवलं तर मानवजातीय होण्यापेक्षा कोंकणस्थ, देशस्थ, कुणबी असं काहीही होणं बरं. पण ते मानवजात नको बॉ..

आपली कोणतीही जात कागदोपत्री, जन्माने, वंशाने असली तरी त्याने फरक न पडणे, त्या जातीचा संदर्भ खाद्यपदार्थ, हलकीफुलकी चेष्टा इथपर्यंत मर्यादित राहणे ही माझ्या दृष्टीने अंतिम आयडियल स्थिती आहे. ती कधी येईल माहीत नाही. पण स्वप्नच पहायचं तर ते पाहतो..

सर्व जातींचं अस्तित्वच नाकारुन सर्वांना मानवजात अशा एका नव्या सर्वव्यापी जातीमधे कन्व्हर्ट करणं असं नव्हे.

जात रद्द व्हायला नकोय.. तिची रद्दी व्हायला हवीय.

माणूसपणाची जात - ज्या जातीचे लोक सर्वाधिक कट्टर आणि प्रो अ‍ॅलर्जी असतात तीच ना?

ठ्ठो!!!!!!!!!! कं लिवलंय, कं लिवलंय!!!!

या लोकांची अस्मितागळवे सर्वांत सेन्सिटिव्ह असतात. माणूसपण वगैरे अ‍ॅब्स्ट्रॅक्ट भूमिका घेऊन आपण या जगतातलेच नाही अशा थाटात जालावर ठीकठिकाणी मताच्या पिंका टाकण्यापलीकडे यातल्या बहुसंख्यांकडून घंटा काही होत नाही. जिथेतिथे टर्मिनॉलॉजिकल अप्रोपिएटनेससाठी भांडणार्‍या या यूसलेस वैचारिक बांडगुळांचे आचार कसे असतात हे पाहिले तर कडवे जात्यभिमानी लोक आणि त्यांत फरक करवणार नाही.

ढालगज भवानी's picture

8 May 2013 - 5:44 pm | ढालगज भवानी

आयला पेटलाय पेटलाय धागा ;)
_____________________________________
मैत्रीमध्ये जातपात अजिब्बात येत नाही. जातीचा संबंध येतो तो रोटी-बेटी व्यवहारात ज्याचे एकमेव कारण म्हणजे "खाद्य संस्कृतीकिंवा अन्य पद्धती" यातील फॅमिलिअ‍ॅरीटी.
मुलीचं लग्न होतं मुलाशी पण सासरी जुळवून घ्यावे लागते सर्वांशी. जातीबाहेर जाऊन लग्न करणार्‍यांचे खूप कौतुक वाटते. सहसा हे प्रेमविवाहातच होताना दिसते. पण सामाजिक "सांस्कृतिक" देवाणघेवाण व खेळते वारे या अशा कुटंबांमुळेच होतात.

वरील सर्व प्रतिसाद मजेत टाकले आहेत. अनेक सुंदर देब्रा/कोब्रा/शिंपी/माळी/सोनार/कासार/कुणबी/सारस्वत/कर्‍हाडे/मराठा मुली पाहील्या आहेत व मी धरुन - अतिशय सामान्य दिसणार्‍या सीकेपी मुलीही खूप पाहील्या आहेत.

आई (कोब्रा) शेजारच्या शिंपी, कासार मावशांकडून (अंड्याची)भुरजी शिकलेली नीट आठवतेय. तिला सिरीयस बरं नसताना याच शेजार्‍यांनी प्रेमाने कुटुंबाला खायला घातलेले आठवतय. अनेकांनी लहानपणापसून प्रेम दिले आहे आणि सर्वजण फक्त अमक्याच अन तमक्याच जातीचे होते असे काही नाही.

अस्मितागळवे हा शब्दच इतका आवडला होता व म्हणून तो बॅटने कॉइन केला हे लक्षात राहीले होते. चपखल शब्द आहे.

बॅटमॅन's picture

8 May 2013 - 5:51 pm | बॅटमॅन

सहमत आहे भवानीतै :)

ढालगज भवानी's picture

8 May 2013 - 6:00 pm | ढालगज भवानी

च्यायला, बॅट्या "मी सुंदर नसल्याशी" तू इतका त्वरीत सहमत झालेला पाहून ड्वाले लई पाणावले रे !!! =)) =))

बॅटमॅन's picture

8 May 2013 - 6:06 pm | बॅटमॅन

हाहाहा =)) =))

जिथेतिथे शब्दांच्या नुस्त्या फुलबाज्या उअडवण्यापेक्षा आणि इतरांच्या विचारांना नावं ठेवण्यापेक्षा आधी त्या व्यक्तीला काय म्हणायचं आहे ते जमल्यास समजून उमजून घेत जा. असो.

फुकाचा उपदेश करण्यापेक्षा प्रत्येक प्रतिसाद वैयक्तिक घेतला पाहिजेच असे नाही इतके लक्षात घेतले तरी लै झाले.

प्रतिसादाला उद्देशून लिहिले म्हटल्यावर उत्तर हे मिळणारच. की फक्त जिथे तिथे बोलायचा मक्ता तुम्हालांच मिळाला आहे?

की फक्त जिथे तिथे बोलायचा मक्ता तुम्हालांच मिळाला आहे?

नाही नाही, तो मक्ता काही विशिष्ट लोकांनाच मिळाला आहे-ज्यांत आम्ही येत नाही. अजूनही प्रतिसादाची रिअ‍ॅक्शन वैयक्तिक घेतल्या जातेय हे पाहून करमणूक अन खेद दोन्ही होताहेत. तुम्ही=तुमची विचारसरणी इतके सरळधोपट इक्वेशन माझ्या मनात नाही. तुम्ही तो करस्पाँडन्स मनाशी घट्ट धरून बसल्यावर मग काय करणार म्हणा. सबब हा ओढूनताणून काढलेला इन्फरन्स माझ्या माथी मारू नका. तुमचे म्हणणे काय असेल याचा रफलि अन्दाज होता, पण गविंनी म्हटलेल्यात चूक तरी काय आहे तेही दाखवून द्यावे. तुमचा प्रतिसाद हा निमित्तमात्र होता. इट्स नॉट अबौट यू एनीमोर. हे लक्षात घेतले तर कळेल काय आहे ते. कळून घ्यावयाचे नसल्यास नाइलाज आहे.

ढालगज भवानी's picture

8 May 2013 - 5:50 pm | ढालगज भवानी

यशोधरा अगं नावं नाही ठेवली. तू बरोबर प्रश्न विचारलास - की सर्व संकुचितपणा च्या पलीकडील "माणूस" या "जातीचे" आहे का कोणी? मला कळला तुझा रोख. अन मला वाटतं इतरांना सर्वांना कळला. :)

शुचि, मी तुला तर काहीच नाही म्हटले की :) नावं ठेवण्याचा प्रश्न येतोच कुठे? आणि ठेवली तरी मला काय फरक पडेल? पण समोरच्याने काय लिहिले आहे हे जाणूनही न घेता, जिथे तिथे आपल्या ज्ञानाच्या पिंका कशाला टकायला हव्यात?

अनिदेश's picture

8 May 2013 - 5:39 pm | अनिदेश

सुन्दर विचार :)

माणूसपणाची जात - ज्या जातीचे लोक सर्वाधिक कट्टर आणि प्रो अ‍ॅलर्जी असतात तीच ना? >> आपला आपला नजरिया गवि, इतकंच म्हणू शकते ह्यावर. निदान आधी मला काय म्हणायचं आहे ते विचारायचं तरी! का आधीच लेक्चरबाजीला सुरुवात? जौद्या झालं.

काहीतरी मिसइण्टरप्रिटेशन झालं असावं. तुम्ही बोलल्यावर मी बोलण्याआधी एकदा तुम्हाला काय म्हणायचं होतं हे एकदा कसं विचारणार?

ठाम मत असलं तरी मी ते अजिबात तीव्र किंवा दुरित शब्दात दिलेलं नाही. अपना अपना नजरिया याच्याशी प्रचंड सहमत आहे, कारण तुमच्या म्हणण्यामागे तो उद्देश नसला तरी माणूसपणाची जात हा केवळ शब्द मी घेतला आणि त्याविषयी माझी निरीक्षणातून बनलेली, नजरियातून मतं मांडली. पाहण्यात असलेले मानवजात वाले लोक हे केवळ डोळे मिटून सत्य नाकारण्याच्या मनोवृत्तीचे दिसले. तसे नसलेले लोक दिसले की मनापासून स्वीकारीन.

हे खूप सरसकटीकरण झालं गवि, अर्थात माझ्या अल्पमतीनुसार.

नीट पहाल तर नक्कीच दिसून येईल की केवळ माणूसपणाची जात मानणार्‍यांनी जगात खूप सकारात्मक बदल घडविले आहेत. हवे असल्यास थोड्या वेळाने भरपूर उदाहरणे देऊ शकेन, आणि ह्या असल्या माणसांमुळेच जग टिकून आहे असे मी म्हणते. असो.

सध्या बाहेर चालले आहे.

सावकाश मांडा तुमचं म्हणणं, सवडीने. वाट पाहतो.

आपलंच ते खरं करण्यासाठी चिरडीला जाऊन वाद अजून एकदाही घातलेला नाही. आत्ताही तसं होणार नाही. तुमच्या म्हणण्याने मत बदललं तर आनंदच होईल.

यशोधरा's picture

8 May 2013 - 7:42 pm | यशोधरा

चिरडीला जाऊन वाद घालायचा संबंध कुठे आला? असो. असे कारण नसताना ग्रह का करुन घ्रेता व देता, हे उमजत नाही. कोणी तुअम्च्या मताविरुद्ध मत मांडले की नेहमी असे काहीतरी का लिहावेसे वाटते? जसे तुम्ही संतुलित वाद घालता, तसेच इतरही संतुलित, स्पष्ट मते मांडत असतील, असा संशयाचा फायदा द्यायला तरी काही हरकत नसावी.

बाहेर गेले होते तेह्वा विचार करता करता बरंच काही सुचलं होतं पण अगदीच थोडक्यात लिहिते. माणूसपणाची जात ह्या शब्दाची इतकी हेटाळणी करायला नको.

माणूसपणाची जात - ज्या जातीचे लोक सर्वाधिक कट्टर आणि प्रो अ‍ॅलर्जी असतात तीच ना?

इतका नकारात्मक दृष्टीकोन? इतकी हेटाळणी? कशासाठी बुवा? माणूस म्ह्णून वावरणारे, समाजाला मार्गदर्शन करणारे संत आठवत नाहीत? अगदी मागे जायला नको, एक गाडगेबाबा आठवले तरी खूप आहे. केवळ माझ्या रयतेचं भलं कशात आहे हे समजून उमजून वागणारे शिवाजीमहाराज, राणी अहिल्यादेवी होळकर, शाहूमहाराज आणि तत्सम राज्यकर्ते आठवले नाहीत? देश पारतंत्र्यात असताना देशासाठी जीव देणारे क्रांतीकारक आठवले नाहीत? संपूर्ण आयुष्य समाजासाठी उधळून देणारे, निरलस वृत्तीने काम करणारे कोणी म्हटल्या कोणीच आठवले नाही? तसे असेल तर तुमच्या व्याख्येनुसारच्या "सर्वाधिक कट्टर आणि प्रो अ‍ॅलर्जी" लोकांमध्ये आणि तुअम्च्ब्यात फरक तो काय?

समाजातील स्त्रीवर्ग आणि बहुजन ह्यांच्या उन्नतीसाठी झटणार्‍यांपैकी कोणीच आठवले नाहीत? अगदी पूर्वीचं जाऊ द्या, बंग परिवार, आमटे परिवार, शिवाजीराव पटवर्धन, नसीमा हूरजूक ह आणि तत्सम ह्यापैकी माणूस जातीचं उदाहरण म्हणून कोणीच आठवलं नाही? असो.

असं म्हणतात की आपली मनोवृती असते त्याप्रमाणे आपल्याला संदर्भ गवसतात आणि मतं असतात. नुसतं चांगदेवी, अहंकारी ज्ञान असून फायदा काय? मुक्ताईला जी अनुभूती लाभली, तशी लाभणार नसेल तर त्या ज्ञानाचा बडिवार काहीच कामाचा नाही. असो.

अत्यंत मनापासून लिहिलेली तळटीप: हे अतिशय शांतपणे आणि अजिबात न चिडता पण अतिशय आश्चर्यचकीत होऊन लिहिलेले आहे.

गविंच्या डोळ्यापुढे बहुदा तिस्ता सेटलवाड, महेश भट्ट, बरखा असे 'ह्युमॅनिटीरीयन' (शब्द बरोबर आहे ना?) असावेत.
आता बघा बरं गणित सुटतंय का?

त्य मघासनच सुटलं हो दादा, पण त्यापलिकडेही जग हाय की! का न्हाई? निसतं त्ये रामकृष्ण मठाचं पाईक बघितलसा काय अन कसं कामं करत्यात तरी माणूसपण काय असतया त्ये उमगतया!

चिरडीला जाऊन वाद घालण्याचा कुठे संबंध आला ?

हो. अजिबातच नाही आला. उलट मी तसे करणार नाही असे म्हणून चांगल्या चर्चेची हमीच तर देत होतो.

त्यात समोरचाही माझ्याप्रमाणे संतुलित नसेल असे ग्रुहीत धरल्यासारखे वाटले ? थोडा गोंधळ झालाय माझा.

बरे. या शाब्दिक चर्चेत मूळ विषय मागे पडू नये.

दिलेली सर्व उदाहरणे अपेक्षितपैकीच.

बाकी ते चांगदेवी अहंकारीवगैरे वाचून आणखी स्पष्टीकरण द्यावेसे आत्तातरी वाटत नाही. आमची माघार धरावी.

बाकी ते चांगदेवी अहंकारीवगैरे वाचून आणखी स्पष्टीकरण द्यावेसे आत्तातरी वाटत नाही. आमची माघार धरावी. >> ते जनरल स्टेटमेंट आहे, इट्स नॉट अबाऊट यू ऑर एनीबडी एल्स एनिमोअर. रादर इट नेव्हर वॉज. असो.

तुमच्या मनाला वाटेल तेह्वा बोलू. :)

बाळ सप्रे's picture

8 May 2013 - 5:47 pm | बाळ सप्रे

जात रद्द व्हायला नकोय.. तिची रद्दी व्हायला हवीय

तोडलंत!!

प्यारे१'s picture

8 May 2013 - 5:50 pm | प्यारे१

व्हायला हवं वगैरे ठीकच पण होणार नाही.
जातीऐवजी आवडी निवडी, खेळ, पैसा, रंग, नेतृत्व, विचारसरणी अशा बर्‍याच गोष्टी वाद घालायला पुरेशा असतात. मुळात वाद घालणं हा नैसर्गिक गुण आहे. त्यातून वेगवेगळ्या भिंती तयार होणार हे वास्तव आहे.
वाद घातला जाणारच, वर्ग पडणारच. नाव काहीही द्या.

व्यक्ती तितक्या प्रकृती हे अगदी सत्य वचन आहे. माणूस हा 'जेव्हा त्याला हवं असेल तेव्हा' सामाजिक प्राणी असतो नाहीतर तो त्याचं 'एकट्याचंच विश्व' सांभाळत असतो.

ढालगज भवानी's picture

8 May 2013 - 5:57 pm | ढालगज भवानी

खरं आहे. एकदा का लेबलं लावली ना की मग डोळ्याला झापड बांधून ब्लेमींग-ब्लेमीग गेम खेळता येतो :)

प्यारे१'s picture

8 May 2013 - 6:00 pm | प्यारे१

आयला,

ही बामनं बी येकमेकात खच्चून भांडतेत की.

- प्यारे महार. ;)

ढालगज भवानी's picture

8 May 2013 - 6:01 pm | ढालगज भवानी

हाहाहा :) मस्त रे प्यारे. :)

लोटीया_पठाण's picture

8 May 2013 - 11:31 pm | लोटीया_पठाण

सिद्धार्थ जाधव आहे क हो य पिच्चर मधे दिलदार अन प्रेमल मुसलमानाच्या भुमिकेत??
एखदा स्वभिमनि ड्वाय्लोक मारून छाताडावर मुठ आदळण्याचा शिन असेलच

यशोधन वाळिंबे's picture

12 May 2013 - 10:38 pm | यशोधन वाळिंबे

कोकणस्थ = विरूद्ध (मागून पुढून झेरॉक्स)+ प्रेरणा (?) + नवनिर्मिती (?) :-)

अप्पा जोगळेकर's picture

12 May 2013 - 10:46 pm | अप्पा जोगळेकर

जातीच्या नावाने उलट्या काढणार्‍यांची अगदी किळस येते. वर 'मोजून मापून.....' ची डकवलेली इमेज पाहिली. अगदी वेडझ... जनरलायझेशन केले आहे.
चित्रपट चालावा यासाठी महेश मांजरेकर सुद्धा वाट्टेल ते करु लागलेत.

चंपाबाई's picture

4 Sep 2016 - 10:32 am | चंपाबाई

अस्ताव्यस्त समस्त वस्तू मिळुनी देशस्थ निर्मियले
स्वस्तात स्वस्त वस्तु मिळुनी कोकणस्थ निर्मियले

सुबोध खरे's picture

4 Sep 2016 - 11:21 am | सुबोध खरे

माणूसपणाची जात - ज्या जातीचे लोक सर्वाधिक कट्टर आणि प्रो अ‍ॅलर्जी असतात तीच ना?

ठ्ठो!!!!!!!!!! कं लिवलंय, कं लिवलंय!!!!

या लोकांची अस्मितागळवे सर्वांत सेन्सिटिव्ह असतात. माणूसपण वगैरे अ‍ॅब्स्ट्रॅक्ट भूमिका घेऊन आपण या जगतातलेच नाही अशा थाटात जालावर ठीकठिकाणी मताच्या पिंका टाकण्यापलीकडे यातल्या बहुसंख्यांकडून घंटा काही होत नाही. जिथेतिथे टर्मिनॉलॉजिकल अप्रोपिएटनेससाठी भांडणार्‍या या यूसलेस वैचारिक बांडगुळांचे आचार कसे असतात हे पाहिले तर कडवे जात्यभिमानी लोक आणि त्यांत फरक करवणार नाही.
बॅट मॅन साहेब
आमचा दंडवत स्वीकारा
काय लिहिलंय ? वा

चंपाबाई's picture

4 Sep 2016 - 11:42 am | चंपाबाई

तो श्लोक जुना आहे. आम्ही तो ल्हानपणापासून ऐकतोय.
त्याचे क्रेडिट आम्हाला देऊ नये.

सुबोध खरे's picture

4 Sep 2016 - 11:46 am | सुबोध खरे

आम्ही "पण" तो ल्हानपणापासून ऐकतोय.
त्याचे क्रेडिट तुम्हाला कोण देतये.

मन१'s picture

4 Sep 2016 - 1:10 pm | मन१

मूळ धागा मस्तच. मिश्किल.
आणि सतत शहाणपण शिकवू पहाणार्‍यांना , टोमणेबाजांना , तिरकस , हिणकस , तुच्छतेनं बोलणं हट्टाने रेटत राहणार्‍यांना , इतरांना इथला वावर असह्य करुन सोडणार्‍यांना बॅट्याने दिलेल्या टपल्याही मस्तच. अर्थात सुधारणेची आशा नाहिच फारशी.

संदीप डांगे's picture

4 Sep 2016 - 1:32 pm | संदीप डांगे

+10000

मन१'s picture

4 Sep 2016 - 1:10 pm | मन१

मूळ धागा मस्तच. मिश्किल.
आणि सतत शहाणपण शिकवू पहाणार्‍यांना , टोमणेबाजांना , तिरकस , हिणकस , तुच्छतेनं बोलणं हट्टाने रेटत राहणार्‍यांना , इतरांना इथला वावर असह्य करुन सोडणार्‍यांना बॅट्याने दिलेल्या टपल्याही मस्तच. अर्थात सुधारणेची आशा नाहिच फारशी.

बोका-ए-आझम's picture

4 Sep 2016 - 8:19 pm | बोका-ए-आझम

कोकणस्थ श्रेष्ठ की देशस्थ?

- (दोन्हीही नसलेला) बोका-ए-आझम

संदीप डांगे's picture

4 Sep 2016 - 9:17 pm | संदीप डांगे

तुम्ही बोकस्थ, तुम्हाला काय फरक पडतो? ;))

बॅटमॅन's picture

5 Sep 2016 - 11:38 am | बॅटमॅन

आजवरचा सर्वांत पॉवरफुल ब्राह्मण म्हणजे लंकस्थ दशग्रंथी, अर्थात रा.रा. रावणजी.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Sep 2016 - 8:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पर्शुराम बे. :P

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Sep 2016 - 10:53 pm | कैलासवासी सोन्याबापु

रावण :), शिवाच्या स्तुतीत रचलेले शिवतांडव स्तोत्र हे रावणाने रचल्याचे सांगतात, एखाद्या संथाधारी ब्राह्मणाच्या तोंडून ते ऐकणे म्हणजे पर्वणी असते

टीप :- संथाधारी ब्राह्मण म्हणजे ज्याला संस्कृत किंवा पौरोहित्य आवडते असे कोणत्याही जातीत जन्मलेले पवित्र आत्मे :) ज्यांनी प्रेमाने संथा घेऊन भाषेला आपलेसे केले आहे ते :)

भीमराव's picture

5 Sep 2016 - 5:40 pm | भीमराव

मला वाटलेल श्रीमान प. पु. कुर्हाडरामस्वामींचा नंबर पहीला असेल!

चंपाबाई's picture

5 Sep 2016 - 7:38 pm | चंपाबाई

ते मूळचे कोकणातले नव्हते... ते उत्तरेकडले . अतीभयाण संहारानंतर ते शांतीसाठी कोकणात गेले.. ( काही लोक म्हणतात, इतर राजांनी त्यांना शिक्षा म्हणून कोकणात स्थानबद्ध केले.) जनकाच्या दरबारात विष्णूंचे दोन अवतार आमनेसामने आले होते. ( म्हणजे विष्णूनेही आधीचा आयडी उडायच्या आतच नवा आयडी ओपन करुन ठेवला होता.)

त्यामुळे तो त्यांचा त्यांनीच उडवला. ;)

अभ्या..'s picture

7 Sep 2016 - 9:49 am | अभ्या..

बरोबर आहे की मग. ;)

.

मी पळालो.

अनिरुद्ध.वैद्य's picture

7 Sep 2016 - 10:51 am | अनिरुद्ध.वैद्य

ऊडला नै कै. म्हाभारतात्पन त हुते न? २ २ आय्डी.

चंपाबाई's picture

7 Sep 2016 - 11:22 am | चंपाबाई

ते सप्तचिरंजीवात आहेत ना ?

पैसा's picture

7 Sep 2016 - 11:27 am | पैसा

( म्हणजे विष्णूनेही आधीचा आयडी उडायच्या आतच नवा आयडी ओपन करुन ठेवला होता.)

तुमचं ट्रेड सिक्रेट सांगताय का! =))

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Sep 2016 - 10:47 pm | कैलासवासी सोन्याबापु

( म्हणजे विष्णूनेही आधीचा आयडी उडायच्या आतच नवा आयडी ओपन करुन ठेवला होता.)

=))