मिपा ट्रेंड्स

मराठमोळा's picture
मराठमोळा in जनातलं, मनातलं
26 Jun 2012 - 10:40 am

नमस्कार मंडळी,

डिस्क्लेमरः यात कुणाचीही थट्टा किंवा टर उडवण्याचा मानस नाही. केवळ गम्मत किंवा विनोदी अर्थाने हा लेख समजुन घ्यावा अशी अपेक्षा. (आजकाल डिस्क्लेमर टाकल्याशिवाय मिपावर काहीही लिहायंच म्हणजे पंचाईत होऊन बसते ;) )

माझा वेळ जात नाही म्हणून मी आजकाल काहीबाही लिहित असतो असा कुणाचा समज झालेला असेल तर तो समज निव्वळ खरा आहे. ;) हा धागा काथ्याकुटात लिहावा की साहित्यात असा पेच उभा होता, जनातल्या आणि मनातल्या विचारांचा आणि नव्या ट्रेंड्स चा आढावा घेण्याचा हा प्रयत्न म्हणून जनातलं मनातलं मधे लिहिला.

मिपा किंवा एकुण मराठी आंतरजालावर म्हणा, (तसे माझे ईतर विहिरी, डबके, महासागर, तलाव यांवर फारसं किंवा जाणंच मुळात नाही) काही ट्रेंड्स बघावयास मिळतात. हे ट्रेंड्स थोडक्यात खालीलप्रमाणे. ;)

कंपूबाजी
वैदीक काळापासून "कलयुग आला आहे" याप्रमाणे "कंपूबाजी केली जाते" असे गळे काढण्याचा ट्रेंड आहे. हे बर्‍यापैकी खरंही आहे. अहो माणूस हा समाजशील प्राणी आहे, तो एकटा कसा राहणार? मोठमोठाल्या कंपनीत सुद्धा गटबाजीनेच प्रमोशन होतात. म्हणून कम्पूबाजीला तुम्ही टाळू शकत नाही हे खरे आहे. त्यामुळे नवख्या लोकांची गोची होते हे कबूल. काही पळून जातात तर काही टिकतात, टिकणारे आंतरजालाबरोबर आयुष्यातही बरंच काही शिकतात. काही कंपू हे नवख्या लोकांवर हल्ला करतात कारण ते बर्‍यापैकी सेफ असतं. काही कंपू सभासद हे त्यांच्या कंपू सभासदांचेच लेख वाचतात किंवा त्यावर प्रतिक्रिया देतात. कोणत्याही कंपूत नसलात (हे अवघड आहे) तर मात्र कधी कधी चांगले लेख मागे राहुन जातात. नवख्या लोकांचा आणि नवकवींचा एक अघोषित कंपू असतो, त्यांचे लेख/कविता वाचणारे/प्रतिसाद देणारे तेच असतात आणि काही अंशी प्रामाणिक प्रतिसादक.

नवखे/न्युबीज्
हे सभासद फारच गोंधळलेले किंवा संभ्रमात असतात. ईतिहास माहिती नसल्याने काय प्रतिसाद द्यावा/लिहावे हे यांना समजतच नाही. कानात वारं घुसलेल्या वासरासारखं हे एकावर एक धागे काढत बसतात. सुरुवातीला काही मिपाकर प्रोत्साहन देतात पण त्याचा अर्थ चुकीचा काढून हे प्रत्येक बॉल सिक्सर मारायसाठीच आहे असे समजून बर्‍याचदा शुन्यावर ऑट होतात आणि मग टीममधून बाहेर फेकले जातात, चिडतात, कंपूबाजीच्या नावने किंवा संपादकांची कंप्लेंट करत फिरतात तर काही नविन कपडे घालून पुन्हा येतात. नवख्या लोकांसाठी आधी अभ्यास करुन डिफेंसीव कसे खळता येईल आनि चातकासारखी प्रतिसादांची वाट न पहाणे याचा विचार करणे फायदेशीर ठरु शकते. खरडवही, व्यनी यातून ओळखी वाढवाव्यात.

जुनी खोडे
यांना मराठी आंतरजालाचा पुर्वेपारपासून चालत आलेला ईतिहास माहित असतो, खरं तर ईतिहास घडवणारे हेच. पण कधी कधी आंतरजाल आपल्याच मालकीचे आहे असा गैरसमज करुन बसतात किंवा वेळेप्रमाणे/ नव्या प्रशासनाप्रमाणे बदलायला यांना उशीर होतो. मग कधी धाग्यांना पंख लागतात तर कधी प्रतिसादांना. भारताच्या पॉलिटीक्स प्रमाणे हे पण कधी कधी पार्टी बदलतात तर काही स्वतःची नविन पार्टी सुरु करतात, दुसर्‍या पार्टीच्या सदस्यांना त्यांच्यात सामील करुन घेण्यासाठी आमिषही कदाचित दाखवले जात असावे. सर्व साधारण सदस्य मग सगळ्याच पार्टीचे मेंबरं होतात.. जस्ट टु प्ले सेफ. यात बरेचसे असेही असतात की एकाच पार्टीशी एकनिष्ठ रहातात कारण ते तटस्थ रहाण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना खर्‍या अर्थाने पॉलिटीक्समधे रस नसतो. काही सदस्यांचे मराठी आंतरजालाशी निगडीत राहण्याचे कारण हे कायमच खर्‍या अर्थाने तेच रहाते - मायमराठीशी नाते जोडुन रहाणे, वाचनातून आनंद मिळवणे.

विचारजंत
विचारजंत कधीही कुणालाही होऊ शकतात. वेळोवेळी गोळी घेणे गरजेचे असते आनी ती गोळी वेळ आली की बरोब्बर मिळते देखील. मानवी स्वभाव आहे तो. कधी खेळकर, खोडकर, कधी एकदम सिरिअस. त्यामुळे एखाद्यास विचारजंत झाले असतील आणि तो तत्वज्ञान प्रसवत असेल तर खुशाल ते करु द्यावं. एक फेज असतो तो.. सरतो. पण काही लोकांचा आजार गोळी घेऊन देखील जात नाही. मग ते प्रत्येक लेख/प्रतिसाद यांचा नीट अभ्यास करुन त्यावर लेखातल्या/प्रतिसादतल्या विचारांशी विरुद्ध मते मांडायचा प्रयत्न करु लागतो. म्हणजे तुम्ही म्हणालात की मिरची तिखट असते तर त्यावर हे लोक्स मिरची तिखट नसुन सापेक्षरित्या तुलना केल्याने ती तुम्हाला तिखट वाटते, अन्यथा ती गोड असते असे काहीसे म्हणतीत.
यांच्या मागे फॅन्स किंवा सहमतीची मेंढरं अपेक्षित असतात कारण त्यांना लेखांवर प्रतिसाद नोंदवायचे असतात (परतफेड होईल म्हनून) म्हणून विचार न करता बाडीस होतात.

वाचक/प्रतिसादक
हा वर्ग फार मोठा आहे. वाचनमात्र असलेल्या लोकांना एखादी मेस लावलेली असेल तर आज जे बनवलय तेच खाण्यावाचून जसा पर्याय नसतो तसा जे लिहिलय ते वाचण्याशिवाय गत्यंतर नसते. प्रतिसादक मात्र बर्‍याच प्रकारचे असतात. काही लोकं अतिशय प्रामाणिक असतात. ते कधीही तिरकस प्रतिसाद देत नाहीत, केवळ प्रोत्साहनपर "छान", "आवडले" असे प्रतिसाद देऊन मोकळे होतात तर काही केवळ टाईमपास करणारे अस्तात, काड्या टाकून पॉपकॉर्न घेऊन बसतात. बर्‍याचदा आयुष्यातील टेंशन किंवा फ्रस्टेशन काढण्यासाठीदेखील प्रतिसाद दिलेले असतात. म्हणजे कितीही प्रामाणिकपणे लेख किंवा एखादी प्रतिक्रिया असेल तर त्यावर आगपाखड कशी करता येईल असे हे प्रतिसाद असतात, काड्या टाकणार्‍यांसाठी हे फार मोठे गिर्‍हाईक असते.

असो... टंकाळा आल्याने उरलेले अध्याय जमल्यास पुढील भागात.. :)

आपला,
मराठमोळा

हे ठिकाणवावरविनोदप्रकटनविचारप्रतिसाद

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

26 Jun 2012 - 10:47 am | प्रचेतस

एकदम अचूक निरीक्षण.
हहपुवा झाली.

पुढचे अध्याय येऊ द्यात लवकर.

श्रीरंग_जोशी's picture

26 Jun 2012 - 10:49 am | श्रीरंग_जोशी

तुमच्या फटकेबाजीने मैदानाचा कुठलाही कोपरा सोडलेला नाहीये.

फारच मार्मिक शब्दात तुम्ही सत्यपरिस्थिती मांडून उच्च प्रतीची विनोदनिर्मिती केलेली आहे. नाहीतर आजकाल विनोदाच्या नावाखाली काय काय चालतं.

तूर्तास एवढेच. याचे जबरी विडंबन केले जाईल हे नक्की. पण वरिजनल ते वरिजनल ;-).

लेख वाचुन मी तर एकदम ऑट बाबा :P

मृत्युन्जय's picture

26 Jun 2012 - 11:04 am | मृत्युन्जय

हाहाहा. तरीही बरेच ट्रेंड्स राहुन गेलेत हो ममो. पुभाप्र

शिल्पा ब's picture

26 Jun 2012 - 11:05 am | शिल्पा ब

छान. आवडले.

जोयबोय's picture

26 Jun 2012 - 11:06 am | जोयबोय

संपादक महोदय,
मराठमोळा यांच्या वरिल लेखावरुन आपणास विनंती करतो की तुम्ही यात लक्ष घालुन 'कंपू' नावचा नवीन दालन उघडावे किजेणेकरुन सर्वांना कम्पुबाजी करता येयील.

साभार

jaypal's picture

26 Jun 2012 - 12:40 pm | jaypal

अजिबात गरज नाही. बघता काय सामील व्हा.( तुम्ही ईथे येत रहा आपोआपच कंपुचा भाग व्हाल.)
टॉमबॉय
जय सितामाँ

उरलेल्या अध्यायांच्या प्रतिक्षेत.

सुप्रसिद्ध अध्याय फेम आणि नवीन ट्रेंड सेटर माननीय सूड यांच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jun 2012 - 12:36 pm | अत्रुप्त आत्मा

अध्याय पहिला परंपरांचा,लिहू पाहतो मराठमोळा...।
सुरु जाहली अता लढाई,उडला पहिला तोफगोळा॥

कपूबाजांचा कापला गळा,रक्त वाहे भळाभळा...।
कंपु-बाजहो सांभाळोनी,या धाग्यावर सावध खेळा॥

नवख्यांचाही नवखा कंपू,पाणी पाहे बाहेर पंपू...।
संधी मिळताच एखाद्या तटी,नवखा पाहे आत जंपू॥ ;-)

जुन्या खोडांची पाळेमुळे,शोधिली जणु घुशिची बिळे...।
काय ते प्रेम भळभळे,अंतरीची मजा पहाता॥

विचारजंती योग्य निरिक्षण,नुसतेच ओझे सव्वा मणं..।
आत वाजती घणघणा घणं, फुसके बार तैश्यापरी॥

वाचकू/प्रतिसादकू लोकं,हॅपी बड्डे'चा सजवला केकं।
सुरी लागो या भितीने,कटावयाचा राहिलेला...॥

अध्याय पहिला बहुज्ञात,वाचला जणू बुभुक्षित...।
पुढच्याची बीजे त्यात,साष-टांग नमन हो मराठमोळा॥

बोला....तुंड-लिकाला वरून हा..ण्ली विटकर....
श्रीहास्यदेव लोळा...राम
म.मो.महाराज...की....जय॥

टवाळ कार्टा's picture

26 Jun 2012 - 12:43 pm | टवाळ कार्टा

_/|\_
भारी

अमितसांगली's picture

26 Jun 2012 - 12:47 pm | अमितसांगली

भारी....

म्हणवितात अत्रुप्त आत्मा पण अध्यायाने त्रुप्त केले सर्वांना :)

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jun 2012 - 6:51 am | अत्रुप्त आत्मा

खरच एक्दम झकास

अमृत

रणजित चितळे's picture

26 Jun 2012 - 2:03 pm | रणजित चितळे

वा काय छान मस्त.

-----------------------------
मी कोणत्या गटात मोडतो बरें.

स्पंदना's picture

26 Jun 2012 - 3:33 pm | स्पंदना

बोला....तुंड-लिकाला वरून हा..ण्ली विटकर....
श्रीहास्यदेव लोळा...राम
म.मो.महाराज...की....जय॥

आमचाबी जय!!!

नाखु's picture

27 Jun 2012 - 8:47 am | नाखु

पहिले नमन गुरुदेवा...
दुसरे ते म.मो. ना कारण मात्र लिखाणाशी...
आता आम्हा वाचकांना मेजवानी "जुगल बंदीची...

jaypal's picture

26 Jun 2012 - 12:43 pm | jaypal

भाग वाचता वाचता संपला. आता अध्यायांची संख्या वाढवुन नुकसान भरपाई करावी. ;-)

टवाळ कार्टा's picture

26 Jun 2012 - 12:44 pm | टवाळ कार्टा

"वाचनमात्र असलेल्या लोकांना एखादी मेस लावलेली असेल तर आज जे बनवलय तेच खाण्यावाचून जसा पर्याय नसतो तसा जे लिहिलय ते वाचण्याशिवाय गत्यंतर नसते."
अगदी खरे आहे :(

टंकाळा करु नका, पुढचा अध्याय येउदे लवकर!

अमृत's picture

26 Jun 2012 - 1:25 pm | अमृत

असंच म्हणतो.

अमृत

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Jun 2012 - 3:22 am | निनाद मुक्काम प...

हेच म्हणतो मी
टंकाळा हा शब्द जाम आवडला.
कधीतरी कुठेतरी हा शब्द नक्की वापरला जाईल.
पुढच्या अध्यायाच्या प्रतीक्षेत

५० फक्त's picture

26 Jun 2012 - 1:31 pm | ५० फक्त

छे सगळा धागा वाचला, विनोदी असं काही जाणवलंच नाही, सगळं कसं मानसरोवराच्या पाण्यासारखं स्वच्छ, अगदी नितळ थेट खालच्या तळाचे दगड दाखवणारं, पण तेवढंच फसवं. आपण जवळ जाउन फोटो काढावा म्हणलं तर कॅमेराच आत जाउन पडायचा.

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Jun 2012 - 1:35 pm | llपुण्याचे पेशवेll

छान लेख.
(मिपाचा मेसकरी मेंबर) पुपे

चौकटराजा's picture

26 Jun 2012 - 1:53 pm | चौकटराजा

सगळ्या मुद्द्यात कंपूबाजी हाच मुद्दा पहिला डोसक्यातून का आला असावा ? ऑं ?

हात फारच आखडता घेतला आहे असे वाटते.
एकट्या 'प्रतिसादक' कॅटेगरीवरच संपुर्ण लेख* पाडला जाउ शकतो तिथे त्याचा वाटेला फक्त चार ओळीच? ;)
अधिक वेळ न दवडता उरलेला वेळ सत्कारणी लाव पाहु. :)

*अभ्यास दांडगा असला तर लेखमाला सुद्धा.

अन्या दातार's picture

26 Jun 2012 - 3:12 pm | अन्या दातार

हाहा. छान चाललंय. माझ्याच या धाग्याची आठवण आली ;)

प्रास's picture

26 Jun 2012 - 7:14 pm | प्रास

झैरात झैरात

सोत्रि's picture

26 Jun 2012 - 8:48 pm | सोत्रि

नुकतेच विजुभौना भेटला होतात काय हो प्रास? ;)

- (६५वी कला जमणारा) सोकाजी

प्रभाकर पेठकर's picture

26 Jun 2012 - 3:30 pm | प्रभाकर पेठकर

आपण कुठल्या वर्गवारीत बसतो ह्या विचारांमध्ये गुरफटलो आहे. कदाचित, पुढील भागात येईल एखादी वर्गवारी.....

स्पंदना's picture

26 Jun 2012 - 3:32 pm | स्पंदना

बर !

पैसा's picture

26 Jun 2012 - 5:11 pm | पैसा

ममो, राहिलेला वेळ लवकर सत्कारणी लावा बघू! आणि अ. आ. ची कल्पनाशक्ती पण चौखूर धावते आहे, बुवा, तुमच्या मिपावार्ता का बंद पडल्या हो?

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jun 2012 - 5:20 pm | अत्रुप्त आत्मा

@बुवा, तुमच्या मिपावार्ता का बंद पडल्या हो? >>> त्ये लै कष्टाचं,आणी डोकं झिजवणारं काम आहे... आणी आम्चाही आळशी पणा नडलाय.

तिमा's picture

26 Jun 2012 - 5:30 pm | तिमा

जालावरी मिपाच्या का रोज पाय नेती
मी कोणत्या गटाचा, हे कोण काय पुसती
नसे मात्र वाचक, नसे खोड, हस्ती
नसे कंपूबाज, हवी फक्त मस्ती
अधाशी मनाला ती गोड पाककृती
विचारी मना,का मला जंत होती

मला कंपूत प्रवेश मिळाल्यास कंपूच्या आत कंपूबाजी अजिबात करणार नाही...

५० फक्त's picture

26 Jun 2012 - 6:55 pm | ५० फक्त

कंपुच्या आत कंपुबाजी केली नाही तर बाहेर कशी करणार ओ, आधी नेट प्रॅक्टिस नको का करायला ?
रच्याकने वेलकम टु वेटिंग लिस्ट.

श्रीरंग_जोशी's picture

26 Jun 2012 - 7:07 pm | श्रीरंग_जोशी

बरोबर आहे आपले म्हणणे, शपथेत नाही करणार असे म्हंटले की ती गोष्ट लोक आवर्जून करतात.

हे रच्याकने म्हणजे काय हो?

मला येथे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकाल का?

सुनील's picture

26 Jun 2012 - 7:26 pm | सुनील

हे रच्याकने म्हणजे काय हो?

तो तत्सम शब्द आहे. सर्व मराठी संस्थळांच्या आजीकडून उचलेला ;)
रच्याकने = स्त्याच्या डेने. = by the way

ह्याला देश्य पर्याय आहे बादवे!

मोहनराव's picture

27 Jun 2012 - 1:31 pm | मोहनराव

असे संस्थळावरचे तत्सम शब्द व अर्थ असा कोणीतरी धागा काढावा, मार्गदर्शक ठरेल.
अगोदरच असेल तर लिंक द्यावी.

बॅटमॅन's picture

26 Jun 2012 - 8:46 pm | बॅटमॅन

बाय डेफिनिशन कंपूबाजी ही आपापल्या कंपूत करायचीच नसते :) ती कुणा बाहेरच्या माणसासमोरच करायची असते.

श्रीरंग_जोशी's picture

26 Jun 2012 - 9:19 pm | श्रीरंग_जोशी

मला असं वाटू लागलंय की शिकवणी लावल्याखेरीज हे प्रकरण मला झेपणार नाहीये अन परीक्षेत नापासाचा शिक्का बसणार आहे. वेळ च्या वेळी शिकवणी लावलेली बरी.

याबाबत आपणांस ठाऊक असल्यास कृपया मार्गदर्शन करावे...

खेडूत's picture

27 Jun 2012 - 12:39 am | खेडूत

अजून अनेक शब्द आणि बराच अभ्यास बाकी आहे.
आता २०१३ च्या सी ई टी ची तयारी करा..कंपू च्या प्रवेशासाठी!

अहो पाण्यात पडला की पोहणे येऊ लागते तसेच आहे हे....अजून वेगळे काही सांगण्याची गरज नै :)

श्रीरंग_जोशी's picture

27 Jun 2012 - 6:09 am | श्रीरंग_जोशी

नव्या गोष्टी शिकताना धडपडतोय, अडखळतोय पण मनापासून आस्वाद घेतोय...

मिपा माझ्यासाठी ज्ञानाचा, मनोरंजनाचा खळाळता झरा आहे, जमेल तेवढे प्राशन करावे, झेपत नसेल तर दुरून गंमत बघावी...

मिपा झरा वगैरे नाही वाटला कधी हे एक व्हाईट वॉटर राफ्टिंग आहे लेव्हल ४ चं, कधी पाणी कुठुन कसं येईल आणि कुठं नेउन आदळेल याची काही खात्री नाही इथं,

श्रीरंग_जोशी's picture

27 Jun 2012 - 8:05 am | श्रीरंग_जोशी

प्रतिक्रिया आवडली!!

खडीसाखर's picture

26 Jun 2012 - 6:14 pm | खडीसाखर

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत :)

हम्म....
आज मिपाच्या मेसमध्ये हा लेख आलाय का?
छान. मस्त. ;)

म्हटल्यावर मेसमध्ये यील ते आपलं.

काल केलं होतं कुळथाचं पिठलं नि भात्..........ते पाहिल्यावर सगळी नातवंडं हाटीलात जेवायला उधळली.
कसलं रांधप न् काय!

सोत्रि's picture

26 Jun 2012 - 8:52 pm | सोत्रि

मग ते प्रत्येक लेख/प्रतिसाद यांचा नीट अभ्यास करुन त्यावर लेखातल्या/प्रतिसादतल्या विचारांशी विरुद्ध मते मांडायचा प्रयत्न करु लागतो. म्हणजे तुम्ही म्हणालात की मिरची तिखट असते तर त्यावर हे लोक्स मिरची तिखट नसुन सापेक्षरित्या तुलना केल्याने ती तुम्हाला तिखट वाटते, अन्यथा ती गोड असते असे काहीसे म्हणतीत.

हा षटकार फारच आवडला :)

- (ट्रेन्डी) सोकाजी

>>जुनी खोडे
>>यांना मराठी आंतरजालाचा पुर्वेपारपासून चालत आलेला ईतिहास माहित असतो, खरं तर ईतिहास घडवणारे हेच.

जसे कुठल्याही समजाची प्रगल्भता यावरून समजली जाते की त्यात ज्येष्ठ सदस्यांना कसे वागवले जाते तसेच संस्थळांचेही असते.

त्यांनी घडवलेल्या इतिहासापासून स्फूर्ती घेऊन नवा इतिहास घडवणारे निर्माण होत असताना 'जुनी खोडे' असे संबोधून त्यांची हेटाळणी करणे केवळ निषेधार्ह...

'हेचि फळ काय मम तपाला' अशी त्यांची भावना होत नसेल तर आश्चर्य...

मराठमोळा's picture

27 Jun 2012 - 5:47 am | मराठमोळा

हाहाहा...

ज्येष्ठ म्हणजे आंतरजालीय वयाने की खर्‍या शारीरीक वयाने हो जोशीसाहेब? ;)

श्रीरंग_जोशी's picture

27 Jun 2012 - 5:53 am | श्रीरंग_जोशी

मिपावरील सेवाज्येष्ठता व इतिहास घडविणारे त्यांचे योगदान...

सध्या बरीच शांतता आहे त्यामुळे वादळाची शक्यता वाटतीये...

ममो - जरा जपूनच!!

>>मिपावरील सेवाज्येष्ठता व इतिहास घडविणारे त्यांचे योगदान...
कसले भारी भारी शब्द वापरता राव तुम्ही.

नाना चेंगट's picture

27 Jun 2012 - 12:37 pm | नाना चेंगट

हं अजुन बरीच मंडळी बाकी आहेत

sneharani's picture

27 Jun 2012 - 12:53 pm | sneharani

भरपुर निरीक्षण केलेलं दिसतय...अजून बरच लिहता येईल.
:)