मिपा ट्रेंड्स - २

मराठमोळा's picture
मराठमोळा in जनातलं, मनातलं
29 Jun 2012 - 10:37 am

भाग १

नमस्कार मंडळी,
मला ही लेखमला बनवायची नाहीये.. (कारण अभ्यास दांडगा नाही, मी अधुन मधुन रजा घेत असतो)
उर्वरीत अध्याय लिहिण्याचा प्रयत्न करतोय. चु.भु.दे.घे. मागील भागातील डिस्क्लेमर इथेही लागू आहे. :)

वाचक/प्रतिसादक अध्याय टंकाळा आल्याने अर्धाच राहिला होता.. त्याचा विस्तार
वाचक/प्रतिसादक विस्तार
मागील अध्यायात आपण काडीसारक, प्रामाणिक आणि फ्रस्टेटेड प्रतिसादक पाहिले. अधुन मधुन फेक प्रतिसादांचा देखील ट्रेंड येत असतो. म्हणजे व्यनीतुन प्लॅन ठरवून मग परस्पराविरुद्ध प्रतिसाद दिले जातात, बर्‍याचदा आपल्याच कंपूतील व्यक्तीच्या धाग्यावर हे केलं जातं. याने धाग्याची टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा मुद्दाम वादविवाद वाढवले जातात. हाच प्रकार बर्‍याचदा दुसर्‍या कंपुतल्या सदस्याच्या धाग्याचा खरडफळा करण्यासाठीही वापरला जातो, इथे संपादकांची मर्जी संभाळून प्रतिसाद दिले जातात, म्हणजे संपादकाला हे प्रतिसाद ना निगलते बनते है ना उगलते. म्हणजे हे प्रतिसाद उडवताही येत नाहीत कारण ते धोरणात बसतात आणि ते ठेवायची ईच्छाही नसते.

काही लोकांना "मीच माझे करतो कौतुक" असे म्हणायची सवय असते.. म्हणजे उगाचच स्वतःचा धागा वर आणणे (काही लोकं स्वतःचा डु आयडी काढुन त्याने स्वतःच्या धाग्यावर प्रतिसाद देताना दिसतील), किंवा प्रत्येक प्रतिसादाला धन्यवादाचा प्रतिसाद देऊन संस्थळाचा "रिकामा" (असे समजून) असलेला डेटाबेस भरणे. एखाद्या धाग्यावर खळबळ माजवायची असेल तर काही झोपलेल्या आक्रमक आयडींच्या पोस्ट बॉक्सात लिंका चिकटवल्या जातात.

काही प्रतिसादक हे अतिशय विचारी/बुद्धीजीवी असतात. काथ्याकुटावर हे भरपुर संख्येने आढळतात. विषयाचा पुर्ण विचार करुन त्यावर संयत भाषेत प्रतिसाद मांडणे यांचा सर्वात मोठा गुण असतो. बर्‍याचदा मूळ लेखापेक्षा यांचे प्रतिसाद जास्त प्रगल्भ असतात आणि प्रसिद्ध होतात.

काही प्रतिसादक लॅकोनिक (मराठी शब्द?) असतात. एखाद्या दुसर्‍या ओळीतच हे सर्व काही सांगून जातात किंवा अपमान देखील करतात. यांचा प्रेझेंस ऑफ माईंड चांगला असतो पण कधी कधी ओवर काँफीडेंस मधे पंख लागून आणि तम्बी मिळून वायादेखील जातो.

काही प्रतिसादक हे कायमच तुच्छता मनात ठेवून गोड प्रतिसाद देतात.. म्हणजे यांचे "छान" हे कारल्याची भाजी आवडत नसताना कुणी जबरदस्ती तोंडात कोंबली तर तोंड जसे होईल तसे करुन दिलेला असतो. किंवा आधी "भट्टी मस्त जमली आहे", "सु..रे..ख..", "भाषाशैली उत्तम आहे" असे शब्द/वाक्य वापरण्याचा ट्रेंड होता तेव्हा मनात "कसली डोंबलाची भट्टी? याक थु" , "कसलं सुरेख? छ्या", "कसली भाषाशैली? ओकारी येतेय" असे मनात काहीसे चालु असते.

धागाकर्ते
अरे बापरे.. ईमिडिएट रिकर्सीव फंक्शन ;) (असो.. ममो.. खरं लिही.. प्रामाणिकपणे लिही ;) )
हा देखील एक फार मोठा अध्याय आहे. कुठुन सुरुवात करावी हेच कळत नाही. :)
बेचैन धागाकर्ते: : हा ट्रेंड झुरळांप्रमाणे जगात कितीही उलथापालथ झाली तरी स्वतःचे अस्तित्व कायम ठेवुन आहे. हे लोक्स सर्वांना वीट आणतात. हे एकावर एक - अनेक असे रोज स्वतःच्याच कपड्यांचे इतके धागे उसवतात की शेवटी नग्नावस्थेपर्यंत पोहोचतात. मिपाकरांकडे शाबासकी देणार्‍या हाताखेरीज पोकळ बांबूदेखील आहेत हे त्याना पार्श्वभागावर वळ उठले की मग कळते.

एकोळी टाईपः : घरात येताजाता कधी बडीशोप तोंडात टाकावी तसे वृत्तपत्रातील एखाद्या बातमीची लिंक किंवा एखादा क्लिष्ट विषय स्वतःचे विचार न मांडता धाग्यात चिटकवून तुम्हाला काय वाटते? असे विचारुन निघुन जाणारे. स्वतःचा धागा हे स्वतःदेखील परत कधी उघडतात की नाही माहित नाही.

खळबळ माजवणारे: : मराठी आंतरजाल, स्त्रि-पुरुष भेद करणारे, पुणे-मुंबई वाद, अनिवासी यांच्याशी निगडीत असेल तर उत्तमच. हे धागे टाकणारे आणि त्यावर प्रतिसाद देणारे आयडी ईतर वेळी कुठे असतात असा तुम्हाला प्रश्न पडेल. इथे भरपुर करमणुकीची संधी असते. हो पण मग हसता हसता कधी अचानक सिरिअस होऊन यात सामील झालात तर मग धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतयं अशा परीस्थित तुम्ही सापडु शकता.

स्वांतसुखाय : हे धागे वाचले की आंतरजालावर आल्याचे सार्थक होते, आंतरजालावर सगळे धागे असेच का नाहीत असा प्रश्न पडतो. पण हे म्हणजे अजिबात भर्‍ष्टाचार न कराणारे सरकार मिळावे अशी अपेक्षा ठेवल्यासारखे आहे. या लेखांना प्रतिसाद नेहमी कमी मिळतात, पण वाचकांचं समाधान फार मोठं असतं.

शतकी धागे : शतकी, द्विशतकी किंवा त्रिशतकी धागे हे नेहमीच दंगा घालणारे धागे असतात. अधुन मधुन असे धागे येतात आणि जबरदस्त हिट होतात. मिसळीला फोडणी हवीच ना. या धाग्यातुन धागाकर्त्याला किंवा प्रतिसादकाला केवळ एकच हेतु साधायचा असतो तो म्हणजे दंगा, असे धागे मिळाले की दंगेखोर एखाद्या लहान मुलाला खेळण्याच्या दुकानात नेउन सोडलं तर ते जसं उधळेल तसे उधळतात कारण इथे बरीच मोकळीक असते. संस्थळाची ट्यार्पी मेंटेन करायला हे धागे मदत करतात.

मी लै शाना धागे : मला फार कळतं आणि मी फार ज्ञानी आहे, बाकीचे अकलेचे कांदे आहेत अशी समजूत असणार्‍या लोकांचे हे धागे असतात. पुर्वी विकिपेडीया वगैरे वरुन माहिती ट्रांसलेट करुन बर्‍याचदा अनेक बुद्धीजीवी धागे निघत आणि लोकं "वा काय ज्ञानी आयडी आहे" असे म्हणत. काही धागे कुठल्यातरी स्टॅटीस्टीक्स उचलुन आणून काहीतरी गंभीर चालु आहे हे दाखवुन मी समाजासाठी किती मोलाचं कार्य करतो/ते आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. खरं तर या सगळ्यात काहीच तथ्य नसतं पण हे चालु ठेवायचं असतं ईतकच. तत्त्वज्ञानी लोकांबदल आपण मागील भागात विचारजंत या अध्यायात पाहिलेच आहे.

कलादालन्/पाकृ : हा सर्वात प्रामाणिक आध्याय आहे. इथे प्रत्येकामधले मुल स्वतःचे कौतुक करुन घ्यायला येत असते. आणि प्रतिसादही बर्‍याच प्रमाणात प्रामाणिक मिळतात. पाठ थोपटली जाते. एकापेक्षा एक वरचढ कला असलेले लोकं पहायला मिळतात, कौतुकही वाटते. खल्लास, वारल्या/खपल्या गेले आहे, तोंपासु, बादलीभर लाळ गळाली आहे, जहबहर्‍या, ई.ई. प्रतिसादांचे टेम्प्लेट मिळाले तर प्रतिसादक नक्कीच खुश होतील. मध्यंतरी पाकृ विभागात प्रत्येक पाकृ ही अंडे घालुन किंवा न घालता कशी करता येईल असा एक ट्रेंड होता. ;)

तुर्तास इतकेच.
धन्यवाद.
आपला मराठमोळा.

हे ठिकाणवावरविनोदप्रकटनविचार

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

29 Jun 2012 - 10:55 am | श्रीरंग_जोशी

ममो -पुन्हा एकदा तशीच जोरदार फटकेबाजी. मला तर सच्याच्या १९९८ मधल्या शारजातील शतकांची आठवण आली.
आपण तर येकदम फ्यान झालोय बुवा.

आता तुंम्हाला नेहमी चाहत्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली खेळावे लागणार असं दिसतय.

च्यायला , भारी अन अभ्यासपुर्ण धागा आहे हा :)
मला मि . पा. वर माझ्या धाग्याच शतक कस कराव ? हा प्रश्न बरेच दिवसापासुन भेड्सावत आहे ;)

( शतकी धाग्याच्या प्रतिक्षेत पियु ;)

अन्या दातार's picture

29 Jun 2012 - 11:15 am | अन्या दातार

मी (अन्या दातार) व मी-सौरभ सुपारी घेऊ की. ;)

ओ आमच्या येरियात उगा डोकं नाय चालवायचं, आधीच बोल्तोय.

अवांतर - आमच्याकडे आंतरजालीय हुतात्मा / बलिदान/ सती जाण्याची सोय करुन मिळेल.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jun 2012 - 12:51 pm | अत्रुप्त आत्मा

आमच्याकडे आंतरजालीय हुतात्मा / बलिदान/ सती जाण्याची सोय करुन मिळेल.

सती जाणारीच्या ओटीचे सामान मिळेल.

सुहास..'s picture

29 Jun 2012 - 1:51 pm | सुहास..

सती जाणारीच्या ओटीचे सामान मिळेल. पुढे " आमची मसणाखेरीज कोठे ही शाखा नाही " असे हवे ;)

मृत्युन्जय's picture

29 Jun 2012 - 1:48 pm | मृत्युन्जय

अवांतर - आमच्याकडे आंतरजालीय हुतात्मा / बलिदान/ सती जाण्याची सोय करुन मिळेल

स्तुत्य उपक्रम आहे. पण " नवरा" आयडी तुम्ही कसा शोधणार / ठरवणार ते सांगा ;)

ती जबाबदारी पूर्णतः आंतरजालीय सती जाणारीची व तिच्या कंपूची राहील. वर म्हटल्याप्रमाणे आम्ही 'फक्त ओटीचे सामान' पुरवू. नंतर गरज भासल्यास तिच्या खवत डकवण्यासाठी छानशी सतीच्या शिळेची इमेज बनवण्याचे काम पैपलाईनमध्ये आहे.

नाना चेंगट's picture

29 Jun 2012 - 1:58 pm | नाना चेंगट

सती च्या जागी सता असेल तर ओटी कशी असेल?

सती केवळ पँट शर्ट घालणारी असेल तर ओटीत खणाच्या जागी काय द्याल?

नाना चेंगट's picture

29 Jun 2012 - 1:59 pm | नाना चेंगट

सती च्या जागी सता असेल तर ओटी कशी असेल?

सती केवळ पँट शर्ट घालणारी असेल तर ओटीत खणाच्या जागी काय द्याल?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

29 Jun 2012 - 6:22 pm | विश्वनाथ मेहेंदळे

सोप्पे आहे. खरा आयडी सती आणि डु आयडी नवरा ? म्हणजे डु आयडी चा गेम झाला की खरा आयडी पण गायब ;-)
काय सूड, वार्ता बराबर ??

दोनदा झाला प्रतिसाद काढतेय :)

धाग्यावर प्रतिसाद संख्या वाढवायचा क्षीण प्रयत्न... :-D

:-) खुस्खुशीत.

अमृत

अमितसांगली's picture

29 Jun 2012 - 12:23 pm | अमितसांगली

घणाघाती पण अभ्यासपूर्ण फटकेबाजी.....

चौकटराजा's picture

29 Jun 2012 - 1:28 pm | चौकटराजा

दागाकरता वर म्न्ह्नन्तुया क्यी म्या ह्येची मालिका करनार नाय व खाली म्हनुया तूर्तास एवढे पुरे
आरं बाबा तू काय समाप्त का म्हन्ला न्हाई ? आमाला परत छळायचा इचार हाय काय ?

नाना चेंगट's picture

29 Jun 2012 - 1:34 pm | नाना चेंगट

एकेका प्रकाराचे उदाहरण दिले असते तर समजायला नीट मदत झाली असती असे आमचे मत आहे. :)

sneharani's picture

29 Jun 2012 - 1:42 pm | sneharani

आंजावरची नजरेसमोरील उदाहरणे घालून वाचून पहा, बर्‍यापैकी समजेल अस आमचं मत आहे ;)

नाना चेंगट's picture

29 Jun 2012 - 1:48 pm | नाना चेंगट

आम्ही बाळगत असलेली समजुत आणि लेखकाची समजुत यांत फरक असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने लेखकाचे मत जाणण्याची मनीषा बाळगतो.

ए असं पॉईंट आऊट नका करु बुवा ..... कानकोंड व्हायला होतं :(

मराठमोळा's picture

29 Jun 2012 - 4:16 pm | मराठमोळा

नॅन्स,
>>आम्ही बाळगत असलेली समजुत आणि लेखकाची समजुत यांत फरक असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने
शक्यता नाही.. आपली समजुत एकच आहे अशी खात्री देतो, पर्‍याला विचार. आणि उदाहरण देऊन मी सता जाऊ का सुडकडुन ओटी भरुन? ;) माझ्यासाठीच विचारलं होतंस का?

हे पहा ममो, सता जाणार्‍यास काय ओटीचे सामान द्यावे यासाठी वेगळा काकू*चा धागा काढणार आहोत. तोवर 'सर्वोपचारार्थे अक्षतान् समर्पयामि' म्हणून मूठभर अक्षता देणेत येतील त्या घेवून सता जावयाची तयारी असेल तर खुश्शाल जावे.

अमसू**: आमचे येथे फक्त साहित्य मिळेल ओटी भरणे वैगरे आपापल्या कंपूकडून करुन घेणे.

* काथ्याकूट
**अत्यंत महत्त्वाची सूचना.

प्रभाकर पेठकर's picture

29 Jun 2012 - 2:00 pm | प्रभाकर पेठकर

प्रतिसादकांपेक्षा धाग्यांचे विश्लेषण जास्त अभ्यासपूर्ण आहे असे निरिक्षण नोंदवून ठेवतो.

पैसा's picture

29 Jun 2012 - 5:25 pm | पैसा

अत्यंत अभ्यासू धागा. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

संजय क्षीरसागर's picture

29 Jun 2012 - 6:48 pm | संजय क्षीरसागर

तुमचं निरिक्षण आणि एकेक प्रतिसाद खळखळून हसवून गेले, लगे रहो.

एव्हढ्या भांडवलावर डॉक्टरेट मिळाया काय बी हरकत न्हाय.
संम न विचार करुन हा बार उडवुन द्यावा.

मराठमोळा's picture

29 Jun 2012 - 6:57 pm | मराठमोळा

डॉक्टरेट? हाहाअहा. नको बुवा...
अजुन मान्यवरांचे प्रतिसाद बाकि हाय.. ते येणार नाहीत याचीबी खात्री हाय :)
सत्यमेव जयतेच्या पहिल्या एपिसोडमधे नायका ते दोन बिचारे पत्रकार.. डाक्टरांच पितळ उघडं पाडुन सोताच आयुष्यभर कोर्टाच्या चक्रा मारत बसले तसच माझं व्हनार हाय :) लोकशाही हाय ही..

हा पण धागा उत्तम.
धाग्यांच्या प्रकारामध्ये आणखी काही प्रकार म्हणजे..
मिपा बातमीपत्र धागे (लई पॉप्युलर होतात, आत्माराम साहेब जिंदाबाद))
संस्थळविचार धागे (समुद्र, तळं, डबके वगैरे किंवा राजा प्रजा, विदुषक)
मदिरा धागे ( सोत्रींचा यामध्ये हातखंडा आहे.. शुक्रवारी बहुतेकवेळा येतो व सगळ्यांची दैना उडवतो.)
अजुन बरंच काही... ममो तुर्तास इतकेच म्हणुन थांबु नका, यु नो टंकाळा. ;)

अतिसुन्दर

असे धागे अलिकडे का बरे येत नाहीत

--

सगळे वाचक हा धागा वाचताना स्वतःवरच हसतायत

अर्धवटराव's picture

30 Jun 2012 - 2:56 am | अर्धवटराव

एकदम जबराट.

अर्ज किया है...
स्वगत :
इर्शाद, इर्शाद...

प्रकटः
एक धागा ममोचा | शंभर धागे मिपाचे ||
भयकारी हे सत्य वाचका, तुझीया अभिव्यक्तीचे ||

अर्धवटराव

गोंधळी's picture

30 Jun 2012 - 9:23 pm | गोंधळी

मजा आली राव.

गोंधळी's picture

30 Jun 2012 - 9:28 pm | गोंधळी

.

आशु जोग's picture

30 Jun 2012 - 11:02 pm | आशु जोग

एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे

>>>मला ही लेखमला बनवायची नाहीये.. (कारण अभ्यास दांडगा नाही, मी अधुन मधुन रजा घेत असतो)

किती हा विनय. आंजावर हे जरा दुर्मीळच आहे.

>>>बर्‍याचदा आपल्याच कंपूतील व्यक्तीच्या धाग्यावर हे केलं जातं. याने धाग्याची टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा मुद्दाम वादविवाद वाढवले जातात.

>>>काही लोकांना "मीच माझे करतो कौतुक" असे म्हणायची सवय असते.

अहो ममो, तीन वर्षे हा कालावधी खूप आहे असे माझे मत आहे.
ही निरीक्षणे (काही वगळली आहेत)आपला कमी पडलेला ;) अभ्यास दर्शवतात.

मराठमोळा's picture

2 Jul 2012 - 6:57 am | मराठमोळा

>>ही निरीक्षणे (काही वगळली आहेत)आपला कमी पडलेला अभ्यास दर्शवतात.

चालायचंच हो चिंतामणी शेट. तुम्हीच लिहा एखादा अध्याय मग. :)

चौकटराजा's picture

5 Jul 2012 - 9:21 pm | चौकटराजा

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Mar 2015 - 10:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हे पण वर आणतोय.