(माउस)

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जे न देखे रवी...
24 Jul 2008 - 3:19 pm

ओट्यावरती तुझ्या किती बघ घुटमळला माउस..!
झाडू घेऊन आलो तरि ना अडखळला माउस..!

मला न जमले ठोकायाला तेव्हा मिश्किल हसला,
मनीपुढे पण स्वतः कसा बघ डळमळला माउस..!

कधी उगाचच रुसला, आणिक माळ्यावरती दडला.
रॅट किलर च्या गोळ्यांनी ना विरघळला माउस..!

अवचित ताज्या गरम भज्यांचा गंध पसरला तेव्हा
मित्रांसोबत बिळाबिळांतुन तळमळला माउस..!

नव्यानव्या कवितांची लागण, विडंबनांची बाधा,
कळफलकाच्या जोडीने मग सळसळला माउस..!

घराघरांतुन निरोप घेई गणरायांची स्वारी.
भिजून गेले डोळे, रडला, कळवळला माउस..!

प्रेरणा: वृत्तातील लहानमोठ्या स्पीड ब्रेकर्ससकटच्या जमिनीवर बरसलेला अभिजीत दात्यांचा पाउस. काही ठिकाणी जमिनीवरचे खड्डे बुजवण्याचे काम केले आहे.

कवितागझलविडंबनमौजमजाप्रकटनप्रतिसादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

24 Jul 2008 - 3:40 pm | अमोल केळकर

मस्त विडंबन
आवडले
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

धोंडोपंत's picture

24 Jul 2008 - 4:41 pm | धोंडोपंत

वा वा बेसनलाडू,

क्या बात है!! उत्तम विडंबन. सही. आवडले.

आपला,
(हसरा) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

बाजीरावाची मस्तानी's picture

24 Jul 2008 - 4:52 pm | बाजीरावाची मस्तानी

"लाडकी बाहुली.. होती..माझी एक...
मिळणार कधी ना..शोधुन दुसर्‍या लाख."

या ओळीन्ची आठवण झाली..

बाकी....गणपतीचा माऊस्....जास्त आवडला....

चतुरंग's picture

24 Jul 2008 - 4:54 pm | चतुरंग

माउस आवडला! :)

चतुरंग

केशवसुमार's picture

24 Jul 2008 - 5:11 pm | केशवसुमार

बेलाशेठ,
माउसा चे वेगवेगळे प्रकार छान गुंफले आहेत.. विडंबन आवडले.. चालू द्या..
(निवृत्त बोका)केशवसुमार
स्वगतः केसुपंथाची पताका बेलामहाराज सॅनहोजेकर सांभाळतील वाटल नव्हतं O:)

वरदा's picture

24 Jul 2008 - 5:35 pm | वरदा

घराघरांतुन निरोप घेई गणरायांची स्वारी.
भिजून गेले डोळे, रडला, कळवळला माउस..!

छानच!

"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

उपटसुंभ's picture

24 Jul 2008 - 6:24 pm | उपटसुंभ

वा..!
सुरेख विडंबन..

प्राजु's picture

24 Jul 2008 - 6:58 pm | प्राजु

बेला.... सह्ही एकदम.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

24 Jul 2008 - 7:03 pm | विसोबा खेचर

अवचित ताज्या गरम भज्यांचा गंध पसरला तेव्हा
मित्रांसोबत बिळाबिळांतुन तळमळला माउस..!

घराघरांतुन निरोप घेई गणरायांची स्वारी.
भिजून गेले डोळे, रडला, कळवळला माउस..!

वा!

स्वाती दिनेश's picture

24 Jul 2008 - 9:30 pm | स्वाती दिनेश

बेला,माऊस छान आहे.आवडला.
स्वाती

सर्किट's picture

24 Jul 2008 - 11:06 pm | सर्किट (not verified)

वृत्तातील लहानमोठ्या स्पीड ब्रेकर्ससकटच्या जमिनीवर बरसलेला अभिजीत दात्यांचा पाउस. काही ठिकाणी जमिनीवरचे खड्डे बुजवण्याचे काम केले आहे.

तुमच्या डोक्यात बाकी मज्जा आहे बॉ.

आवडले.

- सर्किट

मनीषा's picture

25 Jul 2008 - 12:22 am | मनीषा

छान आहे... पावसाइतकाच

प्राजु's picture

25 Jul 2008 - 12:25 am | प्राजु

सह्हिये एकदम..

घराघरांतुन निरोप घेई गणरायांची स्वारी.
भिजून गेले डोळे, रडला, कळवळला माउस..!

हे मस्त.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रियाली's picture

25 Jul 2008 - 3:02 am | प्रियाली

शेवट फारच सुंदर. विडंबन आवडले.

१,२,५,६ अधिक आवडले.

सुवर्णमयी's picture

26 Jul 2008 - 11:44 pm | सुवर्णमयी

सगळे माइस आवडले. फार फार आवडले