मित्रहो,
आपल्या येथील एका सदस्यांनी त्यांची सतत हेटाळणी होत आहे या समजामुळे ज्योतिष्यशास्त्रासाठी आव्हान स्विकारले आहे. त्यासाठी त्यांनी काही फीही आकारायची ठरवले आहे व ती परत मिळणार नाही असेही जाहीर केले आहे. त्याचे कारण त्यांनी त्यांना या सगळ्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत त्यासाठी ते पैसे त्यांना मिळाले पाहिजेत असे जाहीर केले गेले आहे. एक गोष्ट त्यांनी लक्षात घेतलेली दिसत नाही ती ही की हे कार्य कोणाच्या घरचे नसून या शास्त्राचा खरेखोटेपणा सिद्ध करण्यासाठी आहे. त्यात त्यांच्या विरूद्ध दंड थोपटून उभे रहायचे कोणाला वैयक्तिक कारण असेल असे मला वाटत नाही. जशी अव्हानकर्त्याची खरे खोटेपणा सिद्ध करायची जबाबदारी आहे त्याप्रमाणे सगळ्या समाजाची, (ज्यात आव्हान स्विकारणारेही येतात,) पण जबाबदारी आहे. खरे तर हे सगळे परत करायची आवश्यकता आहे का ? हाही प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारायला हवा. कारण हे सगळे एकदा झालेले आहे व फार प्रतिष्ठीत ज्योतिषांबद्दल झालेले आहे. ज्योतिष सांगणे हा एक दोन पसे कमवायचा मर्ग आहे. प्रत्येक धंद्यात दुसर्या कोणाच्यातरी खिशातून पैसे काढले जातात, त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळाले याचा विचार प्रत्येकाने करायचा आहे. जर एखाद्याल खड्यात्च पडायचे असेल तर आपण कोण त्यांना अडवणारे ?
पूर्वी काय झाले होते ते परत एकदा तुमच्यासाठी -
डॉ. अब्राहम टी. कोवूर हे एक स्वतंत्र विचारांचे व्यक्तिमत्व होते. ते एक बुध्दिप्रामाण्यवादी आणि अत्यंत बुध्दीमान असे, मानसोपचार तज्ञ म्हणून ओळखले जायचे, मूळचे ते भारतातले. केरळमधून नंतर ते श्रीलंकेत स्थायिक झाले. श्रीलंकेत ते “Rationalist Society Of Sri Lanka” ह्या संस्थेचे अध्यक्ष होते. त्या दरम्यान त्यांच्या आणि डॉ. कार्लो फोन्सेका ह्यांच्या वैचारिक चर्चा वारंवार थर्स्टन कॉलेज येथे होत. ह्या चर्चेतून व अनेक वर्षाच्या अभ्यासानंतर त्या दोघांनी एक निष्कर्ष काढला की दैवी चमत्कार, अनैसर्गिक शक्ती, आणि अध्यात्मिक चमत्कार ह्यात काहीही सत्य व वस्तुनिष्टता नाही.
त्या काळात ते जगातले एक्मेव असे मनोवैज्ञानिक होते की ज्यांना मिनेसोटा विद्यापीठाने डॉक्टरेट बहाल केली होती. त्यात त्यांचा विषय होता “मानसशास्त्र आणि अतींद्रीय शक्ती”.
श्रीलंकेत अजूनही ते जाहीररित्या कसे भोंदू श्रीसत्यसाईबाबा महाराजांप्रमाणे हातातून राख काढून दाखवत ह्याच्या आठवणी सांगतात. ते खात्री देत असत की कोणालाही दैवी शक्ती नसते आणि कोणालाही नव्हती. जे म्हणतात की त्यांना ती आहे ते एक तर ढोंगी असतात किंवा मनोरुग्ण असतात. दैवी शक्ती ह्या फक्त पुराण कथांमधेच आढळतात.
डॉ. कोवूर यांनी समस्त जनतेला शहाणे करायचे व्रत घेतले होते. त्यांचे एकच ध्येय होते ते म्हणजे बुध्दीप्रामाण्यवादी समाज. त्यांचा जन्म केरळमधे एका ख्रिश्चन कुटुंबात झाला. त्यांचे वडील रे. कोवूर हे एका सिरीयन चर्चचे प्रमुख होते. प्राथमिक शिक्षण त्यांनी चर्चच्या शाळेत पूर्ण केले आणि उच्चशिक्षण कलकत्त्याच्या बंगवासी कॉलेजमधे पूर्ण केले. त्यांच्या अभ्यासाचे विषय होते वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र, अमेरिकेच्या भारतीय समुद्रातील अभ्यास मोहिमेतील ते ह्या खंडातले एकमेव शास्त्रज्ञ होते.
डॉ. कोवूरांना बौध्द धर्मामधे आढळणार्या बुध्दीप्रामाण्यामुळे त्याची ओढ होती. त्यांच्या मते बुध्द हा एक बंडखोर होता आणि त्याने हिंदू धर्मातील स्वमताग्रहाविरुध्द बंड पुकारुन सामान्य जनतेला बुध्दीप्रामाण्याचे धडे दिले. तसेच त्याने लोकांना उदारमतवादी व्हायला शिकवले. त्यांनी नंतरच्या काळात ख्रिश्चनधर्म पण नाकारला कारण त्यांच्या बुध्दीला बायबल हे सर्वज्ञ परमेश्वराचे शब्द आहेत हे काही पटले नाही. जसजसे त्यांचे ह्या विषयावरचे विचार पक्के होत गेले तसतसे त्यांनी बुध्दीप्रामाण्यवाद हेच त्यांचे तत्वज्ञान म्हणून स्विकारले.
त्यांचा मृत्यू सप्टेंबर १८, १९७८ रोजी म्हणजे बरोबर ३१ वर्षांपूर्वी कोलंबो येथे वयाच्या ८०व्या वर्षी झाला.
आता ज्योतिषशास्त्रावर डॉ. कोवूर काय म्हणतात ते थोडक्यात बघूया ! कारण मंगळ या ग्रहाने अनेक भारतीयांचे आयुष्य धुळीस मिळवले आहे आणि ते काम तो अजूनही जोमाने करतोय, मंगळावरचा माणूस (सिनेमात दाखवले जातात तसले) सुध्दा भारतीयांचे एवढे नुकसान करु शकणार नाही.
काय म्हणतात ते ते खाली बघूयात. () ले माझे आहे.
एका विद्वान गृहस्थांनी एका प्रतिष्ठीत इंग्रजी वर्तमानपत्रात एक लेख लिहिला होता त्यात त्यांनी म्हटले होते की ज्योतिषशास्त्राची एक अंधश्रध्दा म्हणून हेटाळणी, जोपर्यंत त्याची मुलभूत परीक्षा शास्त्रज्ञ करत नाहीत तोपर्यंत थांबवावी. थोडक्यात त्यांनी मोठ्या चलाखीने ज्योतिषशास्त्र हे शास्त्र नाही हे सिध्द करण्याची जबाबदारी शास्त्रज्ञांवर टाकली. त्या लेखात त्यांनी असेही म्हटले होते की हे एक अनेक युगे चालत आलेले प्राचीन शास्त्र आहे आणि ह्याच्यावर अनेक थोर शास्त्रज्ञांचा विश्वास होता आणि आहे. ज्योतिषशास्त्राला पाठिंबा देत त्यांनी लिहिले “१४व्या शतकात पश्चिम युरोपमधे विशेषत: पॅरिस, बोलोना, आणि फ्लॉरेन्स इ. शहरातल्या विद्यापिठात ज्योतिषशास्त्राचे विभाग होते. सर्व प्रगत देशातील (अमेरिका) लोक आजही एकमेकांना आपली रास विचारतात. ज्योतिषशास्त्रावर सगळ्यात जास्त ग्रंथाची निर्मिती अजूनही होत अस्ते. हे नाकारण्यात अर्थ नाही की आजही शास्त्रज्ञ ज्योतिषशास्त्राला लागणारी माहिती गोळा करत आहेत आणि एक दिवस हेच शास्त्रज्ञ ज्योतिषशास्त्र हे एक इतर शास्त्रांसारखे शास्त्र आहे हे सिध्द करतील. प्रो. जुंग हे एक थोर शास्त्रज्ञ होते आणि त्यांचा गाढ विश्वास ज्योतिषशास्त्रावर होता हेच उदा.पुरेसे बोलके आहे. ज्योतिषशास्त्र हे एक शास्त्र नाही हे सिध्द करण्याचा कोणीही प्रामाणिक प्रयत्न केलेला नाही. त्याच्यावर अंधश्रध्दा म्हणून शिक्कामोर्तब करण्याअगोदर हयावर मुलभूत स्वरुपाचे काम करुन ती अंधश्रध्दा आहे का नाही हे ठरवणे हे योग्य ठरेल.”
हा लेख बराच शास्त्रीय भाषा वापरुन लिहिला असल्यामुळे सामान्य जनतेला जे लिहिले आहे ते सर्व खरे आहे असे वाटण्याचा संभव होता. म्हणून डॉ.कोवूर ह्यांनी त्याच वर्तमानपत्रात त्याला सडेतोड उत्तर दिले त्याचा गोषवारा खाली दिलेला आहे.
चुकीची विचारधारा.
आमचे विद्वान ज्योतिषमित्रांना हे समजायला पाहिजे की एखादी चुकीची विचारधारणा बहुसंख्य जनता किंवा थोर शास्त्रज्ञ त्याच्यावर विश्वास ठेवतात म्हणून बरोबर ठरत नाही. तसेच ती फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे म्हणजे ती खरी आहे असेही म्हणता येत नाही. काळाच्या ओघात असंख्य विचारधारा नष्ट पावल्या आहेत हेही ह्या संदर्भात लक्षात घेतले पाहिजे.
ज्योतिषशास्त्राचा जन्मच मुळी अशा काळात झाला आहे की मानवाला खगोलशास्त्र आणि हे विश्व ह्याविषयी अत्यंत तोकडी माहिती होती. त्यामुळे ज्योतिषशास्त्र हे अत्यंत चुकीच्या माहितीवर (डाटा) आधारलेले आहे. ज्याच्यावर ज्योतिषी एवढे अवलंबून असतात त्या नवग्रहांपैकी फक्त पाचच ग्रह आहेत. उरलेल्या चारपैकी एक तारा आहे आणि एक उपग्रह आहे. उरलेले दोन तर अस्तित्वातच नाहीत. मग ह्यावर अवलंबून राहून काढलेली अनुमाने बरोबर कशी असतील.
( खरेतर त्यांची बरोबर जागा ही Deformable Mirror आणि Wave Front Sensor वापरून काढायला हव्यात. पॄथ्वीवरून नाहीतर अवकाशातून ! -
Because our vision of the night sky is blurred by turbulence in the Earth’s atmosphere, the detail we can see of the universe is extremely limited – even through the most powerful terrestrial telescopes. When we look up at the sky, we perceive this as the twinkling of stars.
One way we have found to overcome the atmospheric distortion, is to place telescopes outside the atmosphere, such as the Hubble Space Telescope (HST). Considering that it cost about $2 billion to build and launch the HST, with another billion to maintain and repair it, the need for alternative technologies becomes clear.
As early as 1953, Horace Babcock coined the idea of measuring the distortions present in the light received on Earth from the stars above (commonly called “wavefronts”) and quickly correcting them to compensate for the rapidly changing patterns of atmospheric turbulence. However, we would have to wait until the 1990’s for the technology necessary to realize this feat.
खरे तर जेव्हा ते आपल्याला ते दिसतात तेव्हा त्याची जागा थोडीशी बदललेली असते आपल्या डोळ्यांना इकडे थोडे जरी बदललेले असले तरी तिकडे ते अंतर प्रचंड असणार. याचे कारण -Atmospheric Abberations हे आहे. तज्ञांनी हे बरोबर आहे का हे जरूर सांगावे. नसल्यास हे काढून टाकण्यात येईल.)
ज्योतिषशास्त्रातील कुंडल्या ह्या त्या माणसाच्या जन्माच्यावेळी बारा राशींमधील नवग्रहांची सापेक्ष स्थाने पाहून केलेली असतात. आता हे नवग्रह आपल्यापासून लाखो मैल दूर आहेत त्यामुळे त्यांच्या दिसणार्या जागा हा एक भ्रम आहे. आता कुंडल्या ह्या असल्या माहितीवर आधारित असतात. जर ज्योतिषांनी खगोलशास्त्राची मदत घेऊन त्यांच्या जागा खरंच शोधून काढल्या तर माझा विश्वास आहे त्यांचाच ह्या तथाकथित शास्त्रावरचा विश्वास उडेल. ह्या ग्रह, तार्यां पसून निघणारा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला काही मिनिटे ते काही प्रकाशवर्षे लागतात ह्याचाच दुसरा अर्थ कुंडल्या ह्या काही मिनिटे ते हजारो प्रकाशवर्षांनी चुकीच्या असू शकतात.
न्युटन आणि कार्ल जुंग ह्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास होता म्हणून आपण ठेवायला पाहिजे हे चर्चिल महाशय मद्य व सिगार ओढत होते आणि ते महान होते म्ह्णून आपण पण ते करायला पाहिजे असे म्हटल्यासारखे आहे. हा विचार तर अत्यंत हास्यास्पद आहे.
आमचे विद्वान म्हणतात की ज्योतिषशास्त्र हे थोतांड आहे हे सिध्द करण्याची जबाबदारी शास्त्रज्ञांची आहे. हे मला मान्य नाही, तरीपण ह्याच कारणासाठी मी ज्या २३ बाबी सिध्द करण्याचे आव्हान दिले आहे त्यात ज्योतिषशास्त्र आणि हस्तसामुद्रीक हेही विषय घातले आहेत. जो ह्यातले काहीही सिध्द करुन दाखवेल त्याला श्रीलंकेचे एक लाख रुपयाचे बक्षीस मी अगोदरच जाहीर केलेले आहे. हे आव्हान प्रसिध्द करुन आता १५ वर्षे झाली आहेत. हे मी करतोय कारण ही दोन्ही मानव जातीला मिळालेल शाप आणि कलंक आहेत असे मी मानतो. ही कसोटी मी अनेक वेळा घेतलेली आहे आणि हे सिध्द केलेले आहे की ज्योतिषी, सामान्य माणसांपेक्षा वेगळे अंदाज वर्तवू शकत नाहीत. त्याच कसोटीत उतरण्यासाठी आमचे विद्वान मित्र कोणालातरी तयार करतील तर बरे होईल.
त्या परीक्षेच्या संदर्भात ते म्हणतात –
सिलोन संडे ऑब्जर्वरमधे एका लंडनस्थित श्रीलंकेच्या एका ज्योतिषाबद्दल बातमी आली की त्याने घानाच्या अध्यक्षांचा हात बघून त्यांना तेल कुठे मिळेल हे सांगितले. हा ज्योतिषी अर्थातच पैशाने फारच गब्बर झाला होता. माझ्या मनात आले की आमचे अध्यक्ष श्री जयवर्धने ह्यांनी ह्या माणसाचा उपयोग केला तर किती बरे होईल !
हे वाचल्यावर मी त्याच वर्तमानपत्रातून सदर ज्योतिषांना म्हणजे श्री सायरस आबेयाकून आणि श्रीलंकेतील तत्सम ज्योतिषांना थर्स्टन कॉलेजमधील १२ फेब्रुवारी १९७८ रोजी हॊणार्याै कसोटीत उत्तीर्ण व्हायचे आव्हान दिले. बक्षिसाची रक्कम १ लाख होतीच. त्यांना फक्त एकच करायचे होते ते म्हणजे ९५% किंवा जास्त प्रश्नांची उत्तरे कुंडल्या आणि हातांच्या ठशांचा अभ्यास करुन बरोबर द्यायची होती. ज्यांनी ज्यांनी त्यांच्या भविष्य सांगण्याच्या कौशल्याबद्दल जाहिराती केल्या होत्या त्यांना पण ह्या कार्यक्रमाचे आमंत्रण पाठवले गेले.
चार ज्योतिषांनी ह्या कसोटीत भाग घ्यायची तयारी दाखवली. पाचवे जे गृहस्थ होते त्यांनी येशूची प्रार्थना करुन आजार बरा करायचे आव्हान स्विकारले कारण तेसुध्दा माझ्या त्या २३ कसोटीमधे अंतर्भूत होते.
थर्स्टन कॉलेजचे सभागृह कार्यक्रम सुरु व्हायच्या अगोदरच गच्च भरले होते. संघ्याकाळी बरोबर ५ च्या ठोक्याला कार्यक्रम चालू झाला. अगोदर माझे प्राथमिक भाषण झाले. विषय होता “अघोरी विद्या, गूढ विद्या ह्याचा उगम व प्रवास आणि मला हे चमत्कारांच्या विरुध्द हे कायमचे आव्हान जाहीर का करावे लागले ?” हा ! त्यानंतर ज्यांनी हे आव्हान स्विकारले होते त्या सर्वांना व प्रेक्षकांपैकी अजूनही कोणाला स्विकारायचे असल्यास त्या सर्वांना स्थानापन्न होण्याची विनंती करण्यात आली. ही विनंती केल्यावर फक्त एक हस्तसामुद्रीक आणि येशूची प्रार्थना करणारे गृहस्थ एवढेच व्यासपीठावर आले. जे जमले होते त्यात बरेच लोक ज्योतिषी असल्यामुळे परत एकदा विनंती करण्यात आली पण दुसरे कोणीही येण्याचे धाडस दाखवले नाही. ज्या ज्योतिषांना भविष्य सांगून १०/१५ रुपये मिळत ते एक लाख रुपये मिळवण्यासाठी का आले नाहीत ह्याच्या मागचे रहस्य मी सूज्ञ वाचकांना सांगायला नको. कारण स्पष्ट आहे. त्यांना जिंकण्याची सुतराम खात्री नव्हती आणि जर हरले. तर जे मिळतात तेही न मिळ्ण्याचीच शक्यता होती. तो धोका ते पत्करणे शक्यच नव्हते.
प्रेक्षकांमधल्याच एका सद्गृहस्थाला त्या दोघांबरोबर व्यासपीठावर जागा देण्यात आली. मी प्रथम त्या येशूच्या पाईकाची प्रेक्षकांना ओळख करुन दिली आणि त्याला माझ्या नाकावरची एक गाठ येशूची प्रार्थना करुन बरी करण्यास सांगितले. तसा त्याचा मला बराच त्रास होत होताच. खरं तर मी त्याला ह्यापेक्षाही अवघड आव्हान देऊ शकलो असतो कारण मी एक कॅन्सरचा रोगी होतो. पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली की लगेच बयोप्सी करुन प्रेक्षकांना माझा कॅन्सर बरा झालेल मी दाखवू शकलो नसतो. म्हणून मी ही तशजोड स्विकारली.
येशूच्या भक्ताने त्याच्या प्रार्थना सुरु केल्यावर मी माझ्या बॅगेतून दोन लिफाफे बाहेर काढले. एकात श्रीलंकेच्या पोलिसांनी तयार केलेले दहा माणसांच्या हाताचे ठसे होते. दुसर्या तसल्याच बंद लिफाफ्यात त्या दहा माणसांची माहिती होती. त्यात त्यांचे लिंग आणि ते जिवंत आहेत की नाही हे नमूद केलेले होते आणि त्याच्यावर त्या पोलिस अधिकार्याची सही होती. दुसर्यात एका कागदावर त्या दहा माणसांच्या जन्म तारखा आणि वेळा दिल्या होत्या. त्यात चूक नको म्हणून त्या शेवटच्या मिनिटापर्यंत दिल्या होत्या. त्याच बरोबर त्यांच्या जन्मस्थळाचे अक्षांश रेखांश दिले होते.
तसल्याच एका लिफाफ्यात त्या माणसांचे वय, लिंग ही माहिती दिली होती अर्थात ह्याच्यावर पण त्या पोलिसांची आणि त्यातल्या दिवंगत माणसांच्या जवळच्या नातेवाईकांची सही शिक्का होताच.
मी पहिला लिफाफा आणि सगळ्यांसमोर ते दहा हाताचे ठसे ज्योतिषाला आणि नंतर त्या दुसर्या सामान्य माणसाला दिले. त्यांनी त्या ठशांवर तो माणसांचे लिंग आणि तो जिवंत आहे का नाही, हे लिहायचे होते.
मग प्रेक्षकातून दोन बातमीदारांना बोलावले गेले आणि त्यांना परीक्षकांचे काम दिले गेले. हस्तसामुद्रीक तज्ञाची ३०%तर दुसर्या माणसाची, जो ज्योतिषी नव्हता त्याची २०% उत्तरे बरोबर आली. मी जर अजून काही माणसांना व्यासपीठावर बोलावले असते तर त्यातल्या काही जणांची उत्तरे ५०% पण बरोबर आली असती. थोडक्यात काय, ज्यांना ह्या विषयाचा गंध पण नव्हता त्यांची उत्तरे ह्याच टक्केवारीत आली असती.
माझे एक लाख रुपये अजूनही माझ्याकडे सुरक्षित आहेत. ज्या लिफाफ्यात त्या १० माणसांची जन्म तारीख इ. माहिती आहे. ते मी तसेच ठेवले आहे. पुढच्या कसोटीसाठी. ह्या सर्व घटनेला वर्तमानपत्रात भरपूर प्रसिध्दी मिळाल्यामुळे एक मात्र फायदा झाला. श्रीलंकेतील बर्याच ज्योतिषांना आपला गाशा गुंडाळावा लागला. असले उपक्रम करुन ही बांडगुळं कमी व्हायची शक्यता कमी आहे कारण समाजामधे मूर्खांची, घाबरट लोकांची संख्या प्रचंड आहे.
मुहूर्त हा असाच एक मूर्ख प्रकार आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष श्री भंडारनायके ह्यांचा शपथविधी त्यांच्या ज्योतिषीच्या सांगण्यावरुन ३० मिनिटे चांगला मुहूर्त नसल्यामुळे पुढे ढकलला गेला. एवढ्या चांगल्या मुहूर्तावर त्यांचा शपथविधी झालातरी ते त्यांचा कार्यकाळ पुरा करु शकले नाहीत, कारण त्याच्या अगोदरच त्यांची हत्या झाली. एवढे असून भारत आणि श्रीलंका ह्या देशाचे अनेक मंत्री अजूनही मुहूर्तावर शपथ घेतात.
बी. व्ही. रामन :
माझ्या भारतातल्या चौथ्या आव्हानाच्या कार्यक्रमाच्या जरा अगोदर, मी बेंगलोरच्या एका डॉ. बी. व्ही. रामन ह्यांना पत्र लिहून ह्या कार्यक्रमात सामील व्हायची विनंती केली होती. ह्या महाशयांनीसुध्दा भविष्यावरचे मासिक चालवून, व लोकांना मूर्ख बनवून बरीच माया गोळा केली होती. मी बेंगलोरच्या आसपास बरीच भाषणे दिली पण हे गृहस्थ काही तिकडे फिरकले नाहीत. कारण त्यातला धोका त्यांना चांगलाच माहीत आहे. मी आमच्या तज्ञ मित्र, श्री. रामन ह्यांना माझ्या पुढच्या कार्यक्रमाला येण्यासाठी तयार करावे ही विनंती करतो.
आमचे विद्वान मित्रांचे जर हे म्हणणे आहे की ज्योतिषशास्त्रावर अजून शास्त्रीय प्रयोग कोणी केला नाही तर त्यांनी हा प्रयोग स्वत: करुन बघावा आणि त्याचे अनुमान आम्हाला पाठवावे.”
डॉ.अब्राहम कोवूर म्हणतात त्याप्रमाणे आपण मूर्खात मोडतो का शहाण्यात हे आपले आपणच ठरवायला पाहिजे.
जयंत कुलकर्णी.
इंटरनेटवरुन गोळा केलेल्या माहितीवर आधारित.
प्रतिक्रिया
9 Aug 2011 - 5:05 pm | विनायक प्रभू
लेखाबद्दल अभिनंदन.
असो.
मी सुद्धा हात बघुन 'तेल' कुठे मिळेल ते खात्रीपुर्वक सांगतो.(५०० रुपये पाठवायची गरज नाही)
10 Aug 2011 - 4:10 pm | नन्दादीप
>>मी सुद्धा हात बघुन 'तेल' कुठे मिळेल ते खात्रीपुर्वक सांगतो.(५०० रुपये पाठवायची गरज नाही)>>
वाण्याच्या दुकानात...... होय ना????
9 Aug 2011 - 5:38 pm | राजेश घासकडवी
हीच चलाखी सर्वत्र वापरली जाताना दिसते. सत्य हे व्यक्तिसापेक्ष असतं, उत्तरं व्यक्तिसापेक्ष असतात याचा बागुलबुवा उभारून ही असली स्वघोषित 'शास्त्रं' चिकित्सेपासून लपून रहातात.
त्यात गंमत म्हणजे पैशाचा ओघ मात्र एकाच दिशेला जातो. युयुत्सु म्हणतात 'मी सिद्ध करून दाखवेन, आधी मला पैसे द्या आणि माझं चुकलं तरी हे पैसे परत मिळणार नाही'. शशिकांत ओक म्हणतात, 'तुम्हीच नाडीकेंद्राला जाऊन भेट द्या व अनुभव घ्या (पैसे देऊन)'
सगळी गंमत असते.
9 Aug 2011 - 5:42 pm | धन्या
ग्रासस्टँझांशी सहमत !!!
जयंतरावांचा लेखही उत्तम.
घाटपांडे काकांचं मत वाचायलाही आवडेल.
9 Aug 2011 - 5:55 pm | अमोल केळकर
माहितीपुर्ण लेख. धन्यवाद
अमोल केळकर
9 Aug 2011 - 5:55 pm | भारी समर्थ
उत्तम!
--
9 Aug 2011 - 6:00 pm | पंगा
किंवा, कोणतीतरी नटी आपल्या पाठीला लक्स चोळते म्हणून आपणही आपल्या पाठीला लक्सच चोळायला पाहिजे... किंवा, कोणत्यातरी क्रिकेटपटूने पामऑलिवने दाढी केली असता त्या दाढी केलेल्या फेसहीन भागांतून स्क्वेअर-ड्राइव-किंवा-ज्या-ज्या-काही-ड्राइव-किंवा-कट-किंवा-जे-काही-असेल-ते होते म्हणून आपणही पामऑलिवनेच दाढी केली पाहिजे... किंवा कोठलातरी तबलापटू चहा पिऊन ठाण-ठाण-ठाण तबला वाजवून 'अरे हुज़ूर, वाह ताज बोलिए' म्हणतो, म्हणून आपणही ताजछापाचाच चहा प्यायला पाहिजे... किंवा कोणत्यातरी सिनेमाच्या कथानकातला काल्पनिक खलनायक ब्रिटानियाची बिस्किटे खाऊन 'गब्बर की असली पसंद' म्हणतो, म्हणून आपणही ब्रिटानियाचीच बिस्किटे खाल्ली पाहिजेत... यादी हवी तेवढी वाढवता येईल.
विचार हास्यास्पद आहे खरा, पण जाहिराती अशाच तर बनतात. आणि उत्पादने अशीच तर खपतात. ग्राहकाने तारतम्य बाळगणे हाच काय तो शेवटी यावर तोडगा आहे.
9 Aug 2011 - 8:33 pm | मन१
ते ज्योतिष वगैरे खरं नाही, तर्काच्या कसोटीत बसत नाही वगैरे. पण कित्येक गोष्टी विज्ञानाच्या स्पष्टीकरणाच्या पलिकडच्या असणार्या सतत आजुबाजुला दिसतात. बुद्धीवादी पब्लिक ह्याबद्दल सोयीस्कर मौन धरुन बसतं.
हे उदाहरण बघा:-
http://www.youtube.com/watch?v=wvpwk4iIDCA
http://www.youtube.com/watch?v=GVoLvLXRILg&feature=related
डिस्कवरी वाहिनीवर ह्याचा सविस्तर कार्यक्रमही झाला. बिनाअन्नपाण्याने माणुस काही काळातच मरण पावतो, ही (आधुनिक) शरीरविज्ञानाची मान्यत. त्याच्या विपरित जाउन इथे बरेच काही होताना दिसते. हे केवळ एक उदाहरण आहे. ह्याच्या सारख्याच इतर कित्येक घटना आजुबाजुला घडत असताना "तसे काहीच होत नसते" असे म्हणणार्या विद्वानांचे आश्चर्य वाटते. समजा(केवळ समजा ;-) ) :-
माझ्या समोर असलेले लाकडी टेबल कुठल्याही बाह्य बलाशिवाय गरागरा फिरु लागले,आणि त्या टेबलाची क्षणात मांजर झाली आणि "म्यांSSव " करुन पळुन गेली, तर हे म्हणणार की हा केवळ दर्शकास (मला) झालेला मनोभ्रम आहे. अहो, पण ऑन क्यामेरा धेकडो अभ्यासकांसमोर, कित्येक अज्ञेयवादी आणि नास्तिकांसमोरही हे होत असेल, तर त्याबद्दल तुम्ही गप्प बसता आणि उगाच कोपराकापर्यातल्या बाबा-महाराज् म्हणवणारे -कुडमुडे ह्यांना झोडपता.
"असे काही होत नसते " म्हणण्यापेक्षा
"काही प्रश्न अनुत्तरीत आहेत, ते काय आहेत माहित नाही" अशी भूमिकाच प्रामाणीक नव्हे काय?
"अतिंद्रिय शक्ती नसतात" असे म्हणताना, काही खरोखर घडलेल्या गूढ गोष्टींबद्दल्चे स्पष्टीकरणही देउ नये काय?
(सत्य साई बाबा ह्या (किंवा तत्सम)महाभागा बद्दल किंवा त्यांच्या भक्ताबद्दल मी काडीचही समर्थन करीत नाही.)
असेच उदाहरण प वि वर्तक ह्यांचे . हे सूक्ष्मदेहाने मंगळावर जाउन आल्याचा दावा करतात. मात्र त्यांची विधाने खोडून काढताना काही एक स्पष्टीकरण दिले गेले व मला पटले ते असे:-
"त्यांची विधाने जनरलाझ्ड आहेत्.सामान्य तर्कशास्त्राने तशी विधाने वर्तवणे अशक्य नाही. त्यात अतिंद्रिय काहीही नाही."
.
.
.
सध्या हुडकत बसण्यास वेळ नाही, पण अशा खूपशा;सध्या स्पष्टीक्रण उपलब्ध नसणार्या; अतिंद्रिय शक्तींसंदर्भात घटना ऐकलेल्या आहेत, त्यातल्या कित्येक नास्तिकांच्या कॅमेर्यामध्ये बद्धही आहेत.
9 Aug 2011 - 8:49 pm | जयंत कुलकर्णी
:-)
आम्ही म्हणतो, याची उत्तरे शोधून काढली पाहिजेत. यात मानवजातीचे कल्याण आहे.ज्या मुलाबद्दल आपण लिहीले आहे,
त्या मुलाने ही विद्या सर्वांना शिकवावी, कमीतकमी जे अवकाशात जातात त्यांनातरी. तसे झाले तर चांगलेच आहे. आम्ही भोंदूगिरीच्या व फसवणूकीच्या विरूद्ध आहोत. तसे नसेल तर चांगलेच आहे. प्रश्न कुठे आला ? उत्तरे शोधून काढण्यासाठीच तर विज्ञान आहे. अनेक गोष्टींची उत्तरे मिळत नव्हती पण आता मिळाली. याचे ही मिळेल कदाचित. त्यात काही विशेष नाही.
9 Aug 2011 - 10:25 pm | मन१
पण ज्यांना असल्या गोष्टी येतात ते ह्या कुनाला सांगायला तयार नाहित. त्या काय आहेत हे इतर कुणीही( विज्ञान्वादीही) सांगत नाहित्/सांगु शकत नाहित. काही विज्ञानवादी म्हणवणारे "तसे काहिच नसते" इतकच म्हणत राहतात. पण मग हे जे पब्लिकच्या डोळ्यासमोर होतय,अगदि धडधडित, ते काय आहे मग हे कुणीच सांगत नाहित. तुम्ही उल्लेख केलेले श्री कोवुर ह्यांचेही "तसे काही नसते" असे म्हणणे आहे. आमच्या डोळ्यासमोर मात्र जे दिसते त्यावर आम्ही "तसे काहीतरी आहे " असे म्हणतो. उत्तरे शोधावीत, शोध घ्यावा हे खरेच. पण "तसे काहिच नसते" हे पुन्हा पुन्हा ऐकण्याचा जाम त्रास होतो. किंवा, जर काही गोलमाल असेल तर त्याचाही भांडाफोड आपण(विज्ञानवादी) करताच, तो तसा केलेला नाही म्हणजेच तो गोलमाल नसावा असे वाटते.
सामान्य माणुस दोन्ही दृष्टीकोनांच्या टोकाच्या कलकलाटाने त्रस्त होतो ते होतोच.
शिवाय तो एक मुलगा, ती त्याची एक केस असा हा प्रकार नाही, ह्याच्यासारखी इतरही बरीच उदाहरणे आहेत. मागे डिस्कवरी वाहिनीवरच एक बाबा दाखवला होता, मागील पन्नासेक वर्शात काहीही अन्न्-पाणी ग्रहण न केलेला, त्याची परिक्षा घेण्यासाठी त्याला एका खोलीत बंद करुन ठेवले गेले, आणि २४x7 त्याचे चित्रीकरनही करण्यात येत होते. सुमारे ३-४ आठवडे काहीही ग्रहण न करताही त्याचे शरीर ठणठणीत होते, अगदि मस्त उड्या मारत तो फिरु शकत होता. "सूर्यप्रकाशाच्या उर्जेवर मी जगतो" असे तो म्ह्टला. विज्ञानवाद्यांनी अपेक्षेप्रमाणेच "तसे(सुर्यप्रकाशातुन थेट मानवास उर्जा वगैरे) काही नसते" अशी ट्युन वाजवली व विषय मिटवला. पण मग जे समोर दिसत होते ते काय होते? शूटिंग करणारा हा कुणी गूढविद्येवर विश्वास असणारा नव्हे तर चिकित्सक्/विरोधक होता!!!
थोडाक्यात कोवुरांचे जे विधान आहे "तसे काही नसते" हे आहे, त्याचा उबग येउ लागलाय; अगदी भोंदुबाबांच्या थोतांडाइतका नाही, तरी काही प्रमाणात नक्कीच.
9 Aug 2011 - 10:27 pm | जयंत कुलकर्णी
मन१,
आपल्या मनात विज्ञान का आहे आणि त्याचे काम काय आहे या विषयीच्या विचारांत गल्ल्त होती आहे असे वाटते. विज्ञानाचे काम हे भांडाफोड नसून निसर्गात जे काही घडते ते कसे घडते हे शोध घेण्याचा आहे. आता ज्या गोष्टीवर काम केले गेलेले नाही, त्यावर होणारच नाही, असे म्हणता येत नाही. जरूर होईल आणि त्यात मानवजातीच्या कल्याणासाठी काही सापडले तर ते प्रसिद्ध होईलच. किंवा नाही झाले तरीही होईल. माझा आक्षेप ज्या गोष्टींचा समाजाला लुबाडण्यासाठीन होतो त्याला आहे. उरले डॉ. कोवूर यांच्या "तसे काही नसते " या म्हणण्याबाबत. तसे त्यांचे मत होते आणि ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी आव्हानही दिले होते. दुर्दैवाने ते बक्षिस अजूनही तसेच आहे. त्या काळात तसे होते. आता या चमत्कारिक गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे. दुर्दैवाने यात ९० टक्के गोष्टी या फ्रॉड निघतात त्याला काय करणार ....
9 Aug 2011 - 10:51 pm | स्वानन्द
हे चुकीचे आहे. आक्षेप लुबाडणार्याला केला तर जास्त योग्य नाही का? मेडीकल सायन्स मध्ये पण मालप्रॅक्टीसिंग' करणारे बरेच असतात; म्हणून आपण मेडीकल सायन्स ला धारेवर धरतो का? इथेच मिपावर नुकतेच चिंटू यांना त्यांच्या गुडघेदुखीचे निदान करून घ्यायला बरेच डॉक्टर बदलावे लागले मग तुम्ही कुणाला दोषी धरणार? आणि ज्या डॉक्टरांना अचूक निदान करता आले नाही त्यांनी लगेच प्रॅक्टीस बंद केली पाहिजे का? एकच औषध कित्येकदा सगळ्ञा रुग्णांवर ( एकाच रोगाने बाधित असलेल्या ) काम करत नाही, किंवा एका पॅथीमध्ये असलेले उपचार लागू पडले नाहीत आणी दुसर्या पॅथीमध्ये असलेले उपचार लागू पडले तर आधीच्या पॅथीने आपले उपचार देणे बंद करावे का? अशी एक ना अनेक उदाहरणे आहेत.
>>विज्ञानाचे काम हे भांडाफोड नसून निसर्गात जे काही घडते ते कसे घडते हे शोध घेण्याचा आहे.
नक्कीच. पण त्याच वेळेला आम्हाला अ़जून सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत हे मान्य करण्याचा प्रामाणिकपणा मात्र फारसा दिसऊन येत नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विज्ञानात उपलब्ध नसेल तर दुसरी शक्यताच नाकारणे हे तर अतिशय चूक आहे. खरं तर विज्ञातले बरेचसे शोध हे कल्पनेच्या भरारीतूनच लाभलेले दिसतात. मेडीकल सायन्स सारखी शाखा तर अजूनही नव्नवीन शोध घेतेच आहे. आता जर ते परीपूर्ण नसेल तर त्याचा अर्थ ते पूर्णपणे टाकाऊ आहे असा अर्थ घ्यायचा का?
वर मन१ ने म्हटल्याप्रमाणे दोन्ही बाजूकडच्यांच्या टोकाच्या मतांचा फक्त त्रासच होतो. सरसकट जनरलायझेशन करून काहीच हशील नाही.
11 Aug 2011 - 8:35 am | नितिन थत्ते
>>इथेच मिपावर नुकतेच चिंटू यांना त्यांच्या गुडघेदुखीचे निदान करून घ्यायला बरेच डॉक्टर बदलावे लागले मग तुम्ही कुणाला दोषी धरणार?
अंमल गल्लत होते आहे*. गुडघेदुखीचे निदान झाले नाही याला कोण दोषी? याचे उत्तर "तो डॉक्टर" असे देऊन 'विज्ञानक्षेत्र' मोकळे होत नाही. वैद्यकीय विज्ञानातही कमतरता असू शकते हे गृहीतच असते. तसेच हवामान खात्याचे अंदाज चुकतात याला "तो हवामानशास्त्रज्ञ" दोषी असे उत्तर नसते.
वैद्यकीय विज्ञानात संशोधन चालू असते त्यामध्ये अगोदर न समजलेले रोगही समजतात. तसेच हवामानाचे अंदाज चुकतात म्हणून त्या प्रेडिक्शनची मॉडेल्स बदलून घेतली जातात. हे काम कोठे चालू असते (शास्त्र तपासून सुधारण्याचे) हे सर्वांना माहिती असते.
ज्योतिषाबाबत मात्र तसे होत नाही. नेहमीच "ज्योतिषी चुकला, शास्त्र बरोबरच" असा स्टॅण्ड घेतला जातो. किंवा तसा स्टॅण्ड घेणे हेच (इतर) ज्योतिषांच्या हितासाठी आवश्यक असते.
नवे संशोधन सोडा... आधीच माहिती असलेल्या, मानल्या जाणार्या ठोकताळ्यांची चाचणी करून त्याचे संख्याशास्त्रीय निष्कर्ष कुठे प्रकाशित होतात असे ऐकलेले नाही. म्हणजे कोणत्याही ज्योतिषाने असे उत्तर दिल्याचे ऐकलेले नाही.
तेव्हा वैद्यकीय/आधुनिक विज्ञान आणि ज्योतिष'शास्त्र' यांची तुलना फिट होत नाही.
*प्रताधिकारः छोटा डॉन
9 Aug 2011 - 11:03 pm | जयंत कुलकर्णी
ना रहेगा बास न रहेगी बासरी.... या न्यायाने म्हटले आहे मी
असो. चिंटू यांच्या धाग्यावर मी अॅलोपाथी आणि इतर उपचार पद्धती यातला फारक स्पष्ट केला आहे. आपण समाजातल्या वाईट माणसांबद्दल बोलत नसून समाजातील अनीष्ट प्रथांबद्दल बोलत आहोत. हा फरक पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवा. वाईट माणसे सगळीकडेच आहेत. पण तुम्ही आज डॉ. च्या विरूद्ध खटला भरू शकता. ज्योतिषांविरूद्ध भरू शकता का ? आणि रामदेवबाबांवइरूद्ध ?
सगळ्याची उत्तरे मिळाली नाहीत किंवा मिळत नाही हे मान्य करायचा प्रश्न कोठे येतो हे समजत नाही. पण उत्तर नाही म्हणून काहीही ऐकून घ्यायची तयारी या बाजूची नसावी.
11 Aug 2011 - 6:52 am | जॉन
काहीही खोटे लिहू नका.
11 Aug 2011 - 7:45 am | जयंत कुलकर्णी
जॉन,
आपण जॉन हे नाव घेतले आहे म्हणून असला माझ्यावर खोटेपणाचा आरोप करायचा अधिकार आपल्याला कोणी दिला ?
हे वाचा -
Kovoor was born to a Christian family brought up by Christian parents. Unlike many of us who cling to religious indoctrinations of our parents, Kovoor rejected them and started to think for himself. As soon as he came of an age to think and act independently he discarded Christianity and became a rationalist because he could not accept the bible as the word of an omniscient god. It was very difficult for him to get a bride who would agree with his beliefs and agree not to inoculate the children with religious beliefs of the forefathers.
हे लिहिताना ते रॅशनालिस्ट होते हे जरी आपण लक्षात घेतले असते तर बरे झाले असते. खोटेपणाचा आरोप करताना (माझ्याबाबतीत तरी) आपण अनेक वेळा विचार करावा ही विनंती.
आणि मला खोटे लिहायचे काय कारण ? वरील श्री थॉमस चेरियन यांनीच लिहिले आहे. दुसरे म्हणजे नाकारला आणि सोडला याच्यातला फरक कदाचित आपल्याला उमगला नसेल.
11 Aug 2011 - 4:30 pm | Nile
जाउद्या जयंतराव, डुप्लिकेट आयडी दिसतोय. ज्याअर्थी दिलेल्या प्रतिसादात काही विवेचन नाही त्याअर्थी जॉन नावाचं पांघरून घालून कोणी स्वतःच्या नावाची लाज असणार्याने प्रतिसाद दिलेला दिसतो. मनावर घेऊ नका.
11 Aug 2011 - 4:32 pm | Nile
च्यायला,दोनदा पडला!
23 Aug 2011 - 7:54 pm | विजुभाऊ
उत्तम चर्चा.
23 Aug 2011 - 8:35 pm | चेतन सुभाष गुगळे
ज्योतिष खरे की खोटे यावर मला इथे कुठलाच युक्तिवाद करायचा नाही. (वैयक्तिक मत विचाराल तर मी देव, नशीब, ज्योतिष यापैकी कशावरच विश्वास ठेवत नाही. पण त्याविषयी इथे वाद करण्याची अजिबात इच्छा नाही)
माझा मुद्दा इतकाच आहे की इतर सर्व सभासदांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत त्यांनी त्यांच्या व्यवसायाची उघड / छुपी जाहिरात या संकेतस्थळावर केलेली नसताना केवळ या ज्योतिष्यांनीच इथे अशा जाहिराती का केल्या आहेत? आपण काहीतरी अलौकिक / इतर चारचौघांपेक्षा वेगळे करतो आहोत असा बहुधा त्यांचा समज असावा. अर्थात तसे असेल तर त्यांनी त्यासंबंधातली आपली व्यावसायिक सिद्धता दाखवून देण्याकरिता आव्हान फुकटातच स्वीकारावे. त्याची कुठलीही फी घेणे योग्य नव्हे. अन्यथा येथे फुकटात जाहिरात करू नये. आता ते म्हणतील आम्ही इथे जाहिरात कुठे केली? पण आपल्या व्यवसायाचा उल्लेख करणे व त्याविषयी कुठलाही दावा करणारे लेख प्रकाशित करणे ही एक छुपी जाहिरातच आहे. हे मान्य नसल्यास तुम्ही ज्योतिषी आहात हे इतर सभासदांना कसे कळले? (अर्थातच तुम्ही तसा उल्लेख केलात म्हणूनच). मी या संकेतस्थळावर कित्येक धागे प्रकाशित केले, माझी इतरही बरीच माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परंतू अजुनही माझा व्यवसाय कोणता ते इथले बाकीचे सदस्य सांगु शकणार नाहीत. अर्थातच माझ्या व्यवसायाची चर्चा करण्यासाठी मी या संकेतस्थळावर आलेलो नाहीय. त्याचप्रमाणे इतरही बहुतेक सदस्यांनीही इथे स्वत:च्या व्यवसायाचा (काही अपवाद वगळता) उल्लेख केलेला नाहीय. माझ्या समजुतीप्रमाणे संकेतस्थळ चालवणार्या मंडळींनाही सभासदांनी व्यवसायाचा उल्लेख करावा असे अपेक्षित नाहीय.
तरीही कुणाला स्वत:चा व्यवसाय / नोकरी काय आहे ह्याची माहिती इतरांना द्यायची असेल तर त्याकरिता एखादा स्वतंत्र धागा काढावा आणि त्यावर सर्वच सभासदांना (अर्थातच स्वेच्छेने, सक्तीने नव्हे) स्वत:च्या चरितार्थाच्या तपशीलाची माहिती देण्यास मुभा असावी.
आता प्रश्न उरतो तो आव्हान स्वीकारणार्या व्यक्तिचा वेळ / मेहनत खर्ची पडण्याचा. तर यात आव्हान देणार्याचाही वेळ जात असतोच की. तेव्हा कोणी कुणाला मेहनताना / मानधन द्यायचे?
माझ्या पुरते म्हणाल तर हे जे कोणी ज्योतिषी (नाडीतज्ज्ञ / हस्तसामुद्रिक / पत्रिका विशेषज्ञ) असतील त्यांना मी माझी पत्रिका / हात / अंगठ्याचा ठसा दाखवायला तयार आहे. त्याकरिता पुण्यात कुठेही येउन एक दिवस खर्च करायची माझी तयारी आहे. याकरिता मी कुठलीही फी / मानधन घेणार नाही. त्याचप्रमाणे या ज्योतिषांनाही मी कुठलाही मोबदला देणार नाही. या संपूर्ण भविष्य कथनाचे व्हीडिओचित्रीकरण करण्यास माझी हरकत नाही, तसेच मी असे व्हिडीओचित्रीकरण करण्याला या मान्यवरांनीही हरकत घेऊ नये.
सदर चित्रीकरणातच आव्हान स्वीकारणारे जिंकले की हरले याचा सोक्षमोक्ष होऊ शकेल.
24 Aug 2011 - 6:48 pm | आत्मशून्य
.
26 Aug 2011 - 8:51 pm | चेतन सुभाष गुगळे
पुण्याबाहेर मला शक्य नाहीय. पुण्यातलंच स्थळ सुचवा, किंवा माझ्या घरी देखील येऊ शकता. पत्ता वैयक्तिक माहितीत या संकेतस्थळावर दिला आहेच.
14 Sep 2011 - 9:58 pm | शशिकांत ओक
काय ठरले? मिळाली का त्यांना त्यांचा नाडीग्रंथ...
16 Sep 2011 - 11:11 pm | आत्मशून्य
नाही, पट्टी संपूर्ण मॅछोत नाहीये... पूढील आठवड्यात अजून मागवणार आहे साधारण एक आठवडा लागेल. मग पून्हा चौकशी करा. तो पर्यंत एखादी पूजा वगैरे घालायला सांगीतली तर चालेल काय ?
गूगळे साहेब तूमचा जन्म 1968 आणी राशी कॅंसर आहे काय ?
17 Sep 2011 - 12:00 am | चेतन सुभाष गुगळे
<< गूगळे साहेब तूमचा जन्म 1968 आणी राशी कॅंसर आहे काय ? >>
माझ्या जन्मपत्रिकेत मेष आहे. पण जन्मतारखेवरून काही जण म्हणतात की कर्क असायला हवी.
जन्मतारीख - २९.०६.१९७८
यावरून रास काय असेल ते तुम्हीच ठरवा.
17 Sep 2011 - 6:32 am | मन१
अक्शांश्-रेखांश किंवा जन्मठिकाण लागेल ना त्याना.
का हो आत्मशून्य, चांद्र पद्धतीने बघता की सौर?
मी सिंह रास मेष लग्नवाला वाटतो का हो?
17 Sep 2011 - 9:18 am | आत्मशून्य
नवीन पट्या येइपर्यंत वाट पहायला हवी. म्याच झाली की रीडींग करण्यात येत्याल.
@मन, नाडी चांद्र वा सौर पध्दतीने न्हवे तर लंबक पध्दतीने बघितल्या जाते.
4 Sep 2011 - 2:25 pm | मन१
माझ्या वरच्या प्रतिसादात विज्ञानाला अजुन अनुत्तरित अशा घटनांची लिंक दिली आहे.
तसेच आता मिसळपावावरच http://www.misalpav.com/node/19073 हा धागा सुरु झालाय.लोकांनी स्वतःचे अनुभव दिलेत्.सत्य मानायचे म्हटलं तर कठीण आहे. नीट तपासुन न पाहता, किंवा विज्ञाचाच्या चुअकटित स्पष्टीकरण न मिळाल्याने "तसे काही नसते" हेच एक वाक्य विज्ञानवादी पुन्हा ऐकवणार असतील तर प्रश्नच मिटला.
5 Oct 2011 - 12:04 pm | शशिकांत ओक
मन१
आपले वरील कथन नुकतेच वाचले.
ते मला आलेल्या अनुभवाच्या जवळ जाणारे आहे. हे नमूद करावेसे वाटते.
दुसरे - आपली आत्मशून्यांना विचारणा की - (नाडी भविष्य पहाताना ) जन्मवेळ आणि स्थळ सांगावे लागते का?
त्याचे उत्तर - नाही असे आहे. खरे तर जन्मदिनांक सांगायची गरज नाही पण काही केंद्रात ती विचारली जाते. कारण काय असे खोदून विचारले तर म्हटले जाते की त्यांच्याकडील ताडपट्ट्या साधारण किती सालापुढील आहेत याचा अंदाज त्यांना असतो म्हणून ते विचारतात.
5 Oct 2011 - 12:29 am | आशु जोग
कुंडली पेक्षा हातावरच्या रेषा अधिक बोलक्या असतात.
ज्यांना जन्मतारीख माहीत नसते, त्यांचा हात मात्र पाहता येतो.
यातून लोकांची मनेही स्पष्टपणे वाचता येतात
24 May 2016 - 9:45 am | प्रकाश घाटपांडे
धाग्यांच्या मांदियाळीत इतका चांगला धागा माझ्या नजरेतून कसा काय सुटला? सविस्तर नंतर प्रतिक्रिया देतो. खर तर माझ्या फलज्योतिष चिकित्सेच्या लिखाणात प्रतिक्रिया वेळोवेळी अनेकदा आलेली आहे
24 May 2016 - 11:41 am | शाम भागवत
धन्यासेठ, खास तुमच्या बोलविण्यावरून घाटपांडे साहेब येताहेत. भले ५ वर्षे झाली म्हणून काय झाले.
:-))
24 May 2016 - 1:56 pm | राही
आपले 'भागवत' हे आडनाव आणि ज्योतिष विषयातली आपली रुची या मुळे मला दोन पिढ्यांमागचे सुप्रसिद्ध ज्योतिषी कै. अ.ल. भागवत यांची आठवण झाली. त्यांनी फलज्योतिष आणि हस्तसामुद्रिक यांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत.
24 May 2016 - 2:19 pm | शाम भागवत
थोडी अधिक माहिती
अ.ल.भागवत हे त्राटक विद्येतले जाण्कार होते. ते त्यांचे वेगळेपण होते.
24 May 2016 - 1:52 pm | प्रकाश घाटपांडे
कोवूरांचे प्रसिद्ध वाक्य आहे की "चमत्कार करणारे बदमाश असतात व त्यावर विश्वास ठेवणारे मूर्ख असतात." हे भाषणात टाळ्या मिळवायला ठिक आहे पुर्वी अंनिसत वापरायचे पण. यातून असे होते की ज्यांच्या साठी तुम्हा काम करता त्यांना मूर्ख म्हणून कसे चालेल?
अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे तर अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही. अशी शिकवण असते.ज्या समाजात आपल्याला वावरायचे आहे त्यांचे प्रबोधन करताना त्यांना तुम्ही आपले वाटला पाहिजेत.तर ते तुमचे ऐकतील अशी भुमिका त्यामागे असते. दाभोलकर हे कार्यकर्त्यांसमोर सातत्याने मांडायचे. प्रत्यक्षात कार्यकर्ते तसे वागतातच असे नाही हा भाग आहेच.
बरेच तर्ककर्कश विवेकवादी ज्यांचा पिंड साधारण अॅकॅडमिस्ट स्वरुपाचा असतो ते लोक समाजात मिसळून काम करणार्या अॅक्टिव्हिस्ट लोकांपासून स्वतःला वेगळे वा उच्च समजतात. त्यांना समाजातले इतर लोक वा हे अॅक्टीव्हिस्ट हस्तिदंती मनोर्यातील विद्वान असे संबोधतात.हे विद्वान समाजापासून फटकून राहतात. आपल्या पेक्षा वेगळा विचार करणारे लोक हे सगळे अंधश्रद्ध अर्थात कीव करण्याच्या लायकीचे अशी त्यांची समजूत असते. कोणाही माणसाला आपली कीव केलेली सहसा आवडत नाही. त्यामधे त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. मग ते लोक ही असाल तुम्ही शहाणे. तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी अशी भुमिका घेताना दिसतात. हे विद्वान लोक आयुष्याच्या उत्तरार्धात एकटे पडत जातात अथवा स्वतःला बदलतात असे दिसून येते.
दाभोलकरांच्या या भुमिकेमुळे चळवळीला सहानुभुतीदार वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला.अंनिसच्या या भुमिकेला काही बुद्धीदांडगे नास्तिक तुम्ही लेचीपेची भुमिका घेता असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे म्हणायचे. लागूंना काही चळवळ चालवायची नव्हती त्यामुळे ते परमेश्वराला रिटायर करा सारखी भुमिका घेउ शकत होते. दाभोलकरांना समाजाला बरोबर घेउन चळवळ चालवायची असल्याने काही समन्वयात्मक तडजोड घेणे हे कमी पणाचे वाटत नव्हते. किंबहुना अशी भुमिका घेतली नाही तर समाज आपल्या बरोबर येणार नाही हे त्यांना माहित होते.काही लोक असेही म्हणतात कि दाभोलकर-लागू वादसंवाद हे प्रकरण तु मारल्यासारखे कर मी लागल्यासारखे करतो असे काहीसे होते. समजा हे नौटंकी जरी मानले तरी त्यातून प्रबोधक व प्रबोधन घडत होते हे नाकारता येणार नाही.
24 May 2016 - 7:37 pm | प्रचेतस
नेहमीप्रमाणेच उत्तम प्रतिसाद.
24 May 2016 - 7:32 pm | विवेकपटाईत
आपण तर बुआ निर्मल बाबा कि जय म्हणणार. अश्या धाग्यांना वाजताना करमणूक जास्त होते.