वंशावळी : एक ओळख
मागच्या आठवड्यात मी सकाळी घरी होतो त्यावेळी एक जोडपे घरी आले. ते वडिलांना त्यांचे आडनाव विचारत तुम्ही अमक्याचे नातेवाईक, तमक्याचे भाऊ, येथून तुम्ही येथे आले वैगेरे वैगेरे सांगत असलेले मी ऐकले. मी ताबडतोब समजलो की ते एक भाट आहेत, व ते आता वंशावळ वाचणार
आपल्या समाजात अनेक जाती आहेत. या प्रत्येक जातीच्या वंशाची माहीती भाट समाज ठेवत असतो. असलीच कामे वडिलोपार्जीत व्यवसाय म्हणून करणारे ब्रम्हभट - श्री. कैलास रामदेवराय ब्रम्हभट हे होत.
श्री. कैलास ब्रम्हभट (वंशावळ वाचणारे)
ते त्यांच्या वडिलांपासून असणारे हे काम सांभाळतात. आल्यानंतर चहापाणी झाला. अन त्यांनी आमची वंशावळी वाचायला सुरूवात केली. वंशावळ वाचण्याच्या आधी त्यांनी गणेश व इतर देवतांना वंदन केले अन मग एका विशिष्ट सुरात वंशावळीतील नावे वाचू लागले. कोण व्यक्ति कुठे होता, त्याला मुलगे किती, मुली किती, सुनबाई कोणत्या कुळातली, तिचे माहेरचे गाव कोणते आदी उल्लेख त्यात येत गेले. अगदी शंभर वर्षे च्या वरचा उल्लेख त्यात आला होता. नंतर नंतर जेव्हा पणजोबा, आजोबांचा उल्लेख त्यात आला तेव्हा ओळख पटायला लागली. एक प्रकारचा आपल्या कुळाचा इतीहासच होता तो. त्यानंतर त्यात आताच्या नविन पिढीची/ मुलांची नावे लिहील्या गेली. नंतर त्या पोथीची पुजा करून व दक्षिणा अन शिधा देवून समाप्ती झाली.
वंशावळीतील एक पान
वंशावळीतील एक पान
कैलास ब्रम्हभट यांच्याशी केलेल्या गप्पामधून बरीच माहिती मिळाली. कैलास यांचे पणजोबा/ आजोबा हेच काम करत असत. वंशावळीसच नामावळी किंवा वडलोपाजी असे म्हणतात. आता ते मध्यप्रदेश, गुजरात अन महाराष्ट्राचा प्रदेश या वंशावळ वाचण्यासाठी सांभाळतात. जोडीने ते एका मोटरसायकल ने घरून दिवाळीनंतर निघतात अन जुन पर्यंत ते फिरत राहतात. एखाद्या गावात ते एखाद्या घरी राहतात अन मग त्या गावातल्या समाजबांधवांच्या घरी वंशावळी वाचत फिरतात. त्यानंतर जवळच्या गावात चक्क्कर असतो. असे जुन पर्यंत चालू असते. आमच्या घरचे वाचन संपल्यानंतर ते गल्लीतील दुसर्या समाजबांधवांकडे जाणार होते. त्यांचे नाव सांगितल्याबरोबर त्यानी ते कोठले, त्यांचे भाऊबंद कोण याचा उल्लेख बरोबर केला. प्रत्येक कुळाच्या वह्या स्वत्रंत्र असल्याने व शेजारच्यांच्या वह्या आणल्या नसल्याने त्यांच्याकडे वाचन होवू शकले नाही. पुर्वी मोटरगाडीने प्रवास व्हायचा पण आता मोटरसायकल घेवूनच प्रवास केला तर परवडतो. जुन नंतर ते परत राजस्थान (मदनगंज ता किशनगंज, जि अजमेर) ला जावून त्यांच्या स्व:ताचा इलेक्ट्रीकलचा व्यवसाय बघतात.
प्रतिक्रिया
29 Jun 2010 - 8:41 am | प्रकाश घाटपांडे
आता शहरात कुलवृत्तांत जपण्याची जाणीव निर्माण झाली आहे. कुलसंमेलने पण होतात.
जोशीकुलोत्पन्न खुप प्रमाणात असल्याने त्यांचा कुलवृत्तांत फारच मोठा असणार
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
29 Jun 2010 - 8:52 am | रामदास
घृष्णेश्वराच्या मंदीरात गेलो होतो तेव्हा उपाध्यांनी अशीच माहीती दिली होती ते आठवले.
आपले माहीती नसलेले नातेवाईक शोधून काढण्यास/आपल्या कुटुंबाची माहीती जपून ठेवण्यास आंतरजालाचा कसा उपयोग करता येईल याचा विचार करतो आहे.अशी काही माहीती असल्यास सुचवावे.
29 Jun 2010 - 9:06 am | पाषाणभेद
नाशिक येथेही असलीच वंशावळ १० व्या च्या वेळी तेथील ब्रांम्हणांकडे पहायला/ अद्यावत करायला मिळते. असलेच काही काशी येथेही असावे. अर्थात या ठिकाणी जो जातो त्याला हे पहायला भेटते.
परदेशातील बरेच जण आपल्या आडनावाची वेबसाईट बनवतात. आपल्याकडचा वंश फारच 'मोठा' (lengthy) असू शकल्याने असला प्रकार कोणी केला नसावा.
29 Jun 2010 - 7:30 pm | विकास
चांगली माहिती या लेखातून मिळाली.
आंतर्जालाचा उपयोग करण्यासाठी http://www.geni.com/ हे संस्थळ पहा.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
29 Jun 2010 - 10:47 am | jaypal
जमाती होत्या त्यांना "हेळवी" म्हणत असत. हा त्यांचा वंशपरंपरागत व्यवसाय असे. हा एक प्रकारचा डेटाबेस आहे ज्याचा उपयोग मुख्यतः लग्नकार्य करताना मुलाचा / मुलीचा (वंश) इतिहास पहाणे हा असायचा. तेंव्हा पैसे घेत नसत तर ४/५ माप जोंधळे देऊन आजोबा हा इतिहास तपासत.
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
29 Jun 2010 - 3:08 pm | लॉरी टांगटूंगकर
मला आमची घरीच लिहिलेली family tree diagramसापडली घरी बरीच जुनी पुराणी कागदपत्रे होती त्यामध्ये हि १.मी भाट लोकां साम्भार्धात काहीच नवते ऐकले.त्या वंश वृक्षा मुले मला बरेच नातेविक माहिती आहेत पण त्यांना काय सांगू कळत नाही.खरे तर आमच्या कॉलेज चे डिरेक्टर माझे दूर दूर चे नातेवाईक आहेत(नाते माझ्या वर ची ५ वि पिढी आणि त्याची वरची ३ री पिढी हे एकमेकांचे भाऊ).आता लास्ट सेम झाले कि त्यांना भेटणार आहे मी.काय बोलतील काहीही कल्पना नाही.
29 Jun 2010 - 7:23 pm | पाषाणभेद
भावड्या लास्ट सेम नंतर भेटून काय उपेग? आताच भेटलास तर मार्कांना आन मास्तरांवर भाव मारायला कामात येईल. आता लगेच भेट भावा.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
30 Jun 2010 - 1:50 am | लॉरी टांगटूंगकर
आत्ता भीती वाटते. ते हि शेवटी आमचेच रक्त!!! किती लोकांशी पंगे घेतलेत काय माहिती??लोक कदाचित माझ्या वर खुन्नस काढतील .
जमेल तिथे भाव मारतोच,आणि आत्ता भेट्लो अणि मार्क्स विचारले मन्जे फाटेल ना!
30 Jun 2010 - 2:09 am | शिल्पा ब
माहिती आवडली....एक शंका आहे - या वंशावळी लिहिणाऱ्या किंवा वाचणार्या लोकांना एवढी सगळी माहिती कुठून मिळते? आणि कशासाठी ते हे करत असतील?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
30 Jun 2010 - 7:47 am | स्पंदना
<span style="color: #CC33FF;">एक शंका आहे - या वंशावळी लिहिणाऱ्या किंवा वाचणार्या लोकांना एवढी सगळी माहिती कुठून मिळते? आणि कशासाठी ते हे करत असतील?
आम्ही पण या लोकांना "हेळवी" म्हणतो. हा यांचा परंपरागत धंदा आहे. म्हणजे यांच्या जाती कडे थोडे थोडे वंश विभागुन दिले जातात. आपल्या वाडवडिलांची माहिती यांच्या वाडवडिलांनी लिहिली, अस प्रत्येक पिढीला ही माहीती गोळा करुन आपल्याला पुरवली जाते.यात खोटेपणाला फार कमी जागा असते असा माझा तरी अनुभव आहे.
अतिशय माहीतीपुर्ण लेख.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
30 Jun 2010 - 10:47 am | शिल्पा ब
धन्यवाद.
पण अशी माहिती काढताना ते आपल्याकडेच येतात कि डिटेक्टीवगिरी करतात ? म्हणजे एकाच नावाची २ पेक्षा जास्त माणसं असू शकतात...कोणाच कोण ते कसं शोधायचं? लोक आजकाल देश आणि विदेशात पांगलेले असताना हे कसे शक्य होते? आणि मुख्य म्हणजे त्यांना या सगळ्या उपद्व्यापाचा काय फायदा?
हे सगळे प्रश्न गंभीरपणे विचारलेले आहेत.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
30 Jun 2010 - 2:39 am | सुनील
रोचक माहिती.
गेल्या पिढीतील एका ज्येष्ठ विचारवंतांनी स्वतःच्या (ज्यात अनायसे आम्हीदेखिल आलो!) कुलाचा सुमारी चारशे वर्षांचा वंशवृक्ष (family tree) बनवला होता. पार सोळाव्या शतकापासून ते माझ्या आजोबांपर्यंतच्या सगळ्यांची नावे त्यात आहेत.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
30 Jun 2010 - 2:54 pm | जागु
चांगली माहीती आहे.