नमस्कार,
मिसळपाव सुरू होऊन तीनाहून अधिक वर्षे झाली आहेत. या दरम्यान अनेक वादळे येऊन गेली. मिसळपावचे स्वरूप मोकळे ढाकळे असावे. लोकांना येथे येणे आणि लिहीने सोपे व्हावे म्हणून कमीत कमी नियम आणि बंधणे ठेवून या संकेतस्थळाची सुरूवात तात्यांनी केली होती. संकेतस्थळाच्या संपुर्ण बांधणीत मी होतो. तेव्हा पासून ते मिसळपावचे सर्व नियंत्रण सांभाळण्यापर्यंत मी मिसळपाव वाढावं आणि अधिकाधिक लोकांना ते आपलं वाटावं म्हणून प्रयत्न करत आलेलो आहे.
सुरूवातीच्या काळात मी लिहायचो. मग मिसळपाववर अधिकाधिक सोई उपलब्ध करून देणे आणि नंतर सदस्यांच्या अडचणी सोडवणे यात जास्त वेळ देऊ लागलो. आता गेल्या एप्रिल पासून मिसळपावचा सर्व व्याप मीच सांभाळतो.
एप्रिल मध्ये मिसळपाववर अत्यंत गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. त्यातून मिसळपाव सुखरूप बाहेर पडलंय. त्यानंतर काही महिने छान गेले. मात्र पुन्हा दिवाळीच्या आधी काही लोकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केल्याची दिसतेय.
आता या वळणावर काही गोष्टी स्पष्टच करायला हव्यात. म्हणून येथे लिहीत आहे.
१) मिसळपाव हे मराठीवर प्रेम करणार्यांनी मराठीवर प्रेमकरणार्यांसाठी आणी ज्यांना मराठीतून अभिव्यक्त होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी सूरू केलेलं संकेतस्थळ आहे.
२) मिसळपाववर चालणार्या चर्चा, लेख आणि अन्य साहित्य प्रकार हे केवळ आपली मराठीतील अभिव्यक्ती, समान आवड असणार्या लोकांशी ओळख आणि छानसं, हलकं- फुलकं, कधी ठसका बसवणारं तर कधी मन हळवं करून देणारं असावं. लेख, प्रतिक्रिया, खरड कशीही असावी मात्र ती इतर कुण्या व्यक्ती, सदस्यं, संपादक यांचा अपमान करणारी, टर उडवणारी असू नये.
३) मिसळपाववर खूप काळापासून वावरतांना असं होणं स्वाभाविक आहे की काही लोकांच्या लेखनाची आवड निर्माण होते, काहींशी मैत्री होते तर काहींचे लेखन आवडत नाही. अश्या वेळी ज्यांच्याशी आपले सूर छान जुळतात त्यांच्याशी जवळीक निर्माण होणे उत्तमच मात्र कुणा एका सदस्यांचे लेखन आपल्याला आवडत नाही किंवा विचार पटत नाही म्हणून त्या धाग्याचे संदर्भ इतरत्र देऊन त्यांचा उपमर्द करू नये. आपल्याला आवडतं त्याला दाद द्यावी नाही आवडत त्यावर त्याच जागी मतभिन्नता व्यक्त करावी. मात्र त्याधाग्यावरून ती चर्चा इतरत्र नेऊ नये.
४)ही सूचना जूण्या जाणत्या लोकांसाठी आहे की नवीन लोक नव्याने जेव्हा लिहायला लागतात तेव्हा बराच संकोच असतो. मराठीत लिहीता येईल की नाही पासून ते यावर लोक काय लिहीतील येथे पर्यंत गोंधळ नवीन लोकांच्या मनात असतो. कदाचीत आपण जेव्हा नव्याने आंतरजालावर लिहीते झालो तेव्हा आपली परिस्थिती सुध्दा अशीच होती. ते आठवून कृपया नवीन लिहीले झालेल्या सदस्यांना पहिल्याच लेखावर भंडावून सोडून त्यांने यापुढे लिहूच नये, असा प्रकार कृपया टाळावा.
५)यापुढे मिसळपाववर अधिकाधिक खेळीमिळीचे वातावरण राहील असा माझा प्रयत्न राहिल. तुम्हा सर्वांचे याकामी सहकार्य मिळावे ही विनंती. गेल्या काळात जरा बिघडलेल्या वातावरणाला जागेवर आणण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागले तरी त्यामागची भावना समजून घ्या.
६)येथे एक बाब आवर्जून सांगाविशी वाटते की मिसळपावच्या संपादक मंडळास संपादनाचे संपुर्ण अधिकार आहेत. त्याबाबत त्यांनी कसलाही खुलासा देणे अपेक्षीत नाही. त्यांच्या बाबत काही अडचण असल्यास ती जाहीर न बोलता सरपंच किंवा नीलकांत या खात्यावर व्यक्तिगत निरोपातूनच कळवणे अपेक्षीत आहे. कुणीही उठसूठ संपादकांना लक्ष केलेले योग्य नाही. यापुढे असा प्रकार कृपया टाळावा.
७)नवीन सदस्यांनी येथे लिहीते व्हावे. मिसळपाव समजून घ्यावे. नवीन मित्र बनवावे. आणि काहीही अडचण आल्यास सरपंच किंवा नीलकांत या खात्यावर व्यक्तिगत निरोप पाठवावे.
८) मिसळपावचे व्यवस्थापन, संपादक मंडळसदस्यं हे सर्व आपली आवड म्हणून मिसळपावसाठी काम करतात. त्यांच्या मुख्य कामातून आवर्जून वेळ काढून ते मिसळपाववर काम करतात. अश्यावेळी एखाद्या कामात झालेली दिरंगाई लक्षात यावी यासाठी हा संदर्भ पुन्हा एकदा लक्षात आणून देत आहे.
- (सर्वांचे सहकार्य अपेक्षीत असलेला) नीलकांत
प्रतिक्रिया
5 Dec 2010 - 6:21 pm | गांधीवादी
नीलकांत मित्रा, नमस्कार
मी सुद्धा इथे लिहिता होण्यामागे एकच भावना होती, ती म्हणजे मित्र बनविणे. चांगले मित्र मिळावेत, त्यांच्यातून विचारांचे आदान प्रदान व्हावे, तिथून यशस्वी जीवनाचा मार्ग सापडावा, एवढीच काय ती इच्छा.
धोरण जाहीर केल्याबद्दल आभार.
एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ !
5 Dec 2010 - 6:29 pm | नीलकांत
एकूनच या लेखाचे सार हेच आहे की मिसळपाववर मैत्रीचे वातावरण असले पाहिजे. कुणालाही असहज वाटायला नको. सर्वांना मित्र बनवता यायला हवेत. एकमेका सहाय्य करू...
- नीलकांत
6 Dec 2010 - 1:08 pm | आदिजोशी
मिसळपाववर मैत्रीचे वातावरण असले पाहिजे. कुणालाही असहज वाटायला नको. सर्वांना मित्र बनवता यायला हवेत. एकमेका सहाय्य करू...
आमच्याकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल. एकच अपेक्षा ही आहे की जे काही नियम असतील ते सगळ्यांसाठी सारखे असावेत.
उदा: शिव्या चालणार नसतील तर त्या कुणाच्याही चालू नयेत आणि चालणार असतील तर सगळ्यांच्या चालाव्या.
एकाला एक न्याय आणि दुसर्याला दुसरा असे नको. मग ती व्यक्ती कुणीही असो. अधिक सांगणे न लगे.
6 Dec 2010 - 1:10 pm | यशोधरा
अॅड्याला माझे अनुमोदन.
12 Aug 2024 - 9:23 pm | भागो
माझी मेंबरशिप कृपया रद्द करा.
आ. न.
भागो.
12 Aug 2024 - 9:34 pm | कांदा लिंबू
अनुमोदन
12 Aug 2024 - 9:57 pm | कॉमी
माझी सुद्धा.
12 Aug 2024 - 10:09 pm | गवि
कशाला रद्द करायची बुवा? चांगले लिखाण मिपावर करत असता की. भागो हे हल्ली सर्वत्र लुप्त होत चाललेले ललित नामक दुर्मिळ लेखन करतात. प्रयोगशील कथा लिहितात.
तुमचे देखील प्रवाह विरोधी पण मुद्देसूद विचार उत्तम मांडणीयुक्त असतात.
राजकीय चर्चांच्या नादात आयडी रद्द वगैरे कशाला विनंती?
13 Aug 2024 - 9:17 pm | कॉमी
खरडवहीत काहीतरी लिहिलेले होते ते वाचून वाईट वाटलेले. आता ती खरड आणि लिहिणारा आयडी दोन्ही दिसत नाहीत.
तरी माझा इम्पलसिव प्रतिसाद मागे घेत संपादक व सर्व वाचकांची माफी मागतो.
13 Aug 2024 - 1:16 pm | अमरेंद्र बाहुबली
काय झाले भागो आणी कॉमी?? थोडफार चालू असतं, नका मनाला लावून घेऊ. संपादक मंडळाने श्री भागो नी श्री कॉमी ह्यांचा आयडी रद्द अकरा नये अशी विनंती. कांदा लिंबू ह्यांचा आयडी उद्या उडवणार असाल तर आज आता लगेच उडवला तरी चालेल.
13 Aug 2024 - 9:25 pm | मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद....
13 Aug 2024 - 8:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असे काही करू नका. जमेल तसे येत राहा.
-दिलीप बिरुटे
13 Aug 2024 - 10:02 pm | जावा फुल स्टॅक
100% अनमोदन देतो
दिलीप बिरुटे सर तूम्हि छान लिहिले आहे
5 Dec 2010 - 7:06 pm | नितिन थत्ते
सहकार्य नेहमीच आहे आणि असेल.
5 Dec 2010 - 7:22 pm | अरुंधती
सूचना आवडल्या. वातावरण गढूळ झाले की मिपावर यावेसे वाटत नाही. नवे सदस्यही सुरुवातीलाच जर अनावश्यक टीका झाली तर बावचळतात. त्या दृष्टीने हा संदेश महत्त्वाचा. मिपाच्या पुढील सशक्त, खेळीमेळीच्या, सकस वाटचालीसाठी शुभेच्छा! :-)
5 Dec 2010 - 7:25 pm | यकु
अधिकृत स्पष्टीकरणाबद्दल थॅंक्यू नीलकांतजी!
5 Dec 2010 - 7:36 pm | डावखुरा
एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ !
नक्किच...
5 Dec 2010 - 7:48 pm | स्पंदना
छान लिहिता तुम्ही निलाकांत! मुद्देसुद अन आर्जवी.
आवडल. तुम्ही घेत असलेल्या कष्टाची पुरेपुर जाणिव इथल्या बर्याच सदस्यांना आहे अन तुम्ही ,अन संपादक म्हणुन काम पहाणार्या सर्वांचे, आम्ही अतिशय ऋणी आहोत.
__/\__
अपर्णा.
5 Dec 2010 - 7:51 pm | इन्द्र्राज पवार
".....कुणा एका सदस्यांचे लेखन आपल्याला आवडत नाही किंवा विचार पटत नाही म्हणून त्या धाग्याचे संदर्भ इतरत्र देऊन त्यांचा उपमर्द करू नये. आपल्याला आवडतं त्याला दाद द्यावी नाही आवडत त्यावर त्याच जागी मतभिन्नता व्यक्त करावी. मात्र त्या धाग्यावरून ती चर्चा इतरत्र नेऊ नये....."
~ याचा एक अपमानस्पद फटका नुकताच मला बसला. त्यातही भर अशी की, मी "त्या" संस्थळाचा सदस्य नसताना माझ्या परवानगीशिवाय माझ्या विचाराचा, मतांचा वा लेखनशैलीचा 'तिथे' उल्लेख करून मला बिलकुल अपरिचित असलेल्या व्यक्तींनी तीवर डावे (काही वेळा चेष्टेचा सूर लावून) मत नोंदवायचे आणि मी अधिकृतरित्या त्याला प्रतिवाद देऊ शकत नाही हे माहित असूनही ती चर्चा थांबवावी असे इथल्या सदस्याने म्हणू नये, ही घटना फार खिन्न करणारी वाटली मला. घटनेने विचार स्वातंत्र्य सर्वानाच दिले आहे, पण याचा अर्थ असा नव्हे की फक्त "अ" ने "ब" विरूद्ध ते वापरायचे पण "ब" तांत्रिक कारणास्तव उत्तर देवू शकत नाही याची जाणीव असूनही तसे मत व्यक्त केले असल्यास, "अ" याने त्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला अशीच व्याख्या होईल.
अधिकृत संस्थळावरील विविध विषयांमधील चर्चेत "खेळीमेळीचे वातावरण" हवेच हवे, पण त्या वातावरणाचे वावटळीत रूपांतर होत आहे असे दिसू लागताच तीवर संपादनरूपी वॉशिंग्टनची कुर्हाड चालविली गेली तर तीबाबत कुठे भुवई वक्र होऊ नये.
पण असो. श्री.नीलकांत यानी आपुलकीच्या भावनेने हा धागा काढून काही गोष्टी (संस्थळ संचालक, संपादक या भूमिकेतून) वर स्पष्ट केल्या आहेत त्याचे निश्चितच इथे सौहार्द स्वागत होईलच पण त्यापेक्षाही त्या विचारांची अंमलबजावणी झाल्यास 'मिसळपाव' चे जालावरील स्थान अधिक लक्षणीय होईल.
इन्द्रा
5 Dec 2010 - 8:03 pm | आमोद शिंदे
तिकडची धुणी 'तिकडेच' धुवा ना. इथे कशाला?
तसेच मुळात सुरुवात तुम्हीच तिकडच्या सदस्यांविषयी आणखी कुठेतरी लिहून केली होतीत आता खोटा कांगावा करु नका. स्पष्ट बोलल्या बद्दल क्षमस्व!
5 Dec 2010 - 8:19 pm | इन्द्र्राज पवार
"....स्पष्ट बोलल्या बद्दल क्षमस्व!...."
~~ याची काही आवश्यकता नाही, श्री.आमोद जी. उलट मी अशा स्पष्टतेबद्दल तुमच्या मताचे स्वागतच करतो.
तुम्ही म्हणता तसा इकडच्या तिकडच्या धुण्याचा संबंध नाही, पण श्री.नीलकांत यानी स्वतः आपल्या धाग्यात तशी सूचना मांडली असल्याने मी त्या घटनेचा इथे उल्लेख केला इतकेच.
राहता राहिला प्रश्न मी एका सदस्याचा उल्लेख कुठेतरी लेखात केला याचा. तर तुम्ही जे इथे लिहिले आहे ते अपूर्ण वा गोंधळाचे आहे. त्याबद्दल खुलासा करतो की, 'त्या' संदर्भात 'ते' सदस्य आणि मी यांच्यात अन्यत्र व्यक्तिगत संदेशाची देवाणघेवाण होऊन आपापसातील (अकारण निर्माण झालेले) गैरसमज मिटविले आहेत, त्यामुळे ती चर्चा इथे प्लीज नको. [शिवाय या धाग्यावरील माझ्या प्रतिसादातील रोख त्या सन्माननीय सदस्यावर नसून मी 'तिथला' सदस्य नसताना अन्यांनी केलेल्या टीकेला उद्देश्यून आहे, हे लक्षात घ्यावे.]
धन्यवाद !
इन्द्रा
5 Dec 2010 - 8:53 pm | प्रियाली
जाहीर वक्तव्यांवर किंवा जाहीर केलेल्या लेखन शैलीवर इथे टीका व्हावी तिथे होऊ नये वगैरे अपेक्षा करणे गैर आहे. आपणही अशाच प्रकारे एका वेगळ्या संकेतस्थळावर तिसर्या संकेतस्थळाबद्दल (जेथे आपण सदस्य नाही) टीका केल्याचे स्मरते. ती मलाही त्या संकेतस्थळासाठी अपमानास्पद वाटली होती.
5 Dec 2010 - 9:02 pm | आमोद शिंदे
चर्चा हवी आहे की नको आहे? नक्की काय? विषय तुम्हीच काढता आणि चर्चा नको असेही तुम्हीच म्हणता..
तुम्हीही तिथल्या सदस्यांविषयी टीका केल्यावर ते काय तुमची आरती ओवाळतील का? (तुमचे विधान सरसकट संकेतस्थळाला उद्देशुन होते)
5 Dec 2010 - 9:41 pm | इन्द्र्राज पवार
ठीक आहे. मी तो विषय वाढवू इच्छित नाही, आमोद जी. मी केलेल्या 'त्या' चर्चेच्या अनुषंगाने तुमच्या किंवा तुमच्या परिचयाच्या एखाद्या सदस्याच्या कुठल्याही प्रकारे भावना दुखाविल्या असतील तर मी मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो.
पण इथे त्या विषयाला पूर्णविराम द्यावा ही आग्रहाची विनंती.
इन्द्रा
5 Dec 2010 - 9:49 pm | आमोद शिंदे
पूर्णविराम!!
कृपया आमोद-जी म्हणू नये ही एकच विनंती. नुसते आमोद किंवा शिंदे चालेल.
5 Dec 2010 - 8:18 pm | पंगा
वॉशिंग्टनसाहेबाने आपली कुर्हाड स्वतःच्याच तीर्थरूपांच्या अंगणातील (चांगल्या) झाडावर चालवली होती, असे कायसेसे स्मरते. (चूभूद्याघ्या.)
5 Dec 2010 - 8:59 pm | प्रियाली
प्रत्यक्षात असे काही झाले नसून ही वॉशिंग्टनसाहेबांचा टीआरपी वाढवणारी आख्यायिका होती हे आम्हाला स्मरते.(चूभूद्याघ्या.)
5 Dec 2010 - 9:05 pm | आमोद शिंदे
तरीही उपमा चूकच ना? पंगां ह्यांचा रोख त्यावर आहे.
5 Dec 2010 - 9:07 pm | प्रियाली
पंगांच्या वक्तव्याबद्दल काही नाही हं!
मी म्हणत्ये असे की जर [संपादनरुपी] कुर्हाड चालवली जाणे ही आख्यायिकाच असेल तर.... ;) त्यामुळे उपमा चूकच.
5 Dec 2010 - 9:09 pm | आमोद शिंदे
हॅहॅहॅ...म्हणजे संपादनाची कुर्हाड हा टीआरपी वाढवण्याचा प्रकार आहे होय? कॉलींग अवलिया.. ;)
5 Dec 2010 - 9:10 pm | प्रियाली
मी म्हणत नाही पण वरील वाक्यावरून दिसते.
5 Dec 2010 - 9:13 pm | आमोद शिंदे
थोडक्यात तुमचा ईंद्रा झाला आहे. ;)
ह.घ्या.
5 Dec 2010 - 8:03 pm | आमोद शिंदे
नीलकांत,
अतिशय समयोचित योग्य निवेदन.
5 Dec 2010 - 8:08 pm | मितभाषी
सरपंच भावना पोहोचल्या. आमचे सदैव सहकार्य राहील.
मिसळपावबद्दल माझ्या मनात नेहमीच कृतज्ञतेचीच भावना आहे.
इथे आम्ही अन्नछत्रात जेवतो त्यामुळे वरुन बडीशेप मागनार नाही.
फक्त ज्यांच्या हातात आपण कुर्हाड दिली आहे त्यामुळे 'कुर्हाडीचा दांडा गोतास काळ' होवु नये अशी अपेक्षा आहे.
6 Dec 2010 - 1:22 am | शिल्पा ब
नव्या म्हणजे या संकेतस्थळावर नव्या लेखकांनी जरूर लिहावे...पण मध्ये प्रवीण भप्कर आणि अजून एक कोणीतरी यांचे जे प्रकरण झाले तसे असू नये म्हणजे इथले जुने लोक नव्यांची फें फें उडवणार नाहीत.
बाकी नीलकांत यांच्या मुद्द्यांशी सहमत.
6 Dec 2010 - 6:38 am | Pain
नुसतेच लेखनास उत्तेजन देउ नये, दर्जेदार लेखनास उत्तेजन द्यावे.
लेखनाचा रतीब घालण्यावर बंदी घालावी. भप्करछाप आयडी तसेच इतर काही जे अनेकांनी स्पष्ट, उपहास वगैरे मार्गांनी सांगून दाद देत नाहीत त्यांना आळा घालावा.
6 Dec 2010 - 10:25 am | गवि
नीलकांतजी. प्रथमच आपली पोस्ट वाचनात आली. आवडली.
Pain यांच्या प्रतिसादाबद्दल आभार आणि त्या निमित्ताने थोडं माझं जनरल मत :
मराठीब्लॉग्ज डॉट नेट वगैरे स्थळांवर नवीन पोस्ट टॉपला येतात आणि यथावकाश खाली सरकून मागे पडत जातात अशीच कालाधारित रचना मिपा वर असेल असं समजून (आणि प्रत्यक्षात काय लॉजिक आहे ते नीट न पाहता) दणादण पोस्टे टाकत जाण्याची नकळत का होईना, पण चूक सुरुवातीला माझ्याकडून झाली होती.
मलाही आपण म्हटल्याप्रमाणे उपहास्/उपरोध्/चेष्टा या मार्गांनी सदस्यमित्र सांगायचा प्रयत्न करत होते पण ते त्यावेळी लक्षात आलं नाही कारण तेच ते लॉजिकचं गृहितक.
जेव्हा हे लक्षात आलं की प्रतिसादावर अवलंबून धागा परत परत वर येत राह्तो तेव्हा पोस्ट टाकण्याच्या योग्य फ्रीक्वेन्सीची जाणीव झाली. आता "दोन पोस्टांमधे अंतर राखत आहे". (जुनी फ्यामिली प्लॅनिंगची जाहिरात आठवली.!! :-) )
लांबच्या मार्गाने फिरवून फिरवून, अप्रत्यक्ष, आडवळणाने, छद्मीपणाने नवीन सदस्याच्या लिखाणाच्या क्वालिटीचीच मापं काढून एखादी गोष्ट न सांगता योग्य मित्रत्वाच्या शब्दांत नवीन सदस्याला इथली पद्धत सांगितली तर कटुता टळून मैत्री लवकर लवकर वाढेल.
शिवाय एक शंका आली. "दर्जेदार लेखन" आणि "रतीब" हे कोण ठरवणार ? प्रतिसादांवरून दर्जा ठरवायचा का? रतीब म्हणजे किती संख्येने पोस्टे?
पाककृति , फोटो वादविवाद आणि ललित यांच्यात अधिक दर्जेदार काय? की दर्जा प्रत्येक कॅटॅगरीला वेगळा?
मग आपण प्रत्येक पोस्टखाली "पोल"किंवा "रेटिंग" बटण ठेवू शकतो का?
म्हणजे वाईट रेटिंग सातत्याने मिळणार्या सदस्यांना "आळा" घालता येईल.
माझी अशी समजूत आहे की कोणत्याही ओपन फोरम मधे दर्जा हा वाचणार्यांनी ठरवावा.
"आळा" असलाच तर फक्त ऑब्सीन / रेशियल / ऑफेन्सिव्ह कंटेंटपुरता असावा. (सेन्सॉर बोर्डला "परिनिरिक्षण मंडळ" म्हणतात.."परीक्षण मंडळ" नव्हे..ते "श्वास" , "नटरंग" आणि "चल गंमत करु" या तिघांनाही सर्टिफिकेट देतात. दर्जा हा पाहणार्याच्या नजरेत आहे. प्रत्येकाचा वाचक /प्रेक्षक वेगळा.)
धन्यवाद.
6 Dec 2010 - 12:33 pm | इन्द्र्राज पवार
".....मग आपण प्रत्येक पोस्टखाली "पोल"किंवा "रेटिंग" बटण ठेवू शकतो का?..."
~ श्री.गगनविहारी यांच्या एका चांगल्या प्रतिसादातील (जे बहुतांशी सर्वांचीच भावना व्यक्त करते) फक्त वरील सूचनेविषयी लिहितो.
हे स्थळ भाग घेणार्या सदस्याला त्याबद्दल कुठेलेही पारितोषिक वा प्रमाणपत्र देत नाही, ज्यासाठी 'रेटिंग' ची गरज असते. विविध विषयावर मनसोक्त लिहायला मिळते, चर्चा करता येते, खेळीमेळीच्या वातावरणात विचाराची देवाणघेवाण करता येते असे Admirable Aspects असल्याकारणाने पोल/रेटिंग असू नये असे वाटते. तसे झाले तर मूळ रोगापेक्षा औषधयोजनाच भयावह होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
काळाच्या ओघात जे लिखाण चांगले ते टिकणारच....प्रतिसादांचा पाऊस आला म्हणून (प्रविण भप्करने पदार्पणातच शतक झळकाविले होते....तर आपल्या नावासमोर पदव्यांची रास ओतणार्या एका सौंदर्यविशारदानेही इथे एकदा तीच किमया केला होती) ते लेखन दर्जेदार आणि ज्याला डझनभर प्रतिसाद असत नाहीत ते हीणकस अशी व्याख्या असत नाही, असूही नये.
इन्द्रा
6 Dec 2010 - 12:46 pm | गवि
अरे देवा.
:-)
दर्जा कसा ठरवायचा हा प्रश्न कसा अवघड्/किचकट्/अप्रस्तुत आहे हे दाखवण्यासाठी काहीशी उपरोधाने तो सूचना कम प्रश्न केला आहे. पोल ठेवावा अशी सिरियसली केलेली सूचना नाही.
6 Dec 2010 - 12:58 pm | इन्द्र्राज पवार
अच्छा ?? अहो, तुमच्या त्या प्रतिसादातील व्याकरण मांडणी काहीशी सदोष झाल्यामुळे मी चकलो. म्हणजे असे की, तुम्ही "पाककृति , फोटो वादविवाद आणि ललित यांच्यात अधिक दर्जेदार काय? की दर्जा प्रत्येक कॅटॅगरीला वेगळा?" या वाक्यानंतर 'पॉज' घेऊन पुढील वाक्य नव्या 'पॅरा' ते घेतले, त्यामुळे त्याला स्वतंत्र अस्तित्व येते (व्याकरणदृष्ट्या...)
मग आपण प्रत्येक पोस्टखाली "पोल"किंवा "रेटिंग" बटण ठेवू शकतो का?
त्यामुळे, वाचणार्याला (पक्षी मला, म्हणा हवे तर....याचा अर्थ असाही की मी तुमची प्रत्येक पोस्ट वाचतोच) असे वाटते की, गगनविहारी यांनी "असे केले तर चालेल का?" असा सवाल्/सूचना संपादक मंडळाला केला आहे.
असो....तरीही एक सूचना म्हणून जरी तिचे रूपडे असते तरी माझ्या प्रतिसादातील त्याविषयेची भूमिका तशी राहायला काही अटकाव नसावा.
इन्द्रा
6 Dec 2010 - 1:00 pm | गवि
एकदम मान्य.. :-)
6 Dec 2010 - 12:00 pm | परिकथेतील राजकुमार
श्री. पेन ह्यांच्याशी सहमत आहे. (काय दिवस आलेत च्यायला.... म्हणजे श्री. पेन ह्यांच्यावर. माझ्यासारखा माणुस सहमत होतोय)
काही नवलेखक हे मिपाचे नियम वगैरे काही न वाचता सरळ येउन धडाधड लेखन टाकायला सुरुवात करतात. बर हे लिखाण नविन असते का? तर नाही, आधी कुठेतरी जुनेपाने लिहिलेले पुन्हा आणुन मिपाचा शोध लागला म्हणुन मिपावर टाकलेले असते. बर काहींचा अविर्भाव तर असा असतो की आजवर ह्यांनी ज्या दर्जाचे साहित्य लिहिलय ते मिपाकरांनी पाहिले देखील नसेल. ह्यांना 'आधी हे साहित्य वाचलय, पण पुन्हा वाचायला आवडले' अशी प्रतिक्रीया सुद्धा खटकते. काही महाभाग तर लेखावर आलेल्या प्रत्येक प्रतिक्रीयेवर ह्या लांब लांब प्रतिक्रीया देत बसतात. त्यांच्या काही प्रतिक्रीया तर स्वतःच्या लेखापेक्षा मोठ्या असतात. असे वागुन आपण इतर लोकांचे चांगले लेखन अजाणतेपणी खाली खाली ढकलत आहोत हे त्यांना जाणवत नाही का ?
आता चांगले लिखाण कोणते आणि डोक्यावर आदळलेले कोणते ? हे कोण ठरवणार ? नक्कीच मिपाकर वाचक ठरवणार. जर वाचक लेखकानी काय लिहावे हे सुचवत नाही, तर वाचकाने लेखाचे मुल्यमापन कसे करावे हे लेखकानी ठरवु नये. मिळालेल्या पंचवीस प्रतिसादापैंकी चोवीस कौतुकाचे प्रतिसाद विसरुन जाउन एकाच खवट प्रतिसादामुळे जर लेखक खचत असेल तर हा दोष लेखकाचा आहे. पुन्हा ह्या लेखकांना अगदी जेष्ठ मिपाकरांनी जरी काही सांगितले तरी हे 'घोर अन्याय हुआ है मुझपे' च्या थाटात सरळ दुर्लक्ष करतात.
आम्ही देखील कधीतरी नविन मिपासदस्य होतोच की. आम्हीच कशाला आमच्या नंतर कितीतरी लोक नविन आले आणि आनंदाने रुळले. तुम्ही आखडूपणा दाखवलात की मिपाकर तुम्हाला फाट्यावर मारणारच मारणार. आज इंट्या,स्पा सगळे नविन आले तेंव्हा त्यांना छळले गेले नाही का ? शुचिला तर मी अजुन छळतो, पण ती बिचारी मी केलेल्या विडंबनाचे पण बिनधास्त खवत येउन कौतुक करते. मी मात्र तीला अजुन कधी 'सॉरी ग तुला हलकट प्रतिसाद दिला' असे मात्र म्हणत नाही. उगाच गळे काढणार्यांना कोण सहन करणार ?
बाकी नविन कातडी पांघरुन येणार्या जुन्यांविषयी तर बोलायलाच नको.
6 Dec 2010 - 12:12 pm | गवि
त्यांच्या काही प्रतिक्रीया तर स्वतःच्या लेखापेक्षा मोठ्या असतात. असे वागुन आपण इतर लोकांचे चांगले लेखन अजाणतेपणी खाली खाली ढकलत आहोत हे त्यांना जाणवत नाही का ?
मला तरी ते उशिरा का होईना, जाणवले आणि त्यानंतरच्या एकाही पोस्टवर माझ्या स्वतःच्या कॉमेंट टाकलेल्या नाहीत.
मुळात त्यामुळे धागा वर येतो हेच जाणवायला उशीर झाला.
असो.
बाकी आपण जनरल नवीन मिपाकरांबद्दल बोलत आहात असं मी समजतोय. कारण :
काहींचा अविर्भाव तर असा असतो की आजवर ह्यांनी ज्या दर्जाचे साहित्य लिहिलय ते मिपाकरांनी पाहिले देखील नसेल. ह्यांना 'आधी हे साहित्य वाचलय, पण पुन्हा वाचायला आवडले' अशी प्रतिक्रीया सुद्धा खटकते.
हे किमान माझ्या बाबतीत कधीच मनातही आलं नव्हतं याची मला स्वत :शी मनःपूर्वक जाणीव आहे. इतर कोणाच्या मनात माझ्याविषयी अशी भावना आली असेल तर माझं दुर्दैव.
मिपाकर हे खूप व्हर्सटाईल साहित्य वाचत आलेले आणि म्हणून एक खूप दर्जेदार ऑडियन्स, याच दृष्टीने मी तरी पाहात आलेलो आहे. आणि मिपाकर मित्रांनी ते सार्थ ठरवलंय.
6 Dec 2010 - 12:17 pm | परिकथेतील राजकुमार
गवि तुम्हाल उद्देशुन म्हणुन न्हाय हो लिहिला :) गैरसमज नको.
मागच्यावेळी तुमचा 'डायरी' वरुन असाच गैरसमज झाला होता, पण तो सल्ला मी तुमच्या आधी शुचिमामीला दिला होता ;)
6 Dec 2010 - 12:24 pm | गवि
मुळात आमची "न्येमकी" गफलत कुठे होतेय हे लक्षात येताक्षणीच (उशिरा लक्षात आले हे मान्य) फ्रीक्वेन्सी आणि कॉमेंट, दोन्ही आवरलेच..
शिवाय "दर्जा कसा ठरवायचा ?" हे मी वरच्या कॉमेंटमधे लिहिलेलं वाक्य प्रश्नार्थकच होतं. मी "दर्जा कसा ठरवायचा" हे वाचकांना सांगत किंवा शिकवत नव्हतोच हा एक बारीक खुलासा, न मागताच करतो.
आणि जे काही डायरी वगैरे होते ते झाल्यावर मी पुन्हा पोस्ट टाकली आणि "आखडूपणा" हाच्च येग्जॅक्ट शब्द वापरून मला तो करायचा नाही हे दर्शवण्यासाठी ही पोस्ट टाकत आहे असेही आवर्जून लिहिले.
असो. आपण सर्वच काही मलाच उद्देशून बोलत नाही आहात हे कळून उत्तम फीलिंग आले. धन्यवाद.
इथेच मैत्रीचा हात पुढे करतो..
8 Dec 2010 - 12:32 pm | मृत्युन्जय
आपण सर्वच काही मलाच उद्देशून बोलत नाही आहात हे कळून उत्तम फीलिंग आले. धन्यवाद.
"सर्वच"" शब्द काळजाला भिडला ;).
8 Dec 2010 - 12:44 pm | गवि
हेहेहे.. :)
सर्वच म्हणजे "सगळेजण" नसून आपण (परानाना) जे बोलत आहात त्यातले सर्वच काही मला एकट्याला उद्देशून नाही.. असा अर्थ आहे हे खुल्लसित करतो.. :)
6 Dec 2010 - 8:09 pm | इंटरनेटस्नेही
परिकथेतील राजकुमार यांच्या शब्दाशब्दाशी प्रचंड सहमत!
-
(मिपासदस्य) इंट्या.
6 Dec 2010 - 8:28 pm | स्पा
:)
6 Dec 2010 - 9:37 am | यशोधरा
नीलकांत, उत्तम प्रकटन. तुझा ह्या संस्थ़ळावर सक्रीय सहभाग असेल तर बर्याच नको असलेल्या गोष्टीना आळा बसण्याची शक्यता अधिक.
6 Dec 2010 - 9:49 am | अरुण मनोहर
तुमची कार्यपद्धती आवडते. नेहमी सहकार्याचे आवाहन असते. आणि प्रसंगी कठोर निर्णय देखील घेता. तुमच्या नेतृत्वाखाली मिपाची आणखी भरभराट होवो हीच सदीच्छा.
6 Dec 2010 - 10:56 am | नीधप
तुम्ही तुमचे म्हणणे खूप चांगल्या पद्धतीने मांडलेय.
मिपावर लोकांनी लिहीते व्हावे यासाठी जे सगळे अडथळे, विघ्न काढण्याबद्दल तुम्ही म्हणता आहात ते योग्यच.
एखाद्याच्या लेखावर मुद्दामून आचरट विडंबने आणि प्रतिसाद देणे हा मिपाचा यूएसपी असल्यासारखे होते बरेच दिवस त्याला आळा बसेल अशी आशा.
परंतू लिहीत्याचा स्वतःच्या लिखाणावर अधिकार नसेल तर लिहित्याला का लिहावसं वाटावं इथे?
उदाहरणार्थ.. क्ष ने एक लेख/कथा/कविता असं काही मिपावर लिहीले तर त्यामधे बदल करण्याचे त्याला स्वतःला स्वातंत्र्य नाही. पण क्ष ला पूर्णपणे अनोळखी असलेले किंवा क्ष च्या दृष्टीने आगंतुक असलेले इतर १० लोक (अधिकृत आकडा माहित नाही) त्यात हवा तो बदल करू शकतात. हे विचित्र आहे. क्ष च्या लिखाणावर क्ष सोडून इतरांचा अधिकार आहे की काय अशी क्ष ला भिती वाटली तर चुकीचे नाही.
तसेच लेखनाची प्रक्रिया ही सततची प्रक्रिया असते. इथे लिहिणारे बरेच जण नवशिके लिहीते असू शकतात. आलेल्या प्रतिक्रियांच्यातून लिखाणात सुधारणा करण्याची गरज वाटू शकते त्यांना. नुसते टायपो नव्हेत तर पुढचा ड्राफ्ट या संदर्भाने सुद्धा. पण असा कुठलाही बदल करण्यासाठी तो लिहिता संपादकांना साकडे घालणार आणि मग ते बदल लिहून तो पाठवणार आणि मग संपादक तो बदल करणार. ही अतिशय अडथळ्याची/ अडचणीची प्रक्रिया आहे. या वेळखाऊ प्रक्रियेला वैतागून अनेक जण इथे लिहिण्याचे टाळू शकतात. मुळात लेखन-प्रतिसाद-पुनर्लेखन अशी बाहेरून किंवा लेखन-चिंतन-पुनर्लेखन अशी लेखकाची वैयक्तिक प्रक्रिया जी आहे त्यातला सहजपणा, स्पॉन्टॅनिटी अश्या कृत्रिम निर्बंधांमुळे अडकते. जे चुकीचे आणि लिहित्यासाठी गोंधळाचे ठरू शकते.
तेव्हा स्वतःच्या लिखाणाचे संपादन स्वतःला करता यायला हवे. निदान हे होईतो मी तरी इथे नवीन काही लिखाण टाकणार नाही. (त्याने मिपाला काहीही फरक पडत नाही हे मला पूर्ण माहीत आहे.)
7 Dec 2010 - 8:35 pm | जयंत कुलकर्णी
आत्ताच हा धागा वाचला ! मी आपल्या मतांशी सहमत आहे.
आणि लिहायचे थांबवले तर कोणाचे काहीही बिघडणार नाही याही मताशी सहमत आहे.
6 Dec 2010 - 12:25 pm | सुधीर काळे
नीलकांत-जी, धन्यवाद! आपले म्हणणे आपण छान लिहिले आहे. माझ्याकडून नेहमीच सहकार्य मिळेल याची खात्री देतो.
वेळात वेळ काढून आपण पूर्वी करत होता तसे लेखन पुन्हा सुरू करावे. दुर्दैवाने मी आपले त्यावेळचे कुठलेच लिखाण वाचलेले नाहीं!
एक विनंती: अनेक दृष्ट्या सर्वात सरस असलेले 'गमभन' हे सॉफ्टवेअर एका बाबतीत चांगले नाहीं आणि ते म्हणजे लिहिताना कांहीं ठराविक काळजी घेतली नाहीं तर लि़खाण Garble होते. एव्हांना मला काय केल्यास तसे होते हे कळलेले आहे. आणि दुर्लक्षाने तसे झाल्यास ctrl+z वापरून त्या आपत्तीतून सुटका करून घेऊन पुन्हा मूळ पदावर कसे यायचे हेही कळले आहे, पण मूळ उणीव काढून टाकण्याचा प्रयत्न व्हायला व्हावा.
याउलट बरहा हे सॉफ्टवेअर सर्व दृष्ट्या जास्त सरस आहे पण 'माँटेसरी' हा शब्द लिहिला तर तो 'मॉंटेसरी' असा दिसतो. अनुस्वार आहे पण तो off-centre असल्याने नीट दिसत नाहीं. तसेच अवतरण चिन्हेही कमी प्रतीची उठतात.
तरी 'गमभन'तील वरील उणीव भरून काढण्याचा प्रयत्न आपण जरूर करावा किंवा करून घ्यावात ही विनंती.
शुभेच्छा देऊन इथे थांबतो.
6 Dec 2010 - 1:12 pm | अवलिया
एका हाताने टाळी वाजत नाही हेच आणि एवढेच.
6 Dec 2010 - 6:47 pm | योगेश सुदाम शिन्दे
भावना पोचल्या नीलकांत राव ...
8 Dec 2010 - 1:08 pm | जागु
राजकुमार अगदी चांगल लिहिलयत.
निलकांत आमच्याक्डून तुम्हाला सहकार्य आहे. मिपाचा दर्जा चांगला आहे व तो टिकवुन ठेवणे हे जुन्या व नविन मिपाकरांच्या हातात आहे. तेंव्हा मिपावर येताना आपल्या कुटुंबात असल्यासारखे वागा. शेजार्याकडे गेल्यासारखे नको.
8 Jan 2016 - 8:06 pm | राजवैभव
मिपा खुप छान आहे !या करिता खुप खुप धन्यवाद !
5 Feb 2016 - 3:49 pm | मराठी कथालेखक
मिपावरील स्वाक्षरीची सुविधा बंद करण्यात आली आहे का ?
6 Apr 2016 - 5:31 pm | ashok dalvi
मप॑आ खुपच छान आहे. मराथी लिह्न्याचा प्रयत्न कर्तोय. धन्यवाद.
13 Aug 2024 - 2:11 pm | कर्नलतपस्वी
अधून मधून येत असते. म्हणून लगेच अंगी चिताभस्म फासू नये.
For@काॅमी,भागो,कां.ली. आणी इतर सदस्यांना.
अनुभवाचे बोल.
बम बम भौले, श्रावणमासी हर्ष मानसी असू द्यात.
13 Aug 2024 - 6:18 pm | सुबोध खरे
सदस्यत्व रद्द करण्यासाठी विनंती करायची काय आवश्यकता आहे?
हे इथल्याच लोकांना आम्ही व्हीओतलो आहोत हे जाहीर करणे आहे. त्याची काहीही गरज नाही
इथल्या वितंडवादाला कंटाळून असंख्य सदस्य असेही आताशा मिपावर दिसत नाहीत.
बाकी मिपा चालकांना अनेक गोष्टी सांगूनही त्यात सुधारणा न झाल्याने असे झालेले आहे.
तेंव्हा हे असच चालायचं हे गृहीत धरा
13 Aug 2024 - 6:51 pm | धर्मराजमुटके
अनुमोदन.
जणू काही आपण खाते उघडायला काही पैसे मोजले आहेत आणि सदस्यत्व रद्द झाल्याने ते व्याजासकट परत मिळतील असे आहे काय ?
नाही पटले तर मिपाच्या आद्य संस्थापकांच्या भाषेत चपला घालून चालू पडायचे. हाय काय नाय काय ?
सदस्यत्व रद्द करत नाहित म्हणून कुंथत जगायची आवश्यकता नाही.
असो.
आपल्याला न पटलेल्या गोष्टी जगात सगळीकडे होतच असतात. म्हणून आत्महत्या करणे आणि कंटाळून सदस्यत्व सोडणे हे सारखेच.
13 Aug 2024 - 9:25 pm | मुक्त विहारि
इथल्या वितंडवादाला कंटाळून असंख्य सदस्य असेही आताशा मिपावर दिसत नाहीत.
-----
असेच असावे.....
14 Aug 2024 - 12:23 pm | जावा फुल स्टॅक
दिलीप बिरुटे सर यांना विनन्ति आहे कि प्याट्रिक झेड हा आयडी जो रद्द केलेला दिसत आहे तो त्यांनि परत आनावा.
14 Aug 2024 - 2:49 pm | कर्नलतपस्वी
Ssssssss
16 Aug 2024 - 7:58 pm | मुक्त विहारि
उंदराला मांजर साक्ष....
14 Aug 2024 - 2:09 pm | चौथा कोनाडा
मिसिंग जुने जाणते मिपाकर.
नव्या मिपाकरांनी मिपा हलतं ठेवलं आहे याचं ही समाधान आहे !
मिपाला पर्याय नाही
मिपा दा जवाब नहीं
14 Aug 2024 - 3:46 pm | टर्मीनेटर
गेले ते गेले... कालाय तस्मै नमः!
एक बार चले जाते हैं जो दिन रात
सुबह शाम वोह फिर नही आते...
तस्मात आता गेलेल्यांची आठवण काढून काही उपयोग नाही, ते ढगात गेले असे समजायचे 😀
14 Aug 2024 - 3:59 pm | कंजूस
नवे मिपाकर येत नाहीत.
जुने मिपाकर फारसे लिहीत नाहीत.
काय करणार?
14 Aug 2024 - 4:25 pm | टर्मीनेटर
नवे मिपाकर येणार नाहीत असे काही नाही पण कमीतकमी मेन बोर्डावरचे वतावरण तरी त्यांना आकर्षीत करणारे असावे!
मला कोणाच्या सदस्यनामाचा नामोल्लेख करायचा नाही पण कमीतकमी आपल्या प्रतिसादांत काहितरी तथ्य किंवा सच्चेपणा असावा ही काळजी देखील न घेता निव्वळ द्वेष भावनेतून काही नव्या (आणि मिपाच्या अत्यंत जून्या जाणत्या) सदस्यांकडूनही प्रतिसाद दिले जात असतील तर मग दोष कोणाचा?
बाकी गेले ते जाउद्यात, त्यांच्याविषयी काही वाच्यता नको असे वाटते, त्यांना त्यांची जी काही कारणे असतील ती लखलाभ…
आले ही बहू… येतीलही ही बहू….
16 Aug 2024 - 2:10 pm | जावा फुल स्टॅक
प्रोफेश्वर प्रा.डॉ.दिलीप बिरुटे हे खुप चांगले संपादक आहेत
त्यांनी मिसल्पव ही खुप छान प्रकारे धुरा सांभाळी आहे
त्याना नम्र विनंति आहे कि प्याट्रीक झेड हा आयडी क्रूपाया परत आणून द्यावा
16 Aug 2024 - 7:58 pm | मुक्त विहारि
उंदराला मांजर साक्ष....
16 Aug 2024 - 5:05 pm | कर्नलतपस्वी
नवे मिपाकर येणार नाहीत असे काही नाही
नवे नाही आले तरी जे गेलेत तरी पण आहेत ते नव्या आय डी ने पुनर्जन्म घेतलीच की.....