ईट्स अफ्रिका ब्वना -२ !!

टारझन's picture
टारझन in जनातलं, मनातलं
29 Jul 2008 - 5:35 am

ईट्स अफ्रिका ब्वना

डीस्लेमर : या भागात काहीही चटपटीत नाही.. ६ महिने अफ्रिकेत राहून जेवढी अफ्रिका कळाली ती मांडत आहे.

सविस्तर डिटेल फोटू पहाण्यासाठी चित्रांवर टिचकी मारण्याची मेहनत घ्यावी :)

ईट्स अफ्रिका ब्वनापासून पुढे ...

सगळ्यात पहिल्यांदा अफ्रिका म्हंटले की ऊभी रहाते ती दक्षिण अफ्रिका. बाकी अफ्रिकन कंट्रीज आपण वाळीत टाकल्या सारख्या तुच्छ लेखतो. आणि त्यात युगांडा म्हटलं की (मराठी माणसाला) मनातल्या मनात हसू आल्याशिवाय रहात नाही. आपल्याला अजुनही अफ्रिका म्हणजे नुसती जंगल आणि डांबरमेड कल्लू आदिवासी आठवतात. काही अंशी खरं आहे. पण पुर्ण नाही. ईथे थोडा प्रकाश टाकतो.

जसे विमान युगांडाच्या हद्दीत येते, सर्व प्रथम दर्शन होते ते "लेक व्हिक्टोरिया" चे. जगातील २ नंबरचे तळं. (बहूदा भुमध्य सागर पहिला आहे) याच विशाल तळ्यातून द ग्रेट रिव्हर नाईल ऊगम पावते. विमानातून एवढे विशाल पाणी पाहून आपण समुद्रावरून जात असल्याचा भास होतो. एंटीबे एक छोटंस अंतरराष्ट्रिय विमानतळ. तिन्ही बाजुंनी लेक व्हिक्टोरियाच्या पाण्याने वेढलेलं.

हवामान :
अतिशय सुंदर मनमोहक स्वच्छ हवामान, मन गार करणारा हिरवागार निसर्ग , भारताच्या मानाने फार फार कमी प्रदुषित, (ईथे नद्या अजुन नद्याच आहेत, गटारं नाही झाली अजुन त्यांची मुळा-मुठे सारखी ). निसर्गाने दिलेला सुंदर नजराणा अफ्रिकेत अजुन शाबूत आहे. याची प्रत्येक क्षणी ओळत पटते.
युगांडा हे विषुववृत्तावर (ईक्वेटरच ना?) येतं. त्यामुळे सुर्याची लंबवर्त किरणे थेट पृथ्वीवर येतात, म्हणून काही जेनेटिक बदल होऊन अफ्रिकन डांबर झाले असं मला कोणी तरी सांगितलं. ईथे ऊन्हाळा-पावसाळा-हिवाळा ऋतूही नाहीत. बारा महिने कधीही पाऊस पडतो आणि काही क्षणात लख्ख ऊनही पडतं. हवामान अगदीच मानवेल असं (ना इंग्लंड-रशिया सारखं गोठवणारं , ना आखाती देशांसारखं वाफावणारं), एकदम झकास वातावरण.ऊत्तम शरिरासाठी लागणारी हवा (नक्की माहीत नाही काय ते) ईथे आहे. म्हणूनच की काय , जागतिक मॅरेथॉन मध्ये यांच्या स्टॅमिन्याचा हात(पाय) कोणी धरू शकत नाही. अस्मादिकांना व्यायामाचा शौक असल्याने , सकाळीच ४ किमी रनिंग करून जिमला जातो. मला माझ्या सारखेच धावणारे दिसत. आधी विचार केला की हे मॅरेथॉन ची तयारी करतात की काय ? पण नंतर कळलं हे महाभाग पळतच कामाला जातात.

संस्कृती / सभ्यता :
माझा मुक्काम युगांडाची राजधानी, कंपाला मधे होता. एंटिबे एअरपोर्ट पासून ८० किलोमीटर. मायकेल ने गाडी सुसाट आणली .... निसर्ग भरभर डोळ्यांसमोरून पळत होता, आणि मी अचंभित होऊन नुसता पहात होतो. मध्येच कुठे तुरळक पुर्णता: नैसर्गिक पणे (सिमेंट्,विटा,पत्रे ,ई न वापरता) बांधलेली घरे दिसायची, आपल्या सारख्या पारावरच्या गप्पा ईथे भरत नाहीत. अफ्रिकेत, मु़ख्यता : युगांडा, केनिया, टांझानिया, मालावी, सुदान ई. देशांत ३ पिढ्यांपासून स्थालांतरित झालेले भारतिय (मोस्टली केम छो भाई ) जास्त आहेत. ईतके की , तुम्हाला आपण भारता बाहेर रहातोय याची जाणिव फार कमी होते. ईथले बहुतांश भारतिय फार श्रीमंत आहेत. तर स्थानिक लोक खालच्या दर्जाची शारिरीक कामे करतात.एक गोष्ट मला स्पष्ट करावीशी वाट्टे.ईथे मी येतानाच मन मोठ करण्याच्या औषधांच्या जाहिरातींचे मोठे मोठे फलक पाहिले. मायकेल ला विचारल्यावर तो हसला. मिळालेली माहीती अशी. अफ्रिकन माणसाच्या सुंदरतेची व्याख्या ईतर जगापेक्षा वेगळी आहे. चेहरापट्टी, त्वचा,बांधेसूद शरिर त्यांना सुंदर वाटत नाही.स्त्रीचं मन जेवढ मोठ तेवढी ती सूंदर. :) मग बाकी माप बेमाप असले तरी चालेले. ईथल्या स्त्रीला बाई म्हणन्या पेक्षा "बाईमाणूस" म्हटलेलं योग्य. स्त्री-पुरुष दोघांना केस एकदम गवत ऊगवल्या सारखे ऊगवतात.म्हणून हे टकलेच असतात. ९९% स्त्रिया विग घालतात. (मला खटकलेली गोष्ट अशी, तुम्हाला विग घालून केशभुषा करायची आहे तर करा ना , एकसे एक भयानक प्रकार करून ठेवतात, काय माहीत तेही यांना सुंदर वाटत असेल. चिन मध्ये मार्शल आर्ट जसं प्राणांच्या हालचालींवर आधारित आहे, तशी यांची केशभुषा पण प्राण्यांपासून प्रेरित झालेली असावी.) शाळेला जाणार्‍या टकल्या पोरी पाहिल्या की गंमत वाटते.

ईथे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड च्या डायरेक्ट फायटिंग होतात .. एकदम सन्नी देओल ष्टाईल मधे. अफ्रिकेत मुळ भाषा इंग्रजी आहे.युगांडन, स्वाहीली ई. लोकल भाषा आहेत, पण इंग्रजी सर्वांना कळते.मला येऊन २ महिने झाले होते. एका बॅंक ईसमाला मी रोज तसा पहात होतो. एक दिवस माझ्या कडे आला , त्याच्या बरोबरच एक पोरगी होती. मला थोडा बाजुला घेऊन गेला. माझी थोडीशी विचारपूस केली. म्हणाला "स्टे विथ माय डॉटर फॉर अ मंथ,इफ यु लाईक हर, किप हर" , माझी कानशिलं गरम झाली. बधीर होऊन मी पुन्हा त्याला विचारलं "व्हाट डिड यु से?" त्याने त्याच टोन मधे पुन्हा तेच ऊत्तर दिलं. मी म्हटल "ऊठ *डव्या , चालायला लाग !! " किप हर म्हणजे काय ? साला काय शोकेस चा माल वाटला का काय !!! मी त्याचा अपमान करून पण त्याला वाईट वाटलं नसावं. कारण जाताना मला म्हणाला "थिंक ओव्हर ईट अगेन !!" माझा पारा आधिच चढलेला, मी मराठीतल्या चतुर्थ श्रेणीतली स्तुतीसुमनं बिंधास्त हासडली. मी बँकेच्या मॅनेजरला हा किस्सा सांगितला.तो भारतिय मुळाचा होता. त्याने मला सांगितले ते ऐकून चाट पडलो. ईथे लोक १०-१० वर्षे सुद्धा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड म्हणून एकत्र रहातात. त्यात "प्रजनन" पण करतात. आणि मग कुठे यांना लग्न करावं वाटलं तर करतात. त्यामुळे त्या माणसाने मला "किप हर" ची दिलेली 'ऑफर' काही मोठी गोष्ट नाही ईथे. माझ्या हॉटेल च्याचमागे एक चर्च आहे. एक विवाह सोहळा चालू होता. जोडपं तसं वयस्करच दिसत होतं. एक ६-८ वर्षाचा मुलगा(पक्क चिंपाजी वाटत होतं) हातात पुष्पगुच्छ घेऊन जोडप्याच्या दिशेने चालला होता. तोही एकदम सुट-बुट टाकून होता (अर्रे वा चिंपाजी सुट-बुटात?) . म्हंटलं हा कोण? तर तो त्या जोडप्याचा एक पुर्व पराक्रम होता. आई-बापाचे लग्न लावणारा तो ईवलासा शाहिद कपूर पाहून मी धन्य झालो.बर लग्न पण लै भारी होतात. माझ्या हॉटेलच्याच आवारात मला बुधवार-शुक्रवारी ४०-५० लोक खुर्च्या टाकून काही तरी करताना दिसायचे. म्हंटलं भिषी बिशी लावत असतील. खरी गोष्ट अशी की ते नवर्‍याचे-नवरीचे मित्र आणि नातेवाईक असतात. लग्नाआधी सगळ्यांना एकत्र बोलावून पैसे गोळा केले जातात. हे नैतिक सक्तीचं असावं. (लग्न करतो एक, आणि बाकीचे पैसे देतात !!! वा !! चांगला बिझनेस होईल , दर महिना अखेरीला लग्न केलं असत मी तर ..) आपल्या ऊलट, ईथे मुलगा(?) मुलीच्या बापाला हुंड्यात गाई देतो. सही ना ? तर लग्नाची प्रोसिजर मला फार आवडली. मोजके लोक( पुणे -३० सारखे, तुमचे ५० आमचे ५० ) चर्च बुक करायंच.मस्त भाड्याने मर्सिडीज आणायच्या. पादरी(फादर) हाही तरी नाकात बोलतो, गुलाबजल दोघांवर शिंपडतो, मग दोघांनी एक मेकांच एक जाहिर चुंबन घ्यायचं,. झालं लग्न. बाजा नाही ,फटाके नाही, काही नाही.प्लस लग्नाला आपलीच कार्टी उपस्थित .(म्हंटलं ईथ जर पोरा-पोरीला हळद लावण्याची प्रथा असती तर ही ध्यानं टॅक्सी/ऑटो च दिसली असती, ते काळ--पिवळं काँबिनेशन). ईथे अमेरिकन कल्चर फार पाळल जातं. साधा सफाई कामगारही सेफटी बुट-हेलमेट , पिवळा पोषाख घालूनच रस्ते साफ करतो. टॅक्सी ड्राईव्हर पण मस्त टाय घालून प्रोफेशनल वागतो. कंपाला शहर फारं सुंदर आणि स्वच्छ आहे, मोठे सुटसुटीत रस्ते,सुंदर बगिचे, सुंदर ईमारती आहेत.

युगांडा-केनियाला तुम्ही अमेरिका-जपानच जंकयार्ड म्हणू शकता. तिकडे फेकून दिलेल्या कार ईकडे येतात. यात टोयोटचं प्रमाण जवळ जवळ ९०% आहे. तरीही ईथे बी.एम.डब्लु. , मर्सिडीज , जीप , वोक्स वॅगन ,मित्सुबीशी, निस्सानच काय हम्मर पण दिसते. कारण ईथले लोक ३ गोष्टींचे फार आशिक आहेत. बाई-बाटली आणि कार. खायला नसलं चालेलं यांच्या बुडाला कार हवी. ईथे भारतिय-चायनिज बाईक्स दिसतील. ऑटो सारखा खाजगी वाहतूक म्हणून याचा वापर होतो. याला "बोडा-बोडा" म्हणतात.

चलन :
युगांडाचे चलन आहे युगांडन शिलींग , १ डॉलर म्हणजे १६००-१७०० युगांडन शिलींग्स. १ रुपया =४४ युगांडन शिलींग्स
केनियाचं केनियन शिलींग , १ डॉलर = ६० के.शिलींग्स किंवा १ रुपया = १.५० के. शिलींग्स.
युगांडात कमीत कमी १०० शिलींगचं तर जास्तित जास्त ५०,०००शिलींग्सच चलन आहे. मला सुरुवातीला खर्चाचा ताळमेळ लागेच ना !!
मी आल्यावर १००डॉलर बदलून घेतले मला १ लाख ७० हजार शिलींग मिळाल्या , तिथल्या तिथे मी लखपती झालो म्हणून आनंद साजरा केला.

यामुळे झालं काय की मी रोज ३०,००० - ५०,०००शिलींगचं एकटा खातो हे मला पचायला जड जात होतं. पण चलन भिकार असलं तरी महागाई फार आहे. त्यातही मी सेंट-सेंटचा विचार करणारा अट्टल पुणेकर असल्याने ऑर्डर करण्याआधी मोबाईल वर ते किती रूपयांत पडतं याचा विचार करत असे. ५०,०००शिलींग म्हणजे बापरे १२०० रुपयांच जेवण? अबब !!! ते जेवण खाताना रत्न जडीत जेवण जेवल्याचं फिलींग येत असे (सोन्याचा घास काय असतो ते मला ईथे कळाले) . पण भारतिय खायचं म्हटलं की किंमत मोजावीच लागणार होती.

आहार :
ईथले लोक मुख्य करून मांसाहारी आहेत. बिफ , पोर्क, हॅम, चिकन , मासे आहारात रोज असतात. यांचा आहार बघून मला पण न्यूनगंड आला. एक बाईच २-३ भारतियांच्या सहज कानाखाली मारेल एवढ सहज खाते. एक नॉनव्हेज करी, भलामोठा भाताचा ढिग , केळ्यापासून बनवलेला कसलासा पदार्थ , बिनस् ,नुसतेच ऊकडलेले बटाटे हा ईथला मुख्य आहार. तसे ईथे भारतिय रेस्टॉरेंट्स ही भरपूर आहेत. तुम्हाला पुर्ण कांदा-लसूण मुक्त सात्विक भोजना पासून , नॉर्थ-साऊथ इंडियन ही भेटेल.वडापाव पण मिळतो. पण तो मॅक'डी चा बर्गरच वाटतो. त्याच्या चवी विषयी नं बोललेलंच बरं. मला सगळ्यात डोक फिरवणारी गोष्ट वाटली ती म्हणजे, माणून हॉटेलात आला, की ईथे फुकटचे पाणी मिळत नाही. ते विकत घ्यावे लागते. साधी पाण्याची बाटली पण ऑर्डर करावी लागते. वेटर पाणी देत नाही... ड्रिंक्स च मेनुकार्ड पुढे करतो. मी त्याला पुन्हा लहान मुला सारखा सोडा (कोक, फंटा) किंवा पाणी आणायला सांगतो .छोटीशी पाण्याची बाटली ८० रुपये ? ते पाणी पिऊन घसा अजून कोरडा पडतो.

भटकंती :
युगांडात असताना थोडासा फिरण्याचा योग आला ! त्यामुळे ईथलं सामान्य लोकांच जिवन कसं आहे हे अगदी जवळून पहाता आलं. अफ्रिकेत अमेरिका,युरोप आणि बाकी ठिकाणांहून लोक जंगल सफारी साठी येतात. त्यामुळे भारी भारी हॉटेल्स आहेत. हे हाय-हाय हॉटेल्स आणि त्यांपासून थोडी दुर आदिवासी लोकांची ६ बाय ६ ची घर (खरं तर झोपड्या) पाहील्याकी मोठा विरोधाभास दिसतो.कुठेही तुम्हाला केळीची झाड दिसतील.ईथल्या फळांना जगात तोड नाही हो. आंबे, कलिंगड, आननस, फणस आहाहा !! एवढी रसाळ .. वा भाई मजा आ गया ! तुमच्या तोंडून हे शब्द निघाल्या शिवाय रहाणार नाहीत. वन्य-जिवन अजुनही समृद्ध आहे. ईथली पोरं माकडांच्या फार जवळ आहेत. अत्यंत चपळ, झाडांवर ईकडून तिकडे माकडा ईतक्याच सराईत पणे हे ऊड्या मारत असतात. (फोटू नाहीत याचा खेद वाटतो)
पोरं गरिब असंली तरी जाम खूष असावित. शिक्षणाचं यांना सोयरसुतक नसाव. शहरात चांगल्या अंतरराष्ट्रीय दर्जाच्या महागड्या शाळा आहेत पण.
ही एक चिमुरडी .. फारच गोड वाटली.

ईथल्या जंगली लोकांना (जे शेती करतात, पशुपालन करतात) त्यांना मसाई म्हणतात. खरेदीची आवड असल्यास मसाई लोकांनी हाताने बनवलेल्या अतिशय सुंदर कलाक्रुती आपणास मिळतील.

युगांडाचं अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे, ईथे भरपूर टेकड्या आहेत. सपाट पठारी भाग कमी आहे. आणि या हिरव्या गर्द टेकड्यांवर मस्त मस्त बंगले बाधलेले आहेत.ते लांबून बघायलाच ईतकं सुंदर वाटतं.

जिंजा :
कंपाला शहरापासून ८० किमी दुर जिंजा नावाच टाऊन आहे. वाटेतला रस्ता खरोखर सुंदर आहे. मस्त वाटतं


शहराबाहेर निघालं की रस्त्याच्या दोन्ही बाजूंना घनदाट जंगल आहे. रस्ता भरभर जातो पण जंगल काही संपत नाही. निसर्गाच्या सुंदरतेला मर्यादा नाहीत. सलाम करावा वाटतो. मन मोहून तिथेच तंबू टाकून काही काळ रहावसं वाटतं.
जिंजा मध्ये नाईल नदीचं ऊगम स्थान आहे. प्रचंड व्हिक्टोरिया लेक च्या पोटातुन प्रचंड नाईल नदीचा जन्म पहाणे एक वेगळीच मजा आहे. ईथे तुम्ही बंजी जंपिंग, राफ्टींग चा मनमुराद आनंद घेऊ शकता. हॉटेल्सही सर्व सुखसोईंनी युक्त आहेत. वाटेत आदिवासींची घरे आहेत. त्यात मला वाकून जाताना पण त्रास होत होता. कसे रहातात काय माहीत बुआ. यांना कसलाच खर्च नाही. इंटरनेट, केबल टीव्ही , कार , फॅशनेबल कपडे (कपडे हवेत असं ही नाही) किंवा कसल्याच मानवनिर्मित वाढीव गरजा नाहीत. निसर्ग सगळं देतो. आपल्या सारखी गुंठ्यावरून , बांदावरून मारामारी कोर्ट कचेरी ईथे नसावी. कुठेही एखाद झोपड मचान बांधाव,नैसर्गिक रित्या फुकट मिळेल ते खावं आणि दिवस ढकलावे. ऐकीव माहीतीच्या आधारे, काही लोक आयुष्यभर काहीही ऊद्योग न करता जगतात.

स्पिक कॉमन्वेल्थ रिसॉर्ट, मुन्योन्यो :
मी ज्या बँकेच्या कामासाठी आलो , त्या बँकेचा सर्वेसर्वा "सुधीर रुपरेलीया" हा युगांडातला सर्वांत श्रीमंत व्यक्ती.एवढा की युगांडा मधे तो काहीही करू शकतो. १० पंचतारांकित हॉटेल्स , क्लब्स , बँका, अजुन बरंच काही.. स्पिक कॉमनवेल्थ रिसॉर्ट ,मुन्योन्यो हे सप्त तारांकित रिसॉर्ट देखिल त्याचंच.ईथे राजकिय मिटींग्ज होतात. काही महिन्यांपुर्वीच आपले सर सर्दार मनमोहन ईथे येवून भारताचा खजिना थोडासा रिकामा करून गेले.

व्हिक्टोरिया लेक च्या कडेला (जिंजा मधे नव्हे, हे दुसर्‍या टोकाला आहे हे रिसॉर्ट आहे. दिवसाचा रेंट ६००-७०० डॉलर प्रतिदिन. अरबी देशांची बैठक झाली तेंव्हा सगळं हॉटेल बुक केल होतं ५ दिवस. (तेलाच्या किमती का वाढतात ते कळलं आता).

आणखी काही :
भारतात जसं क्रिकेटच वेड आहे, तसंच ईथे फुटबॉलच प्रचंड वेड आहे.मॅच डे ला क्लब्स चे मोठ्या स्क्रीनचे टीव्ही सर्वांसाठी खुले केलेले असतात.फार जोषात हे लोक मॅचचा आनंद घेतात (आमच्या पुण्यातला एक खडूस ईलेक्ट्रानिक्स दुकानदार क्रिकेट मॅच रंगात आली असताना , शो ला ठेवलेल्या टिव्हीचं मुद्दाम चॅनल बदलत असतो.) ईथल्या लोकांना संगिताचं ही वेड आहे. ४-५ लोकं एक मिनी ट्रक काढतात, त्यावर एक म्युझिक सिस्टीम असतं, आणि एक गाणारा. शहरातल्या रस्त्यांवरून मस्त म्युझिक वाजवत फिरतात.थोडक्यात फिरता ऑर्केस्ट्रा. कमर्शीय एरियातुन चालताना बर्‍याच शॉप्स मधून झिंग आणनार्‍या संगिताचे सूर ऐकू येतात. नाईट लाईफ पण एकदम झकास आहे. कसिनो आणि क्लब्स मधे दारू पासून ते विषेश सेवा , सगळं ऊपलब्ध आहे.पोरी बाळींचा द्राक्षासवाचा स्टॅमिना पाहून तोंडात बोट घालायला होतं .. अहो एवढ तर मी पाणी पण नाय पित दिवसाला. पण एक बियर साठी शारिरीक चाळे करणार्‍या किळसवाण्या ध्यानाकड पाहिलं की कससं च होतं... रात्री ८ ला सामान्य जीवन सगळ चिडीचुप होतं... ऊगाच एकटं फिरून सुपरमॅन बनणाराला चाकू,गनपॉईंट वर लुटण्याचे प्रकार होतात. आणि फिरलात तर कृपया थोडे पैसे असू द्यात. कारण काही नाही मिळालं तर ते लोक फटकवतात म्हणे फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी.

सारांश :
अफ्रिका फार सुंदर आहे, आणि ईथलो लोकही, कोणीही तुम्हाला हाय-गुड मॉर्निंग करेल. आठवा ते पुण्या-मुंबईतले लोक. ओळखीचे असून एक तर वाट बदलतात एक तर त्यांचा मोबाईल तुम्ही दिसले की मगच वाजतो. आणि ते सराईतपणे टाळून जातात.अफ्रिकन लोक तुमच्या पर्सनल लाईफ मधे ढवळाढवळ करणार नाही. ते फार हुषार आहेत. अगदी रूमक्लिनर पण ईंग्लिश मधे बोलतो :)
या आमची अफ्रिका बघायला , मला विश्वास आहे तुम्हाला अफ्रिका निराश नाही करणार

(संपुर्ण)
------------------------------------------------------------------------------------------( अफ्रिकेचा टारझन) कुबड्या खवीस २९-०७-२००८ (रात्रौ ३:०७)

संस्कृतीसमाजप्रवासदेशांतरराहती जागाअनुभव

प्रतिक्रिया

अमित.कुलकर्णी's picture

29 Jul 2008 - 6:21 am | अमित.कुलकर्णी

दोन्ही भाग छान जमले आहेत.
-अमित

एकलव्य's picture

2 Aug 2008 - 10:23 am | एकलव्य

आताच वाचले बरं का. पहिला भाग तर झकासच (विशेषतः तयारी वगैरे...) आणि दुसर्‍याची लज्जत न्यारीच. टारझनच्या गँगमध्ये सामील व्हायला हवे तर... चीअर्स

(दहावीपार घराण्याचा झेंडा फडकविणारा आणि आफ्रिकेत बर्‍यापैकी मित्रमैत्रिणी बाळगून असणारा) एकलव्य

अनामिक's picture

29 Jul 2008 - 6:36 am | अनामिक

अफ्रिकेतलं निसर्ग सौंदर्य बघायला नक्किच आवडेल. मस्त झालाय हा लेख पण!

ईथे लोक १०-१० वर्षे सुद्धा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड म्हणून एकत्र रहातात.

अमेरिकेत आल्यावर सुरवातीला मीपण चाट पडलो होतो. एक मजेशीर गोष्ट आठवतेय - मझ्या एका मित्रा बरोबर मी एका पार्टीला गेलो असता एका अमेरिकन माणसाने त्याला विचारले "तुला मुलं आहेत का?"... हा म्हणाला हो म्हणून. ... त्यावर त्या माणसाचा पुढचा प्रश्न - "तुझं लग्न झालय का?".... मित्र एकदम चाट... !!

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Jul 2008 - 6:12 pm | बिपिन कार्यकर्ते

अवांतर...

चिमणरावांची एक गोष्ट आठवली...

एकदा चिमणराव खानेसुमारीला (जनगनणा करायला) जातात. एका घरात घुसतात. तिथे एक तरूण मुलगी असते. तिला प्रश्न विचारायला सुरुवात करतात. मग एक प्रश्न येतो, 'तुमचं लग्न झालंय?' ती बिचारी लाजून बिजून म्हणते, 'नाही'. पुढचा प्रश्न, 'तुम्हाला मुलं किती?' उत्तर, 'फट्याक, तुझा मुडदा बशिवला मेल्या. ^%#$*(&^' चिमणराव गुल.

:))

बिपिन.

धनंजय's picture

29 Jul 2008 - 6:39 am | धनंजय

लिहायची पद्धत, चित्रे माहिती - सगळे आवडले.

यशोधरा's picture

29 Jul 2008 - 7:23 am | यशोधरा

मस्तच लिहिलेस!

मदनबाण's picture

29 Jul 2008 - 7:39 am | मदनबाण

असेच म्हणतो.....

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

रविराज's picture

29 Jul 2008 - 7:28 am | रविराज

पहिल्या भागाप्रमाणेच हा ही भाग मस्तच. पण अजुन क्रमशः करता आलं नसत का? ६ महिन्याच्या अनुभवावरती किमान ६ लेख तरी लिही. बाकी प्रवास वर्णन आणि छाया चित्रे छान. तुझी लिहायची स्टाइल मला आवडली.

विसोबा खेचर's picture

29 Jul 2008 - 8:05 am | विसोबा खेचर

लिहिलं आहेस रे कुबड्या. सगळी चित्रंही मस्त. खास करून नोटांचं आणि त्या लहानगीच! :)

अजूनही अगदी अवश्य लिही, चांगलं लिहितोस तू....

तात्या.

पिवळा डांबिस's picture

29 Jul 2008 - 8:33 am | पिवळा डांबिस

इंग्लंड-अमेरिकेला जाणार्‍या लोकांनी लिहिलेले त्यांचे अनुभव खूप वाचायला मिळतात! कधी कधी तर वीट येण्याजोगे!!
पण अफ्रिकेत गेलेल्या माणसाचे अनुभव इंटरेस्टिंग वाटले.....
यामुळे झालं काय की मी रोज ३०,००० - ५०,०००शिलींगचं एकटा खातो हे मला पचायला जड जात होतं. पण चलन भिकार असलं तरी महागाई फार आहे.
हा, हा, हा!!!! अरे चलन भिकार आहे म्हणुनच महागाई फार आहे.......
त्यातही मी सेंट-सेंटचा विचार करणारा अट्टल पुणेकर असल्याने ऑर्डर करण्याआधी मोबाईल वर ते किती रूपयांत पडतं याचा विचार करत असे. ५०,०००शिलींग म्हणजे बापरे १२०० रुपयांच जेवण? अबब !!!
आता तरी तुझा भारतीयपणा (पुणेरीपणा असं म्हणायचंय पण त्या जाज्वल्य पुणेकरांशी व्यनिची मारामारी नको!!!) आता जरा सोड!! अरे मस्त खाना खिलाना/खाना इज मोस्ट इंपॉर्टंट! कितना पैसा खर्चा किया ये तो बादकी बात है!!!!
ईथल्या जंगली लोकांना (जे शेती करतात, पशुपालन करतात) त्यांना मसाई म्हणतात.
जरा सांभाळून रे बाबा!! ते लोक फार अभिमानी असतात म्हणे! ज्या गोष्टी ऐकल्यात त्यावरून ते कोणाचाही क्षुल्लक कारणावरून कोथळा बाहेर काढतात असं ऐकलंय!! (आमचा अब्दुलखान तरी काय वेगळा होता म्हणा!!!!:))
या आमची अफ्रिका बघायला , मला विश्वास आहे तुम्हाला अफ्रिका निराश नाही करणार
जरूर! पण ते एडसचं जरा थोडं सांभाळायला हवं!!:)
ह.घ्या....
असो,
उत्तम चित्रण, अजून येऊ दे!!

प्राजु's picture

29 Jul 2008 - 8:34 am | प्राजु

कुबड्या खविसा.. मस्त लिहिलं आहेस. दोन्ही भाग आवडले. वर्णन अगदी सुंदर. माझे बाबा होते काही महिने टांझानिया मध्ये त्यांच्या तोंडूनही बरीच माहिती ऐकली आहे.
लेखन आवडलं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सुचेल तसं's picture

29 Jul 2008 - 8:57 am | सुचेल तसं

कु.ख.

दोन्ही भाग मस्त लिहीले आहेस.

http://sucheltas.blogspot.com

प्रमोद देव's picture

29 Jul 2008 - 9:00 am | प्रमोद देव

प्रशांत मस्त लिहीतोस तू! असाच लिहीता राहा.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

भडकमकर मास्तर's picture

29 Jul 2008 - 9:00 am | भडकमकर मास्तर

मी त्याचा अपमान करून पण त्याला वाईट वाटलं नसावं. कारण जाताना मला म्हणाला "थिंक ओव्हर ईट अगेन !!" माझा पारा आधिच चढलेला, मी मराठीतल्या चतुर्थ श्रेणीतली स्तुतीसुमनं बिंधास्त हासडली.
बाप रे बाप ... :०
आई-बापाचे लग्न लावणारा तो ईवलासा शाहिद कपूर पाहून मी धन्य झालो......म्हंटलं भिषी बिशी लावत असतील,,...खायला नसलं चालेलं यांच्या बुडाला कार हवी.
=)) =))
ऐकीव माहीतीच्या आधारे, काही लोक आयुष्यभर काहीही ऊद्योग न करता जगतात.

हे तर लै आवडलं....
__________________
अवांतर : तो अनेक माणसं मारणारा इदि अमिन नामक प्रशासक / हुकुमशाहा युगांडाचाच ना ? युगांडाच्या एकूणच इतिहासाबद्दल लिहिलं तरी वाचायला आवडेल...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मनस्वी's picture

29 Jul 2008 - 10:29 am | मनस्वी

मस्त लिहिलं आहेस टारझना.
दोन्ही भाग छान झालेत.
फोटो पण छान आलेत.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

मनिष's picture

29 Jul 2008 - 10:36 am | मनिष

दोन्ही भाग मस्त झालेत...

आधी वाचलेला एक आफ्रिकेवरचा लेख आठवला (लिखिकेचे नाव विसरलो) - त्यांना म्हणे तिथल्या स्थानिक कामवाल्या विचारायच्या त्यांच्या मुलांकडे बघून - "सेम फादर, सेम मदर?" -- त्यांना असाच जोरदार कल्चरल शॉक बसला होता! :)

श्रीमंत दामोदर पंत's picture

29 Jul 2008 - 10:38 am | श्रीमंत दामोदर पंत

दोनही भाग उत्तम...........

आजुन लिही फार मस्त लिहितोस तु..........

आजुन खूप काही वाचायला आवडेल तु लिहिलेले........

नंदन's picture

29 Jul 2008 - 11:36 am | नंदन

लेख आवडला. किस्सेही मस्तच. कु. ख. ब्वना औरभी लिखो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Jul 2008 - 11:48 am | बिपिन कार्यकर्ते

अरे, तू तर म्हणाला होतास की हे कंटाळवाणं होईल का काय... अजिबात नाही रे... छानच लिहिलं आहेस. मुद्देसूद आणि नीटनेटकं. (शेवटी सॉफ्टवेअर वाला ना तू) फोटू पण छानच. आता पुढे आफ्रिकेतल्या वन्यजीवनावर पण होऊन जाऊ दे एखादा लेख.

कीप इट अप.

बिपिन.

स्वाती दिनेश's picture

29 Jul 2008 - 11:50 am | स्वाती दिनेश

आफ्रिका आवडली,चित्रेही मस्त..

ते शेवटी संपूर्ण असं लिहिलय ना ते तेवढं क्रमशः कर आणि आफ्रिकेतले अजून अनुभव येऊ देत,:)
स्वाती

डॉ.प्रसाद दाढे's picture

29 Jul 2008 - 11:53 am | डॉ.प्रसाद दाढे

खविसमहाराज, मस्तच लिहिले आहेत. मला आफ्रिका पाहावयाची खूप इच्छा आहे. बघू कधी जमत॑य ते.
जगातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर 'लेक बाईकाल' रशियात आहे. दुसर्‍या क्रमा॑कावर आफ्रिकेतले 'लेक टा॑गानिका' आहे. लेक व्हिक्टोरिया (उजीजीचा समुद्र) हे ब्ल्यू नाईलचे उगमस्थान एकोणिसाव्या शतकात कॅप्टन जॉन स्पेक व रीचर्ड बर्टन ह्या दोन धाडसी प्रवाश्या॑नी शोधले. ह्या शोधाची रोमा॑चकारी कहाणी बाळ साम॑त लिखित 'शापित यक्ष' (परचुरे प्रकाशन) ह्या बर्टन चरित्रात वाचावयास मिळेल.

सहज's picture

29 Jul 2008 - 12:30 pm | सहज

छायाचित्रे, वर्णन, उपमा, विचार वाचायला खूप मजा आली.

असेच अजुन लिहीत जा.

अफ्रिकन डायरी असे एक नियमीत सदर होऊन जाऊ दे तुझे.

अजुन किती दिवस मुक्काम असणार आहे? एन्जॉय!!!!

II राजे II's picture

29 Jul 2008 - 12:42 pm | II राजे II (not verified)

लेख आवडला. किस्सेही मस्तच

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

प्रगती's picture

29 Jul 2008 - 1:07 pm | प्रगती

लेख खरंच खूप छान झाला आहे, वाचताना एकटीच हसत होते :D
आपली लिहीण्याची पद्धत आवडली.

पद्मश्री चित्रे's picture

29 Jul 2008 - 4:11 pm | पद्मश्री चित्रे

छान च लिहिलं आहेस..
लिहीत जा.

भोचक's picture

29 Jul 2008 - 6:02 pm | भोचक

वाचून मजा आली. आफ्रिकेची सफारी केल्यासारखे वाटले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jul 2008 - 7:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कुबड्या, ( नाव बदल रे :))

आफ्रिकन टूर मस्त, लेखनाची भाषा आवडली त्यामुळे प्रवासवर्णन वाचायचा कंटाळा आला नाही.
फोटोही छानच, क्रमश लिहावे यासाठी शुभेच्छा !!!

काही जेनेटिक बदल होऊन अफ्रिकन डांबर झाले

ह. ह. पु. वा . झाली !!! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धमाल नावाचा बैल's picture

29 Jul 2008 - 7:37 pm | धमाल नावाचा बैल

मस्त रे कुबड्या! और भी लिक्खो!

झकासराव's picture

29 Jul 2008 - 10:19 pm | झकासराव

मस्तच रे.
अधे मधे पेरलेले विनोद मस्तच उगवलेत. :)
अजुन बरच लिहु शकशील अस वाटत.
बघ विचार कर अजुन.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

टिउ's picture

29 Jul 2008 - 10:49 pm | टिउ

हा भाग पण एकदम झकास जमलाय!

ते फार हुषार आहेत. अगदी रूमक्लिनर पण ईंग्लिश मधे बोलतो
हाहा

पाचवी फ विनोद आठवला...अमेरिकेतले लोक फार हुशार असतात. तिथले लहान मुलं पण फाडफाड इंग्रजी बोलतात म्हणे!

सर्किट's picture

30 Jul 2008 - 1:24 am | सर्किट (not verified)

मस्त लिहिलंय कुब्ड्या साहेब !

युगांडाचे नावही चारचौघात घ्यायला आम्हाला लाज वाटते ;-) तुम्ही तर सफरच घडवलीत. वा !

- सर्किट

सूर्य's picture

30 Jul 2008 - 10:11 am | सूर्य

दोन्ही भाग छान झालेत. आफ्रिकेबद्दल अजुन येउद्यात.

- सूर्य

अनिल हटेला's picture

30 Jul 2008 - 3:06 pm | अनिल हटेला

एकद्म बढीया!!

बेट्या मजा करतोयेस तर !!!!

आणी सहा महीन्यात जे पाह्यलस ते

२ लेखात सम्पवलयस!!!

बाकीचे फोटो काय लोणच घालायला ठेवलेत ?

टाक सगळे पूढच्या भागात !!

वाट बघतोये !!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

आनंदयात्री's picture

30 Jul 2008 - 3:36 pm | आनंदयात्री

सही लिहलय रे कुबड्या !! लै लै आवडले ! संपवले उगच यार, सहजराव म्हणतात तशी आफ्रिकन डायरी येउदेच !

चतुरंग's picture

31 Jul 2008 - 12:03 am | चतुरंग

युगांडा आणि एथिओपियाची सफर आवडली रे!
तू लेका धत्तिंग लिहितोस एकदम! मस्त वाटतं वाचायला.

(एक शंका - माझ्या माहितीप्रमाणे केनया आणि टांझानियात राहणार्‍या आफ्रिकन लोकांना मसाई म्हणतात. तू इथे युगांडा आणि एथिओपियन लोकांनाही तोच शब्द वापरला आहेस. त्यामुळे मी थोडा गोंधळलो आहे.)

चतुरंग

प्रियाली's picture

31 Jul 2008 - 12:37 am | प्रियाली

युगांडा आणि एथिओपियाची सफर आवडली रे!

सहमत. वेगळ्या जगाची ओळख झाली. नेहमीच्या इंग्लंड-अमेरिका वार्‍यांनी वात आणला होता. आणखी अफ्रिकन किस्सेही वाचायला आवडतील.

आता थोडा छिद्रान्वेशीपणा आणि त्याबद्दल आगाऊ माफी :)

केनया आणि टांझानियात राहणार्‍या आफ्रिकन लोकांना मसाई म्हणतात - बरोबर

जगातले सर्वात मोठे सरोवर/तलाव -

१. कॅस्पियन समुद्र
२. लेक सुपिरिअर
३. लेक विक्टोरिया - एक नंबरने उतरला तरी समुद्रासारखाच दिसत असावा हे निश्चित.

टारझन's picture

31 Jul 2008 - 1:48 am | टारझन

युगांडा च्या एका बाजुला टांझानिया आणि एका बाजुला केनिया आहे. जिंजा केनियाच्याच बॉर्डर वर आहे. मी चित्रीत केलेल्या कलाकृती मसाई आहेत एवढ नक्की .. युगांडात मसाई रहातात का नाही ते नाही माहीत.
केनया आणि टांझानियात राहणार्‍या आफ्रिकन लोकांना मसाई म्हणतात - बरोबर
शक्य आहे .. मी एकटाच भटकतो आहे ... कोणी खास माहीती देणारं नाही...त्यामुळे त्रुटी असू शकते. मी काही दिवस केनियात पण होतो.. तिथे मसाई समाज वेगळा, जंगला जवळ रहातो .ते शेती करतात आणि गायी (जनावरे) पाळतात.त्यामुळे त्यांना मसाई म्हणतात. आणि त्यामुळे मसाईमारा नावाचे एक मोठे नॅशनल पार्क आहे केनिया मधे. मसाई चा अर्श ' गाय ' असा पण होतो बहूतेक .

१. कॅस्पियन समुद्र
२. लेक सुपिरिअर
३. लेक विक्टोरिया - एक नंबरने उतरला तरी समुद्रासारखाच दिसत असावा हे निश्चित.

चुक सुधारल्या बद्दल धन्यवाद ... ईथे आल्या पासून लोक सांगत .. लेक व्हिक्टोरिया बघुन ये .. ते दोन नंबरचं लेक आहे. त्या आधारे दिली माहिती ...

यात आगाऊ पणा नाही हो .. प्रतिक्रिये बद्दल पुनःश्च आभार !!!

टारझन (गेल्या जन्मीचा खविस)
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.

तू भारी ...तर जा घरी...

चित्रा's picture

31 Jul 2008 - 8:57 pm | चित्रा

एकदम छान, वातावरण डोळ्यासमोर उभे केलेत.
मजा आली.

ऋषिकेश's picture

2 Aug 2008 - 5:50 pm | ऋषिकेश

अतिशय मस्त.. दोन्ही भाग एकदम एकामागोमाग वाचले.. प्रचंड आवडले.. एका नव्या देशाची अनोखी सफर!..
इथल्या माणसांविषयीही येऊ देत.. तुम्ही एकटे फिरता पण लोक भेटत असतीलच की.. अशाच खास आफ्रिअकन वल्लीबद्द्ल वाचायला आवडेल.

जागतिक मॅरेथॉन मध्ये यांच्या स्टॅमिन्याचा हात(पाय) कोणी धरू शकत नाही
हसून दमलो

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

साती's picture

2 Aug 2008 - 8:06 pm | साती

दोन्ही लेख मस्त झालेत. लिहायची स्टाईल छान आहे तुझी.

-साती

प्रकाश घाटपांडे's picture

2 Aug 2008 - 9:36 pm | प्रकाश घाटपांडे


ओळखीचे असून एक तर वाट बदलतात एक तर त्यांचा मोबाईल तुम्ही दिसले की मगच वाजतो.


ही भानगड आमी एखाद्या कार्यक्रमातुन कल्टी मारायची अस्ली मंग वापर्तो.
बरं ते त्से त्से नावाची माशी कुठं भेटली का? आमचे देव गुर्जी म्हनायचे की लई विशारी अस्ते. चावली की मरतयं म्हने मानुस.
आन तिथ पाउस बी राईट टायमाला पडतो. मान्स त्याच्यावरुन घड्याळं लावतात.
प्रकाश घाटपांडे

टारझन's picture

2 Aug 2008 - 11:25 pm | टारझन

बरं ते त्से त्से नावाची माशी कुठं भेटली का? आमचे देव गुर्जी म्हनायचे की लई विशारी अस्ते. चावली की मरतयं म्हने मानुस.
काय सांगता ? अजुन तरी भेटली नसावी .. नाय तर मी लेख कसा लिहीला असता ? थ्यांक्स फॉर सांगिंग आ ? सो नाऊ मी जपुन राहिंग...
त्से त्से तर जपानी कोरियन नाव वाटतय!! आमच्या अफ्रिकेत कुठून आली मग ही ?

आन तिथ पाउस बी राईट टायमाला पडतो. मान्स त्याच्यावरुन घड्याळं लावतात.
ते घड्याळाच नाय माहीत .. पण आपल्या सारखा मिस कॉल नाही देत पाऊस ईथे. एक नंबर पाऊस. ढग आले की पडणारच .. आणि ऊन पण लगेच पडत ...

टारझन (गेल्या जन्मीचा खविस)
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.


तू भारी तर जा घरी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Aug 2008 - 9:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कुबड्या (आम्ही काही लोकं तुला कुबड्या नाहितर खवीसच म्हणणार),

लेका भारी लिहितोस ... यवढे भारी विनोद लिहितोस तर शौचकूप हा शब्द रे कसा विसरलास?

यमी / अदिती/ संहिता / दीदी

सर्किट's picture

4 Aug 2008 - 6:22 am | सर्किट (not verified)

संहिताताई,

आता शौचकूप हा शब्द विसरा. कुबड्याने शौचकंपू हा मराठीभाषेला युगांडातून बहाल केलेला नवीन शब्द आहे. तोच आपण वापरूयात.

उदा. सकाळी उठून शौचकंपूत गेलो असता, कंपूमध्ये कुणी पाणी टाकलेले नाही, हे लक्षात आले, आणि कंपूबाजीवरील विश्वासच नष्ट झाला.

- सर्किट

धमाल मुलगा's picture

4 Aug 2008 - 10:59 am | धमाल मुलगा

कंपूमध्ये कुणी पाणी टाकलेले नाही, हे लक्षात आले, आणि कंपूबाजीवरील विश्वासच नष्ट झाला.

=))
फु..ट...लो !!!!!

मला अजानुकर्णानं अमिताभवर लिहिलेला लेख आठवला :)
अमिताभ परसाकडच्या वाटेने येताना अमरसिंहाच्या हाती टमरेल..इ.इ....

खल्लास!!!

टारझन's picture

4 Aug 2008 - 11:52 am | टारझन

कुबड्याने शौचकंपू हा मराठीभाषेला युगांडातून बहाल केलेला नवीन शब्द आहे.
थ्यांक्स ... मी पण सायंटिस्ट लोकांसारखे चुकून लागलेल्या शोधांच क्रेडिट घेतो ... हाहाहा ....

उदा. सकाळी उठून शौचकंपूत गेलो असता, कंपूमध्ये कुणी पाणी टाकलेले नाही, हे लक्षात आले, आणि कंपूबाजीवरील विश्वासच नष्ट झाला.
=)) =)) =)) जबरा हाणलाय ....

-- ( टारझन ऊर्फ खवीस )

वेदनयन's picture

5 Aug 2008 - 6:38 am | वेदनयन

अगदी छान वर्णन केलयस. अजुन येऊ देत. येतांना एकटाच आणी अखंड ये एवढीच अपेक्षा.

१२ वर्षापूर्वी मी दक्षिण अफ्रिकेत गेलो तेव्हा असाच अनुभव आला होता. अर्थात काही फरक असणारच. केपटाऊन आणि जोहान्सबर्ग येथे सुमारे दोन वर्ष काढलित. केपटाऊन, क्रिकेट, रग्बी, क्रुगर नॅशनल पार्क, वाईन फार्मस, सन सिटी सगळेच अविस्मरणीय. आता अमेरिकेत अगदी विट आलाय तेच तेच बघुन; पण साहेब मनावर घेईल तर शपथ.

दोन्ही भाग मस्त झालेत.

श्रीरंग_जोशी's picture

18 Oct 2021 - 8:55 am | श्रीरंग_जोशी

टारझन यांचे मिपावरचे लेखन प्रथम वाचले असावे. मध्य आफ्रीकेतल्या लोकांबाबत व निसर्गाबाबतची निरीक्षणे उत्तमपणे मांडली आहे. लेखन वाचून मध्य आफ्रीकेला भेट द्यावीशी वाटत आहे.

कपिलमुनी's picture

18 Oct 2021 - 10:37 pm | कपिलमुनी

केनिया चे वाईल्ड लाईफ सुंदर आहे

श्रीरंग_जोशी's picture

19 Oct 2021 - 12:32 am | श्रीरंग_जोशी

जेव्हा जमेल तेव्हा नक्की जाणार.
बहुधा केनियातच एक रिसॉर्ट आहेत ज्यात जिराफ खिडकीतून मान आत आणून आपल्या डायनिंग टेबलवरची न्याहारी खातात :-).

कपिलमुनी's picture

20 Oct 2021 - 2:47 am | कपिलमुनी

जिराफानी खाल्लेल्या पदार्थांचे पैसे दिले जाणार नाहीत .

श्रीरंग_जोशी's picture

20 Oct 2021 - 8:45 am | श्रीरंग_जोशी

त्या रिसॉर्टमधली काल्पनिक पाटी: 'जिराफांना माणसाचे पदार्थ खाऊ घालू नये. आम्ही त्यांना झाडपाला खाऊ घालतो' =)).

Bhakti's picture

18 Oct 2021 - 9:22 am | Bhakti

टारझनप्रशांतचा पहिलाच लेख मिपावरील वाचतेय
आफ्रिकन लेख आवडला :)

Rajesh188's picture

19 Oct 2021 - 2:02 pm | Rajesh188

लेख आवडला .आफ्रिकेत अजुन प्रदूषण नाही .नैसर्गिक साधन संपत्ती विपुल आहे ,हवामान उत्तम आहे हे वाचून स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असा भास झाला.
अशा विपुल संपत्ती चा आफ्रिकन माणूस गरिबीत जीवन जगतो आणि उपरे तिथे श्रीमंत आहेत हे खूप मनाला लागले.
आफ्रिकन लोकांचे जीवनमान उंचावले च पाहिजे.
उपरे ते करणार नाहीत.
स्वतः आफ्रिकन लोकांना स्वतःचा स्वार्थ बघावा.

स्वप्निल रेडकर's picture

20 Oct 2021 - 12:05 am | स्वप्निल रेडकर

छान लेख !फक्त आफ्रिकन लोकांच्या वर्णनावरून आणि शरीरयष्टीवरून दिलेल्या उपमा चांगल्या जेवणात मिठाचा खडा यावा अशा खटकल्या .
आपण भारतीय unconsciously रेसिस्ट वागून जातो कधी कधी. ;)